पूजा सामग्री:- श्रीफळ, सुपारी १२ नग, विड्याची पाने ७ नग, हळद, कुंकुं, अक्षदा, अष्टगंध, भस्म, अत्तर, गुलाब पाणी, गोमूत्र, दुध, दही, मध, तुप साजूक, तेल, कापुसवात, फुलवात, कापुर, खडिसाखर, समई, सुट्टेपैसे, लाल कपडा २.५ मिटर, चौरंग, आसन, श्री नवनाथ फोटो, ताब्या १ नग, काडेपेटी, फुले, हार, फले, रुमाल, निरंजन, अगरबत्ती, धुप, ऊद, श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ, सोवळे किंवा भगवी लुंगी.
सकाळी लवकर उठावे गोमुत्र टाकून स्नान करावे. सुर्यांस अर्ध द्यावे तुळशीस पाणी घालावे नैमित्तिक देवपुजा करावी. मोठ्या मंडळीनां नमस्कार करावा. नियोजीत जागेवर चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र टाकावे त्यावर श्री नावानाथांचा फोटो ठेवावा समोर तांदुळ याची रास मांडावी त्याराशित एक नाणे ठेवावे त्यावर रिकामा ताब्या ठेवावा ताब्यात पाणी घालावे व पाण्यात हळद, कुंकुं, अक्षदा, एक नाणे, एक सुपारी टाकावी ५ विड्याची ची पाने लावावी. त्यावर श्रीफळ ठेवावे. तांब्यास अष्टगंधाची ५ बोटे ओढावीत स्वस्तिक, त्रिशूल काढावे श्रीफळावर ओम काढावा. कलशाच्या उजव्या बाजुस विड्याची २ पाने एक मेकावर ठेवावी त्यावर तांदुळाचीची रास मांडावी राशीत एक नाणे ठेवावे एक सुपारी पंचामृत, गुलाब पाणी शुध्दपाण्याने धुऊन पुसुन त्यावर ठेवावी (गणपतीचे नामस्मरण ११ वेळ करुन) हलद कुंकुं अक्षदा अत्तर गंध फुले वाहावी. मागे एका सरळ रेषेत तांदळाच्या ३ राशी माडाव्या अशा ३ ओळी माडाव्या समोर एक राश माडावी प्रत्येक राशीत एक एक नाणे ठेवावे. एक एक सुपारी घेऊन पंचामृत गुलाब पाणी व शुध्द पाण्याने स्वछं धुऊन पुसुन घ्यावे प्रत्येक राशीवर थोडे भस्म टाकावे व एक एक सुपारी राशीवर ठेवत जावी सर्व सुपारी ठेऊन झाल्यावर अत्तर लावावे. प्रत्येक सुपारीस गंधफुल वाहावे एक एक सुपारीस स्पर्श करुन गायत्री मंत्राचा ११ वेळ जप करावा फुले वाहावी व परत समोरील सुपारीस फुले तुळस पत्रे किंवा बेलपाने वाहत ११ वेळ......"ओम चैतन्य दत्तात्रयाय नम:" जप करावा व प्रत्येक सुपारीस अशीच पुजा करावी नवनाथांच्या नावाचा जप करा फुले तुळस, बेलपाने वाहावी.
ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम:।।
ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम:।।
ओम चैतन्य गहिनीनाथाय नम:।।
ओम चैतन्य जालिंदरनाथाय नम:।।
ओम चैतन्य कानिफनाथाय नमः।।
ओम चैतन्य भर्तरीनाथाय नम:।।
ओम चैतन्य रेवननाथाय नम:।।
ओम चैतन्य वटसिध्द नागनाथाय नम:।।
ओम चैतन्य चर्पटीनाथाय नम:।।
अशा प्रकारे मंत्र म्हणत फुले अक्षदा तुळस, बेलपाने वाहावी. अशी २१ आर्वतने करावी, गुरुनीं दिलेल्या मंत्राचा एक माळ जप करावा. या चौरंगा समोर दुसरा चौरंग माडावा त्यावर लाल वस्त्र टाकावे श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवावा ग्रंथाचे पुजन करावे फुले वहावी चौरंगा भोवती रांगोळी काढावी. उजव्या बाजुस समई ठेऊन पेटवावी समई कायम तेवत ठेवावी ऊद जाळ।वा अगरबत्ती धुप पेटवावा नमस्कार करावा. महाराजांच्या फोटोला हार घालावा.
हातात पाणी घेऊन ३ , ५ , ७ , ९ , ४१ दिवसांचा संकल्प करावा हातातील पाणी जमीनीवर सोडावे. कापुर पेटवून श्री दत्त महाराजांची आरती करावी.
"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" हा जप करावा व हळुवार पणे 'श्री नवनाथ भक्तिसार' ग्रंथ वाचण्यास प्रारंभ करावा.
अगदी शांततेने व एकाग्रतेने वाचन करावे वाचन झाल्यावर निरंजन लावून श्री नवनाथ महाराजांची आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा.
प्रसाद:- खोबऱ्याचा किस अन्यथा सुंठ, खसखस, पिठी साखर ऐकत्र करुन दररोज वाटावे.
दररोज घरातील स्वयंपाकाचे एक पात्र भरुन सकाळ संध्याकाळ नैवद्य दाखवावा. घरात शांतता राखावी अतिथींचा आदर करावा .कुत्र्यास, गोमातेस नैवेद्य द्यावा. भिक्षा मागण्यास कुणी आल्यास यथाशक्ती भिक्षा द्यावी.
श्री नवनाथ महाराज घरात असल्यामुले घराला मंगल दिवस येतिल अशा भावपूर्ण श्र्रध्देने राहिल्यास पुजकास व ऐकणाऱ्यास फारच अलौकिक अनुभव येतील त्यांच्या मनो कामना पुर्ण होउन संसार सुखाचा होईल. आपल्या कामना अकल्पित रीतीने पुर्ण होतील. साधकाने व सर्व परिवाराने पुर्ण शाकाहारी व निरव्यसनी असणेआवश्यक आहे.
ईतर ठिकाणी किंवा परग्रही भोजन केव्हा अन्नग्रहण करु नये शक्य असल्यास उपवास करावा फलाहारी असावे.
परायणच्यासांगतेच्या दिवशी ९ + ३ लहान मुले व एक मेहुण भोजनास बोलवावे. शक्य असल्यास सर्वांना भगवी वस्त्र अर्पण करावी. सर्वांचे पाद्य पुजन करावे भस्म गंध फुले हार घालावे नमस्कार करावा आरती करावी . जेवणासवाढुन दक्षण। ठेवावी.
भोजनास नैवद्य:- मुगाची खिचड़ी, घेवड्याची भाजी, उडदाचे वडे, कढी, पाट वड्या, अळूपान वडी, जोधल्याची खिर, पुरी, मेथी भाजी, डांगर, चटनी, गवार, भेडी, वाल, कारले, काकडी, बटाटे, टोमॅटो ई. यांची मिक्स भाजी करणे सार (आमटी) भजी पापड ताक ईत्यादीचा नैवद्य असावा. सर्वांना पोटभर भोजन द्यावे व आपणहि भोजन करावे.
दुसऱ्या र्दिवशी सकाळी सर्व पुजा उचलुन घ्यावी ग्रंथ पुजेच्या जागेवर ठेवावा फोटो देवघरात ठेवावा बाकी सर्व साहित्य पाण्यात विसर्जीत करावे.
दर गुरुवारी शक्य असल्यास उपवास करावा.
पुरुष व महिला कुणीही श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ पारायण (वाचन मनन) करु शकतात.
नाथांची सेवा कुणीही करण्यास हरकत नाही.
नाथ जात पात धर्म पंथ या लिंग भेद मानत नाहीं.
सर्वांनी आनंदाने नाथांची सेवा करावी व अल्लंख निरंजन पदाची प्राप्ति करावी.
नवनाथ पारायण करण्याचे महत्व
अध्याय १ : समंधबाधा नाहीशी होऊ शकते.
अध्याय २ : धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते.
अध्याय ३ : शत्रूचा नाश , मुष्टियुद्ध , विद्येची प्राप्ती , घरात मारुतीचे वास्तव्य.
अध्याय ४ : कपटाची बंधने सुटतील , शत्रूचा पराभव, राजदरबारी मान .
अध्याय ५ : घरात भूतबाधा असेल, तर थांबेल व पुनः होणार नाही.
अध्याय ६ : शत्रूचे हृदय पालटेल, त्याच्या मनातील कपट जाऊन तो मित्र होईल.
अध्याय ७ : ८४ लाख योनीत जन्म येणार नाही. व्यथा, चिंता संपेल.
अध्याय ८ : दूरदेशी गेलेला मित्र परत येईल. काळजी संपेल.
अध्याय ९ : चौदा विदया व चौसष्ट कला प्राप्त होऊ शकतील.
अध्याय १० : स्त्री - दोष नाहीसे होतील. मन सात्वीक होईल. मुले जगतील .
अध्याय ११ : अग्निपीडा दूर होईल, गृहदोष संपतील, संततीची प्राप्ती होईल.
अध्याय १२ : देवतांचा क्षोभ संपेल व देवता अनुग्रह करतील.
अध्याय १३ : स्त्री - हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल.
अध्याय १४ : कारागृहातून सुटका, निर्दोषपणे लोकांत राहता येईल.
अध्याय १५ : घरातील भांडणे थांबून सुख - शांती लाभेल.
अध्याय १६ : वाईट स्वप्नांचा नाश होईल.
अध्याय १७ : योगसिध्दि लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल.
अध्याय १८ : ब्रम्हहत्येचा दोष संपेल, कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होईल.
अध्याय १९ : परमानंददायी मोक्षमार्ग खुला होईल.
अध्याय २० : मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल.
अध्याय २१ : गो - हत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल.
अध्याय २२ : ज्ञानसंपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल.
अध्याय २३ : घरातील सुवर्ण टिकून राहील.
अध्याय २४ : बालहत्या दोष संपेल व मुले सुखी होतील.
अध्याय २५ : शाप लागणार नाही, मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभेल.
अध्याय २६ : गो - हत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत.
अध्याय २७ : हरवलेली वस्तू मिळेल, गेलेला अधिकार परत मिळेल.
अध्याय २८ : गुणवान स्त्रीशी लग्न होईल व ती अखंड सेवा करेल.
अध्याय २९ : क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल.
अध्याय ३० : चोरांची दृष्टी नाहीशी होईल.
अध्याय ३१ : शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत.
अध्याय ३२ : गंडांतरे संपतील, आयुष्य वाढेल.
अध्याय ३३ : धनुर्वात होणार नाही व झाला असेल तर बरा होईल.
अध्याय ३४ : सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल.
अध्याय ३५ : महासिध्दी प्राप्त होऊन बेचाळीस पिढ्यांचा उध्दार होईल.
अध्याय ३६ : साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल.
अध्याय ३७ : दु:शीलपणा संपून विदया प्राप्त होईल.
अध्याय ३८ : हिवताप, नवज्वर व इतर ताप नाहीसे होतील.
अध्याय ३९ : युध्दात विजय प्राप्त होऊ शकेल.
अध्याय ४० : कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील. संपूर्ण नवनाथ वाचनाने पुण्य वाढेल.
ओम नमो आदेश....आदेश.....आदेश...!
नव नाथ गायत्री मन्त्र
१) श्री आदिनाथ गायत्री मन्त्र-
ॐ आं आदिनाथाय विद्महे, ॐकार स्वरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्
२) श्री उदयनाथ गायत्री मन्त्र-
ॐ उं उदयनाथाय विद्महे, धरित्री रूपाय धीमहि, तन्नो पराशक्ति प्रचोदयात्
३) श्री सत्यनाथ गायत्री मन्त्र-
ॐ सं सत्य नाथाय विद्महे, ब्रह्मा-स्वरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्
४) श्री सन्तोषनाथ गायत्री मन्त्र-
ॐ सं सन्तोषनाथाय विद्महे, विष्णुरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्
५) श्री अचम्भेनाथ गायत्री मन्त्र-
ॐ अं अचम्भेनाथाय विद्महे, शेषस्वरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्
६) श्री गजबेली गजकन्थड़नाथ गायत्री मन्त्र-
ॐ गजबेली गजकन्थड़नाथाय विद्महे, गणपतिरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्
७) श्री चौरंगीनाथ गायत्री मन्त्र-
ॐ चौं चौरंगीनाथाय विद्महे, चंद्ररूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्
८) श्री मत्स्येन्द्रनाथ गायत्री मन्त्र-
ॐ मं मत्स्येन्द्रनाथाय विद्महे, मायास्वरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्
९) श्री गोरक्ष गायत्री मन्त्र-
ॐ गों गोरक्षनाथाय विद्महे, शून्यपुत्राय धीमहि,तन्नो गोरक्ष निरञ्जन प्रचोदयात्
१०) श्री नवनाथ गायत्री मन्त्र-
ॐ ह्रीं श्रीं क्रीं नवनाथाय विद्महे, सर्वस्वरूपाय धीमहि, तन्नो अलख निरञ्जन प्रचोदयात्