अपराधक्षमापनस्तोत्रम्

अपराधक्षमापनस्तोत्रम्
अपराधक्षमापनस्तोत्रम्

रसज्ञा वशा तारकं स्वादु लभ्यंगृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त । क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।१।।

हे दयाळा श्रीदत्तप्रभो, माझी जीभ 'रस' ज्ञान देणारी आहे... ती माझ्या मनानुसार वागते. तिच्याया मनःपुत आचरणामुळे, आपले भवभय दूर करणारे सहज नाम(ब्रह्मरसानेयुक्त), तिने कधीच घेतले नाही. माझ्या या अक्षम्य अपराधाची त्रिवार क्षमा करावी. ('श्री'... नाम न घेणे, हा अक्षम्य अपराध आहे असेठणकावून सांगत आहेत... म्हणूनच श्रीसंताचे आणि आपले मत जुळते का हे पहाणे जरुरी आहे. आपले मत हे आपल्याच 'अज्ञानी' मनाचे दर्शक असते... तर ज्ञात्यांचे मत ज्ञानमय असते)

वियोन्यन्तरे दैवदार्ढ्याद्विभो प्राग्गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त । क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।२।।

हे दत्तप्रभो, या आता मिळालेल्या, मनुष्यजन्माच्या अगोदरच्या.. इतर जन्मात नाम ग्रहणाची पात्रता नसल्यामुळे.. मी नाम कधीच घेऊ शकलो नाही...या माझ्या अपराधाची त्रिवार क्षमा करावी.

मया मातृगर्भस्थितिप्राप्तकष्टाद् गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त । क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।३।।

पुढे मातेच्या गर्भात असताना होणार्या अनंत यातनामुळे मी आपले नाम घेऊ शकलो नाही,हे दयाळा ...या अपराधाची, मला त्रिवार क्षमा करावी.

मया जातमात्रेण संमोहितेन गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त । क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।४।।

नंतर जन्म झाल्याबरोबर.. विष्णुमायेने मोहित झाल्यामुळे, मला आपले नाम घेता आले नाही.. म्हणून हे दयासागरा मला क्षमा करावी.

मया क्रीडनासक्तचित्तेन बाल्ये गृहीतं कदाचिन्न ते नामदत्त । क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।५।।

लहानपणी खेळात मन गुंतल्यामुळे आपल्या नामाचे विस्मरण झाले... त्याबद्द्ल मला क्षमा करावी.

मया यौवनेSज्ञानतो भोगतोषातद् गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त । क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।६।।

तरुणपणी प्रबळ अज्ञानामुळे विषयभोगात रमलो... नामाचे परत विस्मरण झाले याबद्द्ल पुन्हा पुन्हा क्षमा करावी.

मया स्थाविरेSनिघ्नसर्वेन्द्रियेण गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त । क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।७।।

वार्धक्यात इंद्रियावर ताबा नसल्यामुळे नाम घेता आले नाही याबद्द्ल क्षमा असावी.

हृषीकेश मे वाङ्मनःकायजातं हरे ज्ञानतोSज्ञानतो विश्वसाक्षिन् । क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।८।।

हे हृषीकेशा..अशा प्रकारे, जाणते-अजाणतेपणी माझ्या वाणी,मन, आणि शरीर यांच्या द्वारे जे जे अपराध घडले असतील,त्या सर्वांची.. क्षमा असावी.

स्मृतो ध्यात आवाहितोSस्यर्चितो वा न गीतः स्तुतो वन्दितो वा न जप्तः । क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।९।।

हे महाराजा.. मी आपले स्मरण केले नाही, ध्यान केले नाही, आवाहन केले नाही, पूजन-अर्चन केले नाही,गायन केले नाही, स्तवन केले नाही, वंदन वा नामजपकेला नाही.. या अनंत अपराधाबद्द्ल मला क्षमा करावी.

दयाब्धिर्भवादृङ्न सागाश्च मादृग्भवत्याप्तमन्तोर्भवान्मे शरण्यः। यथालम्बनं भूर्हि भूनि:सृतांघ्रेरिति प्रार्थितं दत्तशिष्येण सारम्।।१०।।

हे स्वामीराजा आपण दयेचे सागर आहात आणि मी अपराधाचा सागर आहे.मज अपराध्याचे.. शरणागताचेकेवळ आपणच आधार आहात. अज्ञानाने जमिनीवर पाय घसरून पडल्यावरही जसा जमिनीचाच आधार असतो.. तसाच भक्ताचे आणि माझ्यासारख्या अभक्ताचेही आपणच आधार आहात. अशी ही (वास्तवाचे दर्शन घडविणारी) साररूप प्रार्थना आपल्याला.. आपल्याच शिष्याने केली आहे.

इति श्री प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं अपराधक्षमापनस्तोत्रं संपूर्णम् ।।