श्री गोरक्षनाथ (सुमारे ११वे शतक)

गोरक्षनाथ
श्री गोरक्षनाथजी 

जन्म: सुमारे ११ वे शतक
आईवडिल: माहिती उपलब्ध नाही.
संप्रदाय: नाथ संप्रदाय
गुरु: मच्छिंद्रनाथ
शिष्य: गहनीनाथ

गोरक्षनाथ ११ व्या ते १२ व्या शतका दरम्यान झालेले नाथ योगी होते. गोरक्षनाथांचे मंदीर गोरखपूर उत्तरप्रदेशामध्ये आहे. गोरक्षनाथांचे नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम आहे. गोरख जिल्ह्यात एका गुहेत गोरक्षनाथांचे एका पायाचे पद चिन्ह आहे. येथे वैशाख पौर्णिमा एक उत्सव होतो.

जन्मकथा 

मच्छिंद्रनाथ भारतभर भ्रमण करीत असे फिरत असता एका घरी भिक्षा मागण्यास गेले. त्या स्त्रीस संतती नव्हती. दारी आलेल्या तेज:पूंज साधूला भिक्षा वाढताना पुत्रप्राप्तीची कामना व्यक्त केली. मच्छिंद्रनाथांने त्या स्त्रीला चिमूटभर भस्म दिले व आशिर्वाद दिला. मुलगा होईल. सदर स्त्रीने आपल्या शेजारणीला झालेली हकीकत सांगितली पण त्या हसू लागल्याने त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले. बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आले व मुलाची चौकशी केली तेव्हा मूल झालेच नाही असे त्या स्त्रीने सांगितले. सर्व हकिकत स्त्रीकडून ऐकून मच्छिंद्रनाथ शेणाच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन चलो गोरक्ष म्हणून हाक मारली. त्या शेणातून मुलगा प्र्गटला व म्हणाला ‘आदेश’ मग मच्छिंद्रनाथ त्याला घेऊन गेले. तेच गोरक्षनाथ. गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ व भारतातच नाही तर अरब जगतावरही आहे. कानाला भोके पाडण्याची पद्धत गोरक्षनाथांनीच सुरू केली. अशी भोके पाडण्याआधी साधकांना अतिशय कठोर हटयोगाची साधना करावी लागे. ते साधू अवधूत असत.

जगातगुरु योगाचार्य गोरक्षनाथजी
जगातगुरु योगाचार्य  श्री गोरक्षनाथजी 

नवनाथ संप्रदाय उपदेश 

त्रिंबकेश्वर हे नाथ संप्रदायाचे उगम स्थान मानले जाते. याच ठिकाणी गुरु गोरक्षनाथांनी ९ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शीळा होय. ॠषींना घेऊन गुरु गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले तेथे त्यांना एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला त्यातील ९ शिष्यांनी तो जसाचे तसा ग्रहण केला त्यांना नवनाथ म्हणतात. ते नवनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ व चरपटीनाथ. त्या शिळेला अनुपम शिळा म्हणतात.

आदि गुरू दत्तात्रेय आणि गोरक्षनाथ यांचा संबंध पाहिला आहेच. भगवान दत्तात्रेय आणि सिद्धाचार्य गोरक्षनाथ यांची भेट गिरनार पर्वतावर झाली असल्याचे प्रसिध्द आहे. याच ठिकाणी गोरक्षनाथांवर दत्तात्रेयांनी सिद्धीसामर्थ्य दाखवून अनुग्रह केला. आज या स्थानाला "कमंडलू तीर्थ’ या नावाने महत्त्व प्राप्त झाले आहे. गोरक्षनाथांनी येथील शिखरावरील दत्तपादुकांचे दर्शन घेतल्याची कथा प्रसिद्ध आहे. दत्तांनी त्यांना या ठिकाणी उन्मत पिशाचवत् अशा दिगंबर, भस्मचर्चित, जटाजूटधारी अशा स्वरूपात दर्शन दिले. नाना सिद्धींचे चमत्कार दाखवून गोरक्षनाथांवर दत्तात्रेयांनी याच ठिकाणी कृपा केली. गोरक्षनाथांच्या परंपरेतील बहुतेक सर्व नाथांचा दत्तात्रेयांशी संबंध असल्याने व दत्तपंथातील अनेक महत्त्वाच्या बाबी नाथपंथाने विकसित केल्या असल्याने श्रीगोरक्षनाथांच्या चरित्राची रूपरेखा पाहणे अगत्याचे आहे.

नाथसिद्धांच्या ज्या विविध नामावली सध्या उपलब्ध आहेत त्यांत गोरक्षनाथांचा उल्लेख येतो. मत्स्येंद्रनाथांचे शिष्य म्हणून गोरक्षनाथांचा उल्लेख येतो. मत्स्येंद्रनाथांना म्हणजे आपल्या गुरुंना स्त्रीराज्यातून म्हणजे वामाचारी पंथातून मुक्त करणारा एक थोर सिद्ध पुरुष म्हणूनही गोरक्षनाथांचा काल व त्यांचे जीवनवृत्त यांची विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही. मत्स्येंन्द्रनाथ व गोरक्षनाथ यांचे कार्य अकराव्या शतकातले असावे, असा संशोधकांचा तर्क आहे. या योगी सिद्धांचे आयुर्मान अनेकदा अवघड काम होऊन बसले आहे. या दोनही सिद्धपुरुषांचे अनेक अवतार असल्याचेही सांगतात.

गोरक्षनाथांच्या जन्मासंबंधी एक आख्यायिका अशी की, एका पुत्रकांक्षिणी स्त्रीस महादेवांनी विभूतीभस्माचा प्रसाद दिला. या स्त्रीने अश्रद्धपणे तो प्रसाद शेणाच्या उकिरड्यावर टाकून दिला. बारा वर्षांनी आपल्या प्रसादाचा परिणाम पाहाण्यासाठी महादेव आले तेव्हा त्यांनी राखेच्या ढिगाऱ्यातून हाक मारून "गोरक्ष” नाथास उभे केले. कधी या कथेतील आदिनाथाऐवजी म्हणजे मत्सेंन्द्रनाथांचे नाव येते. ही पुत्रकांक्षिणी स्त्री ब्राह्मण असल्याचे सांगतात. मत्सेंद्रनाथ व गोरक्षनाथ यांनी नेपाळमध्ये अनेक प्रकारचे चमत्कार केले. नेपाळी परंपरेप्रमाणे मत्स्येंद्रनाथ हे गोरक्षनाथांचे गुरू आहेत, तर गोरक्षसिद्धांतानुसार गोरक्ष हे प्रत्यक्ष शंकराचेच पुत्र वा शिष्य आहेत. गोरक्षनाथांचे जन्मस्थान नेपाळ, पंजाब, गोरखपूर, यांपैकी कुठेतरी असावे. गोदावरी नदीच्या तीरी चंद्रगिरी नावाच्या गावी एका ब्राह्मण स्त्रीस गर्भसंभव होऊन गोरक्षनाथ जन्मल्याचेही सांगतात. गोपीचंदाची आई मैनावती ही गोरक्षनाथांची शिष्या होती. नेपाळी परंपरेनुसार दक्षिणेकडील वडव नावाच्या देशात महामंत्राच्या प्रसादाने महाबुद्धिशाली गोरक्षनाथांचा जन्म झाला. क्रूक्स आणि गियर्सन यांच्या मते सत्ययुगात पंजाबमध्ये, त्रेतायुगात गोरखपुरामध्ये, द्वापरयुगात हुरभुजमध्ये व कलियुगात काठेवाडात गोरखमढी येथे गोरखनाथ यांनी अवतार घेतले. गोरक्षनाथांनी नेपाळ, पंजाब, बंगाल, कच्छ, काठेवाड, नासिक, उडिसा इत्यादींच्या यात्रा केल्या होत्या.

श्री गोरक्षनाथ
श्री गोरक्षनाथ

गोरक्षनाथांचा जन्म, त्यांचे कार्य, त्यांचे पंथिय तत्वज्ञान यांचा अभ्यास आजकाल वाढत आहे. डॉ. कल्याणी मल्लीक, डॉ. प्रबोधचंद्र बागची, डॉ. हजारीप्रसाद द्विवेदी, डॉ. मोहनसिंग इत्यादी संशोधकांच्या अभ्यासामुळे श्रीगोरक्षनाथांच्या कार्यावर नवा प्रकाश पडत आहे. मोहनसिंग यांच्या मतानुसार गोरक्षनाथ हे एका हिंदू विधवेचे अवैध पुत्र असावेत. समाजात त्यामुळे खालचे स्थान मिळाल्याने त्यांनी स्वपराक्रमाने वैचारिक क्रांती केली. गोरक्षसिद्धान्तसंग्रहात त्यांना ‘ईश्वरी संतान’ (बेवारशी) म्हटले आहे. ‘मतिरत्नाकर’ नावाच्या महानुभवी ग्रंथात तर गोरक्षनाथांसंबंधी म्हटले आहे, ‘आणि गोरक्ष जन्मला शूद्र कुळीं.’ त्यांचा जन्म ब्राह्मणकुळात झाला असल्याचेही काही संशोधक सांगतात. त्यांचे वैराग्य प्रखर होते. आपल्या वैराग्यपूर्ण मार्गावरून घसरणाऱ्या आपल्या गुरूस, म्हणजे मत्स्येन्द्रनाथास त्यांनी सावरले. म्हणून की काय ज्ञानेश्वर त्यांना ‘विशयविध्वंसैकवीर’ म्हणतात. त्यांचा संचार सर्व भारतभर असून अमरनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर ही शिष्यपरंपरा महाराष्ट्राच्या दृष्टीने फ़ारच महत्त्वाची आहे.

गोरखनाथांचा एक महत्त्वाचा विशेष असा की, त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी आपला धर्मविचार लोकभाषांतून सांगितला. संस्कृत, प्राकृत वा अपभ्रंशमिश्र हिंदी अशा भाषांतून त्यांचे ग्रंथ मिळतात. अमनस्कयोग, ज्ञानदीपप्रबोध, गोरक्षपद्धती, गोरक्षसंहिता, योगमार्तंड, गोरक्षकल्प, अवधूतगीता, गोरक्षगीता, गोरखबानी; असे काही ग्रंथ गोरक्षनाथांच्या नावावर मिळतात. अमरौघशासनम, महार्थमंजरी, सिद्धसिद्धान्तपद्धती; हेही ग्रंथ गोरक्षनाथांचे म्हणून सांगतात. योगधारणा, पिंडब्रह्मांडविचार, कुंडलिनीजागृती, गुरुचे महत्व, देशकालातीत व जातिभेदातीत तत्वज्ञान, लोकभाषांचा उपयोग; हे गोरक्षनाथांच्या पंथांचे मुख्य विशेष होत. हिंदू व मुसलमान एका विचारावर प्र्थम वावरले ते गोरक्षनाथांच्या परिवारात. नाथपंथाच्या रावळ शाखेत आजही मुसलमानांचा भरणा विशेष दिसतो. नाथपंथात स्त्रीशूद्रांच्या उद्धाराची तळमळही प्रामुख्याने दिसते. विमलादेवी व मैनावती या दोन स्त्रिया नाथपंथात होत्या. बंगालमधील नाथपंथीय हडिपा (जालंदरनाथ) हा एक अंत्यज होता. गोरखनाथांच्या प्रेरणेमधूनच भाषेचा उपयोग अखिल भारताच्या संदर्भात होत राहिला. गोरखनाथांच्या पंथात वर्णाश्रमधर्माला स्थान नसल्यामुळे वर्णभ्रष्टांना या संप्रदायाचा मोठाच आधार वाटला.

‘गोरक्षचरित्र म्हणजे गुण व शक्ती या दोन गोष्टींचा एक सुरेख मणिकांचन योग आहे. ब्रह्मचर्यपरायण, हठयोगाचारनिष्ठ व नीतिसंपन्न अशा योगी संप्रदायाच्या विकासाचे मूळ श्रेय गोरक्षनाथांकडेच आहे... त्यांचा उपदेश व त्यांचे प्रत्यक्ष आचरण यांमध्ये फ़रक नव्हता... त्यांनी जीवनाकरिता ब्रह्मचर्य, संयम, उद्वेगरहित हृदयमार्ग योग्य मानला होता. जर त्यांनी ह्या मार्गाचे प्रत्यक्ष आचरण केले नसते तर निखालसपणे मत्स्येंद्रांच्या उद्धाराकरिता ते न जाते व स्वत:च त्या ठिकाणी रममाण झाले असते. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवरून हे स्पष्ट दिसून येते की, ते कामिनी आणि कांचन या दोनही गोष्टींना साधी राहणी व साधनात्मक जीवन यांच्या दृष्टीने विघातक मानीत असत... ते यौगिक सिद्धींचा प्रयोग फक्त परहितसाधनांकरिताच करीत होते.’ (अमनस्कयोग : पृष्ठे २८-२९) त्यांचा संप्रदाय स्वत:ला अतिवर्णाश्रमी मानतो. ते समदृष्टीने वावरत. भोग, मद्य, मांस इत्यादींच्या सेवनापासून ते अलिप्त होते. योगी पुरुषांना द्रव्याची इच्छा नसावी, असे त्यांना वाटे. स्त्रीकडे बघण्याची त्यांची दृष्टी मातॄभावाची होती. संयमपूर्ण जीवन व साधी राहाणी यांचा ते आदर्शच होते.

'श्री गोरक्ष प्रवाह' ग्रंथ पारायण, एक प्रभावी उपासना

मनात एखादी इच्छा धरुन निश्चयानें ग्रंथपठण केल्यास, मनोकामना खात्रीनें पूर्ण होते, पूवेंकडे तोंड करून, एखाद्या मऊ वस्त्राच्या आसनावर बसून ग्रंथ पठण करावे. लाकडी पाट बसावयास घेऊं नये. घेतल्यास, पाटावर वस्त्र घालून त्यावर बसावे. समोर चौरंग किंवा पाट ठेवून, त्यावर ग्रंथ ठेवावा, व पूजा करून नित्य वाचन करावे. समोर किंवा उजव्या हाताला श्रीदत्तात्रेयांची तसबीर असावी तसबीर शक्य तर भिंतीस टांगावी जमिनीवर, ठेवूं नये. ग्रंथात सांगितल्याप्रमाणे गुरुवारी आरंभ करून रोज रात्री एकदां संपूर्णं ग्रंथ वाचून आरती करावी. या ग्रंथाचा एक पाठ पूर्ण होण्यास अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळ लागतो. तेवढी सवड काढून नित्य ग्रंथपठण करुन, नाथांचा प्रसाद भाविक जनांनी मिळवावा, हीच श्रीदत्तचरणी प्रार्थना .
या गोरक्ष किमयागिरी ग्रंथात आलेल्या मन्त्रापैकी कांही महत्वाचे मन्त्र खालीळप्रमाणें

१) महामृत्युंजय मंत्र 

ॐ होम् ॐ जूं स: भूर्भुंव: स्व: त्र्यंबकं यजामहे सुगन्धिम्पुष्टिवर्धनम् । उर्वांरुक्मिव बन्धनान्मृत्योर्मूंक्षीय मामृतात् ॥

२) संतानप्राप्तीसाठी गोपालमंत्र 

ॐ श्रीं र्हौं क्लीं ग्लौम् देवकीसुत गोविंद वासुदेव जगत्पते । देहि मे तनयं कृष्ण त्वामहं शरणं गत: ॥

३) उच्छिष्ट गणपति मंत्र 

ॐ हस्तिपिशाचि लिखे स्वाहा ॥

४) दत्तात्रेय मंत्र 

१. द्रां दत्तात्रेयाय नम: ॥ 
२. दिगम्बरा दिगाम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा ॥

५) बाधानिवरक हनुमत् मन्त्र

ॐ र्हां र्ही र्हूं सर्वदुष्टनिवारणाय स्वाहा ॥

६) सरस्वतीमन्त्र

ॐ ऐं र्हीं धीं क्लीं सौं श्रीं सरस्वत्यै नम: ॥

या मंत्रांची व इतरही बर्याच मंत्रांची संपूर्ण माहिती प्रस्तुत ग्रंथात आहे.

॥ श्रीआदिनाथाय नम: ॥
ॐ अस्य श्रीगोरक्ष ग्रंथस्य भगवान आदिनाथ ऋषि:
षडाक्षरी छन्द: नवनाथानुग्रह प्राप्त्यर्थे विनियोग: ।
श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीपांडुरंगाय नम: ॥
श्रीलक्ष्म्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नम: ॥

॥ श्री रसेश्वरी प्रसन्न ॥

दत्त गोरक्ष संवाद
श्री दत्तात्रेय-गोरक्ष संवाद

श्री दत्तात्रेय-गोरक्ष संवाद

श्रीशैल ह्या नावाचा अर्थच मुळी "देवीचा पर्वत" असा आहे. तेथील ज्योतिर्लिंगही  प्रसिद्धच आहे. जटाजुट, भस्म, रुद्राक्ष अशी त्यांची अवधूतमूर्ती वैराग्याचे साक्षात प्रतीक. त्रिदेवांचा अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांनी आपल्या मातेला अजपा साधनेचा उपदेश केला होता. गोरक्षनाथांनी गौरवलेली "न भूतो न भविष्यती" अशी ही सहज सोपी, कोणालाही करता येण्यासारखी पण अत्यंत प्रभावकारी साधना सर्वच योगसाधकांनी आचारावी अशी आहे. श्रीशंकराने दत्तात्रेयांच्या हस्ते मच्छेंद्रनाथांच्या माध्यमातून नाथ संप्रदायाची गुढी उभारली. त्यामुळे दत्त संप्रदायाबरोबरच नाथ संप्रदायातही दत्तात्रेयांना मानाचे स्थान आहे. अशी मान्यता आहे की सिद्ध गोरक्षनाथ आजही दत्तसेवेत आहेत. याच विषयीची एक कथा पाहू.

स्त्री-राज्यातून मच्छिंद्रनाथांची सुटका केल्यावर मच्छिंद्र-गोरक्ष ही गुरू-शिष्यांची जोडगोळी नाना ठिकाणची भ्रमंती करत होती. एके दिवशी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना भिक्षा आणण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचा मुकाम एका पर्वतावर होता. आजूबाजूस चिटपाखरूही नव्हते. जवळपास गावही दिसत नव्हते. भिक्षा मागायला जाणार कुठे या चिंतेत असताना गोरक्षनाथांना मैनावाती राणीचे बोल आठवले. स्त्री-राज्यातून निरोप घेताना तीने "कधीही भिक्षा मागायला या" असे सांगितले होते.  गोरक्षांनी योगसामर्थ्याने आपले भिक्षापात्र आकाशमार्गाने स्त्री-राज्यात धाडले. ते भिक्षापात्र थेट राणीपुढे जाऊन पडले. राणीने नाथाचे पात्र लगेच ओळखले आणि ती आश्चर्यचकीत झाली. तीलाही आपले शब्द आठवले आणि ही गोरक्षांचीच किमया आहे याची खात्री पटली. एवढ्याशा पात्रातली भिक्षा तीघांना (मच्छिंद्र, गोरक्ष आणि मीननाथ) कशी पुरणार अशी काळजी वाटून तीने आपल्या दासींना त्या पात्रात भरपूर भिक्षा वाढण्यास सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेवढी भिक्षा घालावी तेवढे ते पात्र 
मोठे मोठे होत होते. अगदी मारूतीच्या शेपटासारखे. शेवटी राणी अहंकार सोडून मनातल्यामनात मच्छिंद्रनाथांना शरण गेली. तक्षणी पात्र पूर्ण भरले आणि परत अवकाशमार्गाने गोरक्षनाथांकडे निघाले.

वाटेत एका पर्वतावर अत्रिपुत्र दत्तात्रेय बसले होते. त्यांनी आकाशमार्गाने उडत जाणारे हे भिक्षापात्र पाहिले. त्यांना विस्मय वाटला. हे कोणाचे पात्र आहे ते विचारावे या हेतूने त्यांनी हातातला दंड वर केला. पात्र घेवून जाणारी सिद्धी त्या दंडाला आपटून खाली पडली. दतात्रेयांनी तीला ठावठिकाणा विचारला आणि पुढे जाण्याची अनुमती दिली. सिद्धी भिक्षापात्रासह गोरक्षांनाथांकडे पोहोचली आणि म्लान वदनाने उभी राहिली. गोरक्षनाथांनी तीला उशीर होण्याचे कारणं विचारले. सिद्धीने झालेला सर्व प्रकार कथन केला.

आपल्या सिद्धीला कोणी गोसाव्याने दंड मारून पाडले हे एकून गोरक्षनाथांचा क्रोध अनावर झाला. आपल्या योगसामर्थ्याचा अपमान करणाऱ्याला शासन करायला ते त्या पर्वतावर पोहोचले. गोरक्षनाथांचा क्रोध म्हणजे ज्वालामुखीच. पर्वतावर दत्तात्रय ध्यानस्थ बसले होते. गोरक्षनाथांनी क्रोधायमान होऊन दातात्रेयांवर झेप घेतली. पण अघटीत घडले. गोरक्ष दत्तात्रेयांच्या शरीरातून त्यांना काहीही इजा न करता आरपार निघून गेले. पाण्यातून काठी फिरवली तरी ते जसे अभेद रहाते अगदी तसे. गोरक्ष विस्मयचकीत झाले. दत्तात्रेयांनाही गोरक्षांची परीक्षा पहावी असे वाटले. ते गोरक्षनाथांना म्हणाले, "गोरक्षा! तुझ्या सिद्धींविषयी मी बरेच ऐकून आहे. तु सिद्धांचा सिद्ध आहेस असे ऐकले आहे. तुला ब्रह्मांडसमाधीचा अनुभव आहे म्हणे. जरा पंचतत्वात लीन होवून दाखव बरे. बघूया तुला शोधता येतय का ते."

गोरक्षनाथ अवश्य म्हणत तेथून गुप्त झाले आणि समुद्रात एक छोटा मासा बनले. दत्तात्रेयांनी ध्यान लावले आणि क्षणात गोरक्षांचा ठाव शोधला. पटकन पाण्यात हात घालून त्यांनी माशाच्या रूपातील गोरक्षनाथांना बाहेर काढले. मग ते गोरक्षनाथांना म्हणाले, "आता मी अदृश्य होतो. तू जर मला शोधू शकलास तर तू खरा सिद्ध. मग माझे सर्वस्व तुला दिले असे समज."

गोरक्षाने होकार देताच दत्तात्रेय अदृश्य पावले. गोरक्षाने चौदा भुवने, तीर्थक्षेत्रे, गुहा, वने, समुद्र सर्व शोधले पण दत्तात्रेय काही त्यांना सापडले नाहीत. आपण हरलो असे लक्षात येऊन गोरक्षांनी मच्छिंद्रनाथांचा धावा केला. मच्छिंद्रनाथ तात्काळ पर्वतावर प्रकट झाले. गोरक्षांनी झालेली हकीकत सांगितली. ती एकल्यावर मच्छिंद्र म्हणाले, "गोरक्षा! हा नक्कीच अत्रेय आहे. त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही असला अचाट प्रकार करता येणार नाही. त्याला शोधण्याचा मार्ग एकच की तू लीन भावाने पंचतत्वात विलीन झालेल्या दत्तात्रेयांना मनोध्यानाने शोध." गुरू आज्ञेनुसार गोरक्षांनी तसे करताच दत्तात्रेयांचे दिव्य स्वरूप त्यांना दृगोचर झाले. "अलक्ष" शब्द गर्जून गोरक्ष त्यांना "आदेश" करते झाले आणि म्हणाले,

अलक्ष दत्तात्रेय अवधूत । तू निरालंब मायातीत॥
अध ऊर्ध्व अजपा जपत । अलक्षलक्षी जागसी॥
अलक्षचिन्नभी चिदद्वयचंद्र। तो अमृत स्त्रवे निरंतर॥
कोटी विद्युल्लता चंद्र भास्कर। अलक्षलक्षी जागसी॥ 
अलक्ष इडा पिंगला शुषुम्ना। मनोन्मन ध्यानधारणा॥
सहजसमाधी मनोपवना । अलक्षलक्षी जागृत॥
अलक्ष शुन्यभूवन श्रुत। ते सहस्त्र्दळहारीनिवांत॥ 
भ्रमरगुहा गुंजारवीत। अलक्षलक्षी जागसी॥
अलक्ष मी आदिनाथ पौत्र। मच्छेंद्रगुरूचा वरदपुत्र॥
तत्प्रसादे निगममंत्र। अलक्षलक्षी जागृत॥
अलक्ष चित्तचैतन्यचिद्रस। तेथे संलग्न समरस॥ 
गोरक्ष चौपदी अविनाश। अलक्ष लक्षे लक्षी पै॥

गोरक्षाच्या या ओळखीवर दत्तात्रेय उद्गरले, "गोरक्षा! अजून ऐक..

"मी वेदशास्त्र अगोचर। मी लोकत्रयाहूनी पर॥ 
मी नव्हेची गा निर्जर। यज्ञादी वर्ण नव्हे मी॥
मज नसे कुळ गोत्र याती। मज स्वर्ग ना अधोगती॥
मी ब्रहमैव अरूपस्थिती। मी परमार्थ तत्व जाण पां॥
मी पर ना अपर। मी क्षर ना अक्षर॥
मी शब्द ना ओंकार। अकार उकार नव्हे मी॥
मी कृपण ना उदार। मी प्रकाश ना अंधकार॥
मित्र ना रोहिणीवर। चटवारश्रुंग नव्हे मी॥
मी कर्ता ना अकर्ता। मी भोक्ता न आभोक्ता॥ 
मी सत्ता न असत्ता। आर्ता पाता नव्हे मी॥ 
मी जाणता न अजाण। मी सेव्य ना शरण॥
मी कारण ना अकारण। ज्ञान अज्ञान नव्हे पै॥ 
मी पाप ना पुण्य। मी कुरूप ना लावण्य॥ 
मी अल्प ना अगण्य। धन्याध्यन्य मी नव्हे॥ 
मी श्वेत ना सावळा। मी रक्त ना पिवळा॥ 
मी नीळ ना सुनीळा। रंगावेगळा असे मी॥ 
मी ब्रह्मचर्य ना गृहस्थ। मी वानप्रस्थ ना सन्यस्थ॥
मी स्वस्थ ना अस्वस्थ। वृत्तस्थ कुटस्थ नसे मी॥ 
मी नसे स्थावर जंगम। मज नसे क्रिया कर्म॥ 
वर्णाश्रम धर्माधर्म। अनामा नाम मज कैचे॥
मी खेचरी ना भूचरी। मी चाचरी ना अगोचरी॥
मी अलक्ष नव्हे निर्धारी। पवन मन नव्हे मी॥
जागृत स्वप्न सुषुप्ती तुर्या। हेही भेद भासती वाया॥
मी नसेची मच्छेंद्रतनया। छायामाया रहित मी॥

दत्तात्रेयांच्या या उत्तरावर गोरक्ष देहभान विसरले. त्या अवस्थेतच मच्छेंद्रनाथांनी गोरक्षांचा हात दत्तात्रेयांच्या हातात ठेवला. द्वैत नावालाही उरले नाही. केवळ सोहम भाव भरून राहीला.

श्रीगोरक्षनाथ संकट मोचन स्तोत्र

बाल योगी भये रूप लिए तब, आदिनाथ लियो अवतारों। ताहि समे सुख सिद्धन को भयो, नाती शिव गोरख नाम उचारो॥
भेष भगवन के करी विनती तब अनुपन शिला पे ज्ञान विचारो । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
सत्य युग मे भये कामधेनु गौ तब जती गोरखनाथ को भयो प्रचारों । आदिनाथ वरदान दियो तब, गौतम ऋषि से शब्द उचारो॥
त्रिम्बक क्षेत्र मे स्थान कियो तब गोरक्ष गुफा का नाम उचारो । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
सत्य वादी भये हरिश्चंद्र शिष्य तब, शुन्य शिखर से भयो जयकारों । गोदावरी का क्षेत्र पे प्रभु ने, हर हर गंगा शब्द उचारो।
यदि शिव गोरक्ष जाप जपे, शिवयोगी भये परम सुखारो। को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
अदि शक्ति से संवाद भयो जब, माया मत्सेंद्र नाथ भयो अवतारों । ताहि समय प्रभु नाथ मत्सेंद्र, सिंहल द्वीप को जाय सुधारो ।
राज्य योग मे ब्रह्म लगायो तब, नाद बंद को भयो प्रचारों । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
आन ज्वाला जी किन तपस्या, तब ज्वाला देवी ने शब्द उचारो । ले जती गोरक्षनाथ को नाम तब, गोरख डिब्बी को नाम पुकारो॥
शिष्य भय जब मोरध्वज राजा,तब गोरक्षापुर मे जाय सिधारो । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
ज्ञान दियो जब नव नाथों को, त्रेता युग को भयो प्रचारों । योग लियो रामचंद्र जी ने जब, शिव शिव गोरक्ष नाम उचारो ॥
नाथ जी ने वरदान दिया तब, बद्रीनाथ जी नाम पुकारो। को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
गोरक्ष मढ़ी पे तपस्चर्या किन्ही तब, द्वापर युग को भयो प्रचारों । कृष्ण जी को उपदेश दियो तब, ऋषि मुनि भये परम सुखारो॥
पाल भूपाल के पालनते शिव, मोल हिमाल भयो उजियारो। को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
ऋषि मुनि से संवाद भयो जब, युग कलियुग को भयो प्रचारों। कार्य मे सही किया जब जब राजा भरतुहारी को दुःख निवारो,
ले योग शिष्य भय जब राजा, रानी पिंगला को संकट तारो । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥
मैनावती रानी ने स्तुति की जब कुवा पे जाके शब्द उचारो । राजा गोपीचंद शिष्य भयो तब, नाथ जालंधर के संकट तारो।।
नवनाथ चौरासी सिद्धो मे, भगत पूरण भयो परम सुखारो । को नही जानत है जग मे जती गोरखनाथ है नाम तुम्हारो ॥

दोहा

नव नाथो मे नाथ है, आदिनाथ अवतार । जती गुरु गोरक्षनाथ जो, पूर्ण ब्रह्म करतार॥
संकट -मोचन नाथ का, सुमरे चित्त विचार । जती गुरु गोरक्षनाथ जी मेरा करो निस्तार ॥

श्री नवनाथांच्या संजीवनी समाध्यांची माहिती

१) मच्छिंद्रनाथ समाधी:
अहमदनगर-  पाथर्डी रोडवरून निवडुंगे गावात उतरणे. तेथुन तीन कि. मी. अंतरावर मढी येथे यावे.मढीवरून ५ कि. मी. अंतरावर पायी जाण्यासाठी मार्ग आहे, किंवा नगर पाथर्डी रोडवर देवराई फाट्यावरून १२ कि. मी. अंतरावर मच्छिंद्रनाथ गड आहे. तसेच नगर - चिचोंडी पाटील - सुलेमान देवळा - बीड या मार्गावरूनसुध्दा रस्ता आहे.

२) जालिंदरनाथ समाधी:
अहमदनगर - पाथर्डी - पाटोदा - बीड या रोडवरून रायमोह गावात उतरणे. तेथुन ५ कि. मी. अंतरावर जालिंदरनाथ देवस्थान आहे. तसेच डोंगरकिन्ही मार्गेसुद्धा रस्ता आहे.

३) कानिफनाथ समाधी:
अहमदनगर - पाथर्डी रोड किंवा बीड - पाथर्डी - नगर या रोडवर निवडुंगे फाट्यावर उतरणे व तेथुन दक्षिणेला ३ कि. मी. अंतरावर कानिफनाथ गड किल्ल्याच्या स्वरूपात आहे. गावाच्या आसपास पुरातन दगडी बांधकामाच्या तीन भव्य बारवा आहेत. त्यांचे दगडी बांधकाम बघण्यासारखे आहे. आसपासचा परीसर निसर्गरम्य आहे.

४) भर्तृहरीनाथ समाधी:
बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी परळी वैजनाथ - गंगाखेड रोडवर वडगांव फाट्यावर उतरून हरंगुळ गावी जावे. तेथे भर्तृहरीनाथांचे भव्य समाधी मंदिर आहे. येथे नागपंचमील यात्रा भरते.

५) रेवणनाथ समाधी:
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटे गाव, यालाच रेवणसिद्ध असेही म्हणतात. येथे नाथांच्या स्वयंभू दगडी चिरा आहेत. रेवणनाथांची दोन प्राचीन मंदिरे आहेत. दर गुरूवारी आणि अमावस्येला भरपुर गर्दी असते.

६) वटसिद्ध नागनाथ समाधी:
हैद्राबाद - परळी रेल्वे महामार्गावर हे तीर्थक्षेत्र येते. लातुर जिल्ह्यापासुन २५ कि. मी. अंतरावर चाकुर तालुक्यात वडवळ हे गांव आहे. येथे वटसिद्ध नागनाथांची संजिवन समाधी आहे. येथे फार जुन्या पद्धतीचे मंदिर आहे.

७) गहिनीनाथ समाधी:
जालिंदरनाथ येवलेवाडीहून सरळ रस्त्याने डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गेकुसळंब मार्गेचांचोलीला जावे. किंवा बीड - पिंपळवडी - कुसळंब मार्गे चिंचोली, किंवा जामखेडहून चिंचोलीला जावे. येथे गहिनीनाथांचे भव्य असे प्राचीन समाधी मंदिर आहे.

८) गोरक्षनाथ समाधी:
सौराष्ट्रात काठेवाडी प्रातांत जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वतावर गोरक्षनाथ सेवेत आहेत. राजकोटहून जुनागड अंदाजे १०० कि. मी. अंतरावर आहे. गिरनारहून द्वारकाधाम प्रभासपाटन तीर्थरूप  (सोरटी सोमनाथ) जाता येते. गिरनारच्या गोरख टोकावर लहानशा मंदिरात गोरक्षनाथांची पाषाणाची मुर्ती आहे. नेपाळ प्रांतात गुरू गोरखनाथ बसलेले आहेत. म्हणून तेथील रहिवाशांना गोरख किंवा गुरखा म्हणतात. महाराष्ट्रामधे नगर तालुक्यात डोंगरगण या ठिकाणीही मंदिर आहे.

श्री चैतन्य गोरक्षनाथ, गर्भगिरी पर्वत

अहमदनगर-वांबोरी रस्त्यावर डोगरगण येथुन मांजरसुंबा याठिकाणी गर्भागिरी पर्वतावर श्री गोरक्षनाथ गड आहे. या ठिकाणी श्री गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केले होते. हिरवाईने नटलेल्या डोंगरावर नाथांचे सुंदर मंदिर आहे. येथे श्री गोरक्षनाथांची काळ्या पाषाणाची प्राचीन स्वयंभू मुर्ती आहे. याठिकाणी दरवर्षी कार्तिक शुद्ध ञयोदशीला गोरक्षनाथ प्रगट दिन सोहळा साजरा होतो. या दिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे. डोंगरगण सह महाराष्ट्रात विविध भागात हा सोहळा साजरा होतो. या दिवशी आपल्या घरी देखिल नाथांची पुजा करुण नाथकृपेचा लाभ आपण घेऊ शकता. या दिवशी आपल्या घरी श्री नवनाथांची प्रतिमा वस्ञाने स्वच्छ पुसुन केशरी गंध लावावा.फुले अर्पण करुण हार घालावा. त्यानंतर धुप व तुपाचा दिवा लावावा. नैवद्यासाठी मलिदा अर्पण करावा. प्रतिमा पुजा नंतर आसनावर बसुन एकाग्र चित्ताने "ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः" या मंञाचा १०८ वेळेस माळ जप करावा व नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील गोरक्षनाथांचा जन्मकथा असलेला ९ वा अध्याय वाचावा नंतर आरती करावी. गाईला नैवद्य द्यावा व सर्वांनी प्रसाद घ्यावा शक्य असल्यास यथाशक्ती अन्नदान करावे.

श्री गोरक्षनाथांची जन्मकथा

श्री सदगुरु मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करीत फिरत असता बंगालात चंद्रगिरी गावास गेले. तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता. त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठगोत्री गौडब्राह्मण रहात असेल. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या स्त्रीचे नाव सरस्वती. ती अति रूपवती असून सद्गुणी असे; पण पुत्रसंतती नसल्याकारणाने नेहमी दिलगीर असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेले. त्यांनी अंगणात उभे राहून 'अलख' शब्द केला आणि भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने त्यास आसनावर बसविले आणि भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीगत सांगून संतति नसल्याने दिलगीर आहे, असे त्यास सुचविले आणि काही उपाय असला तर सांगावा; म्हणून विनंति करून ती त्याच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथास तिची दया आली. मग त्याने सूर्यमंत्राने विभूति मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की, हे भस्म रात्रीस निजतेवेळी खाऊन नीज. हे नुसतेच भस्म आहे, असे तू मनात आणू नको, हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय ! तो तुझ्या उदरी येईल, त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन; तेणे करून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धि त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जावयासाठी उठले असता, तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिने त्यास विचारले. तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेले.

सरस्वतीबाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत हर्ष झाला होता. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेविली. मग ती आनंदाने शेजारणीकडे बसावयास गेली. तेथे दुसऱ्याही पाच-सात बायका आल्या होत्या व संसारासंबंधी त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या. त्यावेळी तिनेहि आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला आणि त्या कानफाड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी भस्म खाल्ले असता, मला पुत्र होईल काय म्हणून विचारले. तेव्हा एकजणीने तिला सांगितले की, त्यात काय आहे? असल्या धुळीने का पोरे होतात? तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे? आम्हाला हे चिन्ह नीट दिसत नाही. अशा तर्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरविल्यामुळे ती हिरमुसले तोंड करून आपल्या घरे गेली व गाईच्या शेणाच्या गोठ्यात  त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले.

बारा वर्षानंतर जेव्हा मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली. तिने नाथांना ओळखले. ''मुलगा कुठ आहे?'' नाथांनी विचारले. ''मला मुलगा झालाच नाही.'' तिने सांगितले. ''खोट बोलू नकोस! मी तुला १२ वर्षा पूर्वी जे भस्म दिले होते त्या भस्माचे काय झाले?'' नाथांनी प्रश्न केला. ''मी ते गाईच्या शेणाच्या गोठ्यात टाकले. असे ऐकल्यावर नाथांना क्रोध येतो. त्यावेळी ती स्ञी नाथांची माफी मागते. योगीराज, मला क्षमा करा!''. त्यावेळी नाथ म्हणतात, मला ती जागा दाखव. तिने नाथांना ती जागा नेऊन दाखविली. त्यावेळी सदगुरु मच्छिंद्रनाथ म्हणतात, ''हे प्रतापवंता, हरिनारायणा, सूर्यसूता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेर ये!''. ''गुरुराया, मी इथे आहे. गोवऱ्यांची रास मोठी आहे. तुम्ही मला बाहेर काढा.''मच्छिंद्रनाथांनी लगेच खाच उकरून त्या मुलास बाहेर काढले. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. सरस्वतीला पश्चाताप झाला. मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्याबरोबर घेऊन गेले. व गाईच्या शेणाच्या राक्षेतुन जन्म झाला म्हणुन त्यांचे गोरक्षनाथ असे त्याचे नाव ठेवले. त्याला शाबरी विद्येत प्रवीण केले. अस्त्रविद्येतही निपुण केले. 

योगबळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतले होते. सिद्ध सिद्धांतपद्धती, अमनस्कयोग, विवेकमार्तंड, गोरक्षबोध, गोरक्ष शतक इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत. गिरनारपर्वतातील श्रीदत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले. चौऱ्याऐंशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला. नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात. नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. त्याच प्रमाणे उत्तरप्रदेश येथिल गोरखपुर जिल्ह्यात गोरक्षनाथांचे भव्य मंदिर आहे. 

गोरक्षनाथ नामस्मरणाचे प्रतिपादन

एकदा गुरु गोरक्षनाथ तीर्थाटन करत एका गावामध्ये आले. गावाबाहेर एक मारुतीचे देऊळ होते, तेथे ते थांबले. एक-दोन दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी नाथमहाराजांकडे येऊ लागली. प्रतिदिन येण्या-जाण्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली. लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले. प्रपंचातील अडचणी सांगू लागले. तेही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले. काही वेळा ते एखाद्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करुन अचंभित करत आसत.

एके दिवशी गावातील मंडळी जमली असता नाथ त्यांना म्हणाले, ”बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही; म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे, भगवंताची निरपेक्ष सेवा करावी. यातच खरा आनंद आहे.” त्यांचे हे बोलणे ऐकून साठ वर्षांचे एक गृहस्थ एकदम चिडून नाथांना म्हणाले, ”प्रपंचामध्ये समाधानी रहावे, असे सांगायला काय जाते; पण ते शक्य आहे का? माझंच बघा, माझा एक मुलगा बारा वर्षांचा आहे, त्याची अजून मुंज व्हायची आहे. दुसरा मुलगा अठरा वर्षांचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे. सर्वांत मोठी मुलगी आहे तिला वीस वर्षे पूर्ण झाली, तरी तिचे लग्न जमत नाही. मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे. तिला औषधपाणी करावे लागते. या सर्वांसाठी माझी मिळकत अपुरी पडते. अशा परिस्थितीत काळजी करू नको तर काय करू?”

नाथांनी त्या गृहस्थाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर ते हसून त्याला म्हणाले, ”काळजी करून प्रपंचातील प्रश्न सुटतात का ? आजपर्यंत आपण काळजी करत आलात, त्याने तुंमच्या समस्या दुर झाल्या का? तरी कोणतीही गोष्ट केवळ काळजीने सुटली नाही. हे कळूनसुद्धा आपल्याला असे वाटत नाही की, आतापर्यंत केली तेवढी काळजी पुरे. काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान जर टिकवले आणि चित्त भगवंताच्या नामावर केंद्रित केले, तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त असते. भगवंत सर्वशक्तीमान असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. तो आपल्या भक्ताच्या मार्गातिल काटे अलगत दुर ककतो. यासाठी जास्तीतजास्त वेळ भगवंताचे नाम स्मरण चिंतन करावे आपला वेळ त्यात जास्तित जास्त घालवावा.” हे सर्व ऐकल्यावर त्या गृहस्थाला आपली चूक समजली. व तो नाथांना नमन करुन त्यांना शरण गेला नाथांनि आपली कृपादृष्टी त्याच्यावर टाकली व त्याला त्याच्या विवंचनेतुन बाहेर काढले. पुढे त्या गावात काही काळ व्यतीत करुन भगवंत भक्तिची गोडी लाेकांत जाग्रुत करुन नाथांनी पुढे गमन केले.

तात्पर्य:- मनाचे समाधान जर टिकवायचे असेल, तर नामावर मन केंद्रित केले पाहिजे. काळजी केल्याने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. यासाठी जास्तीतजास्त वेळ नामस्मरणात घालवावा.

गोरक्षनाथ मंदिर अहमदनगर
श्री चैतन्य गोरक्षनाथ मंदिर, अहमदनगर

श्री चैतन्य गोरक्षनाथ मंदिर, अहमदनगर

अहमदनगर-वांबोरी रस्त्यावर डोगरगण येथुन मांजरसुंबा याठिकाणी गर्भागिरी पर्वतावर श्री गोरक्षनाथ गड आहे. या ठिकाणी श्री गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केले होते. हिरवाईने नटलेल्या डोंगरावर नाथांचे सुंदर मंदिर आहे. येथे श्री गोरक्षनाथांची काळ्या पाषाणाची प्राचीन स्वयंभू मुर्ती आहे.

याठिकाणी दरवर्षी कार्तिक शुद्ध ञयोदशीला गोरक्षनाथ प्रगट दिन सोहळा साजरा होतो. या दिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे. डोंगरगण सह महाराष्ट्रात विविध भागात हा सोहळा साजरा होतो. या दिवशी आपल्या घरी देखिल नाथांची पुजा करुण नाथकृपेचा लाभ आपण घेऊ शकता.
गोरक्षनाथ प्रकट दिनाचे दिवशी आपल्या घरी श्री नवनाथांची प्रतिमा वस्ञाने स्वच्छ पुसुन केशरी गंध लावतात.फुले अर्पण करुन हार घालावा. त्यानंतर धुप व तुपाचा दिवा लावावा. नैवद्यासाठी मलिदा अर्पण करावा. प्रतिमा पुजा नंतर आसनावर बसुन एकाग्र चित्ताने "ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः" या मंञाचा १०८ वेळेस माळ जप करावा व नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील गोरक्षनाथांचा जन्मकथा असलेला ९ वा अध्याय वाचावा नंतर आरती करावी. गाईला नैवद्य द्यावा व सर्वांनी प्रसाद घ्यावा शक्य असल्यास यथाशक्ती अन्नदान करावे.

गुरु गोरक्षनाथ यांचा संसारी लोकांसाठी अमूल्य उपदेश

एकदा गुरु गोरक्षनाथ तीर्थाटन करत एका गावामध्ये आले. गावाबाहेर एक मारुतीचे देऊळ होते, तेथे ते थांबले . एक-दोन दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी नाथमहाराजांकडे येऊ लागली. प्रतिदिन येण्या-जाण्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली. लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले. प्रपंचातील अडचणी सांगू लागले. तेही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले. काही वेळा ते एखाद्या विषयावर लोकांना मार्गदर्शन करुन अचंभित करत आसत.

एके दिवशी गावातील मंडळी जमली असता नाथ त्यांना म्हणाले, ”बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही; म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे, भगवंताची निरपेक्ष सेवा करावी. यातच खरा आनंद आहे.” त्यांचे हे बोलणे ऐकून साठ वर्षांचे एक गृहस्थ एकदम चिडून नाथांना म्हणाले, ”प्रपंचामध्ये समाधानी रहावे, असे सांगायला काय जाते; पण ते शक्य आहे का? माझंच बघा, माझा एक मुलगा बारा वर्षांचा आहे, त्याची अजून मुंज व्हायची आहे. दुसरा मुलगा अठरा वर्षांचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे. सर्वांत मोठी मुलगी आहे तिला वीस वर्षे पूर्ण झाली, तरी तिचे लग्न जमत नाही. मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे. तिला औषधपाणी करावे लागते. या सर्वांसाठी माझी मिळकत अपुरी पडते. अशा परिस्थितीत काळजी करू नको तर काय करू ?”

नाथांनी त्या गृहस्थाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर ते हसून त्याला म्हणाले, ”काळजी करून प्रपंचातील प्रश्न सुटतात का ? आजपर्यंत आपण काळजी करत आलात, त्याने तुंमच्या समस्या दुर झाल्या का? तरी कोणतीही गोष्ट केवळ काळजीने सुटली नाही. हे कळूनसुद्धा आपल्याला असे वाटत नाही की, आतापर्यंत केली तेवढी काळजी पुरे. काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान जर टिकवले आणि चित्त भगवंताच्या नामावर केंद्रित केले, तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त असते. भगवंत सर्वशक्तीमान असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. तो आपल्या भक्ताच्या मार्गातिल काटे अलगत दुर ककतो. यासाठी जास्तीतजास्त वेळ भगवंताचे नाम स्मरण चिंतन करावे आपला वेळ त्यात जास्तित जास्त घालवावा.” हे सर्व ऐकल्यावर त्या गृहस्थाला आपली चूक समजली. व तो नाथांना नमन करुन त्यांना शरन गेला नाथांनि आपली कृपादृष्टी त्याच्यावर टाकली व त्याला त्याच्या विवंचनेतुन बाहेर काढले. पुढे त्या गावात काही काळ व्यतीत करुन भगवंत भक्तिची गोडी लाेकांत जाग्रुत करुन नाथांनी पुढे गमन केले.

तात्पर्य :- मनाचे समाधान जर टिकवायचे असेल, तर नामावर मन केंद्रित केले पाहिजे. काळजी केल्याने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. यासाठी जास्तीतजास्त वेळ नामस्मरणात घालवावा.

गोरक्षनाथांची वाङ्मयसंपदा

आज गोरक्षनाथांनी निर्माण केलेल्या २८ संस्कृत व ४० हिंदी ग्रंथांचा शोध लागला असून ते वाचल्यानंतर गोरक्षांच्या तत्त्वज्ञानाचा सहज परिचय होतो. या ग्रंथात सिद्धसिद्धांतपद्धती, गोरखबानी, महार्थमंजरी, अवधूतगीता, योगमार्तंड, अमरौघप्रबोध, गोरक्षशतक इ. ग्रंथ प्रमुख मानले जातात. यापैकी 'सिद्धसिद्धान्तपद्धती' हा गोरक्षांचा सर्वांत महत्वाचा असा संस्कृत ग्रंथ समजला जातो. यात नाथांनी लोकल्याणासाठी योगमार्गातील गुह्य ज्ञान प्रकटकरून सांगितले असून बद्ध जीवांना मोक्ष मिळवून देणारा असा हा अत्यंत श्रेष्ठग्रंथ आहे. तर 'गोरखबानी' मध्ये योग्याने सदासर्वदा आत्म्याचेच चिंतन करायला हवे व त्यासाठी पंच ज्ञानेंद्रियांना अंतर्मुख करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले आहे. अशाच साधकाला अलख निरंजन परब्रह्माचा साक्षात्कार होऊन तो जीवन्मुक्त होईल असे ते सांगतात.

त्यांच्या 'अमनस्कयोग' या ग्रंथात जीवन्मुक्तीचे रहस्य विशद करून सांगितले असून हा योग मंत्रयोग, ध्यानयोग, जपयोग यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. हा योग जाणणारा योगी सुख-दुःख,शीत-उष्ण, स्पर्श, रस, रूप गंध यांच्या पलीकडे गेलेला असतो. पाण्यात टाकलेले मीठ ज्याप्रमाणे विरघळून जाते त्याचप्रमाणे या लययोगाने मन ब्रह्मतत्त्वामध्ये लीन होते व योग्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. परंतु योगाने या सिद्धींच्या लोभात न अडकता आपली पुढची प्रगती साधायला हवी. हा अमनस्क योग केवळ 'गुरुमुखैकगम्य' म्हणजे केवळ गुरुच्या मुखातूनच प्राप्त होणारा आहे.

नाथांचा 'अवधूतगीता' हा ग्रंथ नाथपंथीयांमध्ये प्रमाणग्रंथ मानला जातो इतकी त्याची योग्यता मोठी आहे. ह्या गीतेत श्रोता आहे कार्तिकेय आणि उपदेशक आहे भगवान् श्रीदत्तात्रेय. या ग्रंथात सर्वव्यापक असा केवळ आत्माच असून तेथे कसल्याही प्रकारचा भेदाभेद असू शकत नाही हे वेदान्ताचे सार सांगितले आहे. ('आत्मैव केवलं सर्वं भेदाभेदो न विते।') आत्मा हा शुद्ध, निर्मळ, अव्यय, अनंत, शुद्ध ज्ञानस्वरूप आणि सुखदुःखातीत असा आहे. तो आतून व बाहेरून चैतन्यरूपाने नटलेला आहे. साकार व सगुण हे सर्व खोटे असून निराकार, शुद्ध, नाशरहित व जन्मरहित असा एक आत्माच सत्य आहे. त्याला आदि, मध्य व अंत अशा अवस्था नाहीत. तो पुरूष नाही की स्त्री वा नपुंसकही नाही. तो षडंगयोगाने वा मनोनाशाने शुद्ध होत नाही. कारण तो स्वभावतःच शुद्ध आणि निर्मळ आहे. अशाप्रकारे या 'अवधूतगीते'त आत्मतत्त्वाचा ऊहापोह असून सर्व नाथसिद्धांना गुरुस्थानी असलेल्या भगवान् दत्तात्रेयांच्या मुखातूनच या गीतेचा उदय झालेला असल्यामुळे समस्त नाथपंथात या 'अवधूतगीते'ला फार महत्वाचे व मानाचे स्थान प्राप्त झाले असल्यास नवल नाही. गोरक्षनाथांच्या ६८ उपलब्ध ग्रंथांपैकी सर्वच ग्रंथांचा असा परिचय स्थलाभावी करून देणे केवळ अशक्यच आहे. मात्र या सर्वच ग्रंथात गोरक्षनाथांनी योग, आत्मा, पिण्डब्रह्माण्ड, अजपा जप, जीव आणि परमात्मा यासारख्या महत्वाच्या विषयांची मौलिक चर्चा केलेली दिसून येते.

गोरक्षनाथांचा उपदेश व तत्त्वज्ञान

गोरक्षनाथांनी हिंदी, संस्कृत भाषेत अनेक ग्रंथ लिहिले. या ग्रंथांतून त्यांनी साधकांना जो मौलिक उपदेश केला आहे त्या उपदेशाचे सार किंवा तत्त्वज्ञान साधारणतः पुढीलप्रमाणे सांगता येईल,

ते म्हणतात, 'ज्याने जिभेवर नियंत्रण मिळविले त्याने सर्व काही जिंकले. फाजील आहार घेतल्याने इंद्रिये प्रबल होऊन ज्ञान नष्ट होते. जो मनुष्य आसन, आहार व निद्रा यांच्या संबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करतो तो वृद्धावस्थेवरच नव्हे, तर मृत्यूवरही मात करतो. मांस, मदिरा भक्षण करण्यापासून जोआनंद मिळतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आनंद योगसाधना करून मिळतो. जीवाची हत्या कधीच करू नका. त्यांच्यावर दया करा. कारण सर्व योगसाधनेचे व अध्यात्माचे मूळ दया हेच आहे. आपले आचार-विचार शुद्ध राखण्यासाठी साधकाने काम, क्रोध, अहंकार, विषयविकार, तृष्णा आणि लोभ यांचा त्याग करायला हवा. हसा, खेळा परंतु ब्रह्माला विसरू नका. रात्रंदिवसस ब्रह्मज्ञानाचीच चर्चा चालू असायला हवी. अल्प-स्वल्प आहार हाच शरीररक्षणाचा उत्तम उपाय आहे. त्यायोगे नाड्यांमध्ये मलाचा संचय होणार नाही व प्राणायाम सोपा होऊन नाड्यांमध्ये होईल, व चक्रांचा भेद होईल आणि योग्याला अनाहत ध्वनी ऐकू येईल. कमी खाण्याप्रमाणेच साधकाने कमी बोलायला हवे. योग्याने वादविवादात कधीही भाग घेऊ नये. तसेच मूर्खांशी मैत्री करू नये. योग्याने हे सर्व नियम पाळून आपल्या कुंडलिनीला जाग आणून त्या महाशक्तीला ब्रह्मारंध्रामध्ये नेऊन बसवायला हवे. तसेच योग्याने आत्मस्थ होऊन प्राणायामाची साधना नियमितपणे करायला हवी. तसेच, शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी दर तीन-चार महिन्यांच्या अंतराने त्याने कायाकल्पही करायला हवा, इत्यादी.

श्रीगोरक्षनाथांच्या ग्रंथांवरून त्यांच्या अशा तत्त्वज्ञानाची आपल्याला ओळख होते. गोरक्षनाथांच्या काळात भारतातील अनेक धर्मसंप्रदायांमध्ये वामाचार सुरू झाला होता आणि पंचमकरांना (मांस, मद्य, मैथुन इ.) प्रमाणाबाहेर महत्व प्राप्त झाले होते. स्वतःला साधक म्हणविणारे आपल्या वासनापूर्तीसाठी याचा सर्रास उपयोग करीत होते. याला पायबंद घालण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी साधनांची पवित्रता, शुद्ध चारित्र्य आणि संयमपूर्ण नीतिमान जीवनाचे महत्व आपल्या ग्रंथाद्वारे व उपदेशाद्वारे साधकांना पटवून देण्याचे फार मोठे कार्य केले, व स्वतःचाच आदर्श त्यांच्यापुढे ठेवला. त्यांचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी शैव संप्रदायाचे संघटन करून तो संप्रदाय बलशाली केला, व त्यात नीतिमान, सदाचारी व संयमी साधक निर्माण केले. तसेच, त्यांनी या पंथात जातिभेद वा धर्मभेद कधीही मानला नाही. त्यांनी यवनांनाही तितक्याच मुक्तपणे आपल्या पंथात प्रवेश दिला.

आद्य शंकराचार्यांनी मोक्षासाठी जसे ज्ञानमार्गाला प्राधान्य दिले तसेच गोरक्षनाथांनी त्याच ध्येयपूर्तीसाठी योगमार्गाला महत्व दिले. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ आधार 'सांख्यमत' हा असून 'पिण्डी ते ब्रह्माण्डी' या गोष्टीवर त्यांचा मुख्य भर आहे.आपल्या शरीरात सारे ब्रह्माण्डसूक्ष्म रूपाने वसत आहे असे त्यांच्या 'सिद्धसिद्धान्तपद्धती' या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे. मृत्यूनंतरची मुक्ती ही गोरक्षांच्या तत्त्वज्ञानात बसत नाही. मंत्रयोग, लययोग, हठयोग आणि राजयोग यांच्या साहाय्याने नाथयोगी आपल्या देहालाच शिवस्वरूप बनवून याच देही मुक्त होऊ शकतो नि यासाठीच षट्चक्रे, पंचआकाश, नवद्वारे इ. चे सम्यक् ज्ञान नाथयोग्याला असणे आवश्यक आहे.

कुण्डलिनी जागृतीलाही नाथसंप्रदायात विशेष महत्वाचे स्थान आहे. कारण या कुण्डलिनीशक्तीच्या द्वारेच जीवशिव सामरस्याचा अनुभव नाथयोग्याला येतो. मात्र हा अनुभव गुरुकृपेवाचून मिळणे दुरापास्त असल्यामुळे नाथपंथात गुरुला अपरंपार महत्व आहे. अशा गुरुच्या ठिकाणी ३६ लक्षणे वा गुण असावयास पाहिजेत. एवढेच नव्हे, तर शिष्यातही ३२ लक्षणे वा गुण असल्यावाचून त्यास शिष्य होता येत नाही. या संप्रदायात शरीर हेच मोक्षप्राप्तीचे किंवा कैवल्यप्राप्तीचे साधन असल्यामुळे ते उपेक्षणीय समजले जात नाही. आमच्या उपनिषदांतही याचसाठी शरीररक्षणाला महत्व दिलेले आढळून येते. हठयोगाच्या साहाय्याने साधकाला याचि देही याचि डोळा हा मुक्तीचा सोहळा अनुभवता येतो असे नाथांचे तत्त्वज्ञान सांगते.

नाथांचे हे तत्त्वज्ञान हे द्वैत अद्वैताच्या पलीकडचे आहे. एकच अद्वितीयय असे परमतत्त्व शिव आणि शक्ती अशा दोन अवस्थांमधून प्रकट होते व शिव हाच शक्तिरूप बनून सर्व दृश्यसृष्टीमध्ये प्रकटतो असे हे तत्त्वज्ञान सांगते. गोरक्षनाथांनी सांगितलेला योगमार्ग हा 'हठयोग' आहे. ह=सूर्य आणि ठ-चंद्र. म्हणजेच हा सूर्यचंद्रांचा योग आहे. सूर्य प्राणवायू आणि चंद्र अपानवायू. या दोहोंचा योग तो हठयोग. श्रीगोरक्षनाथांच्या तत्त्वज्ञानात योग, ज्ञान आणि भक्ती यांना सारखेच महत्व असून शिवाकडून योगविद्या, ब्रह्माकडून ज्ञान आणि विष्णूकडून भक्ती यांची प्राप्ती होते असे हा संप्रदाय मानतो. तसेच, ह्या तिन्ही दैवतांच्या शक्ती श्रीदत्तात्रेयांमध्ये एकवटल्या आहेत असेही या संप्रदायात सांगितले आहे.

श्रीगोरक्षनाथांच्या महान तत्त्वज्ञानाची ही एक ओझरती ओळख असून ज्यांना त्यांचे संपूर्ण तत्त्वज्ञान जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांचे 'सिद्धसिद्धान्तपद्धति', 'गोरखबानी' इ. ग्रंथ मुळातून अभ्यासणेच योग्य ठरेल. 'आंतरिक शुद्धीवर भर, अनुभूतीला प्रमाण मानणारे मुक्तचिंन, तपःपुनीत तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि प्रखर आत्मविश्वास या गुणांमुळे गोरक्षनाथांनी औपनिषदिक ऋषींचा वारसा समृद्ध बनविला.' त्यांच्या एकंदर कार्याची थोडक्यात ओळख पुढीलप्रकारे करून देता येईल.

'गोरक्षनाथांच्या धर्मसाधनेत निगम, आगम, मंत्र-तंत्र, वज्रयान, हनियान, सिद्धयोगी इ. चा समावेश होत असला तरी तिचे शुद्धीकरण करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न त्यांनी केला. वैदिकांचे शुष्क व नीरस कर्मकाण्ड त्यांनी वगळले. तांत्रिकांचा व शाक्तांचा वामाचार त्यांनी त्याज्य मानला. जारण, मारण, उच्चाटन यांच्यापेक्षा देहशुद्धी, ध्यानयोग, कुंडलिनीजागृती यांनी त्यांनी आपला साधनेत महत्वाचे स्थान दिले. वैदिक कर्मकाण्डाला व तांत्रिकांच्या वामचाराला विरोध करून त्यांनी आपली योगसाधना कर्मयोग व भक्तियोग यांच्याद्वारे समाजाभिमुख केली. इंद्रियनिग्रह, आत्मसाधना, मनोविकास यांना महत्व देऊन धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद यांचा विचार न करता त्यांनी भारतीय धर्मसाधनेची बैठक अधिक विस्तृत केली. गुरु गोरक्षनाथांची महती गाण्यासाठी कित्येक ग्रंथ लिहिले तरी ते अपुरे पडतील, इतके ते महान होते!

।।  श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः  ।।