श्रीमद् शंकर स्वामी

आडनाव: पाटकर
जन्म: इ. स. १९११ चिपळूण जवळ डुगवे गावी
आई/वडील: माहित नाही
गुरु: दीक्षित स्वामी (नृसिहसारस्वती)  
कार्यकाळ: १९११ ते १९७१
महानिर्वाण: आषाढ वद्य ३, इ. स. १९७१, सोलापूर येथे

शंकर स्वामी महाराज
श्रीमद् शंकर स्वामी

श्री दत्तात्रेयांची राजधानी म्हणून पावन झालेल्या श्री क्षेत्र नरसोबावाडीमध्ये अगदी अलीकडच्या काळातील एक महान तत्त्वज्ञानी म्हणजे श्रीमद् शंकर स्वामी होय. श्री क्षेत्री आल्यानंतर त्यांना प. प. थोरले स्वामी महाराजांचे दर्शन झाले. अशा महान विभूतींचा जन्म शके १८१३ म्हणजे (इ.स. १९११) मध्ये चिपळूणजवळ डुगवे या गावी झाला. त्यांचे आडनाव पातकर होय. प. प. महाराजांच्याजवळ प्राथमिक संस्कृत अध्ययन सांगलीतील पाठशाळेत झाले. वडिलांच्या इच्छेखातर संस्कृतचे सखोल अध्ययन पूर्ण केले. ब्रह्मचर्याश्रमात शिक्षण पूर्ण केले. १५ व्या वर्षी विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारला. पुढे २ पुत्ररत्ने झाली. एके दिवशी सर्व पाश सोडून वाडीस प्रयाण केले.

श्री क्षेत्र नरसोबावाडीसारख्या पुण्यनगरीत आगमन झाल्यानंतर आपले सारे जीवन परमेश्वराच्या चिंतनात घालविले. गोपाळ स्वामींच्या पाठीमागे असणाऱ्या ओवरीत वास्तव्य केले. नित्य समाधीमग्न  रहात. परमेश्वराखेरीज दुसरा कोणताच विचार मनात नव्हता. आपण मितभाषी असणाऱ्या श्रीमद् शंकर स्वामीनी १२ वर्षेमौन धारण करून मनावर नियंत्रण ठेवले. आहारामध्ये फक्त गुळ-शेंगा-ताक व पाणी यांचा समावेश करून जिभेवर नियंत्रण ठेवले. अशा प्रकारे तन-मन-धन दत्तचरणी अर्पून प्रभूसेवेस तत्पर असत. प. प. नृसिंहसरस्वती दिक्षित स्वामींच्याकडून अनुग्रह घेतला. आपले आयुष्य समर्पण करून शरणागतीने संपूर्ण गुरुदेवांची सेवा केली.

श्रीचरणी लीन झाल्यानंतर, सर्व वासनांचा त्याग झाल्यानंतर, संन्यास ग्रहण केला. वाडीतील पुजारी मंडळींवर अतिशय प्रेम होते. स्वत: अतिशय विरक्त रहात. प्रसिद्धीपराड: मुख होते. तरीही समाजातील लोकांसाठी कृष्णावेणी मंदिर व मारुती मंदीर हे श्रमदानातून बांधले. नरसोबावाडीतील श्री. हावळे पुजारी यांचे घरी श्री दत्त व दीक्षीत स्वामींच्या पादुका स्थापन केल्या. प. प. दीक्षीत स्वामी, सीताराम महाराज मोरया गोसावी, वाडी माहात्म्य, रामगीता व स्तवनपद्मावली इ.चे लेखन केले. त्यातूनही परमेश्वराची सेवा केली.

अशा अत्यंत मितभाषी अशा सत्पुरुषाचे देहावसान आषाढ वा ।। ३ इ. स. १९७१मध्ये सोलापूर ग्रामी झाले. परंतु शेवटी त्यांनी आपले आयुष्य परमार्थ्याच्या स्वरूपात घालविलेल्या श्रीक्षेत्री नरसोबावाडीत श्री कृष्णामातेच्या पोटामध्ये जलसमाधी घेतली.

अशा श्रीमत् शंकर स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!