श्रीमद् गोविंद स्वामी महाराज

जन्म: ज्ञात नाही.
आई/वडील: ज्ञात नाही.
गुरु: ज्ञात नाही.
शिष्य: वासुदेवानंद सरस्वती.
विशेष: निर्याण प्रसंगी वेदांताचे सर्व ज्ञान वासुदेवानंद सरस्वती याना दिले.

नृसिंहवाडी क्षेत्रातील तपोनिधींच्या मालिकेतील श्रीमद् गोविंद स्वामी हे ब्रह्मनिष्ठ महापुरूष होते. त्यांचे ब्रह्मानंदांच्या मठातच वास्तव्य होते. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती हे गोविंद स्वामींना गुरुस्थानी मानत असत. श्रीमद् गोविंद स्वामींचे श्रीवासुदेव शास्त्री (प. प. वासुदेवानंद सरस्वती) च्या वर अकृत्रिम प्रेम होते. श्रीमद् गोविंद स्वामींनी निर्वाणकाळी वेदांताचे रहस्य श्रीवासुदेवशास्त्रींना सांगून त्यांना अनेक दुर्मिळ मौल्यवान ग्रंथ दिले.

गोविंद व मौनी स्वामी हे समकालीन होते. त्यानाही श्री दत्ताचे सांगणे होत होते. प. पु. टेम्बे स्वामींची वाडीत प्रथम  कोणाशीच ओळख नव्हती. नेसलेला एक मळकट पंचा व एक पांघरलेला असा वेष असलेले टेम्बे स्वामी ब्राम्हण तरी आहेत की नाहीत? असा पुजाऱ्याना संशय आल्याने त्यांना श्री पादुकांवर पाणी घालू दिले नाही. तेव्हा ते नुसते दर्शन घेऊन मुकाट्याने वर येऊ लागले. इतक्यात श्री गोविंद स्वामींना प्रभूंचे सांगणे झाले की, पोथी वाचण्याचे सोडून मंडपात काय चालले ते पहा. त्या बिचाऱ्या लांबून आलेल्या ब्राम्हणाला पुजारी पाणी घालून देत नाहीत. हे सांगणे झाल्यावर गोविंद स्वामी ताबडतोब उठून खाली आले. वासुदेव शास्त्री खिन्न चित्ताने वर येत होते. त्यांना पाहिल्यावर गोविंद स्वामी म्हणाले 'शास्त्रीबुवा पादुकांवर पाणी घातले की नाही ?' नंतर शास्त्रीबुवानी घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा गोविंद स्वामींनी आपला दंड त्यांचे हाती दिला व ते श्रीच्या  मंडपात आले. नंतर शास्त्री बुआनी गुरुपादुकाना पाणी घातले. त्या वेळी त्यांना गुरुकृपेची अगाध लीला अनुभवता आली. गोविंद स्वामींचा समाधी काळ जवळ आला तेव्हा  शास्त्रीबुवा वाडीतच होते. त्यांना त्यांनी दशओपनिशीद सांगून पूर्ण आशीर्वाद दिला. समाधीचे अधलेदिवशी शास्त्री बुवाना उद्या गोविंदस्वामी देह सोडतील असा द्री्ष्टांत झाला तेव्हा बुआ त्यांचे जवळच बसून राहिले. जेव्हा गोविंद स्वामींचे निर्वाण झाले तेव्हा मौनी स्वामीसारख्या जीवन्मुक्त यतीलाही अतिशय दुःख झाले. नंतर यार्थशास्त्र कृष्णेच्या प्रवाहात स्वामींचा देह विसर्जन करण्यात आला. शेवटी मौनी स्वामींचे आज्ञेनुसार बुवाचे हस्ते समराधन करण्यात आले.

श्रीमद् गोविंद स्वामी ज्या ठिकाणी ध्यानास बसत त्या स्थानाला ‘गोविंदपूर’ म्हणतात. त्या गोविंदपुरावर एक अश्वत्थ वृक्ष आहे. पादुका असलेली दोन-तीन मंदिरे इ. देवांची मंदिरे आहेत.

श्रीमद् वासुदेवानंद सरस्वतींच्या अलौकिक जीवनात श्रीमद् गोविंद स्वामींचे स्थान अढळ आहे.