प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे

लग्नापूर्वीचे नाव: प. पू. शशिकला काजळकर
लग्नानंतरचे नाव: प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे
जन्म: १९४० जालना येथे
कार्यकाळ: १९४० ते आजपर्यंत
गुरू: धुंडिराज महाराज कविश्र्वर
विशेष: श्री दत्ताश्रमाची स्थापना 

प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे
प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे

तो बहुतांचा पाळणकर्ता । त्यास बहुतांची असे चिंता
नानासाधने समर्था । सद्गुरूपाशी ।
अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य निष्ठेचे भजन ।
तेथे बहु भक्तजन । विश्रांती पावती ॥

महाराष्ट्रात मध्यवर्ती भागात मराठवाड्यात संतांचे अवतारकार्य जास्त प्रकर्षाने पहाण्यास मिळते. प. पू. ताईमहाराज यांनी प्रस्थापित केलेला दत्ताश्रम यास्थानी अनेक संतानी मांडलेली तत्त्वे अनेक सांप्रदायिक पद्धती यांचा अप्रतिम समन्वय पहायला मिळतो.

सौ. ताईमहाराज काळजकर यांचा जन्म १९४० साली रामनवमीला जालन्यात झाला. त्यांचे वडील प. पू. अण्णा काजळकर हे पूण्यवान सत्पुरूष व श्री धुंडामहाराज कविश्र्वर यांचे कृपांकीत प. पू. अण्णा शशीकलाला (म्हणजेच पू. ताई महाराज) प्रेमाने शशाबाई म्हणत. त्यांना घेऊन एकदा देऊळगावराजा येथे धुंडीराज महाराजांकडे गेले. ह्याच्या मांडीवर कन्या ठेऊन म्हणाले, महाराज ही आपली मुलगी आहे. आपण संभाळा व मार्गदर्शन करा. ७-८ वर्षे शशाबाई श्री धुंडीराज महाराजांच्या कृपाछत्राखाली राहिली. तेथेच भक्तीमार्गाचे व अध्यात्मविद्येचे संस्कार झाले. पुढे शशाबाई मामा मामीच्याकडे जालन्यात राहिल्या. त्या मैत्रिणीत फारशा कधी मिसळल्या नाही. कारण त्यांना वेळच नसायचा. त्या घरकामात मदत करीत, पुजेची तयारी करीत, श्र्लोकपठण, जप वगैरे सतत चालू असे. त्यांची रहाणी अत्यंत साधी पण वागण्यात खूप नेटनेटकेपणा होता.

सौ. ताई महाराजांनी १९५८मध्ये म्हणजे वयाच्या १८व्या वर्षी गुरूमंत्र प. पू. धुंडीराज महाराजांच्याकडून घेतला. तेव्हापासून जपास प्रारंभ केला. धुंडीराज महाराज जेव्हा जेव्हा जालन्यास येत. तेव्हा ते काजळकरांकडे येत असत. इ. स. १९७८ धुंडीराज महाराज दत्तवासी झाले. त्यानंतर ताई महाराज श्री दत्त महाराजांच्या संपर्कात आल्या. त्या एका अर्थाने दत्तमहाराजांच्या गुरूभगिनी होत्या. पण त्या त्यांना गुरुस्थानीच मानीत असत. प. पू. दत्तमहाराज जेव्हा जेव्हा हिंगोली किंवा देऊळगाव राजाला जात असत. तेव्हा ते जालन्यास सौ. ताईमहाराजांकडे जात असत. त्या म्हणत त्यांचे गुरुमहाराज म्हणाले होते "आम्ही तुमच्याकडे येत राहू" त्यांच्या समाधी नंतर वाटले होते आता संपले. पण सत्पुरूष/ गुरू आपल्या वचनाला जागतात. आज तेच सद्गुरू ब्रह्मर्षी दत्त महाराजांच्या रूपाने येतच राहिले. यात बिल्कूल संदेह नाही. प. पू. दत्तमहाराजांचा उल्लेख त्या साक्षात भगवती असाच करीत. प. पू. दत्तमहाराजांना ही त्यांच्या अलौकिक तपसामर्थ्य पूर्णतय: ज्ञात होते.

dattaashram jalana
श्री दत्ताश्रम संस्थान जालना 

सौ. ताई महाराजांनी एक छोटेखानी मंदीर बांधले व त्यात आपले गुरू श्री धुंडीराज महाराज व पुण्यपावन पिताश्री श्रीकाजळकर महाराज यांच्या प्रतिमा ठेवल्या. मंदीरात येणाऱ्या भक्तांची रीघ ताई महाराजांच्या तपाने वाढतच राहिली. हळूहळू त्या छोट्याशा मंदिराचे रूपांतर भव्यदिव्य दत्ताश्रमात झाले. या ठिकाणी अनेक मान्यवर सत्पुरूषांनी भेटी दिल्या. त्यात श्रीश्री रविशंकर प. पू. गोदावरी माता करविर पिठाचे विद्याशंकरभारती, श्रीकृष्णानंदतीर्थ, श्रीकिशोरजी व्यास इ.

सौ. ताई महाराजांनी अन्नदान व जपसाधना यास विशेष महत्त्व दिलेले आहे. श्री. दत्ताश्रमात श्री अभिरामेश्र्वर, श्री राघवालय, श्री संतधाम यज्ञशाळा, गोशाळा व दत्त पादूका मंदीर आहे. सौ ताईमहाराज एक तपस्वीनी असून त्यांनी सर्व संसारीक जबाबदाऱ्या पार पाडून जास्तीत जास्त नामस्मरण केले. रोजच्या ताणतणावाच्या जीवनातून मानसिक शांती व अध्यात्मिक प्रगतीसाठी दत्ताश्रमाच्या रूपाने साधन उपलब्ध करून दिलेले आहे. येथे निवासाने मन:शांती आनंद व समाधान मिळते.

श्री दत्ताश्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी प. पू. दत्तमहाराज कविश्र्वर म्हणाले "प. पू. सौ ताई महाराजांच्या तप:प्रभावाने हे स्थान निर्माण झालेले असून इथे सर्व देवतांचा निवास आहे. हे पुढे परमार्थाचे मोठे केंद्र होणार आहे"

गुरुपरंपरा

गुरुपरंपरा

|| पदें पुष्करा लाजवीती जयाचीं || || मुखाच्या प्रभे चंद्र मोहुनि याची || || घडो वास येथें सदा निर्विकारी || || तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||२|| 
|| श्री दत्तस्तुती ||