प. पु. श्रीश्री गणेश महाराज

प. पु. श्रीश्री गणेश महाराज
प. पु. श्रीश्री गणेश महाराज

नाव: प. पु. श्रीश्री गणेश महाराज
प्रात: स्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य श्री गणेश महाराज
कार्यकाळ: (१८४९ ते १९९७)
जन्म: दत्तजयंती १८४९

प. पु. सद्गुरू गणेश महाराज यांचे संपुर्ण "जिवन संन्यस्तवृतीने परिपूर्ण असे की, जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती" याउक्तीने अनंत जिवांच्या कल्याणासाठीअवतरीत झाले. दत्तअवतारी "सरस्वती "गुरूशिष्य परंपरेतील परमहंस पदसिध्द असलेल्य या यतीस कुणी सिध्दमुनी, सिध्ददिगंबर, औदुंबरबाबा, दत्तबाबा,  तथा प्रचलित "गणेशबाबा"या प्रेमभावाने साद घालीत.दत्तगुरूं व श्नीगुरू नृसिंह सरस्वती स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या गाणगापुर क्षेत्री, औदुंबरवाडीचे रहीवासी तळवलकर कुटूंब दत्त दर्शनाला जात असतांना इ. स.१८४९ दत्त जयंती पुण्यपर्वावर "श्रीं"यांचा जन्म झाला जन्म होताच क्षणी दत्त महाराज यती वेशात प्रगट होऊन हे "बालक आमचे आहे व पुढेे संन्यस्थ वृतीचा अंगीकार करून जनकल्याणार्थ जिवन व्यतीत करेल.  व आपल्या कुळाचा उध्दार करेल.  वआपल्या कुळाचा उध्दार होईल"असा आशिर्वाद दिला. दत्त जयंती आणि  दत्त यतींचा आशिर्वाद व दत्त दर्शन, ह्यामुळे त्यांचेलौकीक नामकरण"दिगंबर"म्हणून ठेवण्यात आले.

एक पाठी व प्रखर बुध्दीमत्ता अस६लेल्या दिगंबरांनी पुणे येथे आत्याचे घरी शालेय शिक्षण पुर्ण केले व मुंबई येथिल पुर्वीचे विल्यम् व आत्ताचे विल्सन कॉलेज येथे पुढील सर्व पदवी पर्यतचे शिक्षण संस्कृत व फ्रेंच भाषेसह एम्  ए पदवी विषेश प्राविण्यसह प्राप्त केली. व फरग्युसन कॉलेज येथे विना वेतन अध्यापक म्हणुन विद्यादानास प्रारंभ केला.

 प्रपंच कार्यासाठी जन्मनसुन विश्वकल्याणासाठी जन्म असल्याची जाणीव दत्त यती वारंवार दृष्टांत देऊन गाणगापुरी येण्याचीआज्ञा केली.  तेथे प्रत्यक्ष दर्शन देऊन पुढील कार्यसिध्दीच्या सिध्दतेसाठी १२ वर्षे हीमालयी तपश्र्चर्येसपाठवूनतेथे त्यांचेकडून अनेक प्रकारच्या खडतर साधनसिध्दता कपवून घेतल्या.
तपश्चर्या पुर्ण होताच स्वत: श्रीसद् गुरू नृसिंह सरस्वती स्वामी नी संन्यास दिक्षा देऊन लौकीक गुरूत्व प्राप्तीसाठीअधिकार संपन्न यती सहजानंद सरस्वती  ह्यांचे शिष्यत्व देऊन त्यांचेकडून, सर्व शास्त्रे तंत्र,मंत्र,,यंत्र, यांचे शिक्षण देत सिध्दज्ञानाने परीपुर्ण केले.परिपुर्ण ज्ञान प्राप्तीनंतर गुरू आज्ञेने१२ वर्षे संपुर्ण भारताची पायी यात्रा करून सर्व तिर्थस्थळे, स्थान महात्मेचे दर्शन आणि लोकांची सुख दु:खे,पिडा,अडचणी अनुभवल्या व तिच कार्याची दिशा ठरवून"सकल जन उध्दारणारर्थ, परपिडा निवारणार्थ, हा वसा संपूर्ण भारतभर पद परिभ्रमण करीतअनेक तपा पर्यंत गुरूआज्ञेने लोकोध्दार केला. मात्र हेकरीत असतांना स्वत:चे नाव व प्रसिध्दी ह्या पासुन अलीप्त राहीले.

२४ मे१९७७ रोजी नासिकक्षेत्री भक्तोध्दारासाठी प पू गणेशबाबांचे चरणस्पर्श प्रथम नासिकरोड स्थित लक्ष्मीनारायण मंदिरात स्थिरावले. अंगभर भगवे वस्त्र, हातात जप माळ, काखेत झोळी, भव्य कपाळावरअसलेली नाथ मुद्रा, व जलद चाल. असे ते आकर्षक व्यक्तिमत्व देवतास्वरूप  भासत होते. माध्यांनीपाच घरी भिक्षा, सतत नामस्मरण व दु:खी कष्टी लोकांच्या दु:खावर हळूवार फुंकर घालत मार्गदर्शन, व लहान मुलांवर नामस्मरणाचे संस्कार असा नित्यक्रम होता.कुणी परिचयय विचारल्यास  *"माझे कुणी नाही, माझे काहीही नाही, मी कुणाचाही नाही, तुम्ही द्याल ते नाव, राहील ते गाव, जिथे राहीन ते स्थान"* असा आपला परिचय देत.

अखंड नामस्मरण अखंड जपमाळ, नामावरचीप्रगाढ निष्ठा हेत्यांचे वैशिष्ठ. येणा-या प्रत्येकास नाममहात्म्याचे महत्व पटवून देत परमार्थाची दिक्षा देत.त्यांचेकडे त्याच्या स्वहस्ते रोजनिशीवरील नोंदीप्रमाणे सन १९९५पर्यत त्यांची जप संख्या २६८कोटी इतकी होती. नासिक क्षेत्रीही सकल जनहीताय, सकल पिडापरिहारार्थ, विश्वशांतीसाठी व भक्तोध्दारासाठी अनेक यज्ञ, याग, पुजा, नवनाथपारायणे, श्रीगुरूचरित्रपारायणे, जप अनुष्ठानेकरवून घेऊनअनेकांची कार्यसिध्दी करवून दिली. नाशिकक्षेत्राच्या संपुर्ण वास्तव्यात लहान मोठे ४६५ यज्ञ अनेक थोर मोठ्या यती, संत, महंत, थोर विभुतींच्या उपस्थित संपन्न झाले.

त्यात लक्षात रहाण्या जोगे म्हणज नासिकरोडचा गणपती मंदिरातील पंच कुडात्मक गणेशपंचायत याग, नासिक सॉ मिलचा एकादश कुंडात्मक लक्षलींगार्चनसह अति रूद्रस्वाहाकार,नहात्मासॉमिलचा नवनाथ यज्ञ, महमाने मळ्यातील नवकुंडात्मक नवग्रहाकार नवग्रह याग,आत्ताच्या मंदिराच्या जागेतधनवंतरी याग,सर्वात शेवटचा राष्टसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमातील १०८कुडात्मक महालक्ष्मी महायज्ञ अवधुती पंथानुसार व संन्यास धर्मानुसार एकाच जागी वा ठीकाणी वास्तव्य नसणे हा नियम असतांनाही गुरू आज्ञेने व पुर्व सुकृतानुसार काही भक्तांकडे विशेष कारणाने मुक्काम होता. त्यात 1)लक्ष्मीनारायण मंदिरानंतर, 
2)नवले चाळीतील श्री नावंदर, कांदेचे चाळीतील .
3)कै शिवलींगअप्पा दंदणे  आज या ठीकाणी गणपती मंदीर आहे.
4)जोशी चाळ श्री कलंत्री आज या ठीकाणी गणेश मार्केट उभे आहे
5)नंतर परत श्री मुर्लीधर पांडे यांचे नवले चाळीतील घर
6)काशिनाथ शेठ महमाने लींगायत कॉलनी
7)महात्मा सॉमिल कै लखमसी /कै खिमजीभाईशेठ पटेल
8)कै शामराव भुरे नेहरू नगर
9)श्री चंद्रकांत चित्ताम   नासिक रोड
10) विवेक दंडवते, नासिकरोड, असा प्रवास होता

सन १९७७ ते १९९७ या कालावधीत प पू बाबाजींन कडून अनेक मंदिर, मठांचा जिर्णोध्दार झाला त्यात विषेश

1)साडेतिन पिठापैकी असलेल्या अर्ध पिठ राजराजेश्वरी सप्तश्रृंग निवासीनी मातेचा जिर्णेोध्दार,
2)प प वासुदेवानंद टेंबे स्वामींचे लहान भाऊ ब्र सीताराम महाराज टेंबे यांच्या समाधि मंदीरासमोर असलेले मारूती मंदीर (मारूतीची मुर्ती श्री दंडवते(ताराबाई कुलकर्णी) यांच्या कारंजा मधिल वाड्यातील आहे)
3)कै शंकरशेठ कुलथे यांनी ना रोडला दिलेल्या प्लॉटवर  सुंदर  असे धुर्मवर्ण गणपती मंदीर
4)कांद्याच्या चाळ नासिकरोड येथील गणपती मंदीर
5) शिवाजी नगर नासिक पुणारोड येथील दत्त मंदिर
6)डिजीपी नगर  येथील विघ्नहरण मंदिर
7)अमेरीकेत उपासनी महाराज मठात दत्तपादुकांची स्थापना
8)श्री गजानन महाराज मंदिर इंदौर
9)बालगणेश मंदिर मुरकुटे कॉलनी श्री भास्करराव बोरस्ते
10)बडौदा येथील श्री खेडकर माझलपुर नाका येथिल गणाधिश गणेश
11)बडौदा येथीलmidc तील संजय धर्माधिकारी यांंच्या कंपनीतील गणेश मंदिर
11)नासिकरोड येथिल विद्याविनायक गणेश मंदिर
12)सिडको येथील शुर्पकर्ण गणपती मंदिर
13)इंदिरानगर येथील महादेव मंदिर.

हे जरी असले तरीत्यांचा विशेष ओढा हा कारंजा येथिल श्री गुरूमंदिर दत्त परंपरेतील दुसरा अवतार प प नृसिहसरस्वती स्वामींचे जन्म गाव या ठीकाणी होता व प्रति गाणगापुर चे महत्व पटवून देऊन जिर्णेोध्दार सर्व तोपरी प्रयत्न करून  केले. व वारंवार कारंजाला जात तेथील शैलगमन यात्रेत सर्व भक्तासह सामिल होत. त्यांची प्रमुख आराध्य हे विघ्नहर्ता गणेश उपासना दत्तात्रेय, नवनाथ, अशी होती. त्यांची स्वरचीत दत्तस्तुती, व 23 भजने प्रचलित आहे. ते वर्षातुन गुरूपौर्णिमा व दत्त जयंती दोन वेळी पांढरे शुभ्र वस्र परिधान करत. व वर्षातुन एकदा गुरूकडे निघालो असे सांगुन अज्ञात स्थळी जात बरोबर कुणाला नेत नसत व स्थान हे अज्ञात तच होते. व आल्यावर खुप उत्साही असत.

"नमो हेरंब" हा त्यांचा आवडता सिध्द मंत्र व हाच गुरूमंत्राव्दारे या मंत्राचीच उपासना भक्तांनादेऊन सोबत संकटनाशन गणपतीस्तोत्र, श्री गुरूचरित्र चौदावा अध्याय पठण करण्यास लावून मुक्तीचा सोपान मार्ग दाखवला.

समाधिस्थानेचे संकेत

१९८५ मध्ये प पु बाबाजी कै श्री काशिनाथशेठ महमाने यांचे कडे असताना त्या मळ्यातील औदूबराजवळील जागा मागितली व त्यानी त्वरीत होकार दिला पण नंतर खुप दिवस यावर चर्चा होऊ शकली नाही.पण या औदूंबराजवळ असंख्य अनुष्ठाने, जप, यज्ञ, गुरूचरित्र पारायणे, परंतु कुणालाही कल्पना नव्हती कींवा कळलेही नाही की, या ठीकाणी 12 वर्षा नंतर चिर विश्रीतीची समाधी स्थानाची जागा असेल असेल. संत हे त्रिकालज्ञ असतात आणि सहज बोलण्यातुन बोलता बोलता भविष्यातील संकेत देतअसतात. असेच एकदा आपल्या भक्तांशी हितगुज करतांना अचानकपणे म्हणाले की, माझी निरंतर जपाची माळ ज्या दिवशी दिसेनाशी होईल त्यानंतर 40दिवसांनी आम्ही इहलोकाची यात्रा संपवून या देहाचे विसर्जन होईल.

दिवसा मागुन दिवस जात होते, कार्यक्रम होत होते, विषेश चर्चा या वारंवार राष्टसंत जर्नादन स्वामींचे परम शिष्य व प पु बाबांचे मानसपुत्र प पु माधनगिरी बाबा यांचे सोबत होत. अनेक लांबुन लांबुन संत महंत भेटीला येत होते, भेटीहोत होत्या धार्मिक चर्चा, उद्बोधन होत होते. पण प पु बाबाचे सर्व लक्ष कुठे तरी गुरूआज्ञेकडे लागले होते. कुठेतरी दुरच्या प्रवासाची तयारी करायची होती. व तशी तयारी सुरूही झाली होती. फक्त ती काही  निवडक भक्तांना त्याची जाणिव करून दिली व १९९७ च्या गुरूपौर्णिमेच्या रात्री महायात्रेची तिथी वार नक्षत्र तारीख वेळ एका कागदावर लीहून दिले. व त्या त्या प्रमाणे घडत गेले.

माझा देह कृष्णेत विर्सजन करून जलसमाधी द्या असा प्रेमाचा निरोप संकेताने देत पण नियतीच्या मनात वेगळेच होते. लोकोपचार, भक्तांचे प्रेम यामुळे हे बंध तुटता तुटत नव्हते. त्याच दरम्यान  हातातील जप माळ कुठे गेली हे कळलेच नाही खुप शोधाशोध करूनही सापडली नाही. त्यांना विचारले की मिस्कीलपणे हसत. व याच वेळी मळ्यातील जागेचा निकाल लागला निकालाची पत्र घेऊन श्रीअरूण शेट व अशोकशेट महमाने बाबांकडे आले जागा आपली झाल्याची बातमी दिली.दिलेल्या तारीख वारावर  निश्चिती झाली.

जन्म मरण हे त्रिकाल परमसत्य वय १४८वर्ष. घेतलेल्या लोकोध्दार अवतार कार्याची परिपूर्ण ता झाल्याचे लक्षात येताच देह कृष्णा नदीत विसर्जित करून समाधी घ्यावी ही इच्छा असुनही भक्त आग्रहास्तव योग समाधी व्दारे २२ऑगस्ट १९९७ श्रावण कृ पंचमी   शुक्रवार दुपारी दोन वाजुन बावीस मी देह निजानंदी गमन केले.  हाच दिवस निवडण्याचे कारण म्हणजे त्याचे दिक्षा गुरू व दत्तावतार सद्गुरू नृसिह सरस्वती महाराज यांचा शुक्रवार  निजगमनाचा दिवस व प प वासुदेवानंद टेंबे स्वामी यांची जयंतीयाच तिथी वार नक्षत्रावर होती.

आज ही गुरूमाऊली गणेशबाबा परोक्ष वा अपरोक्षानुभूति भक्तांना देत असुन त्याची प्रचिती अनुभुती येत आहे. भक्तांच्या मनोकामना  पुर्ण करत आहेत.