श्री गुरुचरित्र

श्री गुरुचरित्र
श्री गुरुचरित्र ग्रंथ 

गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो.

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना 'ज्ञानेश्वरी' व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.

सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. पू. श्री. टेंबेस्वामी नेहमी सांगत की, "दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल; परंतू गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या."

दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.

‘भक्तीमुक्ती परमार्थ । जे जे वांछिले मनात ।
ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥’
अशी त्यांची महती आहे.

गुरुचरित्र
श्री नृसिंहसरस्वती

योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते. या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. यात अश्वथ्य, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे. ‘गुरुचरित्रा’त शिवपूजेचे माहात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यांदीची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली. त्यांपैकी ‘पातिव्रत्य’ हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर ‘आतिथ्य’ हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी ‘गुरुचरित्रा’त कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री-पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात.

‘गुरुचरित्रा’त वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी ‘चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भरलेली असून को कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याचा ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ दोन्हीही सुखाचे होतील हे त्रिवार सत्य! साहजिकच हा ग्रंथ हा सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही.

या ग्रंथातील तत्त्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी ‘उद्धरेत आत्मनात्मानम्’ हेच खरे! आपलीच बरी-वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात, हेच तत्त्व या ग्रंथात पुन:पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे, असे आवर्जुन सांगितले आहे. याचे कारण असे की, हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास साहाय्य करते.

‘थिऑसॉफिकल सोसायटी’च्या अध्यक्षा विदुषी ऍनी बेझंट म्हणतात की, "गुरुचरित्राची एकेक ओवी म्हणजे एक ‘सिद्ध मंत्र’ असून त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होत. या इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरींतून फारच प्रभावी असतात, असे दिव्यसृष्टी कंपन लहरी आणि ‘सप्तशती’ या दिव्य ग्रंथातील मंत्रांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी या सारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात, हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे."

श्रीगुरुचरित्र
गुरुचरित्राचे कर्ते सरस्वती गंगाधर

गुरुचरित्रग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक ‘दृष्टांत-कथा’ आहेत. लोक त्याला ‘चमत्कार-कथा’ समजतात; पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरूकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. ईश्र्वरदर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणाने आणि सर्वत्र दर्शनसुख प्राप्त होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनधन्यता त्यातच आहे. गुरुचरित्रात अनेकांना दु:ख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासनाधर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा मिलाफ गुरूचरित्रात आहे. पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची ‘यथोचित फलश्रुती’ देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे, हेच खरे!

‘गुरुचरित्रा’चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य अभ्यासकांच्या नजरेतून निसटले आहे. ते हे की, यात वैदिक आणि अवैदिक या दोन्ही संस्कृतीच्या प्रवाहाचा संगम झालेला आहे. वेदनिष्ठेचा उद्घोष तर या ग्रंथात स्पष्टपणे ऐकू येतो. त्याच बरोबर वैदिकांच्या आचार धर्माचा ध्वनीही यात तितकाच स्पष्टपणे मिसळलेला आढळतो. लिंगपूजा ही अवैदिकांचीच. शिवपूजा म्हणजे ईश्वरपूजा, सोमवारचे व्रत, भस्मलेपन, रुद्राक्षधारण हे आचार त्याच परंपरेतले आहेत. इतकेच नव्हे, तर औदुंबर पूजा म्हणजेच वृक्षपूजा हाही आचार अवैदिकांचाच आणि म्हणूनच दत्तभक्तांप्रमाणेच शिवभक्तांनीही या ग्रंथाला आपले म्हटले आहे.

सरस्वती गंगाधर हे ‘गुरुचरित्रा’चे कर्ते. त्यांनी आपली माहिती देताना म्हटले आहे,
"आपस्तंब शाखेसी । गोत्र कौंडिण्य महाऋषि ।
साखरें नाम ख्यातीसी । सायंदेवा पा साव ॥’
(गुरुचरित्र १.४१)

यावरून ग्रंथकर्त्याचे उपनाव म्हणजे आडनाव ‘साखरे’ असून ते आपस्तंब शाखेचे कौंडण्यि गोत्री ब्राह्मण होते. ‘गुरुचरित्र’ ही सरस्वती गंगाधरांची ‘वाङ्मयी मूर्ती’. या ग्रंथाव्यतिरिक्त ‘शिवरात्री माहात्म्य’ हे २५२ ओव्यांचे लेखन अलीकडेच प्रकाशात आले असून त्यांनी रचलेले ‘श्रीनृसिंह सरस्वती स्तोत्र’ उपलब्ध आहे.

‘गुरुचरित्रा’ची मूळ संहिता आजमितीस उपलब्ध नाही. भाऊबंदकीच्या तंट्यात जप्ती आली तेव्हा सरस्वती गंगाधरांच्या हातची ‘गुरुचरित्रा’ची मूळ प्रत दुसऱ्या कोणाच्या हाती लागू नये; म्हणून भिंतीत पुरून टाकण्यात आले; कै. रा. कृ. कामत यांना गाणगापूर, कडगंची, वाडी, औदुंबर, कुरवपूर, केंगेरी, कुंदगोळ, आंबेवाडी, परोळकर, चिकोडी, बैलहोंगल, टेंबेस्वामीप्रत, साधलेशास्त्री प्रत इत्यादी अनेक हस्तलिखित प्रती उपलब्ध झाल्या. या प्रतीच्या आधारेच त्यांनी ‘गुरुचरित्रा’ची सध्या उपलब्ध असलेली प्रमाणित व संशोधित प्रत तयार केली.

‘गुरुचरित्रा’ची अध्याय संख्या नक्की किती? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही; परंतू या ग्रंथाचे ५१ अध्याय आहेत, याला ‘अवतरणिके’त दोन आधार सापडतील.

‘सांगेन आता अवतरणिका ।
प्रथमपासूनि सारांश निक्का एक्कावन्नाध्यायपर्यंत ॥’
(गुरुचरित्र ५२-१८)

‘गुरुचरित्रा’ची अवतरणिका कोणी रचली हे छातीठोकपणे सांगता येत नाही. 

"अवतरणिकेचा अध्याय हा सरस्वती गंगाधराचा नसून मागाहून कोणीतरी रचला आहे; परंतु तो उपकारकच आहे." असे कै. रा. कृ. कामत म्हणतात. इतकेच नव्हे, तर श्री. गुर्जर नावाच्या गृहस्थांनी शके १७९६मध्ये मुंबईच्या ‘निर्णयसागर’ छापखान्यात मुद्रित केलेले ‘शतश्र्लोकी गुरुचरित्र’ नावाचे पुस्तक म्हणजेच हा ‘अवतरणिका अध्याय’ होय, हेही ते स्पष्ट करतात. श्री. अप्रबुद्ध यांना सायंदेवाने अवतरणिका रचली असावी, असे वाटते; परंतू त्याला ठोस आधार नाही.

५२ अध्यायांमाणेच ४९ व ५३ अध्याय असलेल्या पोथ्याही आढळतात. गाणगापूरात उपलब्ध झालेली पोथी ५० अध्यायांची होती. कै. अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मते ‘गुरुचरित्रा’त मंत्रशास्त्रातील एक अध्याय होता. तथापि, श्रीगुरूंच्या आज्ञेवरून तो वगळण्यात आला. कदाचित खुद्द सरस्वती गंगाधरांनीदेखील तो काढून टाकलेला असावा आणि म्हणूनच त्यांनी संशोधित केलेल्या प्रतीत काशीयात्रेचा अध्याय आहे याचा अर्थ असा की, ‘गुरुगीते’ची मूळ संहिता सायंदेवाकृत असावी किंवा ती सरस्वती गंगाधरांची स्वतंत्र कृती असावी, असे काही जाणकारांचे मत आहे.

श्रीनृसिंहसरस्वतीचे एक शिष्य सिद्ध यांच्या सेवेतच असत. त्यांनीच हे ‘गुरुचरित्र’ आपल्या नामधारक नामक शिष्यास सांगितले अशी कल्पना करून त्याच चरित्राचा विस्तार सरस्वती गंगाधरांनी केला. गाणगापूरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले ‘उत्तरकंची’ किंवा ‘कडगंची’ हे त्यांचे मूळ गाव.

‘गुरुचरित्रा’च्या तिसऱ्या अध्यायात, सिद्ध मुनींनी आपल्याकडील ‘पुस्तक’ दाखविले असा स्पष्ट उल्लेख नामधारक करीत आहे;

श्रीगुरुचरित्र महिमान । तेचि आम्हा अमृतपान ।
सदा सेवितो याचि गुणे । म्हणोनि पुस्तक दाखविले ॥
(गुरुचरित्र ३.८)
त्याचप्रमाणे अकराव्या अध्यायात-
महाराष्ट्र भाषेंकरुनि टीका । सांगतसे सरस्वती गंगाधरा ॥ गुरुचरित्र ११-१०७)
व अठ्ठाविसाव्या अध्यायात-
पुढील कथा पावन । सांगे सिद्ध विस्तारून ।
महाराष्ट्र भाषेकरून । सांगे सरस्वती गुरुदार ॥
(गुरुचरित्र २८-१९४)

असा उल्लेख आलेला आहे याचा अर्थ असा की, सिद्धमुनी यांच्याकडील पुस्तक संस्कृतातच असण्याची दाट शक्यता आहे. ‘महाराष्ट्र सारस्वत’ पुरवणीत कै. डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी हाच मुद्दा अधिक स्पष्टपणे मांडला आहे. सिद्धमुनी नामक स्वामींच्या एका शिष्याने त्यांचे त्रोटक चरित्र यापूर्वीच संस्कृतात लिहिले होते. त्याचाच अनुवाद प्राकृतात ‘गुरुचरित्रकारां’नी केला असावा, असे डॉ. रा. चिं. ढेरे यांचेही मत आहे.

सरस्वती गंगाधर हे कानडी ब्राह्मण असून त्यांची मातृभाषा कन्नड आणि डॉ. द. रा. बेंद्रे यांनी दर्शविल्याप्रमाणे ‘गुरुचरित्रा’चा शेवट कानडी भाषेतील पदांनी झालेला आहे. हे जरी किती खरे असले, तरी मूळ ‘गुरुचरित्र’ कानडीत असावे, असे म्हणता येत नाही.

‘गुरुचरित्र’ मूळ कोणत्याही भाषेत असले, तरी त्याचे लेखन श्रीगुरूंच्या आज्ञेने झाले आहे, अशी सरस्वती गंगाधराची दृढ श्रद्धा आहे-
‘निरोप देती माते परियेसी । चरित्र आपुले विस्तारी’
म्हणे ‘ग्रंथ कथन करी । अमृतघट स्वीकारी…’
‘आज्ञा असे श्रीगुरुची । म्हणोनि वाचे बोलतसे
(गुरुचरित्र १.५२, ५३, ५६).

किंबहूना ‘श्रीगुरुवाक्य मज कामधेनु’ असल्यामुळे आपण हे लेखन करीत आहोत असे ‘गुरुचरित्र’कारांचे सांगणे आहे. ‘गुरुचरित्रा’त काव्य आहे; परंतु ते पंडिती नाही. निवेदन आहे; परंतू प्रतिपादन नाही. प्रतिभाविलासाचे प्रदर्शन नाही. तसेच, अद्भुताचे आकर्षणही नाही आणि म्हणूनच हा ग्रंथ अजरामर झाला आहे.

गुरुचरित्र
गुरुचरित्र 

श्रीनृसिंहसरस्वती हे जरी ‘गुरुचरित्रा’चे चरित्रनायक असले, तरी त्यांचा पूर्वावतार म्हणून ओळखले जाणारे श्रीपादश्रीवल्लभ यांच्या जीवनातील काही ठळक घटनाही या ग्रंथात आहेत. चौथ्या अध्यायात दत्तावताराची कथा उलगडून सांगितली असून पाच ते दहा अध्यायापर्यंत श्रीपादश्रीवल्लभांचे रोचक भाषेत रेखाटले आहे; परंतु विशेष म्हणजे ‘गुरुचरित्रा’शिवाय अन्य कोणत्याही ग्रंथात त्याचा उल्लेखही नाही.

श्रीनृसिंहसरस्वतींचे जीवनचरित्र अकराव्या अध्यायापासून एक्कावन्नाव्या अध्यायापर्यंत आले आहे. जन्मत:च प्रणवोच्चार करणारा हा चरित्रनायक व्रतबंधाच्या सोहळ्यापर्यंत ‘मूकनायका’च्या भूमिकेत वावरतो आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर एक चतुर्वेदी विद्वान बालक म्हणून आपल्यासमोर साकारतो. नंतर तो जेव्हा संन्यास ग्रहणासाठी आपल्या मातेकडे संमती मागतो, तेव्हा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. यानंतर कारंजवासियांना श्रीगुरूंचे दर्शन घडते तब्बल वीस वर्षानी. तेही नृसिंहसरस्वती म्हणून.

श्रीनृसिंहसरस्वतींचा जीवनप्रवाह कृष्णातटाकी असलेल्या औदुंबर क्षेत्री एक चातुर्मास, कृष्णापंचगंगा संगमावर एक तप आणि भीमा अमरजा संगमावर दोन तपे असा दुथडी भरून वाहात जाऊन अखेर श्रीशैल पर्वताजवळील पाताळगंगेच्या कुशीतील कदलीवनात अदृश्य झाला आहे.

प्राचीन काळापासून विख्यात असलेल्या भीमा-अमरजा संगमावर वांझ म्हशीला पान्हा फुटणे, ब्रह्मराक्षसाची मुक्ती, त्रिविक्रमाला विश्वरूप दर्शन, उन्मत्त ब्राह्मणांना शासन, वांझ वृद्धेला पुत्रप्राप्ती, नरहरी ब्राह्मणाचे कुष्ट निवारण, मुसलमान राजाला पूर्वजन्माची स्मृती अशा अंगावर रोमांच उभे करणाऱ्या प्रसंगातून ‘गुरुचरित्र’ वाचकांसमोर उलगडत जाते. प्रसंगी क्षेत्रमाहात्म्य, रुद्राक्षमहिमा, भस्ममाहात्म्य, सोमवार व्रत, अनंत व्रत, स्त्रियांचे आचरण, पुरूषांचे आन्हिक निरूपण आले असून वेदमाहात्म्यही वर्णिले आहे. श्रीपादश्रीवल्लभांच्या जीवनातील कुरवपूर येथे घडलेल्या अंबिका मातेला शनिप्रदोषाचे व्रत देण व रजकाला (परटाला) पुढील जन्मी तू म्लेच्छं राजा होशील असा आशीर्वाद देणे, या दोन्ही घटनांचा ‘गुरुचरित्रा’च्या चरित्रनायकाच्या जीवनाशी फारच निकटचा संबंध आहे.

पहिल्या शनिप्रदोष व्रतप्रदान घटनेमुळे ‘गुरुचरित्रा’च्या नायकाच्या जीवनाचा प्रारंभ झालेला असून रजकला (परटाला) आशीर्वाद देण्याच्या प्रसंगातून ‘गुरुचरित्रा’च्या नायकाच्या जीवनाची अखेर सूचित केली आहे.

‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ दत्तात्रेयांचे आख्यान असलेला किंबहुना ‘श्रीनृसिंहसरस्वत्युपाखाने’ असा आहे. या उपाख्यानात विविध कथा गुंफल्या असून मुख्य आख्यान, उपाख्यान, पूर्वकथा व दु:खितांच्या कथांची एका वर्तुळातून दुसरे वर्तुळ अशी रचना केलेली आहे; त्यामुळे चक्रव्युहाचा भास होत राहतो.

श्री गुरु अतिथी वेषाने भिक्षा स्वीकारून आशिर्वचंन दिले - गुरुचरित्र
गुरुचरित्र कथा प्रसंग- श्री गुरु अतिथी वेषाने भिक्षा स्वीकारून आशिर्वचंन दिले

सिद्ध व नामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की, गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन:शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला, तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा-अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली, ही घटना शके १४९०मध्ये घडली. याचा अर्थ असा की, तब्बल ११० वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले.

भीमा-अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले. 

श्रीगुरुचरित्रात ग्रंथात ही उपासना तीन प्रकारे करता येईल, असे चरित्रकार सरस्वती गंगाधर यांनी नमूद केले आहे.
‘अंत:करण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र । सौख्य होम इहपरम।

दुसरा प्रकार सांगेन
॥ सप्ताह वाचावयाची पद्धती । तुज सांगो यथा स्थिती । शूचिर्भूत होवोनी शास्त्ररीती । सप्ताह करीता बहूपुण्य ॥ दिनशुद्धी बरवी पाहून । आवश्यक स्नान संध्यादिक करुन । पुस्तक वाचावयाचे स्थान । रंगविल्याही शोभा करावी ॥ देशकालाही संकल्प करुन । पुस्तकरूपी श्रीगुरूचे पूजन । यथोपचारे करुन । ब्राह्मणासही पूजावे ॥ प्रथमदिवसापासोन । बैसावया असावे एकस्थान । अतत्वार्थ भाषणी धरावे मौन । कामादि नियम राखावे दीप असावे शोभायमान । देव ब्राह्मण वडिल वंदून पूर्वोत्तर मुख करुन । वाचती प्रारंभ करावा ॥ नव संख्या अध्याय प्रथमदिनी । एकविशती पर्यंत द्वितीयदिनी । एकोनत्रिशंत तृतीयदिनी । चतुर्थीदिनी पंचतीस ॥ अडतीसपर्यंत पांचवेदिन । त्रेचाळीसवरी सहावेदिनी । सप्तमी बावन्न वाचोनी । अवतराणिका वाचावी ॥
अशी सप्ताहपद्धती ते सांगतात. नंतर उत्तरपूजा करून उपहार करावा. रात्री भूमीवर झोपावे, ब्राह्मण सुवासिनीस भोजन-दक्षिणा द्यावी, त्यांना संतुष्ट करावे असेही प्रतिपाद दिले आहे.

तिसरा प्रकार,
‘धर्म अर्थ पुस्तक लिहिता सर्वसिद्ध । म्हणजेच लेखनस्वरूपात सेवा करावी.’
‘सदा वाचावे गुरुचरित्र’ या ओवीचे दोन अर्थ आहेत. सदा म्हणजे नित्याने वा दररोज आणि सदा म्हणजे सप्ताह पद्धतीने सदैव । दररोज वाचताना एक फायदा होतो.

​ प्रसंग-अध्याय २२
गुरुचरित्र कथा प्रसंग- अध्याय २२, ओवी  ४८

पारायणाची फलश्रुती

कोणतीही उपासना ही काहीतरी प्राप्त व्हावे, अशा इच्छेनेच बहुधा केली जाते. तसेच उपासनेचे फळ हे निश्चितपणे मिळते, असे अभिवचन ग्रंथात दिलेले असतेच. तुम्ही-आम्ही सर्व प्रापंचिक माणसे आहोत. प्रपंच म्हटला की, सुख-दु:ख आलेच! मग सुखप्राप्ती व्हावी आणि दु:खनिवृत्ती व्हावी ही सर्वाचीच अपेक्षा असते. तसेच पारायण सेवेने देवदर्शन घडावे अशीही मनिषा असते. आपण राहतो ती वास्तू आपणास लाभ-आनंद देणारी असावी असेही प्रत्येकास वाटत असते. या सर्व गोष्टी ग्रंथपठण-पारायण सेवेने प्राप्त होऊ शकतात. दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी एकनाथांचे भागवत अशा विविध ग्रंथाच्या पारायण सेवेने भक्तांना त्यायोगे फलप्राप्ती होतच असते. श्रीगुरुचरित्र ग्रंथातही फलश्रुती सांगितली गेली आहे. तर ती अशी (१) त्रिपदा गायत्रीमंत्राचे पठण (१०८ मण्यांची माळ किंवा त्यापर्यंत जप) करावे, तसेच गुरुचरित्र वाचावे. त्रिपदा गायत्रीमंत्र असा,

‘ॐ भू:ॐ भुव:ॐ स्व: मह:ॐ जन ॐतप: ॐसत्यम ॥१॥
ॐ तत्सवितुर्व रेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियोयोन: प्रचोदयात ॐ ॥२॥,
ॐ आपोज्योती रसोमृतम ब्रह्मभूर्भव: स्वरौम ॐ विष्णवे नम: ॥३॥

मनोकामना तर पूर्ण होताच पण दत्तदर्शन घडून व्यक्ती वा वास्तू यांतील बाधाही नाहीशी होते. दर्शन कसे घडते? तर सप्ताह काळात वा सप्ताहाचे शेवटी, तसेच ग्रंथ पठण-श्रवण-लेखन याद्वारेही पारायण पूर्ण झाले की, बहुधा नैवेद्याचे वेळी किंवा समाप्ती समयी दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या वेशात येऊन जातात. चाहूल वा सुगंध या स्वरूपातही त्यांचे अस्तित्त्व (उपस्थित) कळून येते. त्यामुळे आपण मन-बुद्धी-शरीर यासहित अपार श्रद्धेने व उत्कट भावाने त्यांचे ध्यान-अनुसंधान करावे. तसेच बाधानिरसनही होते. ग्रंथकाराने म्हटले आहे की,
जे जे जन भक्ती करिती । त्यासी येईल आमुची प्रचिती । मन कामना पावती त्वरिती । निश्र्चयवाक्य असे आमुचे । ऐसेसप्ताह अनुष्ठान । करिता होय श्रीगुरुदर्शन । भूतपप्रेतादि बाधा निरसन । होवोनि सौख्य होतसे ॥

ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले अहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे 

सप्ताह पद्धती

१ ला दिवस :- १ ते ९ अध्याय 
२ रा दिवस :- १० ते २१ अध्याय 
३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय 
४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय 
५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय 
६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय 
७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय


श्री गुरुचरित्र पारायण असे करावे.

श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलाला अहे. ईसवी सनाच्या १४व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अदभूत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्य परंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहीला.

श्री गुरूंच्या चारीत्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलाला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून अल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले अहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र -वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरु चरित्र कार म्हणतात.

"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"

अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्मा ग्रंथाचे वाचन करावे वैविध्य पूर्ण अशा संकल्प पूर्तते साठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते , असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे अहेत.

अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम

 • वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे.
 • वाचनासाठी नेहमी पूर्वा भिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे.
 • वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्मात बदल होऊ देऊ नये.
 • श्रीदत्तात्रायांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.
 • सप्ताहकालात ब्र्म्ह्चर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत पणाने व सोवळ्या नेच करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.)
 • रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव अहे.
 • वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
 • सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
 • सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. 

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती 

★अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते.
★अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.
★अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते. व व्रताची पूर्तता होते.
★अध्याय ४:- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.
★अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.
★अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.
★अध्याय ८:-  बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.
★अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.
★अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.
★अध्याय ११:- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.
★अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.
★अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.
★अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.
★अध्याय १५:- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.
★अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.
★अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.
★अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.
★अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.

श्री गुरुचरित्रातील अध्यायतील फलश्रुती 
गुरुचरित्र कथा प्रसंग- अध्याय २०, ओवी ५ वी 

★अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!
★अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .
★अध्याय २२:- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.
★अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.
★अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.
★अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.
★अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.
★अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.
★अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.
★अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.
★अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.
★अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.
★अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.
★अध्याय ३३:- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.
★अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.
★अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.
★अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.
★अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.
★अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.
★अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .
★अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.
★अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो.
★अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.
★अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.
★अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.
★अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.
★अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.
★अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.
★अध्याय ४८:-  गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.
★अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.
★अध्याय ५०:- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.
★अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.
★अध्याय ५२ :- श्रद्धेला  चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

भक्ती, मुक्ती परमार्थ । जे जे वांछि मनी आर्त ।। त्वरित होय साद्यंत । गुरुचरित्र ऐकता ।।

क्षुद्र शेती - गुरुचरित्र
गुरुचरित्र कथा प्रसंग- क्षुद्र शेती 

गुरुचरित्र आणि दत्त माहात्म्य हे दत्त सांप्रदायातील दोन मुख्य ग्रंथ, मंत्रसिद्ध आणि लगेच प्रचिती देणारे. पण दत्त भक्ती हि दुर्लभ असल्याने ह्याच्या वाचनाचे आणि मननाचे भाग्य फार थोड्या जणांना लाभते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय कायम वाचनात असावा अगदीच नाही तर नित्य पाच ओव्या तरी चुकवू नयेत असे थोरले महाराज म्हणत असत. पाहायला गेल तर एक मंत्रसिद्ध ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूने पाहताच आपली संपूर्ण आचार संहिता. प्रत्येक अध्याय अत्यंत मृदू आणि संयम, नीतिमत्तेची पराकाष्ठा असलेला. चौदाव्या अध्यायात सायंदेव ब्राह्मण म्हणतो माझं रक्षण करा, पण त्या यवन मंडळींचा नायनाट करा असा शब्दही नाही, केवळ मला सांभाळा. अठ्ठेचाळिसाव्यात त्या शेतकऱ्याला महाराज विचारतात काय इच्छा आहे? तो म्हणतो, जरा माझ्या शेताकडे अमृत दृष्टीने पहा, ते छान पिकू द्या.  वास्तविक प्रत्यक्ष परमात्मा समोर प्रसन्न उभा आहे, द्या दोन चार रांजण मोहरा! असं न मागता केवळ शेत उत्तम पिकाव, धन्य आहे. वांझ म्हैस दुध देऊ लागली म्हणून ते तसंच पुढ्यात ठेवलं का? ते तापवून मग दिलं, अगदी छोटी गोष्ट पण शिकवण देणारी. साठ वर्षे होऊनही त्या स्त्रीला कन्या रत्न झालं पण केव्हा एकदा महाराजांना भेटते आणि आशीर्वाद घेते असा प्रकार नाही. दहा दिवस झाल्यावर मग ती महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आली. सायंदेवाला महाराज म्हणाले आता इथे येऊन सेवेत राहावे, यवन सेवेत मानधन भरपूर, बासर ब्रह्मेश्वरला / कडगंचीला स्थिरस्थावर पण सर्व सोडून तो सहकुटुंब सहपरिवार गाणगापूरला आला आणि गुरुमहाराजांबरोबर राहिला. पुढे कसं होईल, नोकरी कोण देईल, काही चिंता नाही. गुरुवाक्य प्रमाण!
रजकाला महाराज म्हणाले राज्य ह्या जन्मी हवं कि पुढे? पुढचा जन्म कोणी पाहिला आहे असा विचार त्याने नाही केला, महाराज म्हणताहेत म्हणजे होणारच! त्यात शंका 
नाही. 

दत्तावतार व भिक्षेचे महत्व

श्री गुरू चरित्रातील प्रत्येक अध्याय हा दत्तभक्ताला मोलाचा संदेश देऊन जातो, म्हणून श्री गुरूचरित्राचे महत्व हे अनन्य साधारण असेच आहे. श्री गुरू चरित्राच्या पाचव्या अध्यायात माधांन्य समयी भिक्षेसाठी येणार्या अतिथी बाबत आस्था असणे गरजेचे आहे, त्यास रिक्त हस्ते पाठवू नये त्या रूपाने श्री दत्त गुरूयेऊ शकतात हा भाव असणे महत्वाचे आहे. माधान्ह काळी दत्तगुरू हे भिक्षा ग्रहण करतात. आजही श्री क्षेत्र गाणगापूर ईथे दत्तप्रभूंना भिक्षा दान केली जाते तसेच दक्षिण क्षेत्र कोल्हापूर ईथे मा जगदंबे कडून भिक्षा ग्रहण करतात. गुरूचरित्रातील पाचव्या अध्यायात पीठापूर या क्षेत्री आपळराज व त्याची पत्नी सूमती यांच्या कडे श्राध्द होते, अतिथी वेशात श्री दत्तात्रेय तिच्याकडे भिक्षा मागण्यास आले श्राध्दीय ब्राम्हण जेवले नसतांना माता सूमतीने त्यातील अन्न श्री दत्तात्रेयाला भिक्षा घातली त्या अतिथीदेवो भव आदरातिथ्याने श्री दत्तप्रभू प्रसन्न झाले व आपले खरे रूप दाखवून मनोकामना पूर्ण होईल असा आशिर्वाद दिला कालातंराने सूमती मातेस गणेश चतूर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने दत्तात्रेयाचा पहिला अवतार जन्माला आला. अशी ही श्रीपाद श्रीवल्लभा च्या जन्माची पाचव्या अध्यायाची कथा आहे. या शिवाय श्री गुरूचरित्रातील पाचव्या अध्यायाची घडलेली घटना श्री क्षेत्र पीठापूर या क्षेत्री घडली आहे. श्री दत्तप्रभूंचा पहिला अवतार या क्षेत्री झाल्याने दत्तप्रेमींना या स्थानाचे व क्षेत्राचे विशेष प्रेम आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार ज्या स्थळी झाला, ज्या गावांत त्यांचे बालपण गेले जिथे त्यांनी भ्रमण केली आपल्या लिला दाखवल्या, ती स्थळे पाहणे त्यास्थळांना भेटी देणे दर्शन घेणे तिथे अनूष्ठान करणे पूजा अर्चा करणे हा दत्तभक्ताचा आचार धर्मच बनून जातो तिर्थाटनाचा हा त्यामागिल एक ऊद्देश असतो.

पिठापूर पूर्वदेशी । होता ब्राह्मण उत्तमवंशी ।
आपस्तंभ शाखेसी । नाम आपळराजा जाण ॥१०॥

तयाची भार्या सुमता । असे आचार पतिव्रता ।
अतिथि आणि अभ्यागता । पूजा करी भक्तिभावे ॥११॥

ऐसे असतां वर्तमानी । पतिसेवा एकमनी ।
अतिथिपूजा सगुणी । निरंतर करीतसे ॥१२॥

वर्तता ऐसे एके दिवशी । आला दत्त अतिथिवेषी ।
श्राद्ध होते अमावस्येसी । विप्राघरी तै देका ॥१३॥

न जेवितां ब्राह्मण घरी । दत्ता भिक्षा घाली ते नारी ।
दत्तात्रेय साक्षात्कारी । प्रसन्न झाला तये वेळी ॥१४॥

त्रैमूर्तीचे रूप घेऊनि । स्वरूप दावियले अतिगहनी ।
पतिव्रता धावोनि चरणी । नमस्कारी मनोभावे ॥१५॥

दत्तात्रेय म्हणे तियेसी । माग माते इच्छिसी ।
जे जे वासना तुझे मानसी । पावसी त्वरित म्हणतसे ॥१६।।

माधान्ह समयी अतिथीकाळी । दत्तात्रेययेताति तये वेळी ।
विमूख न व्हावे तये काळी । भिक्षामात्र घालिजे ।३४।।

।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।

श्री गुरुचरित्र वैशिष्ट्ये
श्री गुरुचरित्र वैशिष्ट्ये

गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते

१. आपली चूक नसताना दुसर्याकडून झालेला त्रास, हे आपलेच प्रारब्ध असते.
२. आपण मदत करत नसतो, तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते.
३. आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते.
४. यांत्रिक पणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. 
५. मनुष्य रूपातच बहुतेक गुरू भेटतात, पण कुणाला तरी गुरू मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते. पण योग्य गुरू भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. (आचरेकर सरांनी गालात मारलेली होती तरीही सचिन आज पाय धरतो. त्यांची चिकित्सा करत नाही).
६. काळ हा परमेश्वरलाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे.
७. आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात. त्याला पर्यायी उपाय नाही.
८. नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जग राहाटी चालवावी हेच सांगितले.
९. महाराज वैश्विक शक्तीच्या सुचनेने राहिल्यासारखे वाटतात. बाकीच्या घटना या घडत गेल्या. मुख्य कार्य ठरलेले होते.
१०. अवतार हे काळाप्रमाणे होतात. दर वेळी एकाच रुपात येत नाहीत. 
११. विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र (जे असेल ते) आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. 

श्री गुरु दीपावली व भक्तांसाठी आठ रूपे

आठ रुप
आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।
आठ रुप
आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।
आठ रुप
आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।
आठ रुप
आठ रूप झाले आपण । अपार महिमा नारायण ।

श्रीगुरू गाणगापुरात असताना एक गमतीदार गोष्ट झाली. एकदा दिवाळीचा सण आला. श्रीगुरुंचे सात शिष्य श्रीगुरुंच्याकडे आले. या मंगल दिनी श्रीगुरुंचे चरण आपल्या घराला लागावेत असे प्रत्येकाला वाटत होते. या दिवाळीच्या दिवशी श्रीगुरुंनी आपल्या घरी यावे असे प्रत्येकाला वाटत होते. तशी त्यांनी श्रीगुरुंना विनंती केली. श्रीगुरुंना त्यांचे मन मोडवेना. तेव्हा ते शिष्यांना म्हणाले, "तुम्ही सगळेच माझे प्रिय शिष्य आहात. तेव्हा मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी कसा येणार ? तेव्हा मी कुणाच्या घरी येऊ ते आपापसात ठरवा व मला सांगा." श्रीगुरुंनी आपल्याच घरी यावे असे त्या सातही शिष्यांना वाटत होते. त्यावरून त्यांचे भांडण सुरु झाले. त्यांचे काही केल्या एकमत होईना. मग श्रीगुरुंनी युक्ती केली. त्यांनी एकेका शिष्याला बाजूला बोलाविले व त्याला सांगितले, "मी तुझ्याकडेच येईन; पण हे कोणाला सांगू नकोस. आता तू शांतपणे आपल्या घरी जा." अशारीतीने प्रत्येकाची समजूत काढून सर्वांना वाटेला लावले. त्यामुळे श्रीगुरू फक्त आपल्याच घरी येणार नाही म्हणून सर्वांना आनंद झाला. ते सार्वजण आपापल्या गावी गेले.

दिवाळीला श्रीगुरू बाहेरगावी आपल्या शिष्यांकडे जाणार ही बातमी मठातील भक्तांना समजली, तेव्हा ते श्रीगुरुंना म्हणाले, "स्वामी, दिवाळीसारख्या पवित्र दिवशी तुम्ही बाहेरगावी शिष्याकडे जाणार ? मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे ? तुम्ही दिवाळीत आम्हाला सोडून कोठेही जाऊ नये." त्यांचे मनोगत लक्षात घेऊन श्रीगुरू त्यांना म्हणाले, "तुम्ही चिंता करू नका. आम्ही येथेच राहू." ते ऐकून सर्वांना समाधान वाटले. दिवाळीच्या दिवशी श्रीगुरुंनी मंगलस्नान केले. आपल्या योग-सामर्थ्याने सात रूपे घेतली व एकेका रूपाने ते विविध गावांत राहणाऱ्या आपल्या सातही शिष्यांच्या घरी गेले. त्या सर्वांकडून त्यांनी पूजासेवा घेतली व मठातही राहिले. कार्तिकी पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्रीगुरुंचे ते सातही शिष्य गाणगापुरला मठात आले. त्यावेळी प्रत्येकजण सांगू लागला,"दिवाळीला श्रीगुरू फक्त आपल्याच घरी आले होते." आणि आपण दिलेली वस्त्रे श्रीगुरुंच्याकडे असल्याचे दाखवू लागला. ते ऐकून सर्व शिष्य मोठ्या संभ्रमात पडले. पण गाणगापुरातील लोक म्हणाले, "श्रीगुरू तुमच्यापैकी कोणाकडेच आले नव्हते, ते मठातच होते. त्यांनी आमच्याबरोबर दिवाळी साजरी केली."

हे सगळे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. श्रीगुरू साक्षात परमेश्वर आहेत. त्रैमूर्तींचा अवतार आहेत. भक्तांसाठी त्यांनी आठ रूपे घेतली हे रहस्य उघड होताच सर्वांनी श्रीगुरूंचा जयजयकार केला. ते म्हणाले, "परमेश्वरा, अनंत रूपे धारण करणारा तू त्रैमूर्ती भगवान आहेस. तुझे सामर्थ्य आम्हाला कसे बरे कळणार ?" त्यावेळी सर्वांनी श्रीगुरूंची स्तुती केली. दीपाराधना करून समाराधना केली.

ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, "श्रीगुरुंचे माहात्म्य हे असे आहे." या प्रसंगाने श्रीगुरूनृसिंहसरस्वतींची ख्याती सर्वत्र झाली. ग्रंथकर सरस्वती गंगाधर सांगतात, "सज्जन हो ! तुम्ही श्रीगुरूंची आराधना करा. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. जे मूर्ख असतात त्यांना श्रीगुरुसेवा करण्याची लाज वाटते. जे ज्ञानी असतात ते श्रीगुरुंचे नामामृत प्राशन करतात. श्रीगुरू हेच त्रैमूर्ती आहेत. हा संसारसागर तरुन जाण्यास श्रीगुरू हाच एक आधार आहे.

गुरुचरित्र अन्वयार्थ

प्रत्येक अध्यायात सुरुवातीला आणि शेवटी एकच मुद्दा अधोरेखित केला आहे की,

"अरे ! काही करू नकोस , तुझ्या सद्गुरुना शरण जा. तुझी श्रद्धा; भक्ती; एकाग्रता एवढी वाढव की त्या सद्गुरुनी सांगितलेला प्रत्येक शब्द फुलासारखा झेलता आला पाहिजे. कदाचित त्या फुलात काटे असतील ते तुला टोचतील, तरीसुद्धा तू तक्रार करू नकोस. कारण ते काटेसुद्धा तुझ्या अंतिम हितासाठीच असतील." 

गुरुचरित्राच पठण करणाऱ्या प्रत्येकाने आत्मशोधन करावे की, नेमके कशासाठी हे पठण करतो आहोत. आपला नेमका हेतू काय आहे ? तो शाश्वत आणि भव्य स्वरूपाचा आहे की संकुचित आणि अशाश्वत आहे. हे आत्मशोधन नित्य पठणाआधी भक्त करू शकला तर श्रीगुरूचरित्राच्या वाचनातून त्याला त्याच्या प्रगतीचा मार्ग आपोआप उलगडत जाईल नव्हे तर सद्गुरु तत्वाकडून काळजी घेतली जाईल, हे निश्चित. आपल्या पूर्व कर्माच्या प्रतिक्रिया ज्या दिवशी संपतील त्या दिवशी आपण आणि सद्गुरु / परमात्मा एकच होऊन जाल. पण तत्पूर्वी आपणच लावलेली पापाची बीजं भोगुन संपवावी लागतात. सत्कर्माने त्या बीजांची झालेली झाडे नष्ट करता येतात पण बीज मात्र भोगूनच संपवावे लागते. पूर्वकर्माची निष्कृती झाली की मग "मी तू पणाची झाली बोळवण" अशी अवस्था येते. तुमच्यात आणि सद्गुरुत वेगळेपणा उरतच नाही. तुम्ही संपूर्ण एकरूप झालेले असता. 

श्री गुरु अवतार प्रेरणादायी व मार्गदर्शक, गुरु चरित्राचे  विविध पैलू

१) पूर्व जन्मस्मृती

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज व श्रीगुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या दत्तप्रभुंच्या दोनहीअवताराचे वैशिष्टय, सतशिष्यास, निजभक्तास पुर्वस्मृती व रृणानुबंध ज्ञात करून देणे. बाल श्रीपादांनी मातामह श्री बापन्नाचार्यांना अगदी गणेशपुत्र लाभ, लाभाद महर्षी, सत्यरृषीश्वर, नंद यादव, भास्कराचार्य हा पुर्वजन्मींचा प्रवास दाखवत बापन्नाचार्यांनी, "सोन्या तु नेमका कोण आहेस?" असे विचारताच त्यांच्या मस्तकास स्पर्श करून प्रयाग संगमावर स्नान करणारे शोडष वर्षीयमहावतार बाबा, शामाचरण लाहिरी, कर्दळी वनांतप्रवेश करणारे श्री नरसिंह सरस्वती स्वामी, बाहेर पडणारे श्री स्वामी समर्थ, यवन वेशातील "अल्लामालीक" म्हणणारे फकिर श्रीसाईबाबा हा चलतपटकाही क्षणांत दाखविला. १६ वर्षी पिठापुर सोडताना आई सुमती महाराणींस मस्तक स्पर्श करुन महालयअमावास्येस तिला झालेले दर्शन, आशिर्वाद व वचनदाखवते झाले. वयाच्या ८ वर्षी कारंजा सोडुन काशीक्षेत्री जाण्यास श्रीनरसिंह सरस्वती स्वामी निघाले. त्यांना आईच्या मस्तकास स्पर्श करताचतिला अंबिकेची पुर्वजन्माची कुरवपुर येथील श्रीपाद दर्शन,शनिप्रदोष व्रताशिर्वाद, वचन आठवले. बीदरचायवन बादशाह गाणगापुरला व्याधी शमनार्थ आलातेंव्हा श्री नरसिंह सरस्वती स्वामिंनी "का रे रजका? कोठे असतोस?" अशी हाक मारताच त्यास पुर्वजन्मीची स्मृती झाली व कुरवपुरातील त्याचा सेवक रजकाचा जन्म, श्रीपाद दर्शन व आशिर्वाद आठवला. 

२) पतीस पत्नीचे योग्य मार्गदर्शन

स्त्रीने पतीला योग्य सल्ला दिल्याची काही उदाहरणे दत्त साहित्यात आढळतात, त्यातील एक गुरुचरित्रातील म्हणजे मित्रसह राजाचे उदाहरण, सेवकरूपी राक्षसाने फसवून नरमांस वाढले आणि ऋषींनी दिलेल्या शापाने राजा निराश झाला वास्तविक राजाला यातील काहीच कल्पना नव्हती यामुळे ऋषींना शाप देण्यासाठी त्याने हातात जल घेतले असता पत्नीने त्याला परावृत्त केले आणि ते जल पायावर सोडल्याने कल्माषपाद असे त्याला नामाभिधान मिळाले होणाऱ्या, त्या पापापासून वाचविले, दुसरे उदाहरण दत्त माहात्म्यातील, विष्णुदत्त ब्राह्मणाला ब्रह्मराक्षस प्रसन्न होतो आणि म्हणतो जे मनात असेल ते मागावे असे म्हणतो, इथे विष्णुदत्त ब्राह्मणाची व्दिधा मनस्थिती होते काय मागावे, घर, पुत्र, ऐश्वर्य, परलोक, काही न सुचल्याने तो पत्नीला विचारण्यासाठी घरात येतो तेव्हा ती म्हणते, मागू नका नश्वरा । श्री दत्ताची भेटी करा । ऐशा वरा मागावे । आणि त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात विष्णुदत्त ब्राह्मणाला दत्त दर्शन घडते अशी कथा आहे.        

३) गरीब श्रीमंत सर्व समानच. श्रद्धा व एकनिष्ठा हाच मापदंड. श्रीगुरु ब्रम्हस्वरूपी,

एकदा श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला असताना मठामध्ये सात भक्त त्यांना दिवाळी करीता निमंत्रित करण्यासाठी आले, महाराज भक्त वत्सल आहेत आणि आपले प्रेमळ बोलावणे नाकारणार नाहीत हि सर्व भक्त मंडळींना खात्री होती पण सर्व एकत्र आल्यानंतर आता गुरुमहाराज कोणा एका ठिकाणी जाऊ शकतील व ते ठिकाण आपले असावे या साठी त्या सात भक्तांमध्ये कलह सुरु झाला, प्रत्येकाची विनंती ऐकून मठातील भक्त मंडळी काळजीत पडली. ऐन दिवाळीच्या दिवशी गुरुमहाराज मठात नाहीत हि कल्पना त्यांना करवेना. आता गुरुमहाराज काय निर्णय घेतात याकडे सर्व पाहू लागले, यावर गुरुमहाराजांनी एकेका भक्ताला जवळ बोलावले व सांगितले मी तुझ्या घरी येत आहे आता समाधानी असावे मात्र हे वर्तमान गुप्त ठेवावे. यावर आनंदित होऊन ते सात भक्त आपापल्या घरी जाते झाले, तेव्हा मठात भक्तगण म्हणू लागले, महाराज आम्हाला सोडून जाऊ नये, दिवाळी आम्हासोबत साजरी करावी. यावर गुरुमहाराज म्हणाले मान्य आहे, मी इथेच असेंन. काही दिवसांनी दिवाळी नंतर ते सात भक्त पुन्हा योगायोगाने दर्शनाला आले व त्यांची भेट झाली, अर्थातच गुरुमहाराजांनी आपल्या घरी येऊन आपल्याला आशीर्वाद दिले ते प्रत्येक जण सांगू लागला व त्याच्या पुष्ट्यर्थ आपण त्यांना दिलेली भेट मठात विराजमान असलेली दाखवू लागला, हा सगळा प्रकार पाहून मठामधील भक्तगण हस्तक्षेप करीत म्हणू लागले कि गुरुमहाराज इथे मठातच होते आणि आम्ही सर्व त्यांच्या सोबतच होतो, स्वपक्ष सिद्ध करताना कलह वाढू लागला तेव्हा गुरुमहाराज म्हणाले आता थोडं लक्ष द्या, मी सातही जागी गेलो होतो आणि इथेही होतो तेव्हा सर्वांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला व गुरुमहाराजांच्या अलौकिक लीलेबद्दल कौतुक व्यक्त करीत सर्व भक्त स्वस्थानी गेले.                                                     

४) श्री गुरूंचा स्पर्श सहवास

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज संन्यासी होते अर्थात त्यांना इतरजनांचा स्पर्श त्याज्य होता. संपूर्ण गुरुचरित्रात केवळ एका जीवाचा स्पर्श नृसिंहसरस्वती स्वामीमहाराजाना झाला. गंगा नावाची साठ वर्षे वयाची स्त्री महाराजांच्या आशीर्वादाने कन्यारत्न प्राप्त करून घेते आणि दहा दिवसांनी जेव्हा ती महाराजांच्या दर्शनाला येते तेव्हा आशीर्वादाकरिता त्या बालकाला महाराजांसमोर ठेवते. महाराज अत्यंत प्रेमाने त्या मुलीला उचलून कडेवर घेतात. कडिये घेतले प्रीतीसी ।। असे तेव्हाचे वर्णन गुरुचरित्रात आहे. आधीच अवतार काळात जन्म दुर्लभ, त्यातही तो अवतार ज्या प्रांतात आहे त्यात होणे, त्या अवताराशी संबंध येणे आणि अशी गुरुकृपा मिळणे एकाहून एक दुर्लभ आहे. त्या मुलीची अनंत जन्मांची पुण्याई फळाला आली आणि महाराजांचा सहवासप्राप्त झाला,

५) भक्तांना रोगमुक्ती

गुरुचरित्र हा सिद्ध ग्रंथ आहे. प्रत्येक अध्यायात केवळ एकच नाही तर अनेक गोष्टी त्यात आढळतात, माहूरच्या विप्राचे गाणगापूरला येताच प्राणोत्क्रमण होते आणि गुरुमहाराज त्याला पुन्हा आयुष्य प्रदान करतात या वेळी केवळ आयुष्य न देता रोगरहित आयुष्य त्याला देतात हे लक्षात घेतले पाहिजे, असाध्य रोगाने प्राणोत्क्रमण झाले होते पण पुन्हा आयुष्य द्यायचे तर ते रोगरहित असले पाहिजे. हे त्या विप्राला मिळालेले आयुष्य म्हणजे रुद्र महिमा असल्याचे गुरुमहाराज नमुद करतात आणि त्याच्या पुष्टयर्थ रुद्रमहिम्याची एक कथा येते. त्यानंतर गुरुमहाराजांना ती विप्रस्त्री एखादा मंत्र द्यावा अशी विनंती करते, का तिला असा मंत्र मागावयाची बुद्धी व्हावी? या मागे गुरुमहाराजांना सोमवार व्रत सांगावयाचे होते आणि त्याच बरोबर स्त्री वर्ग मंत्र शास्त्राकरिता अनधिकारी आहे हे हि नमूद करावयाचे होते त्यामुळे कच-देवयानी आणि सीमंतिनी हि दोन आख्याने पुढे आली आहेत. श्रीगुरु अनेकांना रोगमुक्त करतात त्यात कुष्ठरोगी असो किंवा इतर व्याधीग्रस्त असो श्रीगुरु त्यांना व्याधीमुक्त करतात.

गुरुचरित्र कथा
गुरुचरित्र कथा प्रसंग 

६) नरसिंह सरस्वती, भिक्षा मागणे हि सुद्धा लीला

काही अज्ञानी भक्तांना प्रश्न पडायचा की हा ज्या दिवशी भिक्षा नाही मागत त्यावेळी काय करत असतील ती परीक्षा पाहायला एकटा ब्राह्मण गेला आणि तिथे एक नावाडी पण होता, व्रह्मण नरसिंह सरस्वतीचा रुद्र रूप वाटलं।तो घाबरून पळून गेला पण नावडी ला भिती वाटली नाही त्याला असे दिसले की, मध्यान्हकाळी नदीतून चौसष्ट योगिनी आल्या. त्यांनी श्रीगुरुंची पूजा केली. मग त्या श्रीगुरुंना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याचक्षणी नदी दुभंगली. सर्वजणी श्रीगुरुंसह आत गेल्या व काही वेळाने श्रीगुरुंना घेऊन बाहेर आल्या. मग श्रीगुरू एकटेच स्वस्थानी गेले. ते दृश्य पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले. दुसऱ्या दिवशी पूर्वीप्रमाणेच योगिनी आल्या व श्रीगुरुंना बरोबर घेऊन नदीच्या प्रवाहात शिरल्या. त्याचक्षणी नदीप्रवाह दुभंगला. वाट निर्माण झाली. योगिनी श्रीगुरुंच्यासह आत शिरल्या. त्याचक्षणी तो नावाडीही त्यांच्या मागोमाग आत शिरला. दुभंगलेला नदीप्रवाह पूर्ववत झाला. आत गेलेल्या त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले. तेथे त्याला इंद्राच्या अमरावतीसमान वैभव संपन्न नगर दिसले. त्या नगरात रत्नखचित गोपुरे होती. श्रीगुरू तेथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले. त्यांनी श्रीगुरुंना एका मंदिरात नेउन उच्चासनावर बसविले व त्यांची यथासांग पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्यांना उत्तमोत्तम भोजन दिले. भोजन झाल्यावर श्रीगुरू बाहेर आले. त्याचवेळी श्रीगुरुंचे त्या नावाड्याकडे लक्ष गेले. त्यांनी त्या नावाड्याला विचारले, "तू येथे कशासाठी आलास?" तेव्हा तो नावाडी हात जोडून म्हणाला, "स्वामी, मी तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. तुम्ही साक्षात त्रैमूर्ती अवतार आहात. संसारमायेत अडकले त्यांना तुमचे स्वरूप समजत नाही. या संसारसागरात बुडणाऱ्या लोकांचा उद्धार करणारे तुम्ही साक्षात त्रिमुर्ती श्रीदत्तात्रेय आहात. ज्यांना तुमचे दर्शन घडते त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. त्यांचे इह-पर कल्याण होते." त्या नावाड्याचे असे स्तवन केले असता श्रीगुरू प्रसन्न झाले. ते म्हणाले, "तुझे दैन्यदारिद्र्य गेले. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती ती पूर्ण होईल; परंतु येथे जे काही पाहिलेस ते कुणालाही सांगू नकोस. जर वाच्यता केलीस तर तुझे मोठे नुकसान होईल." असे सांगून ते नावाड्यासह औदुंबरापाशी आले. श्रीगुरूंचा निरोप घेऊन तो नावाडी आपल्या शेतात गेला. तेथे त्याला गुप्तधन सापडले. त्या धनामुळे त्याचे दुःखदारिद्र्य नाहीसे झाले. त्याची बायकामुले सुखी झाली. त्याला श्रीगुरुंच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्तीही झाली. त्या दिवसापासून तो आपल्या कुटुंबासह श्रीगुरूंची मनोभावे सेवा करू लागला. नरसिंह सरस्वती आपले वास्तव्या सोडून गाणगापूर पुरला निघेल त्या वेळी ६४ योगिनी नि प्रार्थना केली आम्हाला उपेक्षून तुम्ही जात आहात त्यावेळली महाराजांनी मनोहर पादुकां दिल्या, आणि चीर काळ वास्तव्य राहील असे सांगितलेगुरुचरित्रात ६४ योगिनींचा उल्लेख १९ व्या अध्यायात येतो . पणत्या अध्ययतील कथा समजायला १८ व्या अध्यायात ल जाऊन घ्यायचा घ्यावा लागतो. अध्याय १८ मध्ये श्रीगुरु अमारेश्वरी गरीब ब्राम्हणाचे घरी घेवाड्याच्या शेंगाची भाजी भिक्षेत घेऊन विप्राचे दारिद्र्य हरण करतात हे सर्वांना ज्ञात आहेच .तसेच भोजन पात्रही नसणाऱ्या श्री कुलकर्णींच्या घरी दगडावर कण्या घेऊन त्या कुळाचा जन्मोजन्मीचा उद्धार करतात. भिक्षा हे फक्त निमित्त भक्तांचा उद्धार हेच खरे उद्दीष्ठ!

गुरुचरित्र कथा प्रसंग
गुरुचरित्र कथा प्रसंग व गुरु बोध

७) गुरु चरित्रातील इतर प्रसंग व गुरु बोध

गुरुचरित्र आणि दत्त माहात्म्य हे दत्त सांप्रदायातील दोन मुख्य ग्रंथ, मंत्रसिद्ध आणि लगेच प्रचिती देणारे. पण दत्त भक्ती हि दुर्लभ असल्याने ह्याच्या वाचनाचे आणि मननाचे भाग्य फार थोड्या जणांना लाभते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ कोणत्याही कामनेशिवाय कायम वाचनात असावा अगदीच नाही तर नित्य पाच ओव्या तरी चुकवू नयेत असे थोरले महाराज म्हणत असत. पाहायला गेल तर एक मंत्रसिद्ध ग्रंथ आणि दुसऱ्या बाजूने पाहताच आपली संपूर्ण आचार संहिता. प्रत्येक अध्याय अत्यंत मृदू आणि संयम, नीतिमत्तेची पराकाष्ठा असलेला. चौदाव्या अध्यायात सायंदेव ब्राह्मण म्हणतो माझं रक्षण करा, पण त्या यवन मंडळींचा नायनाट करा असा शब्दही नाही, केवळ मला सांभाळा. अठ्ठेचाळिसाव्यात त्या शेतकऱ्याला महाराज विचारतात काय इच्छा आहे? तो म्हणतो, जरा माझ्या शेताकडे अमृत दृष्टीने पहा, ते छान पिकू द्या. वास्तविक प्रत्यक्ष परमात्मा समोर प्रसन्न उभा आहे, द्या दोन चार रांजण मोहरा! असं न मागता केवळ शेत उत्तम पिकाव, धन्य आहे. वांझ म्हैस दुध देऊ लागली म्हणून ते तसंच पुढ्यात ठेवलं का?? ते तापवून मग दिलं, अगदी छोटी गोष्ट पण शिकवण देणारी. साठ वर्षे होऊनही त्या स्त्रीला कन्या रत्न झालं पण केव्हा एकदा महाराजांना भेटते आणि आशीर्वाद घेते असा प्रकार नाही. दहा दिवस झाल्यावर मग ती महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आली. सायंदेवाला महाराज म्हणाले आता इथे येऊन सेवेत राहावे, यवन सेवेत मानधन भरपूर, बासर ब्रह्मेश्वरला / कडगंचीला स्थिरस्थावर पण सर्व सोडून तो सहकुटुंब सहपरिवार गाणगापूरला आला आणि गुरुमहाराजांबरोबर राहिला. पुढे कसं होईल, नोकरी कोण देईल, काही चिंता नाही. गुरुवाक्य प्रमाण !!
रजकाला महाराज म्हणाले राज्य ह्या जन्मी हवं कि पुढे? पुढचा जन्म कोणी पाहिला आहे असा विचार त्याने नाही केला, महाराज म्हणताहेत म्हणजे होणारच !! त्यात शंका नाहीच.

८) श्री गणेश व गुरुचरित्रातील संदर्भ

गणेशाचा संदर्भ गुरुचरित्रात तीन प्रकारे गुरुचरित्रात येतो. 

अ) पहिला प्रकार

अध्यायाची सुरवात गणेशाच्या नावे होते, याचा अर्थ आपण मनोभावे गणेशाचे नुसते स्मरण केल्यास विघन पळून जातात.

ब) गणेशा च सुंदर वर्णन गुरुचरित्रातील पहिला अध्यायात आहे गुरुचरित्र कारणी गुरू चरित्र लिखाण।साठी ज्ञान मिळावे हया साठी प्राथना केली आहे. हे ॐ कारस्वरूप गणेशा, विघ्नहर्त्या, पार्वतीसुता, गजानना मी तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण इत्यादी नावाने प्रसिद्ध् आहेस. तुझ्याा हालणाऱ्या कांनापासून जो वारा निर्माण होतो त्या वाऱ्याने तुझ्या साऱ्या भक्तांची सर्व संकटे दूर होतात, म्हणून तुला विघ्नांतक, विघ्नहर्ता असे म्हणतात. तप्त सुवर्णाप्रमाणे असलेले तुझे मुख शोभून दिसते उगवत्या सूर्याप्रमाणे असलेले त्याचे तेज सर्वत्र पसरते. संकटरुपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू हातात परशू धारण केला आहेस. तू नागबंद म्हणजे सर्पाचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवीत धारण केले आहेस. हे चतुर्भुज, विशाल नेत्र विनायका, तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा सांभाळ करतोस. जे लोक तुझे चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांचे सर्व मनोरथ तत्काळ सिद्धीला जातात. कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी सर्वप्रथम तुलाच वंदन केले जाते. हे लंबोदर गणेशा, तूच चौदा विद्यांचा, म्हणजे चार वेद, सहा वेदांगे, पुराणे, मीमांसा, न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस. तूच वेद शास्त्रे पुराणे यांचे लेखन केले आहेस, म्हणून तर ब्रह्मदेवादी सर्व देव तुझे स्तवन करतात.हे गणेशा, अजिंक्य, अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी भगवान शंकरांने तुझेच स्तवन केले होते. हरीब्र्म्हादी देव कार्यारंभी तुलाच वंदन करतात. तुझ्या कृपेने त्यांना इच्छित गोष्टी प्राप्त होतात. हे कृपानिधी, गणनायका, हे मूषकवाहना, ॐकारस्वरूप, दु:खहर्त्या, विनायका मला बुद्धी दे. जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्ये सिद्धीला जातात. हे गणेशा, तू कृपासागर आहेस. तू सर्वांचा आधार आहेस. हे गजानना माझे मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो. मला ज्ञान दे, बुद्धी दे, हे गणेशा, तू शरण आलेल्यांना वर देणारा आहेस. मी अज्ञानी आहे म्हणून तुझ्याा शरणी आलो आहे. गुरुचरित्र लिहावे अशी इच्छा आहे. तुझी माझ्यावर पूर्ण कृपादुष्टी असावी व मी हाती घेतलेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे.

क) गोकर्ण महाबळेश्वर कथा आहे रावणा कडून लिंग घेऊन कशी स्थापना केली याच वर्णन आहे हा गुरुचरित्रातील ६ वा अध्याय त्यात गणेशाच सुंदर वर्णन आहे.      

।। श्री गुरूदेव दत्त ।।

आरती श्रीगुरुचरित्राची

मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं ।
षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं ।
भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं ।
मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥ 
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं ।
नरहरि भारति लीला ब्रह्मादिस्तुत्यं ।
कलिमलदाहक मंगलदायक  फलनित्यं ।
पारायण देहि मे पुस्तकमपि चित्यं ॥ २ ॥ 
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

त्वद्रतलीलासारं श्रृतिसकलाकारं ।
कांडत्रयविस्तारं प्रत्ययलघुकारं ।
कल्पद्रुमफलभारं कल्पित्तदातारं ।
पठणामृतरसधारं भवभयपरिहारं ॥ ३ ॥
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

अगाध श्रीगुरुकरुणं भूइच्छातरणं ।
ज्ञानामृतरसभरणं जडजीवोद्धारणं ।
भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रयहरणं ।
नियमाराधित महिमा मोक्षश्रीवर्णं ॥ ४ ॥
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

श्रीगुरुकरुणाकृत्यं सिद्धेश्र्वरगीतं ।
शारदगंगाधरसुतमथितं नवनीतं ।
भाविकभक्तप्रियकर कृतलोककदतं ।
तद्रेतशेषं वांछित सखा हरिहरचित्तं ॥ ५ ॥
जय देव जय देव वंदे गुरुचरितं । 
कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।
जय देव जय देव ॥ धृ. ॥

परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजजी के भक्तो के अमृत अनुभव

गुरुचरित्र श्रीग्रंथ कामधेनु है.

उस समय परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजजी का वास गरुडेश्वर में था. वहा पर एक ६-शास्त्रों में निपुण विद्वान ब्राह्मण स्वामीजी के सानिध्य में वेद व उपनिषदो पर चर्चा करता था. संस्कृत ग्रंथो के प्रति उसे बड़ा ही आदर था पर प्राकृत भाषा में लिखे ग्रंथो को वो दरकिनार किया करते थे.

वहा गरुडेश्वर में अनेक भक्तजन दत्तमूर्ति व स्वामीजी के सामने बैठकर प्रासादिक ग्रंथ गुरुचरित्र का पारायण किया करते थे.
पर ये ब्राह्मण देवता उन पाठकरने वालो को कमतर आंकते थे. पर उनकी स्वामीजी के सामने कुछ बोलने की हिम्मत नहीं होती थी.

अनेक मास बीत गए पर ब्राह्मण देवता वेद-वेदांतो की ही  चर्चा में ही उलझे रहे और उन्हें कभी भी गुरुचरित्र ग्रन्थ पढ़ने की इच्छा हुई ही नहीं.

स्वामीजी के समाधिस्थ होने के बाद ब्राह्मण देवता का मन गरुडेश्वर में लगता नहीं था क्योकि अब उन्हसे  वेद-चर्चा करने के लिए वहा पर कोई भी नहीं था, इसलिए वे अपने गाँव लौटकर सपत्निक निवास करने लगे.

एक-दो वर्षो के बाद उनकी पत्नी गंभीर रूप से बीमार पड गई, अनेक वैद्य-डाक्टरों के इलाज हुवे, तंत्र-मन्त्र हुवा पर उनकी पत्नी की तबियत सुधरने का नाम ही नहीं लेती थी.

इतने उपनिषद पढ़ने के बावजूद भी उनके मानसिक व उनकी पत्नी के शारीरिक कष्ट ख़त्म होने का नाम ही नहीं लेते थे.
वे थकहार के निराश होकर बैठ गए.

एक रात्रि को उनके स्वप्न में टेम्बे स्वामीजी ने आकर कहा:- “अरे, गुरुचरित्र ग्रन्थ में क्या रखा है ? हम तो उपनिषद् पढ़ने वाले है ! “

अगले दिन काफी सोच-विचार करने के बाद ब्राह्मण देवता को सूझ पड़ी की गुरूजी ने अपने को आधि (मानसिक कष्ट व रोग) व व्याधि (शारीरिक कष्ट व रोग) से छूटने का उपाय बताया है. फिर क्या ब्राह्मण देवता ने अपने पडोसी कुटुंब को अपनी पत्नी की देखभाल की जिम्मेदारी सौप कर सीधे गरुडेश्वर का रास्ता पकड़ा. अपने मुख से दत्त भगवान का नामस्मरण करते हुवे व अपना ध्यान दत्त-प्रभु की ओर लगाकर वे गरुडेश्वर पहुच गए. वहा जाकर उन्होंने श्री चरणों में साष्टांग दंडवत किया और अपराध क्षमा-प्रार्थना की.

अगले दिन उन्होंने नर्मदा माई में स्नान करके अपना आन्हिक ब्रह्मकर्म सुसंपन्न करा. फिर उन्होंने श्रीगुरु के समाधी-मंदिर के सामने बैठकर गुरुचरित्र श्रीग्रंथ का पूजन करके गुरुचरित्र सप्ताह का श्रीगणेश किया.

ब्राह्मण देवता पहले से ही संस्कारी ब्राह्मण परिवार में जन्मी हुई आत्मा थे, ऊपर से उनके द्वारा श्रीगुरु के दर्शन व गुरुसेवा भी हुई थी.
फिर क्या जैसे ही उनके गुरुचरित्र का पाठ आगे बढ़ने लगा उनके ह्रदय में आनंद बढ़ने लगा और उनकी वृत्ति गुरुमय होने लगी. वे आत्मस्वरूप में लीन होने लगे.
जब देह की ही वृत्ति न हो तो फिर अपनी पत्नी का स्मरण कहा से होगा ?
पर गुरु तो ठहरे गुरु, उन्हें अपने भक्तो की चिंता तो रहती ही है.
जैसे जैसे विप्रवर का पाठ आगे बढ़ता गया उनकी पत्नी को आराम मिलता गया, सातवे दिन तो वो माता जो महीनो से खटिया से जकड़ी हुई थी, वह उठकर बैठ गई. धीरे-धीरे उन्हें मानसिक स्वास्थ भी प्राप्त होने लगा. वे अन्नग्रहण करने लगी जिससे उनकी शारीरिक दुर्बलता भी दूर होने लगी. 

ब्राह्मण देवता का पारायण पुरा होते ही उन्हें टेम्बे स्वामी का दर्शन-लाभ होकर कृपा-प्रसाद भी मिला. घर लौटकर आने पर उनकी पत्नी की सुधरती हुई प्रकृति देख वे आनंदित हो गए, उनकी भक्ति और दृढ़ हो गयी. ब्राह्मण दम्पति के  इस तरह सारे दुःख व कष्ट मिट गए.
श्रीग्रंथ के कम-से-कम १५ पंक्तिया नित्य-पठण करने का उन्होंने नियम भी बना लिया.

यह गुरुचरित्र श्रीग्रंथ अत्यंत प्रासादिक है और महज प्राकृत भाषा में होने के कारण किसीको भी इसके महत्त्व पर शंका नहीं करना चाहिए. विधि पूर्वक व यम-नियम का पालन कर पाठ करने वाले व श्रवण करनेवालो की अगर शुद्ध-मनोभूमिका होगी तो प्रसाद तो अवश्य मिलेगा ही.

श्रीग्रंथ गुरुचरित्र कामधेनु है और इस ग्रन्थ को साष्टांग दंडवत नमस्कार है.

श्री गुरुचरित्र पारायण ! 

"पारायण" करणे म्हणजे नक्की काय करणें हा प्रश्न कधीच तत्ववेत्ता साधकांकडुनही विचारण्यात किंवा उल्लेख ही केला गेला नाही. आज आम्ही अमुक पारायण केले म्हणजे अमुक आकडेवारी गाठली ही महत्त्वाची, की जी योगक्रिया केली त्याचं मर्म आणि सखोलता साधली ती महत्त्वाची ! हा प्रश्न नेहमीच मला पडतो. श्री गुरुचरित्र सिद्धमंत्रग्रंथ हा पाचवा वेद आहे. या गुरुतत्वाचे अपेक्षित सत्व फलिभुत होणेसाठी त्याअधी सर्व अपेक्षित मानसिक व शारीरिक पुर्वतयारी होणे अतिमहत्वाचे असे मला वाटते.

"पारायण" या शब्दाचा नेमका अर्थ काय ?

पारायण हा शब्द "आत्मपरायण" तत्वाची अभिव्यक्ती आहे. "पारायण" याचा आ+परा+आयण असा अर्थ होतो. यात "आ" म्हणजे नारायणातील "आ" स्वरशक्ती. "परा" आपल्या शरीरातील नाभीवाणी अथवा नारायणाची वाणी जी पश्यंतीच्या पुढे स्थित आहे आणि निगम वाणीच्या आलिकडे आहे. "आयण" म्हणजे आवाहन करणे. "पारायण म्हणजे नारायणाच्या परावाणीचे आवाहन असा अर्थ आहे". श्री गुरुचरित्राचे पारायण करणे याची अभिव्यक्ती ईतकीही समजणेहेतु सरळही नाही. श्री गुरुचरित्राचे पारायण करणेआधी "श्रीगुरुचरित्र" या षडाक्षरी तारक मंत्राचा अर्थ समजावून घेणे ही प्रार्थमिकता असावी. उदा. विशालकाय वटवृक्षाचे अस्तित्वाची सुरवात एका बीजातुन होते. त्याच प्रमाणे श्रीगुरुचरित्र सिद्धग्रंथाचे अवलोकनात्मक अध्ययन प्रथमतः षडाक्षरी नामातुनच करणे योग्य !

"श्री गुरुचरित्र" या शब्दब्रम्हाचा मतीतार्थ असा कि, हे परब्रम्ह यतिराज श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरु महाराज, माझ्या अज्ञानरुपी अंधःकाराचा समुळ नाश करुन माझे दास्यभक्तीयुक्त आचरण पवित्र व चारीत्र्य संपन्न करा. सप्ताहकाळ वाचनात अथवा महाराजांच्या दत्तउपासनेत "सात" आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सद्गुरु शिष्य परंपरेला अनुसरुन ७ हा अंक दास्यभक्तीला अनुसरुन आहे. देहातीत सप्तपाताळ व षट्चक्र + सहस्त्रार एकूण सात चक्रांना अनुसरुन आहे.

श्री गुरुचरित्राचा पाठ अंतर्मुखी होऊन केल्यास आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते आणि संकल्पयुक्त बर्हीमुखी होऊन केल्यास इहलौकीक वैभव प्राप्त होते.

श्रीगुरुचरित्र एक अमृतग्रंथ

गुरुमहाराज अर्थात श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज हे प्रत्यक्ष दत्त महाराज आहेत, त्यांचे दिव्य चरित्र म्हणजे आपल्याला सहज उपलब्ध झालेली अमृताची पोयी आहे हे सांगायचा प्रयत्न गुरुचरित्रकार वारंवार करताना दिसतात.

तेराव्या अध्यायात गुरुचरित्रकार म्हणतात, 
एकदा न देखे तक्र स्वप्नी | 
त्यासी मिळे क्षीर बरणी || 

स्वप्नात ताक देखील न पाहिलेल्या मनुष्याला दुधाचा संचय मिळावा तशी आमची अवस्था आहे.

सतराव्यात काय म्हटलंय पहा, 
पर्जन्य येता पुढारा | 
जैसा येतो सुचिन्ह वारा | 
सद्गुरू कृपा दैन्यहरा | 
ऐके श्रीगुरुचरित्र ||
 
पाऊस येण्याअगोदर जसा थंड वारा सुटतो आणि आता थोड्याच वेळात पाऊस पडणार आहे हे सुचिन्ह दाखवितो तसे गुरुचरित्र म्हणजे आमच्या दैन्याच्या समारोपाचे चिन्ह आहे.

पंचविसाव्या अध्यायात गुरुचरित्रकार हे विचारणा करताना दिसतात,
ऐसा कृपाळू परमेश्वर | 
आपण झाला अवतार | 
येरी दिसतसे नर | 
तेचि अज्ञानी प्रत्यक्ष || २ ||

अहो या दत्त महाराजांना ओळखलंत का ? मनुष्य रूपाला तुम्ही भुलून जाऊ नका.

एकोणिसाव्यात अध्यायात गुरुचरित्र हे अमृत असल्याची ग्वाही दिली आहे,
अज्ञान तिमिर रजनीत | 
निजलो होतो मदोन्मत्त | 
गुरुचरित्र मज अमृत | 
प्राशन करविले दातारा |
|

खरोखर गुरुचरित्र हा अमृत ग्रंथ आहे, नित्य अध्याय वाचन या खेरीज या ग्रंथाचे कायम चिंतन, मनन केल्याने गुरुमहाराजांच्या अनेक लीला आजही अनुभवता येतात. थोरल्या महाराजांनी गुरुचरित्राच्या रोज पाच ओव्या तरी अवश्य वाचाव्यात हे सांगण्यामागे हा अमृतग्रंथ आहे हेच सांगायचा उद्देश आहे. 

गुरुचरित्र अँप
गुगल प्ले
वरून गुरुचरित्र अँप डाउनलोड करा