श्री निपटनिरंजन (सन १६२३ – १७३८)

जन्म:  चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात जन्म, १६२३
आई/वडिल: ज्ञात नाही 
कार्यकाळ: १६२३-१७३८
संप्रदाय: नाथ संप्रदाय
गुरु: चर्पटनाथ
समाधी: आवतार समाप्ती १७३८

निपटनिरंजन महाराज
श्री निपटनिरंजन 

हे एक संतकवी असून यांचा जन्म बुंदेलखंडातील चंदेरी गावी चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात झाला. लहानपणापासून यांच्या मनावर धार्मिक संस्कार होते. संत दादू दयालची भजने हे आवडीने गात. सन १६६३च्या सुमारास आपल्या वृद्ध मातेला घेऊन हे बऱ्हाणपूरमार्गे औरंगाबादेस आले आणि तेथेच राहू लागले. औरंगपुऱ्यात एकनाथमंदिराजवळ चिलखते वगैरे बनविण्याचा यांचा छोटा व्यवसाय होता. परंतु धंद्यात अपयश आल्याने ते निराश झाले. वृद्ध आई मृत्यू पावली तेव्हा गरिबीमुळे त्यांना तिचा अंत्यसंस्कारही नीटसा करता आला नाही. आईच्याच चितेवरची राख अंगाला फासून हे पूर्ण बैरागी बनले.

ध्यानधारणा व योगसाधना यांत त्यांचा काळ जाऊ लागला. काही दिवसांनी मठाच्या बागेतच यांना दत्तदर्शन झाले. कोणा चर्पटनाथ नामक साधुपुरुषाकडून यांनी देवगिरीवर गुरुपदेश घेतला. अष्टमहासिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. प्रत्यक्ष औरंगजेबावरही या योगी पुरुषाच्या सामर्थ्याचा प्रभाव पडला.

त्यांची काही पदे व दोहे प्रसिद्ध आहेत. 

एक अद्भुत दत्तभक्त - कवी निपट निरंजन

आनेकी बाट कोन | जानेका घाट कोन |
ब्रह्म का कपाट कोन |  कहासे जीव आया है |
जीव कोन शिव कौन |  शिवका स्वरूप कोन |
माया कोन धरनी कोन |  धरनी को धरे कोन |
सोवनमे जागे कोन |  देहले भागे कोन |
वादचंद लागे कोन | कोन मे कोन समाया है |
कहे निपट निरंजन |  इतना नाही बुझे तो |
झक मारन नरदेह पाया है |

हे एक संत कवी असून ह्यांचा जन्म बुंदेलखंडातील चंदेरी गावी गौड सारस्वत ब्राह्मण कुळात झाला. लहानपणापासून ह्यांच्यावर धार्मिक संस्कार होते. संत दादू दयाळ ह्यांची भजने हे आवडीने गात असत. सन१६६३ च्या सुमारास हे आपल्या वृद्ध मातेस घेऊन औरंगाबाद येथे आले आणि तेथेच राहू लागले. औरंगपुरा येथे त्यांचा चिलखते बनविण्याचा छोटा व्यवसाय होता. धंद्यात अपयश आल्यामुळॆ हे निराश होते त्यातच ह्यांच्या वृद्ध मातेचा मृत्यू झाला व त्यांच्या जवळ मातेच्या अंत्य संस्कारासाठी सुद्धा पैसे नव्हते.

आईच्या चितेवरची राख अंगाला फासून हे पूर्ण वैरागी बनले. ध्यान व योग धारणा ह्यात ह्यांचा काळ जाऊ लागला. काही दिवसांनी ह्यांना दत्त दर्शन झाले. चर्पटनाथ नावाच्या साधू कडून ह्यांना देवगिरीवर गुरूपदेश झाला व अष्ट महासिद्धी त्यांना प्राप्त झाल्या .

निपट निरंजन ह्यांना भेटण्यास औरंगजेब सन १६८२ मध्ये आला तो त्यांना वश  करण्यासाठी .कारण त्याने श्री निपट बाबांच्या सिद्धी विषयी ऐकले होते. औरंगजेब आला त्यावेळेस बाबाना ताप आला होता. त्यांनी लगेच ओळखले की हा संतांना शरण नाही तर मराठयांची पाळेमुळे खणण्यासाठी आला आहे.  निपट निरंजन व औरंगजेब ह्यांच्यात जो संवाद झाला, त्याच्या ११४ ओव्या उपलब्ध आहेत. ह्या’ निरंजन बानी’ ह्या पुस्तकात दिल्या आहेत

‘सून आलमगीर दिल से भी जायेगा दुनिया से भी जायेगा’ बाबानी औरंगजेबाला त्याच्या क्रूर कर्माबद्दल असे सुनावले.

दावा बादशहा का करते, और दुवा मांगते है तो फकीर से
कहे निपट ये दिल्ली का दरबार नही फकिरी दरबार है
चारो दिशा बाहर मार- काट किया कत्ले आम
और फकीर की दुवा मांगने आया है ?

औरंगजेबाने निपट बाबाची परीक्षा घेण्यासाठी मक्केची बोरे खायची इच्छा केली त्यावेळेस काय झाले त्याचे वर्णन संतकवी महिपतीनीआपल्या भक्तलीलामृत मध्ये वर्णन कारक आहे

मशिदीत मध्य कोनाड्यात गेले जावोनि बैसले तयावेळी
पाशह कुराण पढावया आला | अकस्मात याला पाहता हे |
विचारात नाम निपट सांगती |  बोलाविले प्रीती म्हणुनी आलो |
पाशहाने तेंव्हा केला चमत्कार |  सांडोनि कलेवर मक्के गेला |
तेथे सिद्ध सात होते त्या |  नमन बद्री वृक्ष जाण होता तेथे  |
निपट हि गेले त्या वृक्षीं देखील |  बोरे खाती वाहिले आनंदात |
पाशह प्रसाद मागातचि | म्हणत देऊ मशिदी चाल आता |
गेला शरीरात पाहे कोनाड्यात | बैसोनि हे बोरे खात तेथे |
बोराचा प्रसाद देता लोटांगण | घालोनिया म्हणे ईश्वर हा |

                                               -  भक्तलीलामृत

ब्रह्मा पिता है कौन | माया की माता कौन
खात कोन पिता कोन |  कहाँ वाको घर है
निर्गुण की जात कोन |  सगुन की गोत कोन
ज्योतीं का ज्योत कोन |  कोन परात्पर है
सिद्धां का वेद कोन |  योगियो का नाद कोन
वेदन का भेद कोन  | शास्त्र क्या आधार है
कहे निपट निरंजन | गुरुकI न जाना घर
स्वर है की नर या सुकर कूकर है

 

श्री निपटनिरंजन
संतकवी श्री निपटनिरंजन मंदिर 

महाराष्ट्राच्या संत परंपरेत तसेच सूफी परंपरेत निपट बाबा परिचित होते व त्यांच्या इतर संतांशी गाठी भेटी होत असत. संत कवी महिपतीनी पण आपल्या भक्त लीलामृत मध्ये निपट निरंजनांचे वर्णन केले आहे. असा पण एक प्रवाद आहे की निपट व निरंजन ही गुरु शिष्याची जोडी होती व त्यांचे नाव बरोबर घेतले जाते.

निपट निरंजनाचें लिखाण हे नाथ परंपरेला शोभेल असेच  होते व जास्त करून ते हिंदीतच रचना करत. ह्यांचे किती ग्रंथ उपलब्ध आहेत ह्याबद्दल माहिती नाही.

निपट निरंजन ह्यांचे मंदिर औरंगाबाद येथे आहे