श्री दत्तमंदिर डभोई, जिल्हा बडोदे

स्थान: डभोई, जिल्हा बडोदे, गुजरात
सत्पुरूष: प. पू. वासुदेवानंद सरस्वती
विशेष:  हजारो पारायणे झालेला परिसर, प. पू. वासुदेवानंद सरस्वती यांनी वारंवार भेटी दिल्या ते पवित्र स्थान

प. पू. वासुदेवानंदसरस्वतीस्वामी (टेंबे)
प. पू. वासुदेवानंदसरस्वतीस्वामी (टेंबे)

प. पू. वासुदेवानंदसरस्वतीस्वामी (टेंबे) गरुडेश्र्वर, यांचे प्रेरणेने डभोई, जिल्हा बडोदे येथे श्रीदत्तमंदिर निस्सीम दत्तभक्त श्री रामचंद्र दत्तात्रय पेडगावकर यांनी स्थापन केले. सन १९४८ साली प्रथम फोटोवरून श्रीदत्तजयंती उत्सव केला. पुढे डभोई येथील एक ब्राह्मण श्री अंबालाल धनसुखलाल दवे यांनी त्यांचे घरात मंदिरासाठी जागा दिली. तेथे सन १९४९ साली दत्तमूर्तीची स्थापना केली. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी यांचे कृपानुग्रहातून या मंदिराची निर्मीती झालेली आहे.

दत्तभक्त श्री पेडगावकर यांना लहानपणापासून श्री क्षेत्र गरुडेश्र्वराचे आकर्षण होते. ते तेथे विविध उत्सवात सहभागी होत असत. त्यांनी वेदतुल्य श्री गुरूचरित्राची अनेक पारायणे केली. एके दिवशी श्रीक्षेत्र गाणगापूराला जाण्याचा दृष्टांत झाला. श्री गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून श्री पेडगावकर गाणगापूरी गेले. तेथे त्यांनी मनोभावे श्रीगुरूंची सेवा केली. गुरुचरित्राची अनेक पारायणे संगमस्थानी केली. तेव्हा आपल्या मूळ गावी डभोई येथे जाऊन पारायणे करण्याची आज्ञा झाली. त्याप्रमाणे त्यांनी ११०० पारायणे केली. त्यानंतर श्री स्वामींचे आज्ञेने श्री क्षेत्र डभोई जि. बडोदे येथे दत्त मंदिराची स्थापना केली. याच मंदिर परिसरात त्यांनी श्री गुरुचरित्र, नवनाथ भक्तिसार, आणि दत्तप्रबोध ग्रंथाची अनेक पारायणे केली. आजही आपण या मंदीरात प्रवेश केल्यानंतर प्रसन्नता व पावित्र जाणवते.

श्रीगुरुचरित्र, नवनाथभक्तिसार आदी ग्रंथांची यांनी पुष्कळ पारायणे केली; तसेच श्रीदत्तबोध ग्रंथाचीही पारायणे केली. गुजरात राज्यात प. पू. वासुदेवानंदसरस्वती स्वामी (टेंबे स्वामी) यांचे प्रेरणेने स्थापन झालेले हेच एक दत्तमंदिर आहे.