ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज

जन्म: उरण जवळ पोंपुड गावचे
आई / वडिल: विठाबाई / गणपतराव
गुरु: १९७४, अबु पहाडावर दत्तशिखरावर ‘ॐ गुरुदत्त’ मंत्र मिळाला.

ओम श्रीदत्त ठाकूर महाराज
ॐ श्रीदत्त, ठाकूर महाराज

साठ वर्षांचे ठाकूर महाराज यांची महती एक उरण दत्तभक्त म्हणून मोठी आहे. हे मुंबईजवळ उरण नजीक पोंपूड या गावचे. पण लहानपणापासून यांना चिंतनाचा व परमार्थाचा नाद असल्यामुळे त्यांचे पुढील आयुष्य मुंबई येथे गेले. यांना दत्तात्रेयाचा व नरसिंहसरस्वतींचा लोभ होता. गाणगापूर येथे गेल्यावर यांना स्वामींचा साक्षात्कार झाला. आणि त्यांनी पोंपूड येथे एक दत्तमंदिर बांधून दत्तभक्तीचा प्रचार केला. हे स्थान पुढे दत्तवाडी या नावानेच ओळखू जाऊ लागले. गुरुचरित्र या ग्रंथाची त्यांनी अनेक पारायणे केली. पुढे यांचा परिवार वाढीस लागला. अनेक भक्तगण त्यांच्याभोवती जमा झाले. गुरुवारी यांनी दत्ताची भजने मोठ्या सुरात म्हणण्यास प्रारंभ केला. लोक त्यांच्या संगीतप्रेमावर आणि दत्तभक्तीवर लुब्ध झाले.

यांनी अनेक तीर्थ क्षेत्रांच्या यात्रा केल्या. गाणगापूर येथे दत्ताई नावाचे स्थान निर्माण केले. तेथे अनेक भक्तांसहित यांची उपासना चालू असते. सन १९७१मध्ये यांनी उजैयनी येथील कुंभमेळाचा आनंद उपभोगला. १९७४ साली हरिद्वार येथे हे गेले. त्यानंतर आबू पहाडावरील गुरुशिखरावर यांना ॐ दत्त असा मंत्र मिळाला. १९७५ मध्ये यांनी उरण येथे अवधूत नावाचे स्थान निर्माण केले.

दत्त ठाकूर महाराज
ॐ श्रीदत्त, ठाकूर महाराज

हे प्रथम रेल्वेत नोकर म्हणून होते. १९७६ मध्ये यांनी नोकरीचा राजीनामा दिला. १९७८ मध्ये गाणगापूर येथे यांना नरसिंहसरस्वतींचा प्रसाद मिळाला. १९८० मध्ये चंपकेश्र्वर येथील कुंभमेळात राहून यांनी ३६ दिवस केवळ दूध पिऊन उपासना केली. सन १९८१ मध्ये यांची वाटचाल परमार्थाच्या मार्गाने सुरू झाली. १९८३ मध्ये उरण येथे दत्तात्रेयांची मूर्ती यांनी स्थापन केली. १९८६ मध्ये महाराज पुन्हा हरिद्वारला कुंभमेळ्यासाठी गेले. १९८९ मध्ये अलाहाबाद येथील कुंभमेळा करून काशीला गेले. तेथील दत्तमठाचा जीर्णोद्धार करण्यासाठी यांनी एक लाख हजार एकशे अठरा देणगी म्हणून दिले. १९९० मध्ये उरण येथील दत्तमंदिराजवळ यांनी हनुमान, शिवलिंग, लक्ष्मी यांची मंदिरे बांधली. हे स्थान पुढे ‘नवीन पोंपूड’ म्हणून ओळखले जाऊ लागले. क्षेत्र कुरवपूर येथील श्रीपादवल्लभांच्या स्थानासाठी यांनी पाच हजार पाचशे एक देणगी दिली.

आज ठाकुर महाराज यांचे स्थान माटुंगा येथे आहे. येथे अनेकदा गुरुचरित्राचे पारायण होते. ठाकूर यांच्या नावावर अनेक लहानमोठी काव्ये आहेत. श्रीचिलेमहाराज दत्तगीते, दुमदुमली पंढरी, शंकरमहाराज, दत्ताई, वासुदेवानंदसरस्वती अशी यांच्या कॅसेट्सची व पुस्तकांची नावे आहेत.

श्री ओम् दत्त ठाकूर महाराजांनी श्री नृसिहसरस्वती स्वामी महाराजांचे इच्छेनुसार श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री दत्ताई देवी मंदिर व श्री दत्ताई सदन यांचे बांधकाम भक्तांचे सहकार्याने पूर्ण केले. प्रतिवर्षी श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे वर्धापन दिवस उत्सवासाठी येत असतात. त्यात मुख्यत्वेकरून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व बेळगाव येथील भक्तांचा समावेश असतो.

प. पू . ओम दत्त ठाकूर महाराज एप्रिल २०२१ मध्ये दत्तचरणी विलीन झाले. पण त्यांचे आशीर्वाद सदैव भक्तांचे पाठीशी आहेत.

|| यतीरूप दत्तात्रयादंडधारी || || पदी पादुका शोभती सौख्यकारी ||  || दयासिंधु ज्याची पदें दुःखहारी || || तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||१||
|| श्री दत्तस्तुती || 

ठाकूर महाराजनी स्थापिलेली दत्तमूर्ती कडगंजी
ठाकूर महाराजनी स्थापिलेली दत्तमूर्ती ...कडगंजी