श्री क्षेत्र शेगाव

शेगाव मंदिर
श्री क्षेत्र शेगाव मंदिर

प. प. श्री गजानन महाराजांचे वास्तव्याने परम पावन झालेले श्री क्षेत्र शेगाव! रोज हजारो भक्त भारतातील कानाकोपऱ्यातून या क्षेत्री येतात व परम पावन समाधीचे दर्शन घेतात व सिद्ध  स्थानी येऊन या अवलिया संताचरणी नतमस्तक होतात.

आपले अवतार कार्य पूर्ण होत आले आहे हे साधारणपणे १९०८ मध्ये श्री गजानन महाराजांना जाणवले. योगायोग असा की त्याच सुमारास श्रींचे भक्त श्री जगू पाटील ह्यांनी शेगाव मध्ये महाराजांचे भव्य मंदिर स्थापन करावे अशी ईच्छा महाराजांच्या अपरोक्ष त्यांच्या इतर भक्तगणांकडे व्यक्त केली आणि सर्वांनी ही विनंती मान्य केली. पण त्या वेळेस शेगावांतील पाटील आणि देशमुख घराण्यात दुफळी माजली होती. महाराजांचा जुना मठ माळी समाजातील माणसांच्या मालकीचा होता आणि माळी समाज देशमुखांच्या बाजुला होता. मात्र गावात पाटील घराण्याचे वर्चस्व होते. महाराजांना ही दुफळी पसंत नव्हती. म्हणून त्या दोघांपैकी कुणाचीच जागा मंदिर बांधन्यासाठी महाराजांनी स्विकारली नाही. त्यांना कुणाच्या मालकीची जागा नको होती. कालांतराने महाराजांनी "मी येथे राहिन" असे सांगून ज्या जागेचा निर्देश केला त्या ठिकाणी श्रींच्या मंदिराचे काम सुरु करायचे असे ठरले. ती जागा सरकारची असल्याने महाराजांच्या संकेतानुसार परमभक्त हरी कुकाजी पाटील ह्यांनी जागेच्या मागणीचा अर्ज सरकार दफ्तरी दाखल केला. बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन सर्वाधिकारी (Deputy Commissioner) करी साहेब ह्यांनी नगर परिषदेच्या १९०१ ठरावानूसार एक एकर जागा मंदिरासाठी मंजुर केली. शिवाय एका वर्षात ही दिलेली जागा व्यवस्थितपणे विकसित केल्यास अजून एक एकर जागा देऊन तुमचा हेतू पुरविला जाईल, असा शेरा करी साहेबांनी मारला.

श्री क्षेत्र शेगाव मंदिर
श्री क्षेत्र शेगाव मंदिर

श्री क्षेत्र शेगाव मंदिर

जागा मिळाल्यावर मंदिराचे बांधकाम करणे आवश्यक होते. श्रींचे भक्त हरी पाटील व बंकटलाल एकटयाने हे काम पूर्ण करु शकले असते. पण महाराजांना हे काम सर्व भक्तांद्वारे करवून घ्यायचे होते. म्हणून महाराजांच्या निर्देश