श्री क्षेत्र दुसखेड

श्री समर्थ बाळानंद स्वामी महाराज समाधी मंदिर
श्री समर्थ बाळानंद स्वामी महाराज समाधी मंदिर 

श्रीक्षेत्र दुसखेड गाव महाराष्ट्र खान्देश  पो. पारधाडे, ताल. पाचोरा, जिल्हा- जळगांव येथे बहुळा नदीच्या तटावर आहे. येथे समर्थ बाळानंद त्यांना मिळालेली प्रासादिक दत्तमूर्ती श्री दत्तमूर्तीचे मंदिरात आपणास बघावयास मिळेल. विलोभनीय दत्तमूर्ती ४ ते ७ इंच उंच व बहुमूल्य धातूची एकमुखी व ६ हात असलेली आहे. 

तीर्थयात्रा

इ.स. १७७४ पासून श्री क्षेत्र दुसखेड - श्री क्षेत्र माहूर अशी दर वर्षी यात्रा सरु झाली. श्री बाळानंद स्वामींनी ६५ वर्षे अखंडपणे श्रीक्षेत्र दुसखेड- श्रीक्षेत्र माहूर पायी यात्रा केल्या. यात्रेचा ही परंपरा त्यांचे वंशज ह्यांनी आजही सुरु ठेवले आहे.

इ.स. २०१९ मध्य श्रीक्षेत्र दुसखेड- श्रीक्षेत्र माहूर प्रती वर्षी च्या २४५ यात्रा पूर्ण झाल्या या कालावधीत ५ ते ६ पिढ्यांचा कालखंड व्यतीत झालेला आहे. तेव्हापासून आज पर्यंत प्रतिवर्षी ही एकमुखी दत्तमूर्ती घेऊन श्री दत्तजयंतीस श्रीक्षेत्र माहूर येथे जाणेची परंपरा अखंडपणे सुरू आहे. श्री बाळानंद महाराजास मिळालेली   प्रासादीक दत्तमूर्ती आज ही आपण दुसखेड येथील गावात असलेल्या मंदिरात बघू शकता. दत्तस्वरूप श्री समर्थ बाळानंद स्वामी महाराज यांच्या कृपेने संकटे आपोआप नष्ट होतात. 

महानिर्वाण

इ.स. १८३९ मध्ये दुसखेड येथेच देह ठेवला व त्याच जागेवर त्याचा समाधी बांधण्यात आली आहे

समाधी

श्रीक्षेत्र दुसखेड येथ श्री बाळानंद महाराजांची समाधी आहे. समर्थांची समाधी गावाजवळच बहुळा नदीचे पात्रात पुर्वाभिमुख आहे तशी श्रीक्षेत्र माहूर येथे हा बाळानंद महाराज यांचे विठ्ठल मंदिर (मठ) आहे. हा मठ म्हणजे एका महान सत्पुरुषाची स्मृती आहे.

मंदिर व्यवस्थापन

श्री बाळकृष्ण महाराज (पाठक)  मु. दुसखेड, पो. पारधाडे, ताल. पाचोरा, जिल्हा-  जळगांव

श्री दत्त मूर्ती
समर्थ बाळानंद महाराज यांना मिळालेली प्रासादिक दत्तमूर्ती