सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज

श्रीयोगी मछिद्रनाथ
श्री योगी मछिद्रनाथ

|| ॐ गुरूजी, सत नमो आदेश ||

श्रीमद भागवतात उल्लेख केल्या प्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी "नऊ नारायण " म्हणून प्रसिद्द असलेल्या नऊ मुलांनी जगदुद्धारार्थ अवतार धारण केले. त्यातील कवी नारायणाचे प्रथम अवतार असलेले श्री मत्स्येंद्रनाथ जी होय. श्री नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला आणि "श्री मत्स्येंद्र" हे नामकरण धारण केले. श्री मत्स्येंद्रनाथ जी हे नाथ पंथाचे आद्य नाथाचार्य होत. कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते. सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते. मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात.

जगात सर्वात प्रथम श्री शंकारकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकविला ते स्वामी मछिंद्रनाथ होत. विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारा महायोगी म्हणजेच स्वामी मछिंद्रनाथ होय. शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही. तर देवाधिदेव महादेव आदिमाया पार्वती, भिल्लीणीच्या रुपात असतांना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय, असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारा जगातील महापुरुष म्हणजेच स्वामी मछिंद्रनाथ होय. महादेवाच्या मानसपुत्राला म्हणजेच वीरभद्राला स्वतःच्या  शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालविण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषीश्रेष्ठ, स्वामी मछिंद्रनाथ होत.
महादेव शंकरानंतर ज्या कोणास संजीवनी विद्येचे केवळ ज्ञान होते एवढेच नव्हे, तर त्या अत्यंत कठीण विद्येत पारंगत होते आणि स्वतःवर तसेच मीननाथांवर संजीवनी विद्येचा वापर करून स्वतःचे परमश्रेष्ठत्व सिद्ध करणारे तपोनिष्ठ विभूतिमत्व म्हणजे स्वामी मछिंद्रनाथ होत. गोरक्षासारखा अवधूत स्थिती प्राप्त झालेल्या श्रेष्ठतम शिष्याच्या तपोमयतेचा अहंकार, अत्यंत साध्या लपंडावाच्या खेळाने आव्हान देऊन, त्रिखंडात क्षणात संचार करणाऱ्या गोरक्षनाथांनाही पुनःश्च शरण आणणारे जगातले पाहिले शिवशिष्य स्वामी मछिन्द्रानाथ होय. (मछिंद्रनाथ महाराजांनी जो लपंडाव मांडला, त्यात त्यांनी पृथ्वी, तेज, आप, वायू व आकाश अशी रुपे धारण केली व तेवढेच सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड अगदी चाळणीत चाळुन काढले पण त्यांना स्वामी मछिंद्रनाथ सापडले नाहीत). नवनाथांपैकि आद्यगुरु बडेबाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज संजिवन समाधी मंदिर मायंबा (सावरगाव) या ठिकाणी नाथांचा जन्मोत्सव  ऋषी पंचमीला साजरा केला जातो.

सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज
श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ

श्री चैतन्य मच्छिंद्रनाथांची जन्मकथा

एके दिवशी शिव-पार्वती कैलास पर्वतावर असता, 'तुम्ही जो मंत्र जपत असता, त्याचा मला अनुग्रह द्यावा,' असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, 'मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन; पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेणे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला.

उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की, सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनि ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला; परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये; तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले.मच्छींद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी कितीएक बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिले. तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणी तरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की, हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा. नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्धता स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले, तो पान्हा फुटला. मुलगाहि दूध पिऊ लागला. मग मुलास न्हाऊ-माखू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती; तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यांस अनुपम आनंद झाला.

बालपण

मच्छिंद्रनाथांचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा पिता कामिक, मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरिले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे; असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे, हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेहि करून ह्याचा हा उद्योग हा उद्योग बंद केला पाहिजे, असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या पित्यास इतका राग आला की, तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच प्रकारे ताडन करून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणितो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस; तर मग खाशील काय? भीक मागावयाची असेल अशा लक्षणानी ! असे बोलून तो पुन्हा उदकात शिरला. त्या बोलण्याने मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे, असा विचार करून व बाप पाण्यात शिरलासे पाहून त्याची दृष्टि चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथे त्याने बारा वर्षै तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की, त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला. इकडे श्रीदत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व आदिनाथानची स्तुति करताच आदिनाथाने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले. नंतर उभयतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहाण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन आदिनाथ अरण्यात गेले . त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहाण्याची वासना होऊन त्यास आदिनाथाचा रुकारहि मिळाला. ते उभयता बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले.

तो भी कच्चा बे कच्चा नही गुरू का बच्चा Ι तो भी कच्चा बे कच्चा नही गुरू का बच्चा ΙΙ
गुप्त होकर प्रकट होवे जावे मथुरा काशी Ι ब्रम्हरंद्र से प्राण निकाले सत्य लोक का वासी Ι तो भी कच्चा बे कच्चा नही गुरू का बच्चा ΙΙ
कुंडलिनी खुब चढावे ब्रम्हरंद्र मे जावे Ι चलते है पानी के उपर बोले सो होवे Ι तो भी कच्चा बे कच्चा नही गुरू का बच्चा ΙΙ
कहे मच्छिंद्र सुन रे गोरख तिनो उपर जाना Ι कृपा जब सद्गुरुजी की होवे आप आप को चिना Ι सो ही सच्चा बे सच्चा सो ही गुरु का बच्चा ΙΙ

श्री शिव मच्छिद्रनाथ योगी
श्री शिव मच्छिद्रनाथ योगी

गुरु मच्छीन्द्रनाथ व गोरक्षनाथ व योग

योगशास्त्रावरील श्री मछिंद्रनाथ स्वामी आणि श्री गोरक्षनाथांची सत्ता असामान्य होती. समधीयोग, आत्मबोध, नाद्ब्रम्ह, बिंदूब्रम्ह, शून्यतत्व आणि निरंजन तत्व ह्या सर्वांचे ज्ञान आणि अनुभूती त्यांच्यात परिपूर्णतेने स्थित होती. त्यांच्या ग्रंथसंपदेत ह्याचा पदोपदी प्रत्यय येतो. अद्वयतारक उपनिषद, मंडलब्राम्हण उपनिषदांत उल्लेखिलेले अमूर्त तारकयोग, उत्तरतारक योग, अमनस्क योग हा तर नाथांच्या विशेष अभ्यासाचा विषय होता. चक्रभेदन शून्यभेदनादी अवस्थामधून शिवशक्तीरूप सामरस्य कसे प्रत्यक्षात साधता येते हे ह्या दोन्ही स्वामींनी दाखवून दिले. ते ज्ञान आपल्या मोजक्या शिष्यांना काहीही संकोच न करता, त्यांच्या योग्यतेनूसार दिले. ज्ञानमार्गातील निर्गुणावस्थेच्या अत्यंत अवघड मार्गावर त्यांनी योग्य अशा शिष्य वर्गाला मार्गदर्शन केले. बौद्धांच्या शून्यतत्वाच्या पलीकडे अतिशून्य, महाशून्य, सर्वशून्य ह्या अवस्थांचा भेद करून ब्रम्हरंध्रातील निजवस्तू -सत्य कसे अनुभवावे ह्यावर त्यांचे प्रभुत्व होते. ज्ञान, योग अर्थातच ध्यान ह्या योगांचा समन्वय त्यांनी साधला. तथापी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे आणि पिंडानुसार त्यांनी साधना आणि आचरणाचे नियम घालून दिले. नाथांची विचारधारा फार सखोल होती. द्वैत-अद्वैतापर्यंतच ते थांबले नाहीत. त्याचाही पलीकडे असलेले "द्वैताद्वैत विलक्षण" नाथ तत्व त्यांनी तत्ववेत्त्यांपुढे ठेवले.

मानवी देह कुठल्याही आश्रमात असो - ब्रम्हचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, अगर संन्यासाश्रम, ह्या प्रत्येक जीवन प्रणालीला उपयुक्त अशी साधना त्यांनी सांगितली. त्यांची धर्म संकल्पनाच वेगळी होती. प्रत्येक आश्रम हा त्यांनी धर्मच मानला होता. उन्नत करणारे जीवनाचे कार्य, आचार विचार विवेक पद्धती हाच धर्म त्यांनी मानला. परंतु ती व्याख्या संकुचित कधीच नव्हती. त्यात मानवधर्म हाच अभिप्रेत होता. तो सर्वांसाठी होता आणि विश्वात्मक होता. प्रेमाच्या, समतेच्या आणि विश्वभावाच्या अभेद्य शिलेवर स्थित असलेला तो परिपूर्ण असा नाथांना अभिप्रेत असलेला मानवधर्म होता आणि आहे.नाथांनी कालमानाप्रमाणे कार्याची योजना केली. दृष्टेपणाने केली, हे वर नमूद केलेच आहे. कालाच्या स्थित्यंतरांत जीवन पद्धतीत अमूलाग्र बदल झाला. अस्थिरता वाढली. अशा परिस्थितीत योगाचरण अशक्य नाही, परंतू फारच अवघड झाले म्हणून नाथांनी पूर्वापार सिद्ध असलेल्या भक्तिमार्गाला चालना दिली. नाथसंप्रदायातील विष्णूपूजन, ह्या सगुण भक्तीची साक्ष देते. ज्ञानोत्तर भक्ती सारखेच भक्तीतून निर्माण होणाऱ्या ज्ञानावर त्यांनी भर दिला, डोळस भक्ती शिकविली. तसे अपार योग्यतेचे नाथशिष्य निर्माण केले. श्री गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथ घडविले आणि श्री निवृत्तीनाथांनी आदर्श असे श्री ज्ञानेश्वर महाराज घडविले. परंपरा खुप वाढली आणि वाढत आहे. उच्चकोटीची ग्रंथसंपदा निर्माण झाली. भक्तीचा पूर लोटणारा वारकरी सांप्रदाय उद्यास आला. भक्तीचे एक वेगळे पर्वच सुरु झाले. मानवतेच्या उद्धाराचा प्रत्येक मार्ग कालमानाप्रमाणे नाथांनी विश्वाला प्रदान केला. हे एक महान कार्य आहे. ह्या मार्गात कोणाचाच अव्हेर नाही. त्यांनी नाथतत्व आपल्यापुढे मांडले आहे. दिव्य नाथांनी हे काम केले आहे. ते कृतीत उतरविणे ह्यातच आपला उद्धार आहे. कोणीही अनाथ नाही. चौर्यांशी सिद्ध नवनाथांना हृदयाच्या अंतःकरणातून आदेश.

गुरु शिष्य संवाद- श्री मच्छिद्रनाथ व गोरक्षनाथ संवाद

|| श्री गोरक्षनाथ उवाच  ||
कहां वसे दिन | कहां वसे राती || कहाँ वसे ज्योति ? कहाँ वसे प्राण ? कौन स्थान ये तत् रहे ? सदगुरु होय सो पुच्छ्या कहे ||

यावर मछिंद्रनाथ गुरूंनी खुप अप्रतिम उत्तर दिले.

||श्री मछिंद्रनाथ उवाच||
अवधूत: राती वसे दिन, दिन वसे राती | दिप वसे ज्योति | पिण्ड वसे प्राण | शून्यस्थान ये तत् रहे ऐसा विचार मछिंदर कहे ||

भावार्थ: गोरक्षनाथांच्या साधनामय जीवनात लौकिक काहीच नव्हते. जनरितीमध्ये सहभाग नव्हता आणि म्हणून प्राणविहीन शरीर (गुरु शिष्य भ्रमण करीत असतांना एका मृत मनुष्याच अंत्यविधी पाहून गोरक्षनाथांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले) ते पाहून  प्रश्नमालिका सुरु झाली. 

बारावर्षे तपश्चर्या करतांना दिवसरात्र वर्षमहिने ही कालाची जाणीव हरपल्याने प्रश्न उमटला, 'रात्रंदिनाचे हे चक्र कसे सुरु रहाते ? आणि ज्योतीरुप प्राण असतो तरी कोठे ? आणि अंतिम सत्य कोणते ? त्याच स्थान काय ?' मछिंद्रनाथांचा मानसपुत्र, त्यांनी घडविलेला शिष्य आणि साधनेतूनच उन्नत झालेला नाथोत्तम - गोरक्षनाथ. त्यांच्या वैराग्य मनातल्या प्रश्नांना केवळ सदगुरु स्वामी मच्छिन्द्रनाथच समर्पक उत्तरे देऊ शकतील ; असे ते प्रश्न. स्वताःच्या शिष्याला आदराने "अवधूत" म्हणजेच वैराग्यांचा अग्रणी म्हणणारे गुरु मछिंद्रनाथ उत्तर देत गेले.

अवधू ! रात्रीच्या गर्भात दिवसाचा वास असतो आणि दिवसाच्या पोटी रात्र ही असतेच! या जगाच्या काल गणनेला सुरवात झाल्यापासून दिवस-रात्रीचे चक्र सुरूच आहे, त्यात खंड नाही. दिप प्रज्वलीत झाला की आपण म्हणतो प्रकाश पडला. पण धातूचा अथवा मातीचा दीप असेल तर त्याचा उजेड नाही पडत. तेवढे वात ज्योत तेवते त्या वातीमुळे ठराविक भागापर्यंत मंद प्रकाश पोहोचतो पण त्यापुढे काय. तर प्रत्येक दिपामध्ये ज्योत असते, कधी उजळलेल्या तर कधी न उजळलेल्या वातीच्या रुपात. प्रकाश देण्याची शक्ती त्या ज्योतीमध्ये असते. धातूच्या, मातीच्या, दिव्यामध्ये नाही. त्याचप्रमाणे देहामध्ये प्राण असतो. प्रत्येकाचा पिण्ड (जीव) वेगळा. प्रत्येकात वास करणारा प्राण मात्र एकाच परमात्म्याचा अंश असतो.

गोरक्षा, समजल का?"

'पण गुरूजी, रात्रच नसती तर दिवस कसा निर्माण झाला असता ? आणि इतक्या प्रकाशमान दिवसामध्ये रात्र कशी सामावली ? दिव्याच्या प्रकाशाचे काय ? जर ज्योतच निमावली तर तो प्रकाश कोठे जातो ? आणि जर हे इतके वेगवेगळे देह निर्माण झाले नसते तर त्यामधले प्राण कोठे असते ?.

नवनाथांचे आद्य गुरु आद्य नाथ श्री मच्छिंद्रनाथ यांची जयंती ही भाद्रपद ऋषी पंचमी यादिवशी मानली जाते. मुळातच अयोनीसंभव अवतार असल्याने प्रकट होणे ही तर मुळ चैतन्य शक्तीची एक अगम्य लीलाच्. तरीही आमच्या सारख्या पामरांना त्या मुळ चैतन्य शक्तीचे स्मरण रहावे, त्यानिमित्ताने ईश्वरी सेवा घडावी म्हणून आपल्या ऋषींनी आपल्याला जयंती - प्रकट दिन, समाधी सोहळा साजरे करण्याचे संस्कार आणि प्रथा घालून दिलेली आहे. मच्छिन्द्रनाथांना महाराष्ट्रात आद्य नाथ म्हणून आदरयुक्त प्रेमाने बडे बाबा असेही म्हणतात. मच्छिन्द्रनाथांच्या नावा मध्ये कालानुरूप बदल होत आलेले आपल्याला दिसतात. आधुनिक नाथ साम्प्र्यादांच्या योगीकडून मच्छिन्द्रनाथांचा केला जाणारा उल्लेख म्हणजे "मच्छिंद्रनाथकिंवा मच्छेन्द्रनाथ" हा होय. तर नेपाल मध्ये मच्छिन्द्रनाथांच्या नावाची तुलना बुद्धदेवता अर्यवालीकेतेश्वर यांच्या नावाशी केली जाते. नेपाळमध्ये नाथांची आणखी दोन नावे "करुणामय आणि लोकनाथ" हि आहेत. तसेच नेपाळमधील नाथांचे प्रसिद्ध नाव म्हणजे "रतो मत्सेन्द्रनाथ" हे आहे अर्थात पावसाचा देव ...God of Rain

सिद्धी प्रवृत्ती या महान ग्रंथामध्ये नाथांचा उल्लेख "मिनापा वर्ज्पदा" हा झालेला आहे तर अभिनव गुप्त याने लोकतंत्र मध्ये नाथांचा उल्लेख माछान्दाविभू असा केलेला आहे.

आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा । मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। १।।
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला । गोरक्ष वोळला गहिनीप्रती ।।२।।
गहीनिप्रसादे निवृत्ती दातार । ज्ञानदेवे सार चोजाविले ।।३।।

विश्ववंद्य माऊली श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांनी आपली श्रेष्ठ गुरु परंपरा सांगतांना हा वरील अभंग रचलेला आहे.  ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायी होते.  

भागवतामध्ये दिलेल्या माहितीनुसार ऋषभदेवाचेएकूण १०० पुत्र होते असे वर्णन आहे, त्यापैकी ९ विरक्त होते तेच हे नऊ नारायण कवी, हरी, अंतरिक्ष,
प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस वकरभाजन आणि यानींच कलीयुगामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार पृथ्वीवर नवनाथ रुपाने पुन्हा अवतार घेतला. त्यांची क्रमश: नावे; 

प्रथम पुत्र कवी हा “मच्छेंद्रनाथ” या नांवाने जन्मला. 
”अन्तरिक्ष” याने “जालंदर” या नांवाने जन्म घेतला. 
यांच्या शिष्य रुपाने प्रबुद्ध “कानिफा” या नांवाने अवतरीत झाला. 
पिप्पलायन “चर्पटनाथ” नांवाने अवतरित झाला. 
अविर्होत्र हा “नागेशनाथ” या म्हणून अवतरित झाला. 
द्रुमिल याने “भर्तरीनाथ” या नांवाने अवतार घेतला. 
चमस हा “रेवणनाथ” या रुपात अवतरित झाला आणि 
करभाजन “गहनिनाथ” या नांवाने जन्मला.

नाथ संप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा अवतार मानतात. तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिध्द आहे. श्री मच्छिंद्रनाथांच्या जयंती निमित्त श्री मच्छिंद्रनाथ गड म्हणजेच सावरगांव मायंबा येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. श्री मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे, त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य अनुभवता येते याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सेवाच रुजू करत आहे असे वाटते. भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तिच्या सुगंधाने परिसर अगदी उल्हासित होतो. गडावर श्री माच्छिन्द्रनाथांची चैतन्य समाधी आहे तेथून जवळच पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर आहे. हि देवी नाथांनी मानलेली बहिण आहे गडावर अखंड धुनी असते ती कधीच विझत नाही. धोंडाई देवीच्या डोंगराखाली एक तलाव आहे त्याला "देव तळ" (तलाव) म्हणतात. गडावर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत आणि आता तर मढी ते मायंबा नविन रस्ता झालेला आहे.

मच्छिंद्रनाथाचा जन्म, त्याची तपश्चर्या

कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले. त्यावेळ सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता. जवळ उद्धवहि होता. इतक्यात कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्धि, पिप्पलायन, अविर्होत्र (ऐरहोत्र), चमस, द्रुमिल, (ध्रुवमीन) आणि करभाज असे नऊ नारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांस आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले. नंतर त्यांनी षोडशोपचारांनी पूजा केली. तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणिले, असे नवनारायणांनी हरीस विचारिले. तेव्हा त्यांने त्यास सुचविले की, आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत. जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात, त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्युलोकात प्रगट होऊ. हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना ! आपण आम्हांस अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की, तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की, आम्हासच अवतार घ्यावयास सांगता, असे मनात आणू नका. तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्युलोकी अवतार घेणार आहेत, प्रत्यक्ष कवि वाल्मीकि हा तुळसीदास होऊन येईल. शुकमुनि हा कबीर, व्यासमुनि तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल. जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेउन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल. मीसुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपति शंकर हा निवृत्ति होईल. ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्ताबाई होईल. हनुमंत हा रामदास होईल. मजशी रममाण होणारी जी कुब्जा ती जनी दासी या नावाने उघडकीस येईल. मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्तिमहात्म्य वाढवू.

अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रगत व्हावे ते सविस्तर कळविण्याविषयी नवनारायाणांनी पुन्हा विनंति केली. तेव्हा हरीने त्यांस सांगितले की, पराशर ऋषीचा पुत्र जो व्यास मुनि त्याने भविष्यपुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेविले आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचा वीर्यापासून अठ्यांयशी हजार ऋषि निर्माण झाले. त्याप्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे; पैकी थोडासा भाग तीनदा यमुनेत पडला. त्या तीन भागापैकी दोन भाग द्रोणात पडले व एक भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळिले तिच्या उदरात कवि नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे. शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नि काढून जाळून टाकिलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे; यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रीतीने की, कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे, त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील; तेव्हा द्विमूर्धन (अग्नि) गर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंदराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे. अठ्यायशी हजार ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे, तेते चमसनारायण याने रेवणसिद्ध या नावाने प्रगट व्हावे. त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाहि मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जनमेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी सार्‍या सर्पांची आहुति दिली; त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे, असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वडाच्या झाडाखाली लपवून ठेविले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे होते तसे आहे, त्यात आविर्होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तीस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल, त्यात सूर्य आपले वीर्य सांडील, ते उकिरडामय असेल; त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे. दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्नसमारंभसमयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले; त्यासमयी त्यास परम लज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य रगडून चौफेर केले, त्यावेळी ते एके बाजूस साठ हजार ठिकाणी झाले, त्याचे साठ हजार वालखिल्य ऋषी झाले. दुसर्‍या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले ते कुश बेटात गेले; ते अद्यापि तेथे तसेच आहे. यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरी या नावाने भिक्षापात्र कैलीकऋषीने आंगणात ठेविले होते; त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले; ते त्याने (भर्तुहरि) तसेच जपून ठेविले आहे. त्यात धृवमीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाची वीर्य गळाले; त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला, त्यात करभंजनाने संचार करावा. अशा रीतीने, कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे, ह्याही नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले, तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधिस्त होऊन राहिले. पुढे हे नऊ व शुक्राचार्य असे दहा जण निघाले.

एके दिवशी शिव-पार्वती कैलास पर्वतावर असता, 'तुम्ही जो मंत्र जपत असता, त्याचा मला अनुग्रह द्यावा,' असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, 'मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन; पण यासाठी एकांतस्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभयता एकांतस्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता. यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केले व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वतीस सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता, ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तो मंत्र ऐकत होता. तेणे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तो ब्रह्मरूप झाला.

उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले, इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की, सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनि ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्यास शंकराने सांगितले की, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला; परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बदरिकाश्रमास ये; तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले.

मच्छींद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी कितीएक बकपक्षी मासे धरावयास यमुनातटी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिले. तेव्हा त्याची दोन शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिऊन पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदीप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणी तरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की, हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. ह्या बालकास तू आपल्या घरी घेऊन जा. नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. ह्याच्याविषयी तू मनात किमपि संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्यास घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्धता स्त्रीस दिले व मुलगा आपणाला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले, तो पान्हा फुटला. मुलगाहि दूध पिऊ लागला. मग मुलास न्हाऊ-माखू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयताना मूल व्हावे म्हणून आशा सुटली होती; तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यांस अनुपम आनंद झाला.

मच्छिंद्रनाथाचे वय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक, मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळे पसरिले आणि पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळे घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे; असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे, हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करू जनमेजय राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेहि करून ह्याचा हा उद्योग हा उद्योग बंद केला पाहिजे, असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की, तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बर्‍याच चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणितो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस; तर मग खाशील काय? भीक मागावयाची असेल अशा लक्षणानी ! असे बोलून तो पुन्हा उदकात शिराल.

त्या माराच्या तिरिमिरीसमसे मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे, असा विचार करून व बाप पाण्यात शिरलासे पाहून त्याची दृष्टि चुकवून मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बदरिकाश्रमास गेला. तेथे त्याने बारा वर्षै तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की, त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला.

इकडे श्रीदत्तात्रेयाची स्वारी शिवालयात गेली व शंकराची स्तुति करताच शंकराने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भेट देऊन आलिंगन दिले व जवळच बसविले. नंतर उभयतांनी एकमेकांस नवल वर्तमान विचारले. तेव्हा बदरिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहाण्याची दत्तात्रेयाने आपली इच्छा असल्याचे शंकरास कळविले. मग त्यास बरोबर घेऊन शंकर अरण्यात गेला. त्याच समयी मच्छिंद्रनाथाचा उदयकाल होण्याचे दिवस आल्याकारणाने तो योगायोग घडून येण्यासाठीच दत्तास अरण्य पाहाण्याची वासना होऊन त्यास शंकराचा रुकारहि मिळाला. ते उभयता बदरिकावनातील शोभा पाहून आनंद पावले.

श्री  मच्छीन्द्रनाथ व गिरनार पर्वत

रम्य वनश्रीने नटलेल्या, गर्द गीर च्या जंगलाने वेढलेल्या, सिंह-व्याघ्र यांचे निवासस्थान असलेल्या परमपवित्र गिरनार पर्वतराजी मधील कथा.

नुकताच वर्षा ऋतू सरलेला. सगळीकडे हिरवळ पसरलेली अशा उन्मादक वातावरणात मच्छिंद्र ध्यान लावून बसलेले. दत्त महाराजांची स्वारी आली गुरू शिखरावर. मच्छिंद्रनाथांनी नेत्र उघडले आणि दत्तात्रेयांना आदेश केला. दत्त म्हणाले "मच्छिंद्रा वातावरण बघ कीती मोहक झालंय! मला वनविहार करण्याची प्रबळ इच्छा होते आहे. ह्या माझ्या प्रिय गिरनार चे सौंदर्य बहरून आले आहे. चल ऊठ आपण फेर फटका मारून येऊ." मच्छिंद्रनाथ म्हणाले "प्रभो मी आपला प्रिय पुत्र आहे. आपली ईच्छा पूर्ण करणे माझे भाग्यच होय." दोघेही गुरूशिखरावरून खाली उतरू लागले. वाटेत एक श्वान त्यांच्या सोबत येऊ लागला. थोड्याच वेळात ते दोघेही खाली उतरून गर्द जंगलात प्रवेशले. वनराज सिंहाने डरकाळी फोडून दोघांना आदेश करण्याचा प्रयत्न केला! वनराई चे निसर्ग सौंदर्य पाहून दत्त हरपून गेले. एका औदुंबर वृक्षाच्या छायेत बसले. मच्छिंद्रनाथांना म्हणाले, "पुत्रा किती वर्ष माझ्यापासून व आपल्या ह्या गिरनार पासून तू दूर राहिलास! किती प्रसंग सोसलेस बाळा! जगाच्या कल्याणासाठी दारोदार फिरलास. भिक्षेच्या रूपात लोकांचे दैन्य-दुःख झोळीत घेतलेस. मायास्वरूपात जरी स्त्री राज्यात गेलास तरी लोकांचे बोल तुला सोसावे लागले. मन कापून ऊठते जेव्हा लोक म्हणतात पहा दत्त पुत्र नाथपंथाचा निर्माता अध्वर्यू मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात जाऊन सुख भोगून आला! असं वाटत की माझ्या हातात फिरणारे हे सुदर्शन चक्र सोडून आत्मरंध्राची किंकाळी फोडत त्या लोकांचे शीर धडावेगळे करावे! पण नियतीपुढे मलाही झुकावे लागते. गोरक्षाने तुला स्त्री राज्यातून सोडवून आणले. माझ्या मनाचे समाधान केले. न जाणो किती वर्षे झाली रे तुझे रूप बघून. तुझा आदेशाचा मंजुळ आवाज ऐकून. तुझे तेजस्वी निळे डोळे बघून!
ये बाळ असा दूर का ऊभा? माझे हृदय तुला जवळ घेण्यासाठी तळमळते आहे!"

महाराजांच्या नेत्रातून अश्रूपात होऊ लागला! हे पाहून मच्छिंद्रनाथांना गहिवरून आले...त्यांनी पळत जाऊन अनसूयात्मजाला कंठभेट दिली. काय वर्णावा तो क्षण? माय-लेकरू एकरूप झाले! थोड्या वेळाने दोघेही स्थिर झाले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, "हे करुणानिधी आपण असे भावनाविवश झालेले मला पहावत नाही. तुम्ही जाणता लोकोद्धारासाठी मला आपल्यापासून व गिरनार पासून पुन्हा विलग व्हावे लागणार आहे. गर्भगिरी पर्वतावर अक्षय निवास करण्याचा माझा विचार आहे! माझा प्रिय पुत्र गोरक्षनाथाला मी इथेच गिरनार वर राहून आपली सेवा करण्याचा आदेश केला आहे. आम्हा नव नाथांचे देह कार्य समाप्त झाले आहे. आता आम्ही गुप्त रूपात कार्य करणार आहोत. आपली आज्ञा असावी."

दत्त म्हणाले, "हृदयावर पाषाण ठेवून मला तुला निरोप द्यायला लागत आहे रे. ठीक आहे. जाऊन रहा गर्भगिरी वर. लोक तुला मायबा म्हणूनही ओळखतील. गर्भगिरी पर्वताला मी प्रती गिरनार असण्याचा वर देतो आहे! गिरनार व गर्भगिरी मध्ये काही फरक नाही. मच्छिंद्रा तु माझेच प्रतिरूप आहेस. तुझे दर्शन म्हणजे माझे दर्शन घेतल्या सारखे आहे. तुला केलेला प्रत्येक नमस्कार हा नऊही नाथांना व मला पोहोचेल. गिरनार वर तु नसूनही असशील माझ्या रूपात आणि गर्भगिरी वर मी नसूनही असेन तुझ्या रूपात. पण माझी तुला आज्ञा आहे. दर पौर्णिमेला तु गिरनार वर मला भेटायला ये." हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले, "महाप्रभू आपली आज्ञा शिरसावंद्य! मी अजून काही दिवस गिरनार वर वास करून गर्भगिरी साठी प्रस्थान ठेवेन. जे भक्त गर्भगिरी वर येतील त्यांना आपल्या सांगण्या प्रमाणे गिरनार यात्रेचे फळ मिळेल. गिरनार मुळे जसा गुर्जरदेश (गुजरात) पावन झाला त्याप्रमाणे गर्भगिरी मुळे मराठदेश (महाराष्ट्र) पवित्र होईल. मी दर पौर्णिमेला गिरनार वर येईन आणि कोणत्याही रूपात माझ्या व आपल्या भक्तजनांना दर्शन देईन. गोरक्ष माझा प्रिय शिष्य आहे कृपया त्याला कधी अंतर देऊ नये. काही चुकले तर त्याला क्षमा करावे. गोरख शिखरावर तो निरंतर वास्तव्य करेल. त्यास कृपावलंकीत करावे."

महाराज तथास्तु म्हणाले व मच्छिंद्रासोबत गुरूशिखरावर गेले. काही दिवसांनी मच्छिंद्रनाथ गर्भगिरी कडे निघाले. दत्ताने, गोरक्षाने व भर्तुहरीनाथ, गोपीचंदनाथ यांनी मच्छिंद्रनाथांना भावपूर्ण निरोप दिला. अशाप्रकारे सद्गुरू मच्छिंद्रनाथ गर्भगिरी वर अजूनही वास्तव्यास आहेत.
भक्तांना त्यांच्या वास्तव्याची आजही अनुभूती येत असते.

मंदिरे

आद्य नाथाचार्य चैतन्य श्रीमत्स्येंद्रनाथजी संजीवन समाधी मंदिर, श्रीक्षेत्र मायंबा, जि. बीड, महाराष्ट्र
मच्छिंद्रनाथ मंदिर, मिटमिटा, औरंगाबाद , महाराष्ट्र
मच्छिंद्रनाथ मंदिर, वढोदा. ता. मुक्ताईनगर, जि. जळगांव 425327
मच्छिंद्रनाथ मंदिर, कीलेमच्छिंद्र गड ता. वाळवा जि. सांगली.