स्थान: आष्टे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली
सत्पुरुष: श्री दत्तमहाराज
विशेष: श्री दत्तमंदिर, दत्तयंत्र
दत्तमहाराज मंदिर अष्टे, पवित्रतं स्थान!
वेगळ्या वाटा धुंडाळत चालताना जशी आगळीवेगळी माणसे भेटतात त्याचप्रमाणे काही निराळी आणि छानशी ठिकाणेसुद्धा दर्शन देऊन जातात. खरं तर ही ठिकाणं जायच्या यायच्या वाटेपासून अगदी जवळ असतात, पण मुद्दाम त्यांना भेट देण्याचे राहूनच जाते. असेच एक स्थान आहे सांगली जिल्ह्यतील वाळवा तालुक्यातील अष्टे गावचे. दत्तमहाराज मंदिर या नावाने प्रसिद्ध असलेले हे एक जागृत देवस्थान आहे.
हे स्थान सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात आष्टे गावात आहे. हे दत्तमहाराज मंदिर अतिशय जागृत आहे. यामागे काही दंत कथा आहेत त्या या स्थानाशी निगडित आहेत. प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी अष्ट शिवलिंगाची स्थापना केली होती म्हणून या गावाचे नाव आष्टे झाले. या गावी सदानंद स्वामी या महात्म्यांचे वास्तव्य होते. इथे श्री दत्तमहाराज या नावाचे एक मोठे सिद्ध पुरुष होऊन गेले. त्यांचे मूळचे नाव नरहरी दिवाण. ते एकनाथ महाराजांच्या मुलीच्या वंशाचे असल्याचे सांगतात. ते ब्रम्हचारी होते तसेच ते सिद्ध हठयोगी होते.
इ. स. १९६३ मध्ये आष्टे येथे समाधी घेतली. समाधी मंदिरातच श्री दत्तयंत्र व दत्तमूर्ती ठेवण्यात आलेली आहे. श्री दत्त महाराजांच्या गुरूंचे नाव श्री हरिहर स्वामी होय. ते व ऱ्हाडातील होते. श्री वासुदेवानंद सरस्वती टेम्भे स्वामी महाराजांकडून श्री दत्तमहाराजांनी योगसाधना प्राप्त कारून घेतली. त्यानंतर १२ वर्षे तपस्चर्या करून त्यांनी कृष्णा प्रदक्षिणा केली. कर्नाटकातील तंजावर येथे काही क।ळ स्वामींचे वास्तव्य होते व येथेच श्री दत्त प्रभूंचा त्यास अनुग्रह झाला असेही सांगितले जाते. श्री दत्तात्रेयांच्या आदेश नुसार ते बुवाचे वाठार येथे येऊन राहिले. हे त्यांचेच गाव होते. त्यानंतर त्यांनी सर्व महाराष्ट्र।त भ्रमण केले व नंतर आष्टे येथ येऊन त्यांनी समाधी घेतली. आपल्या समाधीची वेळ तिथी त्यांनी आष्टे येथील भक्तांना अगोदरच सांगितली होती. तसेच समाधीची जागाही सांगितली होती. त्याजागी एक मंदिर बांधावे असे हि त्यांनी भक्तांना सांगितले. परंतु लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी स्वामींनी सांगितलेल्या जागी फाल्गुन शुद्ध षष्टी या तिथीला उघड्यावरच समाधी घेतली. मग मात्र गावकरी जागे झाले. तत्कालीन कलेक्टर ट्रोट्मन व आष्टे नगरपालिकेचे अध्यक्ष खर्डेकर यांचे प्रयत्नांनी तेथे समाधी मंदिर बांधण्यात आले. समाधी स्थानावर श्री दत्त यंत्र व दत्तमूर्तीची स्थापना करण्यात आली. ही दत्तमूर्ती स्वामींना दुपारी भिक्षेत मिळालेली होती. या ठिकाणी फाल्गुन शु.६ मोठा उत्सव असतो. तसेच दत्त जयंती ही येथे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. श्रींची मनोभावे सेवा केल्यास भक्तांची संकटे दूर होतात व त्यांस आयुरारोग्य व सौख्यप्राप्ती होते असा भक्तांचा विश्वास आहे.
या ठिकाणी श्री दत्तमहाराज आष्टेकरांनी भक्तांच्या कल्याणासाठी खूप चमत्कार केले. त्यांचे गुरु श्री हरिहर महाराज. पण त्यांना श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचेही मार्गदर्शन लाभले. त्यांनी श्रीकृष्णामाईची केलेली प्रदक्षिणा ही सुद्धा श्री टेंबे स्वामींच्या आज्ञेनेच केली. त्यांनी समाधीदिन खूप आधी नक्की करुन भक्तांनाही सांगितले सांगीतले होते. समाधीत रुद्राक्षमाळा कफनी व हार व त्यांच्या वस्तु ठेवण्यात आलेल्या आहेत.