जन्म: ४/११/१८४५, कुलाबा, जि. शिरढोण, पनवेल तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
वडील: बळवंत फडके
कार्यकाळ: १८४५ - १८८३
मार्गदर्शन: श्री स्वामी समर्थ
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म: हिंदू
प्रभाव: महादेव गोविंद रानडे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे
निर्याण/समाधी: १७/२/१८८३, एडन येथे जन्मठेप भोगताना मृत्यू
आद्य क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेल जवळील शिरढोण येथे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. कल्याण येथे प्राथमिक शिक्षण संपवून ते इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले. गिरगावातील फणसवाडी येथील जगन्नाथाचे चाळीत वास्तव्य करून त्यांनी काही काळ इंग्रजी अभ्यास केला व पुढील शिक्षणासाठी ते पुण्यास रवाना झाले. शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या सैनिकी लेखानियंत्रक (कंट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊंटस) कार्यालयात सेवा केली. त्यांना त्यांच्या आजारी आईला भेटण्यास रजा मिळाली नाही. प्रश्न मनात आला जर आपणास आपल्या आईला भेटता येत नसेल तर त्या नोकरीचे मोल काय? त्यात आईचे निधन झाले व शेवटी भेट घेता आली नाही. या घटनेने आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्याच वेळी हिंदुस्थानात भीषण दुष्काळ पडला. इंग्रज सरकारच्या हलगर्जी कारभाराचे मुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे इंग्रज राजवटी बाबत प्रचंड संताप त्यांचे मनात उफाळून आला व त्याचा प्रतिशोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र बंड करण्याचे ठरवले. परिणामी त्यांना शिक्षा होऊन त्यांना एडन येथे धाडले गेले. व तेथेच त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ ला मृत्यू आला. १८५७ च्या अयशस्वी क्रांती पर्वानंतर भारतीय स्वातंत्र्याचे ध्येय स्पष्टपणे समोर ठेऊन ब्रिटिश राजवट उलथून टाकण्याचा जो सशस्त्र प्रयत्न झाला तो वासुदेव बळवंत फडके यांचे बंडच होय. त्यात त्यांना रामोशी, भिल्ल, आगरी, आणि कोळी तरुणांचा पाठिंबा मिळाला. या वीराच्या स्मरणार्थ स्मारक समिती स्थापन होऊन अनेक सामाजिक कामे केली जातात.
अव्वल इंग्रज काळातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे एक थोर दत्तोपासक म्हणून प्रसिद्ध आहेत. यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील शिरढोण गावी झाला. कर्न्याळ्याची किल्लेदारी फडके यांच्या घराण्याकडे होती. लहानपणापासूनच वासुदेव हूड व बंडखोर वृत्तीचा होता. कल्याण, मुंबई, पुणे येथे थोडेफार शिक्षण झाल्यावर त्या वेळच्या जी. आय. पी. रेल्वेकंपनी, ग्रॅंट मेडिकल कॉलेज इत्यादी ठिकाणी नोकरी करणाऱ्या वासुदेवाच्या मनात इंग्रजी राजवटीविषयी तिरस्कार उत्पन्न होत होता. सत्तावनच्या युद्धाची प्रेरणा त्याच्या मनात होतीच.
पुण्याच्या फायनान्स ऑफिसात नोकरी करीत असताना त्यांच्या मनातील वैराग्यवृत्ती उसळून वर आली. मंत्रतंत्र, सत्पुरुषांच्या गाठीभेटी यांत त्यांना गोडी वाटे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनाही ते भेटले होते. वासुदेव बळवंतांचे आराध्य दैवत श्रीदत्त हेच होते. श्रीपादवल्लभ नामक ध्यानाचे एक चित्र त्यांनी एका चित्रकाराकडून मुद्दाम काढवून घेतले होते. दत्ताचे हे रौद्र दर्शन त्यांच्या बंडखोर मनाला प्रेरणा देई. त्याची नित्य ते पूजा करीत. रोज ते श्रीगुरुचरित्राच्या पोथीचा अध्याय वाचीत. दत्तांच्या आराधनेचा व उपासनेचा एक ग्रंथ ‘दत्त महात्म्य’ नावाचा प्रसिद्ध करण्याचा त्यांना मानस होता. गंगाधरशास्त्री दातार यांच्याकडून ‘दत्तलहरी’ या स्तोत्राचे भाषांतर करवून वासुदेव बळवंतांनी प्रसिद्ध केले होते.
राजद्रोहाखाली यांना हद्दपारीची शिक्षा झाली. एडन येथेच जन्मठेप भोगीत असताना त्यांचे निधन झाले. ‘दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांसाठी दिल्या. हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये?’ अशी त्यांची वृत्ती होती.
वासुदेव बळवंत फडके हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.
येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.
वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. १८७३ मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी 'ऐक्यवर्धिनी संस्था' सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये १८७४ मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन' ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.
वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्तमहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.
”दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवासाठी दिल्या; मग हे भारतीयांनो, मी आपला प्राण तुमच्या साठी का देऊ नये?” - वासुदेव बळवंत फडके. भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक हुतात्मा वासुदेव बळवंत फडके यांच्या त्यांच्या देश सेवेस त्रिवार वंदन. तसेच अध्यात्मिक जीवनास परिपूर्ण म्हणता येईल. त्यांनी राष्ट्रकार्य अध्यात्मिक जीवनाने परिपूर्ण केले.
वासुदेव बळवंत फडके यांचे निधन !
माघ शुद्ध एकादशी शके १८०४ मध्ये या दिवशी महाराष्ट्रातील आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे एडन येथील काराग्रुहात निधन झाले.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या या वीरश्रेष्ठाला काळ्या पाण्याची शिक्षा होऊन एडन येथील तुरूंगात डांबुन रहावे लागले होते. त्यांचा मुक्त आत्मा रोगांनी जर्जर झालेल्या शरिरात तडफड करीत होता. दोन वर्षांपूर्वीच तूरूंगातून पळुन जाण्याचा धाडसी प्रयत्न वासुदेव बळवंतांनी केला होता. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर अधिकची बंधने घातली होती. जीवन अधिक कष्टदायक झाले होते. मन व शरिर खंगुन गेल्याने उत्साह पार मावळला होता. दुर्धर अशा क्षयरोगाने त्यांना पछाडले होते. तेथील अधिकारी त्यावेळी फलटन येथील डॉ. बर्वे हे होते. ओळखीचे, जवळचे आणि मायेचे एकच व्यक्ती म्हणजे डॉ. बर्वे. वासुदेव बळवंतांना आता फक्त म्रुत्युची आशा राहिली होती. घरदार शेकडो मैलांवर राहिले होते. म्रुत्युची वाटचाल करणारे वासुदेव इंग्रज सरकारवर मनातुन चरफडत होते. आणि माघ शुद्ध एकादशीचा दिवस उजाडला त्यांच्या अंगातील ताप वाढला. अखेरची घटका जवळ आली व सायंकाळी साडेचारच्या सुमारास वासुदेव बळवंत यांचे निधन झाले