श्री चिदंबर दिक्षीत महास्वामी

चिदंबर दिक्षीत महास्वामी
चिदंबर दिक्षीत महास्वामी

जन्म: १७५८, शुक्ल यजुर्वेदीय ब्राम्हण
आई/वडील:  आईचे नाव ज्ञात नाही / मार्तंड दीक्षित जोशी
कार्यकाळ: १७५८ ते १८१५
पत्नी: सरस्वती, सावित्री
अवतार समाप्ती: १८१५ 
शिष्य: राजाराम
वाड्ग्मय: श्री दत्त प्रेम लहरी, भजन गाथा, अनुभव वल्ली, ब्रह्मोपदेश, स्पुट लेख    

यांचे घराणे विजापूर जिल्ह्यातील गोठी गावचे. यांचे कुलदैवत खंडोबा असून यांच्या वडिलांनी, मार्तंड जोशी यांनी सोमयाग केला म्हणून यांचे नाव दीक्षित असे पडले. हे शुक्लयजुर्वेदाच्या काण्व शाखेचे ब्राह्मण होत. कर्नाटकातील मुरगोड गावी यांचा जन्म झाला. वर्णाश्रम धर्मभ्रष्ट झाला, त्याचे नीट पालन व्हावे म्हणून यांचा अवतार झाला. हे गृहस्थाश्रमी असून सरस्वती व सावित्री या नावाच्या दोन बायका यांना होत्या. सहा मुलगे, एक मुलगी; अशी सात अपत्ये यांना होती. मुरगोड येथे पाठशाळा स्थापन करून यांनी धर्मसेवा केली. या गावी एक ब्रह्महत्या झाली म्हणून यांनी हे गाव सोडून देवलापूर, हुबळी, हिपरगी, कुंदगोळ, नवलगुंद इत्यादी गावी भ्रमण केले. यांनी सन १८०७ साली नवलगुंद येथे एक यज्ञ केला. दुसरे बाजीराव पेशवे, रास्ते, गोखले, निपाणीकर सरदार इत्यादींची यांच्यावर श्रद्धा होती. यांची दीड लाखांवर अभंगरचना आहे. गुर्लहोसूर येथे यांची समाधी आहे.

चिदंबर दीक्षित हे दत्तावतारी म्हणून प्रसिद्ध असून कवी मोरोपंतांचे नातू सखाराम त्र्यंबक उर्फ अबूनाना गर्दे यांनी ‘श्रीमच्चरित्र’ नावाच्या अनेक वृत्तात्मक चरित्रात यांचा जीवनवृत्तांत दिला आहे. बाभूळगावचे पाटील राजाराम महाराज हे यांचे पट्टशिष्य असून त्यांनीही सुमारे एक लक्ष अभंगात यांचे चरित्र सांगितले आहे. शिवशास्त्री या एका तेलंगी ब्राह्मणानेही संस्कृत श्लोकांत यांचे चरित्र गाइले आहे. गोण्णगरास असताना यांनीही सोमयाग केल्याचा उल्लेख यांचे चरित्रकार करतात. या अवताराने सनातनधर्माचा उद्धार करून भक्तिज्ञानाचा प्रसार केला. पाठशाळा, अन्नदान, अध्यापन, निरूपण, पुराणकीर्तन यांत ते रंगून गेले होते. ‘शुभं ब्रूयात्। मंगलं ब्रूयात्। शुभं ब्रूयांत्।’ अशा शब्दोच्चारांनी ते आसनावर विराजमान होत. ‘आम्ही ब्राह्मणांनी, ब्रह्मस्वरूपीयांनी, सर्व जगाचे सर्वस्वदान दुसऱ्यास करता येण्याजोगे दानशूर व्हावे, हात पसरण्यातच स्वधर्म मानू नये,’ असे ते शिष्यांना सांगत. दान देण्यात धन्यता वाटावी, घेण्यात आनंद मानू नये, अशी त्यांची शिकवण होती. स्वत:च्या मुलाने एक लाखांचा निधी आपल्या नावावर गोळा केलेला पाहून यांना यांना मनस्वी वाईट वाटले. त्यांनी तो सर्व निधी गोरगरिबांना वाटून टाकला. यांच्या राजाराम महाराज नावाच्या शिष्याने

‘स्वारी चाले चिदंबर । विप्रमंडलीके भार॥१॥ झांज ढोलकी मंजिरे । प्रेमभजन लागतय्यारे ॥२॥ बिना सतार मुरली । भजन करत स्वारी चली ॥३॥ दास कहे चिदंबर । लीला बतावे अपार ॥’ असे यांचे वर्णन केले आहे.

चिंदंबरस्वामी दीक्षित
.

चिदंबर दीक्षितांच्या भक्तगणांत सर्व जातींचे, पंथांचे, वृत्तींचे लोक होते. गृहस्थ, यती, ब्राह्मण, ब्राह्मणेतर असे सर्वजण त्यांच्या परिवारात असत. ‘श्रीमच्चरित्रा’त अबूनाना गर्दे यांनी चिदंबरांना दत्तात्रेयस्वरूप मानले आहे. कविवर्य मोरोपंतांची मुलगी आनंदीबाई ही म्हैसाळचे त्र्यंबकराव गर्दे यांनी दिली होती. या दांपत्याचा वडील मुलगा म्हणजे सखाराम उर्फ अबूनाना असून तो मोठा दत्तभक्त होता. श्रीपादवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वतींनी आपल्या भक्तांना ‘मुर्गोडी वसतो चिदंबररूपें तूं तेथ जा लौकरी’ असे सांगितल्याची माहिती चरित्रकार देतात.

‘यद्व्याजें शिव हा चिदंबर गुरू त्रैमूर्तीचा पुतळा । दत्तात्रेय सगूण होउनि आता हा पातला भूतला ॥’ अशी अबूनानांची श्रद्धा होती. पूर्वीचे दोन दत्तावतार म्हणजे श्रीपादयती व श्रीनृसिंहसरस्वती आणि ‘आता दत्तचि तो चिदंबर गुरु झाला गृहस्थाश्रमी’ असे त्यांनी म्हटले आहे. ‘श्रीमत्स्वामिचिदंबरा नरहरी यांते नसे भेद हा’ असे कवी वारंवार सांगत आहे. श्रीपादयती, नृसिंहसरस्वती व चिदंबर दीक्षित यांचे ऐक्य भक्तांना प्रतीत होई. राजाराम महाराजांनी चिदंबरांचे वर्णन मोठ्या रेखीव पद्धतीने केले आहे.

सगुण सांवळा ब्रह्मींचा पुतळा । देखियेला डोळां चिदंबर ॥१॥
चंद्रकांति ऐसा चिरा साजे शिरीं । भाळीं हे कस्तुरीटिळक शोभा ॥२॥
धोत्र शुभ्रकांठी कासेसी कसोटी । अंगी शोभे उटी मैलगिरी ॥३॥
त्यावरी हो साजे यज्ञोपवीत शोभा । विद्युल्लता नभामाजीं जैसी ॥४॥
क्षीरावर्ण जैसा अंगींचा दुशाला । मेळा भोंवताला ब्राह्मणांचा ॥५॥
दास म्हणेज चाले त्रैलोक्याचा राणा । बरोबरी नाना यात्रा दाटी ॥६॥

मुरगोड मुळ देवस्थान
मुरगोड मुळ देवस्थान

जमखड़ी (कर्नाटक राज्य) जवळच्या गोठे या गावात मल्हार भट्ट नावाचे एक श्रेष्ट तपस्वी व् महानुभवी जन्मास आले. कुमार वयात असतांनाच प्रापंचिक तिटकारा, गावातील शिक्षण सोयींचा अभाव, सोळाव्या वर्षी गुरुस्थानी असलेल्या वडिलांचे देहावसान, कौटुंबिक जबाबदारी, पारमार्थिक, जिवनाविशयी आत्यंतिक तळमळ यामुळे काशी क्षेत्री जावुन स्वयंप्रकाश गुरुंजवळ सतत विस वर्षे विद्याभ्यास करुन ते सकल शास्त्रात पारंगत झाले, स्वयंप्रकाश श्रीगुरुंच्या आज्ञेनुसार मल्हारभट्ट गोठे या आपल्या गावी परतले, त्यानंतर त्यांनी शहाणे करून सोडावे सकल जन या दृष्टीने संस्कृत पाठशाला उघडून धर्म व नितिचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला,

"धर्मग्लानी आली पाहुनी हाती जनी यास्तव | 
येवुनी पोटा लावी जग धर्मे सेतुचे वाटे ||"

आणि म्हणुनच पाखंडापणाचे बंड मोडून, भक्तज्ञानाचा डांगोरा पीटुन, शांति-सुखाचा सूकाळ करणारा सत्पुत्र आपल्या पोटी अवतारावा या हेतूने त्यांनी प्रथम सुगोल क्षेत्री जावून सोमनाथाच्या सहवासात सात वर्षे गायत्री पुरस्चरण केले, तदनंतर हिप्परगी क्षेत्री प्रयाण करुण आपले कुलदैवत मार्तंड भैरव यांची दोन वर्ष आराधना केली.

शिव चिदंबर महास्वामी

जमखड़ी (कर्नाटक राज्य) जवळच्या गोठे या गावात मल्हार भट्ट नावाचे एक श्रेष्ट तपस्वी व् महानुभवी जन्मास आले. कुमारवयात असतांनाच प्रापंचिक तिटकारा, गावातील शिक्षण सोयींचा अभाव, सोळाव्या वर्षी गुरुस्थानी असलेल्या वडिलांचे देहावसान, कौटुम्बिक जबाबदारी, पारमार्थिक, जिवनाविशयी आत्यंतिक तळमळ यामुळे काशी क्षेत्री जावुन स्वयंप्रकाश गुरुंजवळ सतत विस वर्षे विद्याभ्यास करुन ते सकल श्रासंत पारंगत झाले, स्वयंप्रकाश श्रीगुरुंच्या आद्न्येनुसार मल्हारभट्ट गोठे या आपल्या गावी परतले, त्यानंतर त्यांनी 'शहाणे करून सोडावे सकल जन' या दृष्टीने संस्कृत पाठशाला उघडून धर्म व् नितिचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला,

धर्मग्लानी आली पाहुनी हाती जनी यास्तव | येवुनी पोटा लावी जग धर्मे सेतुचे वाटे ||

आणी म्हणुनच पाखंडापणाचे बंड मोडून, भक्तज्ञानाचा डांगोरा पीटुन, शांति-सुखाचा सूकाळ करणारा सत्पुत्र आपल्या पोटी अवतारावा या हेतूने त्यांनी प्रथम सुगोल क्षेत्री जावून सोमनाथाच्या सहवासात सात वर्षे गायत्री पुरस्चरण केले, तदनंतर हिप्परगी क्षेत्री प्रयाण करुण आपले कुलदैवत मार्तंड भैरव यांची दोन वर्ष आराधना केली.

मार्तंडेश्वर आज्ञा करी एसी | तुम्ही जावे चिदंबर क्षेत्रासी || 
चिदंबर प्रसन्न होवूनी तुम्हासी | अवतरे निश्चय़े तुमच्या कुशी ||

असा दृष्टांत झाला. या दृष्तान्तामुळे त्यांनी आकाश चिदंबर (तामिलनाडू) क्षेत्री जावून सतत तिन वर्षे घोर तपश्चर्या केली. भगवान शंकराना प्रसन्न करून घेतले. त्यावेळेस भगवान महादेव कोटि सुर्याच्या दिव्य प्रकाशात प्रगट होवून त्यांनी, 

मी तुम्हास झालो प्रसन्न | एसे दिधले अभय दान || तुमच्या उदरी अवतार धरून | जग उद्धारण करीन मी ||

असा इष्टवर दिला. आणि शके १६८० कार्तिक वद्य षष्टि सोमवार या दिवशी शिव चिदंबर महास्वामिंनी भूतलावर अवतार धारण केला. चिदंबर स्वामींनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला आणि चमत्कार दाखविले व् लोकांना भागवत भक्तीचा मार्ग दाखविला. शिव चिदंबर या नामात सर्व शक्ति आहे. नामस्मरण करत असता दृष्टांचेही अंतकरण दृष्टपणा सोडून प्रेमाने भरुन जाते. नाम घेता अज्ञानाचा नाश होतो. चिदंबर नाम सर्वात श्रेष्ट आहे. भगवंताच्या सर्व नामाचा मूळ हेतु सर्वश्रेष्ट आहे. जे शुद्ध निर्विशेष ब्रह्म तेच चिदंबर होय. तेच सर्व नामांचे जन्मस्थान आहे. तेथुनच सर्व अवतार होतात. चिदंबर ब्रम्ह आहे. चिदंबर कृष्ण आहे आणि चिदंबरच भगवान महादेव आहेत. जगाची उत्पत्ति तेथेच होते. व्यास महर्षिन्नी स्कंद पूराण यात चिदंबर महात्म्य वर्णिलेले आहे. सोळा हजार श्लोकांनी या नामाचा महिमा वर्णन केला आहे.

शत वर्ष बाकी असता कृष्णासी | लवकर जाण्याची त्वरा केलि ||१||
कृष्ण सांगितले ते वेळी उत्तर | कलियुगी अवतार घेणे आम्हा ||२||
दिक्षितांचे कुळी वैदिक ब्राम्हण | शत वर्ष पूर्ण करू तेथे ||३||                                                                                
व्यासोक्त पुराण व्यासाचे उत्तर | तोचि चिदंबर दास म्हणे ||४||

म्हणुनच सर्व नामामधे चिदंबरांचिच शक्ति आहे. कलियुगात तीच शक्ति चिदंबर रुपात अवतरली. पूर्ण ब्रह्म चिदंबर भूमीवर मूळ नाम चिदंबरच धारण करून अवतरले. शिव चिदंबर हा महामंत्र आहे व यात उद्धार करण्याची फार मोठी शक्ति भरलेली आहे. चिदंबर स्वामींचे महाराष्ट्रात आगमन व् वास्तव्य घडले ते त्यांच्या एक महान भक्तामुळे. गोदावरी नदीच्या तीरावर बाभुळगाव(गंगा), ता. वैजापुर, जि. औरंगाबाद या नावाचे एक खेडेगाव आहे. अत्यंत छोट्याश्या आशा या गावात महान भागवत भक्त हरिसिंग व् पतिव्रता लक्ष्मीबाई यांचे पोटी महाभक्त दास राजाराम यांचा जन्म झाला. अतिशय दुर्गम भाग, निर्जन प्रदेशात त्यावेळी निजामांचे राज्य होते. आई लक्ष्मीबाई, वडिल हरिसिंग परदेशी (राजपूत) हे महान विट्ठलभक्त होते. २० वर्षे पायी पंढरपुर वारी करणारे गृहस्थ, दोन गावचे पाटिल (नांदुर ढोक व् नांदुर खंडाला) आशा या विट्ठल भक्ताच्या घरी राजारामांचा जन्म मंगळवार सर्वजित नाम संवत्सर शके १९९० रोजी झाला. याच बाभुलगावात महान पंचाग्नि साधना करणारे द्वारकादास महाराजांचे वास्तव्य होते. ते हरीसिंग यांचे गुरु. राजाराम महाराज दररोज वडिलांबरोबर आश्रमात भागवत पुराण ऐकण्यासाठी जात असे. त्यांना वयाच्या पाचव्या वर्षिपासून च भागवत भक्तीचा छंद लागला. शिवपूजा, नामस्मरण, पुराणकथा असा नित्यक्रम चालू असतांनाच द्वारकादास महाराजांनी राजारामान्ना सांगितले की, तुला वयाच्या आठव्या वर्षी देव भेटेल. त्या प्रमाणे जवळच असलेल्या बालेश्वराच्या मंदिरात चिदंबर स्वामींनी राजारामान्ना साधुच्या रुपात दर्शन दिले. तेव्हापासून राजाराम महाराजांना सर्व गोष्टीत विरक्ति आली. पुढे दुष्काळ पडला, वडिलांचे निधन झाले, घरात मन रमेना, तशातच आईच्या आग्रहास्तव झालेले लग्न, वडिलोपर्जित शेती होती परंतु त्यातही मन रमेना. पुढे त्यांना पेशव्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या हौशंगाबाद (मध्यप्रदेश) येथे शिलेदार म्हणून नोकरी मिळाली. त्यांच्या हाताखाली पाचशे सैनिक होते. तेलंग देशीचा (आंध्रप्रदेश) ब्राम्हण कृष्णभट्ट यांनी राजाराम महाराजांची हौशिंगाबाद येथे भेट घेउन सांगितले की, तुम्ही संत तुकाराम महाराजांचे अवतार असून त्यांचे राहिलेले कार्य तुम्हांस पूर्ण करावयाचे आहे.

अवतार श्रेष्ट | द्विज कुल भूषण || पांडुरंग अवतार | उघड जगी चिदंबर ||
तेव्हा होतो तुकाराम | आता झालो राजाराम || चिदंबर चरणी हो विश्राम | पावे दास राजाराम||

हे एकुन त्यांनी निजमाच्या नोकरीचा त्याग करून पंढरपुर गाठले.तेथे त्यांनी धर्मराज बडवे यांना देवाच्या भेटीची इच्छा बोलुन दाखविली. बडव्यांनी त्यांना सांगितले की, विठ्ठल अवतार सध्या कर्नाटकातील मुरगोड येथे चिदंबर स्वामी या नावाने प्रगट झालेला आहे. त्यांनी राजाराम महाराजांबरोबर लिम्बाजी नाइक व् कानडी भाषा येणारा एक नोकर दिला. त्यांना घेउन महाराज कुंदगोळ या गावी पोहोचले. तेथे एका लिंगायत वाण्याच्या गोठ्यात तिन दिवस मुक्काम झाले तरी स्वमिंची भेट झाली नाही. तिसऱ्या दिवशी स्वामींनी स्वप्नात येउन सांगितले की, "मी एक गरीब ब्राम्हण रुपात राहत आहे." आशा प्रकारे महाराजांची भेट झाली. राजाराम महाराजांना स्वामींचा सहवास लाभला. त्या काळात स्वामींनी अनेक लीला दाखविल्या. अनेक लोकांना भक्तीचा व ज्ञानाचा मार्ग दाखविला. ते सर्व अभंग रुपात राजाराम महाराजांनी स्वहस्ताक्षरात लिहून ठेवले आहेत. जवळपास सव्वा लाख अभंग मूळ स्वरूपात आजही श्रीक्षेत्र बाभुलगांव येथे पहावयास मिळतील. श्री चिदंबर महास्वामींनी आपल्या महान भक्ताला स्वयंभू मूर्ति निर्माण करून दिल्या व् वचन दिले की तू मागे वळुन न पाहता चालत रहा, मी तुझ्या पाठीमागे तुझ्या घरी वास करण्यासाठी येत आहे. परंतू काकती (बेळगाव जवळ) येतांच राजाराम महाराजांनी मागे वळुन पाहिले व् तेवढ्यात चिदंबर स्वामी त्या मूर्तित लिन झाले.

त्या स्वयंभू मूर्ति घेउन राजाराम महाराज आपल्या घरी बाभुलगाव गंगा येथे आले. त्या मूर्तीची आपल्या वाड्यात स्थापना करणार, परंतु तो पेशवाई चा काळ असल्याने, व् ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनाही ज्यांचेकडून त्रास झाला त्याच तथाकथित धर्म रक्षकाकडून राजाराम महाराजांनाही त्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी विरोध झाला. कारण सांगितले की, प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्तीची स्थापना करता येणार नाही. परंतु पेशव्यांच्या हट्टाला न जुमानता राजाराम महाराजांनी मूर्ति तशाच घरात नेत असतांना पेशव्यांनी गोळीबार केला. ती गोळी श्रीचिदंबर स्वामींनी आपल्या दंडावर घेतली (मूर्तीच्या डाव्या दंडावर ही खूण आजही आहे). व् मुर्तिरूप राजाराम महाराजांच्या वाड्यात जावून उभे राहिले. श्री चिदंबर स्वामी चालत असतांना राजाराम महाराजांनी स्वतःचा शेला पायघडी म्हणून अंथरला होता. त्यावर बारा पावलांच्या खुणा आजही मंदिरात पहावयास मिळतात.

या स्वयंभू मूर्तीची अजुनही प्राणप्रतिष्ठ झालेली नाही, कारण स्वतः श्रीचिदंबर महास्वामिच चालत जावून तेथे उभे राहिले आहेत. आणि ते ठिकाण म्हणजे बाभुलगाव गंगा. श्रीचिदंबर स्वामींचि स्वयंभू मूर्ति ही फ़क्त गोदावरी तिरी राजाराम महाराजांच्या वाडयातच आहे. अन्य कोठेही नाही म्हणुनच येथील स्वामिंच्या दर्शनाने मनुष्य कृत कृत होतो. राजाराम महाराजांनी अभंग रुपात लिहल्याप्रमाणे;

मूर्ति करविली जैशी | प्रगट श्रुष्टिसी || दावी अवतार कृत्य | म्हनवी चिदंबर सत्य ||
मूर्ति करविली पाषाण | तेने करावे भाषण || तरीच अवतार खरा | दास म्हणे चिदंबर ||
चिदंबर मूर्ति बोलवी पाषाण || अवतार जाण कळले तेव्हा ||१|| 

या अभंगातिल अर्थाप्रमाने या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होण्याअगदोर संत माउली ज्ञानेश्वारांची ९ लक्ष लोकांची दिंडी बाभुलगावत घेउन येतील त्यावेळीस्वामिंच्या मूर्ति त्या सर्वांसमक्ष आशीर्वाद वचन देतील. व् माउली संत ज्ञानेश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. त्याच वेळेस चिदंबर अवतार संपवतील.

मुरगोड
.

शिष्य राजारामा विषयी 

अत्यंत छोट्याश्या आशा या गावात महान भागवत भक्त हरिसिंग व पतिव्रता लक्ष्मीबाई यांचे पोटी महाभक्त दास राजाराम यांचा जन्म झाला. अतिशय दुर्गम भाग, निर्जन प्रदेशात त्यावेळी निजामांचे राज्य होते. आई लक्ष्मीबाई, वडिल हरिसिंग परदेशी (राजपूत) हे महान विट्ठलभक्त होते. २० वर्षे पायी पंढरपुर वारी करणारे गृहस्थ, दोन गावचे पाटिल (नांदुर ढोक व नांदुर खंडाला) आशा या विट्ठल भक्ताच्या घरी राजारामांचा जन्म मंगळवार सर्वजित नाम संवत्सर शके १९९० रोजी झाला. याच बाभुलगावात महान पंचाग्नि साधना करणारे द्वारकादास महाराजांचे वास्तव्य होते. ते हरीसिंग यांचे गुरु. राजाराम महाराज दररोज वडिलांबरोबर आश्रमात भागवत पुराण ऐकण्यासाठी जात असे. त्यांना वयाच्या पाचव्या वर्षिपासून च भागवत भक्तीचा छंद लागला. शिवपूजा, नामस्मरण, पुराणकथा असा नित्यक्रम चालू असतांनाच द्वारकादास महाराजांनी राजारामाना सांगितले की, तुला वयाच्या आठव्या वर्षी देव भेटेल. त्या प्रमाणे जवळच असलेल्या बालेश्वराच्या मंदिरात चिदंबर स्वामींनी राजारामाना साधुच्या रुपात दर्शन दिले. तेव्हापासून राजाराम महाराजांना सर्व गोष्टीत विरक्ति आली.

पुढे दुष्काळ पडला, वडिलांचे निधन झाले, घरात मन रमेना, तशातच आईच्या आग्रहास्तव झालेले लग्न, वडिलोपर्जित शेती होती परंतु त्यातही मन रमेना. पुढे त्यांना पेशव्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या हौशंगाबाद (मध्यप्रदेश) येथे शिलेदार म्हणून नोकरी मिळाली. त्यांच्या हाताखाली पाचशे सैनिक होते. तेलंग देशीचा (आंध्रप्रदेश) ब्राम्हण कृष्णभट्ट यांनी राजाराम महाराजांची हौशिंगाबाद येथे भेट घेउन सांगितले की, तुम्ही संत तुकाराम महाराजांचे अवतार असून त्यांचे राहिलेले कार्य तुम्हांस पूर्ण करावयाचे आहे,

"अवतार श्रेष्ट | द्विज कुल भूषण ||
पांडुरंग अवतार | उघड जगी चिदंबर ||
तेव्हा होतो तुकाराम| आता झालो राजाराम ||
चिदंबर चरनी हो विश्राम | पावे दास राजाराम ||"

मुरगोड भक्तनिवास
भक्तनिवास

हे एकुन त्यांनी निजमाच्या नोकरीचा त्याग करून पंढरपुर गाठले. तेथे त्यांनी धर्मराज बडवे यांना देवाच्या भेटीची इच्छा बोलुन दाखविली. बडव्यांनी त्यांना सांगितले की, विठ्ठल अवतार सध्या कर्नाटकातील मुरगोड येथे चिदंबर स्वामी या नावाने प्रगट झालेला आहे. त्यांनी राजाराम महाराजांबरोबर लिम्बाजी नाइक व कानडी भाषा येणारा एक नोकर दिला. त्यांना घेउन महाराज कुंदगोळ या गावी पोहोचले. तेथे एका लिंगायत वाण्याच्या गोठ्यात तिन दिवस मुक्काम झाला तरी स्वामींची भेट झाली नाही. तिसऱ्या दिवशी स्वामींनी स्वप्नात येउन सांगितले की, "मी एक गरीब ब्राम्हण रुपात राहत आहे." आशा प्रकारे महाराजांची भेट झाली.

"मार्तंडेश्वर आज्ञा करी एसी | तुम्ही जावे चिदंबर क्षेत्रासी || 
चिदंबर प्रसन्न होवूनी तुम्हासी | अवतरे निश्चय़े तुमच्या कुशी ||"
 असा दृष्टांत झाला.

या दृष्तान्तामुले त्यांनी आकाश चिदंबर (तामिलनाडू) क्षेत्री जावून सतत तिन वर्षे घोर तपश्चर्या केली. भगवान शंकराना प्रसन्न करून घेतले. त्यावेलेस भगवान महादेव कोटि सुर्याच्या दिव्य प्रकाशात प्रगट होवून त्यांनी

"मी तुम्हास झालो प्रसन्न | एसे दिधले अभय दान || तुमच्या उदरी अवतार धरून | जग उद्धारण करीन मी ||
असा इष्टवर दिला. आणि शके १६८० कार्तिक वद्य षष्टि सोमवार या दिवशी शिव चिदंबर महास्वामिंनी भूतलावर अवतार धारण केला. 

चिदंबर स्वामींनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला आणि चमत्कार दाखविले व लोकांना भागवत भक्तीचा मार्ग दाखविला. शिव चिदंबर या नामात सर्व शक्ति आहे. नामस्मरण करत असता दृष्टांचेही अंतकरण दृष्टपणा सोडून प्रेमाने भरुन जाते. नाम घेता अज्ञानाचा नाश होतो.

चिदंबर नाम सर्वात श्रेष्ट आहे. भगवंताच्या सर्व नामाचा मूळ हेतु सर्वश्रेष्ट आहे. जे शुद्ध निर्विशेष ब्रह्म तेच चिदंबर होय. तेच सर्व नामांचे जन्मस्थान आहे.तेथुनच सर्व अवतार होतात. चिदंबर ब्रम्ह आहे. चिदंबर कृष्ण आहे आणि चिदंबरच भगवान महादेव आहेत. जगाची उत्पत्ति तेथेच होते.

व्यास महर्षिंनी स्कंद पूराण यात चिदंबर महात्म्य वर्णिलेले आहे. सोळा  हजार श्लोकांनी या नामाचा महिमा वर्णन केला आहे.

"शत वर्ष बाकी असता कृष्णासी |
लवकर जाण्याची त्वरा केलि ||१||
कृष्ण सांगितले ते वेळी उत्तर |
कलियुगी अवतार घेणे आम्हा ||२||
दिक्षितांचे कुळी वैदिक ब्राम्हण |
शत वर्ष पूर्ण करू तेथे ||३||
व्यासोक्त पुराण व्यासाचे उत्तर |
तोचि चिदंबर दास म्हणे ||४||

म्हणुनच सर्व नामामधे चिदंबरांचिच शक्ति आहे. कलियुगात तीच शक्ति चिदंबर रुपात अवतरली. पूर्णब्रह्म चिदंबर भूमीवर मूळ नाम चिदंबरच धारण करून अवतरले. शिव चिदंबर हा महामंत्र आहे व यात उद्धार करण्याची फार मोठी शक्ति भरलेली आहे.

चिदंबर स्वामींचे महाराष्ट्रात आगमन व वास्तव्य घडले ते त्यांच्या एक महान भक्तामुळे. गोदावरी नदीच्या तीरावर बाभुळगाव (गंगा, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद) या नावाचे एक खेडेगाव आहे.

राजाराम महाराजांना स्वामींचा सहवास लाभला. त्या काळात स्वामींनी अनेक लीला दाखविल्या. अनेक लोकांना भक्तीचा व ज्ञानाचा मार्ग दाखविला. ते सर्व अभंग रुपात राजाराम महाराजांनी स्वहस्ताक्षरात लिहून ठेवले आहे. जवळपास सव्वा लाख अभंग मूळ स्वरूपात आजही श्रीक्षेत्र बाभुलगांव येथे पहावयास मिळतील.

श्री चिदंबर महास्वामींनी आपल्या महान भक्ताला स्वयंभू मूर्ति निर्माण करून दिल्या व वचन दिले की तू मागे वळुन न पाहता चालत रहा, मी तुझ्या पाठीमागे तुझ्या घरी वास करण्यासाठी येत आहे. परन्तु काकती (बेळगाव जवळ) येतांच राजाराम महाराजांनी मागे वळुन पाहिले व तेवढ्यात चिदंबर स्वामी त्या मूर्तित लिन झाले.

chindabarswami
.

त्या स्वयंभू मूर्ति घेउन राजाराम महाराज आपल्या घरी बाभुलगाव गंगा येथे आले व त्या मूर्तीची आपल्या वाड्यात स्थापना करणार परंतू तो पेशवाईचा काळ असल्याने व ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनाही ज्यांचेकडून त्रास झाला त्याच तथाकथित धर्म रक्षकाकडून राजाराम महाराजांनाही त्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी विरोध झाला. कारण सांगितले की, प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय मूर्तीची स्थापना करता येणार नाही. परन्तु पेशव्यांच्या हट्टाला न जुमानता राजाराम महाराजांनी मूर्ति तशाच घरात नेत असतांना पेशव्यांनी गोळीबार केला. ती गोळी श्रीचिदंबर स्वामींनी आपल्या दंडावर घेतली. (मूर्तीच्या डाव्या दंडावर ही खूण आजही आहे) व मुर्तिरूप राजाराम महाराजांच्या वाड्यात जावून उभे राहिले. श्री चिदंबर स्वामी चालत असतांना राजाराम महाराजांनी स्वतःचा शेला पायघडी म्हणून अंथरला होता. त्यावर बारा पावलांच्या खुणा आजही मंदिरात पहावयास मिळतात.

या स्वयंभू मूर्तीची अजुनही प्राणप्रतिष्ठ झालेली नाही कारण स्वतः श्रीचिदंबर महास्वामीच चालत जावून तेथे उभे राहिले आहेत. आणि ते ठिकाण म्हणजे बाभुलगाव गंगा. श्रीचिदंबर स्वामींचि स्वयंभू मूर्ति ही फक्त गोदावरी तिरी राजाराम महाराजांच्या वाडयातच आहे. अन्य कोठेही नाही म्हणुनच येथील स्वामिंच्या दर्शनाने मनुष्य कृत कृत होतो.
राजाराम महाराजांनी अभंग रुपात लिहल्याप्रमाणे -

"मूर्ति करविली जैशी | प्रगट श्रुष्टिसी ||
दावी अवतार कृत्य | म्हनवी चिदंबर सत्य ||
मूर्ति करविली पाषाण | तेने करावे भाषण ||
तरीच अवतार खरा | दास म्हणे चिदंबर ||
चिदंबर मूर्ति बोलवी पाषाण ||
अवतार जाण कळले तेव्हा ||१||"

या अभंगातील अर्थाप्रमाणे या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होण्याअगोदर संत माउली ज्ञानेश्वारांची ९ लक्ष लोकांची दिंडी बाभुलगावात घेउन येतील त्यावेळी स्वामिंच्या मूर्ति त्या सर्वांसमक्ष आशीर्वाद वचन देतील व माउली संत ज्ञानेश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. त्याच वेळेस चिदंबर स्वामी अवतार संपवतील.  

देखीला दृष्टीसी ब्रम्हीचा पुतळा । 
शंकर तो भोळा चिदंबर ।।१।।
सावळे ते मूर्ती अंगासी विभूती ।
गुंडी धरोनिया हाती चाले सदा ।।२।।
पाहता दृष्टीसी सुख हे सर्वांसी ।
जीव तो यात्रासी अनंत तो ।।३।।
दास म्हणे ऐसा पुर्ण अवतार ।
स्वामी चिदंबर देखीयेला ।।४।।

पंढरपूरचे विठ्ठल-तुकाराम यानंतर प्रभु श्रीरामांनी कर्नाटकमध्ये श्री चिदंबर स्वामी हा अवतार घेतला आणि ते श्री संत राजाराम महाराज यांच्यामागे महाराष्ट्रात आले. ते ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बाभुळगावगंगा येथे स्थायिक झाले. 

येथे त्यांचा सर्व इतिहास ग्रंथ, वस्तू, मूर्ती स्वरुपात आहे. त्यात अशी नोंद आहे की या मूर्ती ७ पिढ्यानंतर (काही दिवसात) प्रकट होतील. असे संत राजारामांनी लिहीले आहे.

रोहन शारदानंद फाटक,
कराड 

चिदंबर दीक्षित यांचे अद्भुत व सिद्ध चरित्रातील काही पैलू

श्री नटेश्वरांनी या वरदानाची पूर्ती करण्यासाठी दीक्षित दांपत्याचे पोटी अवतार धारण केला. साक्षात् चिदंबर नटेश्वर मानवी देहाने अवतार धारण करून आल्याने नवजात शिशुचे नांवही चिदंबर असे ठेवण्यात आले. हा शिशूच कालांतराने ‘श्री चिदंबर महास्वामी’ या नांवाने सत्पुरुष म्हणून प्रसिद्ध झाला. श्री चिदंबरमहास्वामी हे विवाहित असून त्यांना सौ. सरस्वती व सौ. सावित्री अशा दोन पत्नी होत्या. या दोन्ही पत्नींपासून त्यांना दिवाकर, शंकर, भास्कर, मृत्यूंजय, वररुचि आणि काशीनाथ असे सहा पुत्र झाले आणि एक कन्या झाली. पिताश्री मार्तंड दीक्षित यांनी बालचिदंबराच्या उपनयन संस्कार कालीच बालचिदंबरास गायत्री महामंत्राबरोबरच श्रीविद्यामहायोग साधनेमध्ये सुद्धा दीक्षित केलेले होते. पित्याच्या आज्ञेचे व मार्गदर्शनाचे अनुसरण करीत श्री चिदंबर आजन्म श्रीविद्यामहायोग साधनेमध्ये प्रवृत्त राहून अखंड तपस्या करीत राहिले. आपल्या सत्तावन्न वर्षांच्या अवतारी जीवनामध्ये श्री चिदंबरस्वामी महाराजांनी अगदी बालपणापासून जडचालन, मृतसंजीवन, अनेक देहधारण, अंतःसाक्षित्व, पंचभूततत्वजय, अमर्याद निग्रहानुग्रह सामर्थ्य, देशकालवस्तु निरपेक्ष परमस्वतंत्र अशा इच्छा, ज्ञान, क्रियाशक्तींचा अविष्कार अशा अवतारित्वसूचक अनेक लीला तर केल्याच परंतु त्याच बरोबर भक्ती, ज्ञान, वैराग्ययुक्त विहित कर्माचरण, गुरुसेवा, पितृसेवा, मातृभक्ती, सकलदीन दुःख जडजीवांविषयी क्रियाशील कारुण्यभाव, शम, शांती, तितिक्षा, अमानित्वादि दैवी साधनसंपत्ती अशा सर्व लोकोत्तर दैवी गुणांनी भूषित असे एक आदर्श जीवन जगून एक महान असा पारमार्थिक आदर्श त्याकाळातील समाजापुढे ठेवला. श्री चिदंबर महास्वामी श्रौताग्निहोत्री होते. आपल्या अवतारी जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये श्री चिदंबरमहास्वामींनी अभूतपूर्व असे सोमयागाचे अनुष्ठान घडविले. त्या सोमयागाचे प्रसंगी त्या काळातील अनेक सिद्ध महात्मे उपस्थित होते अशी माहिती मिळते. निग्रहानुग्रह अमर्याद सामर्थ्यास प्रकट करीत अविरत लोकसंग्रह, लोककल्याण आणि धर्मजागरणाद्वारे लोकशिक्षण करून पौष शुद्ध चतुर्थी शके १७३७ अर्थात इ.स. १८१५ रोजी महायोगीश्वर भगवान श्री चिदंबर महास्वामींनी योगमार्गाने अर्थात योगशास्त्रोक्त देहविसर्जनाच्या प्रक्रियेचा अवलंब करून आपली स्थूल भौतिक देहाने केलेली लीला संपविली. सध्याच्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यात असलेल्या मुरगोड या गावी कार्तिक वद्य षष्ठी शके १६८० अर्थात इ.स. १७५८ या दिवशी अवतार धारण केलेल्या चिदंबरमहास्वामींनी त्यानंतर जवळ जवळ ५७ वर्षे अवतार लीला करून वर सांगितलेल्या दिवशी आपली स्थूल भौतिक देहाने केलेली अवतार लीला संपविली असे असले तरी त्यांच्या निग्रहानुग्रहात्मक शक्तीस देह, देश, काल व वस्तु यांचे बंधन नाही.

भगवान श्री शिवचिदंबर महास्वामी

भगवान श्री चिदंबरमहास्वामी आपल्या आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी अशा चतुर्विध भक्तांच्या प्रार्थनेला स्मर्तृगामी असल्यामुळे त्वरित प्रतिसाद देतात, असा सश्रद्ध भक्तगणांचा अबाधित अनुभव आहे. आपल्या दिव्य चिन्मय देहावर कलिप्रभाव निरुद्ध करणारे विराट दिव्य तप करीत भगवान श्रीचिदंबरमहास्वामी वेदोक्त, सनातन धर्मोद्धारासाठी आवश्यक असलेल्या दिव्यशक्तीचे उत्सर्जन करण्याचे महान देवकार्य आजही करत आहेत अशी अंतरंगानुभवी सत्पुरुष ग्वाही देतात. आपण वर म्हंटलेले आहेच की, श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ श्रीमत् मार्तंड दीक्षित हेच भगवान श्री चिदंबर महास्वामींचे श्रीविद्यामहायोग साधनेचे सद्गुरु होते. श्री स्वयंप्रकाशस्वामी महाराजांकडून प्राप्त झालेल्या ब्रह्मविद्येचा सानुग्रह उपदेश ब्रह्मश्री मार्तंड दीक्षितांनी आपले चिरंजीव परमशिवाचे अवतार भगवान श्री चिदंबर महास्वामींना केला. भगवान चिदंबर महास्वामी जन्मसिद्ध असूनही त्यांनी गुरुशिष्यपरंपरेचा आदर करण्यासाठी ‘शिष्टानुमोदित गुर्वनुग्रह’ परंपरा आपल्या पूज्य वडिलांकडून स्वीकारली व लोकसंग्रहार्थ तिचे उपदेशाद्वारे संवर्धनही केले. श्री चिदंबर महास्वामी महाराजांचे श्रीविद्यामहायोग साधनपरंपरेतील दीक्षानाम श्री पूर्णानंदनाथ असे होते. श्रीमत् पूर्णानंदनाथांनी अर्थात् भगवान चिदंबरमहास्वामींनी श्रीविद्यामहायोगाचा उपदेश आपले शिष्योत्तम श्रोत्रीय, ब्रह्मनिष्ठ श्रीमान राजाराम महाराज ठाकूर – परदेशी यांना केला. श्रीमान हरिसिंग परदेशी आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई या क्षत्रिय राजपूत दाम्पत्याच्या पोटी श्रीमान राजाराम महाराजांचा जन्म बाभुळगाव गंगा या गावी फाल्गुन वद्य द्वितीया शके १६९० अर्थात इ.स. १७६८ या रोजी झाला. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्याच्या शेजारी गोदावरी नदीच्या तीरावर बाभुळगांव नावांचे छोटे खेडेगांव आहे. तेच श्री राजाराम महाराजांचे जनस्थळ होय. बालपणापासूनच परमार्थाची आवड असलेल्या श्री राजाराम महाराजांना सद्गुरू दर्शनाची तीव्र इच्छा झाली होती. उपजीविकेचा व्यवसाय म्हणून राजाराम महाराज त्यावेळच्या पुण्याच्या पेशव्यांकडे शिलेदार म्हणून नोकरी करीत असत. मध्यप्रदेशातील होशंगाबाद हे त्यांचे व्यवसायक्षेत्र होते. त्या ठिकाणी पाचशे घोडेस्वारांचे प्रमुख म्हणून नेतृत्व करीत राजाराम महाराजांनी पेशव्यांची शिलेदार म्हणून नोकरी केली. हे करीत असतानाच परमार्थ लाभ व्हावा म्हणून पंढरपूरक्षेत्री आले असता तेथे धर्मराजनामक बडव्याबरोबर त्यांची भेट झाली होती. त्यांचे बरोबर पारमार्थिक चर्चा करत असता त्यांनी असे सांगितले की, सध्या कर्नाटकात मुरगोड गांवी साक्षात परमशिव हेच चिदंबरमहास्वामींच्या रूपाने लोकोद्धार करीत आहेत. धर्मराजाकडून हे वृत्त ऐकताच राजाराम महाराजांनी चिदंबरमहास्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मुरगोड गाठले. यावेळेस चिदंबरमहास्वामींचे वय सत्तेचाळीस वर्षाचे होते व राजाराम महाराजांचे वय सदतीस (३७) वर्षाचे होते. श्री राजाराम महाराज जवळ-जवळ १० वर्षे चिदंबरमहास्वामींच्या सहवासात राहिले. श्री चिदंबरमहास्वामीं पासूनच श्रीविद्यामहायोग साधनाक्रमांतर्गत चारही महावाक्यांचा उपदेश लाभला आणि ते ब्रह्मनिष्ठ पदास पोहचले. श्री चिदंबरमहास्वामीमहाराजांच्या कृपेने श्री राजाराम महाराजांना अद्भूत काव्यप्रतिभा लाभलेली होती. त्यांनी लिहिलेले ‘अद्वैतसार’, ‘ब्रह्मानंदलहरी’, ‘अमृतानंद’ यासारखे ओवीबद्ध ग्रंथ त्यांच्या अतुलनीय ब्रह्मनिष्ठेची साक्ष देतात. श्रीमान राजाराम महाराजांनी लिहिलेले श्रीचिदंबरमहास्वामींचे अभंगात्मक चरित्र ही त्यांची एक लोकोत्तर वाङमयीन कृती होय. श्री चिदंबरमहास्वामींच्या प्रत्यक्ष सहवासात जवळ-जवळ १० वर्षाचा काळ व्यतीत केलेल्या राजाराम महाराजांनी श्री चिदंबरमहास्वामींच्या लोकोत्तर लीला स्वतः प्रत्यक्ष पाहिलेल्या व अनुभवल्या होत्या. त्या सर्वांची अत्यंत दक्षतेने व भक्तीभावाने नोंद करणारी त्यांची चिदंबरचरित्रात्मक अभंगगाथा हा भगवान श्री चिदंबरमहास्वामींच्या लोकोत्तर चरित्राची माहिती वर्तमानकाळात उपलब्ध करून देणारा एक अमोल ठेवा आहे असेच म्हटले पाहिजे. ब्रह्मनिष्ठ पूज्य श्री राजाराम महाराजांनी ही चिदंबर चरित्रपर अभंगगाथा रचली नसती तर कदाचित चिदंबरमहास्वामींचे लोकोत्तर जीवन हे भावी पिढीला अज्ञानातच राहिले असते. नामस्मरण साधनेचा उपदेश करीत चिदंबरभक्तीचा प्रचार-प्रसार करणारे राजाराम महाराज हे स्वतः महान भगवद्भक्त होतेच परंतु त्यांच्याबरोबर अलौकीक सिद्धीसंपन्न महायोगीही होते. कार्तिक वद्य द्वितीया शके १७६५ अर्थात इ.स. १८४३ रोजी स्वत:च्या देहातच दिव्य योगाग्नी प्रज्वलित करून आपल्या स्थूल देहासहित श्री राजाराम महाराज भगवान श्री चिदंबराच्या सच्चिदानंद स्वरूपात लीन झाले. आपल्या दिव्य पारमार्थिक जीवनाची त्यांनी केलेली हि परिसामाप्ती ते एक उच्चकोटीचे महायोगी पुरुष होते याची स्पष्ट साक्ष देते. ब्रम्हनिष्ठ श्री राजाराम महाराजांच्या परंपरेत होवून गेलेले एक थोर महायोगी सत्पुरुष म्हणजेच ब्रम्हश्री बाळशास्त्री भट हे होत. एकोणविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होवून गेलेले ब्रम्हश्री बाळशास्त्री भट हे मध्यप्रदेशातील इंदूरचे रहिवासी होते. भगवान श्री चिदंबरमहास्वामी आणि श्रोत्रिय ब्रम्हनिष्ठ राजाराम महाराज यांच्या परंपरेतून लाभलेला श्रीविद्यामहायोग ब्रम्ह्श्री बाळशास्त्री भटांनी स्वतः केलेल्या आजीवन साधनेद्वारे परिपुष्ट केला आणि उपदेशाद्वारे अधिकारी शिष्यांमध्ये श्रीविद्यामाहायोग साधनेचा प्रचार-प्रसार ही केला. अंतरंगातून श्रीविद्यामहायोगाची साधना करणारे बाळशास्त्री हे बहिरंगातून वैदिक श्रौताग्निहोत्री होते. आपल्या सभोवताली जमलेल्या शिष्यांना त्यांच्या अधिकारानुसार कोणास श्रौताग्निहोत्राची दीक्षा देवून, तर कोणास वेदाध्यानात तत्पर करून, तर एखाद्यास गायत्री उपासनेत प्रेरणा देवून तर अन्य अधिकारी शिष्यांना श्रीविद्यामहायोगात दीक्षित करून ब्रम्हश्री बाळशास्त्री भटांनी आजीवन परमार्थ प्रचार-प्रसाराचे कार्य केले.