जन्म: १७-०५-१९१८
कार्यकाळ: १९१८ – १९८७
आईवडिल: योगीनी सोनामाता/स्वामी शिवानंद
समाधी: ०६-१२-१९८७
गुरु: परशुराम
श्रीजी म्हणून जगन्मान्य असलेले परमसदगुरू श्री गजानन महाराज यांची माता एक श्रेष्ठ योगीनी होती तर पिताश्री नादब्रम्ह योगी होते. सदगुरू हे सर्वज्ञानी असतात तर ते जगताच्या उध्दारासाठीच जन्मास येतात. हे तर परमसदगुरू, त्यांच्या जन्मापूर्वीच जगनियंत्याने त्याचे पदरी एक अदभुत बालक जन्मास येणार अशी पूर्वसुचना दिली होती आणि हीच सुचना परत जन्मवेळीच अज्ञात शक्तीकडून देण्यात आली आणि जगताचा तारणहार व मार्गदर्शक जन्मास आला. त्यांचा जन्म १७ मे १९१८ ला खरगपूर येथे झाला.
श्रीच्या स्वत:च्या गरजा अत्यंत मर्यादित होत्या. एक धोतर कंबरेभोवती तर एक खांद्यावर टाकत असत. त्यांचा अधिकतर वेळ ध्यान ध्यारणेत एका लाकडी स्टंडवर बसवून घालवीत असत. त्यांचे भक्त सर्व भारतवर्षातूनच नव्हे तर जगाच्या कानाकोप-यात विखुरलेले आहेत. त्यांना वेदांचे प्रथम आकलन व ज्ञान झाले. त्यांना याच काळात आत्मज्ञान झाले. ते म्हणत मुक्ती ही फक्त आपल्या परमेश्वराचे चरणासि पूर्ण शरणागतीनंतरच प्राप्त होते. आपली पूर्ण साधना भक्ती अंतिम ईश्वरप्राप्तीच्याच ध्येयाने प्रेरीत असावी. २७ सप्टेंबर १९४४ (दसरा) या दिवशी श्रीनी त्यांचे गुरूचरणाशी शपथ घेतली, मी वेदज्ञान जनता जनार्दनासाठी त्यांचे आकलन शक्तीनुसार पुनर्मांडणी करील व त्यांनी तसे करण्यास प्रारंभ केले. त्यांचे गुरू श्री परशुराम हे भगवंताच्या दश अवतारांपैकी एक होते.
गजानन महाराज म्हणत असत माझे सर्व आयुष्य हे भगवंतासाठीच अर्पण केलेले आहे. त्यांच्या इच्छेनुसारचे मी पूर्ण आयुष्यभर व्यतीत करीन. भगवंताला जो मार्ग जनता जनार्दनाने अवलंबावा असे वाटते तो फक्त माझ्या माध्यमातून भगवंत करवून घेतो. आपण सर्वच भगवंताचे गुलाम आहोत.
ते म्हणत आम्ही लोकांना गुरू म्हणून संबोधुन असे सांगतो. तरीसुध्दा गुरूपद लोकांनीच आमच्यावर थोपले आहे. अनेकांना आमच्यात दिव्यशक्तींचा प्रादुर्भाव जाणवतो. अनेकांना अनेक दिव्य चमत्काराची अनुभुती जाणवली. पण आम्ही या चमत्काराचे कर्ते नसून फक्त प्रत्यक्षदर्शी आहोत. सर्व कर्तृत्व सर्वशक्तीमान परमेश्वराचे आहे. अवकाश फक्त तुमच्या पूर्ण समर्पणाचा आहे. श्री १९८६ जानेवारीमध्ये म्हणाले, तुम्ही जेव्हा भगवंताचे चरणी पूर्ण समर्पण भाव ठेवला तर बाकी सर्व सर्वशक्तीमान परमेश्वरच करतो. तुम्ही त्याला समर्पण करा तो तुमची सर्व पापे भस्मसात करतो.
सुर्योदय व सुर्यास्तावेळी केलेया अग्नीहोत्राने वातावरणशुध्दी व पूर्णतया समर्पणची स्थिती निर्माण होते. सुर्योदयाच्या वेळी
सुर्याय स्व: । सुर्य इदं मम ।
प्रजापते स्व:। प्रजापते इदं मम ।
सुर्यास्ताचे वेळी
अग्नये नम: । अग्नये इदं मम ।
प्रजापते स्व: । प्रजापते इदं मम ।
सूर्य म्हणजे आपणास दृष्टीस दिसणारा सूर्य नव्हे. अनेक सूर्य या मंडलात आहेत. त्यांना व त्यांच्या कर्त्या प्रजापतीस हे समर्पण. आपल्या शेजा-यास । आप्तास परमेश्वर स्वरूप समजा. त्यांच्यावर प्रेम करा. त्यांचा जन्म मे १९१८ व २५ डिसेंबर १९४१ त्यांना आत्मबोध झाला. हे दोन्हीही दिवस तपोवन अक्कलकोट्मध्ये साजरे केले जातात.
गजानन महाराजांना कल्की अवतारच मानले जाते. त्यांनी कायम मानवतेच्या व प्रेमाचाच संदेश दिला. त्यांची वेदविद्येची व्दारे सामान्य जनांना उघडून दिली. अनेक वर्षापासूनची सत्ययुग व सत्यधर्माची पु:नस्थापनेचा त्यांनी प्रयत्न केला.
त्यांचे पिताश्री स्वामी शिवानंद हे शिवावतारी मानले जातात तर माता योगिनी या गायत्री अवतार मानल्या गेलेल्या आहेत. त्यांचा निवास राजीमवाले येथील राजपरिवारातील मानला जातो. त्यांचे पोटी आलेले गजानन याचा जन्मच जगाला सत्य व प्रेमाचा मार्ग दाखवण्यासाठीच मानला जातो. प.पू.उपासनीबाबा यांचा आशीर्वाद योगिनी मातेला गर्भावस्थेतच खरगपूर येथे प्राप्त झाला. श्री भाऊसाहेब शिंगवेकर साकोरीत वेदविद्या शिकवीत. ते गजानन महाराजांचे आजोबा होते.
श्री स्वामी समर्थ शिष्य प.पू. बाळप्पा स्थापीत श्री गुरूमंदीराच्या गादीचे ते उत्तराधीकारी होते. त्यांनी शिवपुरी आश्रमाची स्थापना केली. एके दिवशी संध्याकाळी गुरूमंदिरात सायंप्रार्थनेच्या वेळी भगवान परशुरामांनी स्वत: श्रींना आशिर्वाद दिला होता व अत्यंत प्रभावी त्रीपुरी मंत्र दान केला. त्यांनी सोमयाग केला. तो जवळजवळ २५०० वर्षांनी कोणी असा याग केला. श्री स्वत: शिवपुरीत रहाण्यास आले. त्यांना शिवपुरी हे सत्यधर्माचे प्रचाराचे स्थान म्हणून विकसित करायचे होते.
त्यांनी ४ मे १९८४ ला परशुरामजयंतीलाच आपला देह विसर्जन केला.