वैशिष्ट्य पूर्ण दत्तमूर्ती

25 मुखी दत्त महाराजांची मूर्ती तामिळनाडू मध्ये आहे. प्रत्येक चेहऱ्यावरचे भाव वेगळे आहेत. श्रीचरणी कोटी कोटी नमन !
25 मुखी दत्त महाराजांची मूर्ती तामिळनाडू मध्ये आहे. प्रत्येक चेहऱ्यावरचे भाव वेगळे आहेत. श्रीचरणी कोटी कोटी नमन !
श्री स्वामी समर्थांच्या पूजेतील दत्तमूर्ती
श्री स्वामी समर्थांच्या नित्यपूजेतील दत्तप्रभूंची दिव्य मूर्ती

सदर दत्त मूर्ती 350 वर्षापूर्वीची आहे. दत्त मूर्ती हि स्वामी समर्थच्या पूजेत होती. नंतर त्यानी त्याचे शिष्य चिदंबर दिक्षित यांना दिली. पूढे चिंदबर दिक्षित यांनी हि मूर्ती त्याचे शिष्य नागलिंग स्वामी (कर्नाटक) यांना दिली. पूढे नागलिंग स्वामी यांनी मूर्ती नामदेव महाराज चहाण यांना दिली व करवीर क्षेत्री जाण्यास सांगितले व साक्षात दत्त भेटेल म्हणाले. हि मूर्ती घेऊन श्री नामदेव महाराज करवीर क्षेत्री (कोल्हापूर) आले तिथ त्यांना गंगावेशेत शेषनारायण मंदिराजवळ दत्त अवतारी श्री कृष्ण सरस्वती महाराजाची गाठ पडली.

या मूर्तीचे वैशिष्ठ म्हणजे दत्ताची मूर्ती किंवा फोटो हे ब्रम्हा विष्णू महेश असे असतात पण मूर्तीत महेश मध्ये आहे म्हणजे ब्रम्हा महेश विष्णू अशी एकमेव गुरु शिष्य पंरमपरतील आहे. सदर मूर्ती दोनदा चोरीला गेली होती. तेव्हा दत्त महाराजानी श्री नामदेव महाराजाच्या स्वप्नात दृष्टात देऊन अंबाबाई मंदिरा जवळील जुने वणक्रूद्रेचे भांडयाच्या दुकानातून घेऊन जायला सांगितले. तेव्हा  दोनशे रू. देऊन हि मूर्ती श्री नामदेव महाराजानी परत घेतली.

आज हि मूर्ती कोल्हापूरात शुक्रवार पेठेत पंचगंगा रोड येथे श्री नामदेव महाराज मठी येथे पहायला मिळते.

चिकोडी दत्त मंदिर (प्रति नुर्सिहवाडी)
चिकोडी दत्त मंदिर (प्रति नुर्सिहवाडी)

चिकोडी दत्त मंदिर (प्रति नुर्सिहवाडी)

ओम श्रीगुरुपरात्परगुरू पादुकाभ्यो नामोनम:

पुण्याचे रघुनाथ नरसिंह मामलेदार हे चिकोडी (बेळगांव) येथे मामलेदार होते, ते चिकोडी न्यायालयात नोकरीस होते, निस्सीम श्री दत्त भक्त असल्याने दर पौर्णिमेस घोड्यावरून श्रीक्षेत्र नुर्सिह वाडीस दर्शनासाठी जात असत. एका पौर्णिमेला दानवाड येथील दुधगंगा नदीला पूर आल्याने त्यांना घोड्यावरून नदी पार करता आली नाही. त्यामुळे पौर्णिमेची वारी खंडित झाली. त्यांना अतीव दुःख झाले. त्यावेळी त्यांनी नदीकाठीच विश्रांती घेतली असता त्यांना महाराजांचा दृष्टांत झाला. इथून पुढे तू माझ्याकडे येऊ नकोस, मीच तुला दर्शन देण्यासाठी तुझ्या गावामध्ये प्रकट झालो आहे. ओढ्याशेजारी औदुंबर वृक्ष आहे, तिथे माझ्या पादुका आहेत त्या शोधून त्यांची प्रतिष्ठापना करावी. ह्यानंतर मामलेदारांनी चिकोडीत येऊन अशी जागा कुठे आहे ह्याची चाचपणी केली असता चिकोत्रा नदी मानल्या जाणाऱ्या मोठ्या ओढ्याकाठी औदुंबराच्या वृक्षाजवळ पादुका मिळाल्या. ह्या पादुका घेऊन जेष्ठ वद्य तृतीयेस शके १७७७ ला त्यांची स्थापना करून मंदिर बांधले. काही काळ त्यांनी नित्य सेवा केली. नंतर बदली झाल्याने त्यांनी काही पुजाऱ्यांची नियुक्ती केली.

ह्या मंदिरात नित्य रुद्राभिषेक आदी विधी होतात. ह्या मंदिरात -श्रीधरस्वामी, थोरले महाराज, त्यांचे सहपाठी दीक्षित स्वामी, कांचीकामकोटीचे शंकराचार्य आदी सिद्ध येऊन गेल्याचा उल्लेख आहे.

पादुका पाषाणाच्या असून साडेचारशे किलो वजनाच्या आहेत. सोन्याच्या कासवावर त्या प्रतिष्ठापित करण्यात आल्या आहेत. अतिशय पवित्र, सुंदर असे हे मंदिर आहे. चिकोडी येथील मुख्य पुजारी श्री रामचंद्र पुजारी, ह्यांच्यामुळे आमचे दर्शन झाले, योगायोग ! आधी औदुंबर, मग नुर्सिहवाडी, श्री स्वामी समर्थ पादुका कार्यक्रम, आणि हे दर्शन झाले.

श्री क्षेत्र काशी येथे प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज्यांनी श्री दत्त मुर्ती व वीश्वेश्वर लिंग स्थापून अगस्तेश्वरला अर्पण केले तेच हे स्थान
श्री क्षेत्र काशी येथे प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज्यांनी श्री दत्त मुर्ती व वीश्वेश्वर लिंग स्थापून अगस्तेश्वरला अर्पण केले तेच हे स्थान.