जन्म: बार्शी
गुरु: गुळवणी महाराज, ब्रम्हश्री दत्तमहाराज कविश्वर शास्त्री
कार्यकाळ: प्रधान विश्वस्त वासुदेव निवास, पुणे
श्री. शरद शास्त्री जोशी बार्शीतील हे अत्यंत धार्मिक व अत्यंत पूण्यशील अशा धार्मिक कुटुंबात जन्माला आले. त्यांच्या कुटुंबास पाच पिढ्यांचा श्रीमद् भागवत कथनाचा वारसा लाभला आहे. श्री महाराजांना घराण्याची वैश्विक परंपरा आहे. ते उच्च विद्या विभूषीत एम.ए.बी.एड. असून साहित्य विशारद आहेत. त्यांचे वडिल व आजोबा दोघेही संस्कृत विद्वान होते.
पूण्यपावन कुटुंबात जन्मलेल्या जोशी महाराजांना अगदी लहान वयातच श्री.प.पू.योगीराज गुळवणी महाराजांकडून शक्तीपात दिक्षेचे कृपादान प्राप्त झाले. प.पू.श्री ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर यांचेकडून मंत्र दीक्षा प्राप्त झाली. प.पू.योगतपस्वी नारायणकाका ढेकणे महाराज यांच्याकडून शक्तीपात दिक्षेचा अधिकार प्राप्त झाला. प.पू.नारायणकाका ढेकणे दत्तवासी झाल्यानंतर त्यांचेच इच्छेने श्री शरदशास्त्री जोशी महाराज वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त म्हणून गादीवर आरूढ झाले.
त्यांनी प्रधान विश्वस्त म्हणून कार्यभार स्विकारल्यावर त्यांनी महायोग व वासूदेव निवासमध्ये कालानुरुप बदल केले. अत्यंत प्रभावी अशी वेबसाईटची निर्मीती करून फ़ेसबुक व साईटच्याद्वारे देशातील व विदेशी साधकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयास सुरु केला आहे. प्रत्येक गोष्टीत वैयक्तीक लक्ष घालून वासुदेव निवास येथे अनेक अध्यात्मिक व सामाजीक उपक्रम सुरू केलेले आहेत. श्री जोशी महाराज स्वत: प्रत्येक भक्त, संस्था यांचे पर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजून त्यांना अध्यात्मिक मार्गदर्शन करतात. त्यांच्या अथक परिश्रमाने श्रीवासुदेव निवास येथे कार्यक्रम सुरु असतात. महिन्याच्या पहिल्या रविवारी सामूदाईक साधना घेऊन तद्नंतर ते साधकांना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शनही करतात. ते अत्यंत प्रभावी वक्ते व अत्यंत उत्तम प्रशासक आहेत.
आज श्री शरदशास्त्री हे वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त आहेत व वासुदेवानंद सरस्वती स्वामी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आहेत. संस्कृत वाग्डवाहिनी बार्शीचे ते संस्थापक सदस्य. ते विश्व महायोग व वासुदेवानंद सरस्वतीच्या योगदानासाठीच्या परिषदेचे मानद प्रवर्तक आहेत. त्यांची पार्थेय व संस्कृती अशी प्रकाशने असून वृत्तपत्र व मासिके यांतून ते सातत्याने स्फुट लेखन करीत असतात. वासुदेव निवासमधून प्रकाशीत होणाऱ्या त्रैमासिकांतही ते सातत्याने भक्त व साधकांना मार्गदर्शन करतात. त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वतींचे सर्व वाङ्मय ‘जसेच्या तसे’ पुनर्मुद्रित करून भक्तांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले आहे. सध्या महायोग देशातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात प्रचार करण्याचे महान कार्य श्री महाराज करीत आहेत. त्यासाठी लागणारे सर्व वाड्मय निर्मिती व प्रसार हे मुख्य कार्य आहे.
श्री शरद जोशी महाराज यांना खालील सन्मान प्राप्त आहेत :
१) श्री जगद्गुरु श्री शृंगेरी पीठ पुरस्कार.
२) बार्शीनगर परिषद - गुणवंत पुरस्कार.
३) मातोश्री सरोज कुलकर्णी पुरस्कार.
४) अखिल भारतीय किर्तन/प्रवचन कुळसंस्था पुरस्कार.
५) श्री ब्रह्मश्री दत्त महाराज कविश्वर पुरस्कार.
६) कृतज्ञता पुरस्कार श्री क्षेत्र आळंदी
७) श्री साई सेवा संस्थान विशेष पुरस्कार पुणे
८) योग तपस्वी पुरस्कार मुंबई
याखेरीज अनेक धार्मिक, सांस्कृतीक, शैक्षणिक संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे व पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या नृसिंहवाडीतील वास्तुचे नुतनीकरणाचे कार्य पूर्ण झालेले आहे. श्री शरदभाऊ जोशी अत्यंत विद्वान, प्रभावी वक्ते अत्यंत शिस्तप्रिय असल्याने त्यांचे काळवधीत वासुदेव निवास, महायोग साधनेचे कार्य दुप्पट वेगाने प्रगतीपथावर राहील यात शंका नाही. श्री गुरुचरणी एवढीच प्रार्थना की त्यांना शतायुष्य व आरोग्य लाभावे.
॥ श्री गुरुदेव दत्त ॥