श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

जन्म: ज्ञात नाही, अक्कलकोट येथे अश्विन व ५ बुधवार १८५७ ला आले 
प्रकट दिन: चैत्र शु. २
आई/वडील: ज्ञात नाही
वेष: दिगंबर (अवधूत)
कार्यकाळ: १८५६ ते १८७८
संप्रदाय: दत्तासंप्रदाय, श्री दत्तांचे चतुर्थ अवतार
गुरु: ज्ञात नाही
समाधी: चैत्र व. १३, १८७८ अक्कलकोट येथे 
चरित्रग्रंथ: श्री स्वामी लिलामृत,  श्री गुरुलिलामृत
शिष्य: बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती, रामानंद बिडकर महाराज
खालील संतांवर विशेष प्रभाव: श्री साईबाबा, श्री गजानन महाराज शेगाव, सद्गुरू हरिबाबा  महाराज फलटण, शंकर महाराज

Swami Samarth
श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत. पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे १४व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना ‘पुन्हा-भेटेन’ असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे (कारंजा-वऱ्हाड) जन्मास आले. त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन १३७८ ते १४५८ हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इ. सन १४५७च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्यावेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते ‘चौथा अवतार’ मानले जातात. श्री दत्तसंप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, माणिकप्रभू, नारायण-महाराज जालवणकर, चिदंबर दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री स्वामी समर्थांनी स्वत:च ‘मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव ‘नृसिंहभान’ असे भक्तांना सांगितल्याने दत्तसंप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्रीदत्ताचे ‘चौथे अवतारित्व’ मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामीभक्त झाले. 

swamisamarth
श्री स्वामी महाराज

श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्रीस्वामी समर्थांचे मांडीवर लागून श्रीस्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे. श्रीस्वामी समर्थ तेथून श्रीकाशीक्षेत्री प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्रीस्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करीत. क्वचित गावात येत. गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ते श्रीस्वामी महाराज गावात आले की भोजन देत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्रीस्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून ‘श्री’ अक्कलकोट येथे आले त्या वेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. चोळाप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले. त्या वेळेपासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. चोळाप्पांचे घरातील मंडळी त्यांना ‘एक वेडा घरात आणून ठेवला आहे’ असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोक स्वामीदर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती झाली. श्रीस्वामी समर्थ राजवाडयात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांचा राजवाड्यातच चारचार दिवस मुक्काम असे. 

अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. (हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एस. टी. स्टॅंडसमोर आहे.) तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली. बालोन्मत्तपिशाच्चवृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. "आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन," असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे. शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते अजानुबाहू होते. 

swamisamarth
श्री स्वामी समर्थ

तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.

श्री स्वामी समर्थांच्या अवतारित्वाविषयीची हकिकत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी वर्णिली आहे ती अशी :-
अशा भागिरथीच्या तीरी । कर्दलीवना माझारी । स्वामी निजमानसांतरी । ते निर्विकारी चिंतिता ।। तपश्चर्च्या करिता करिता । तत्व येऊनिया हाता । प्राप्त झाली तदैक्यता । नुरले तत्वता देहभान ॥ ऐशापरी लोटता काळ । अंगावरी जाहले वारूळ ॥ दिव्य सतेज सोज्वळ । देह निर्मळ झालासे ॥ ऐसी स्थिती झाल्यावर । काय घडला प्रकार ॥ भावे ऐका सादर । सौख्यसार तो आहे ॥ लाकूडतोड्या एके दिनी । सहज आल त्याच वनी ॥ वृक्षावरी घाव घालुनी । डाहाळी झणी पाडिली ॥ डाहाळी पडताच सकळ । ढासळून गेले वारूळ । फार जुनाट मूर्ती सोज्वळ । बाहेर तत्काळ निघाली ॥ आजानुबाहू दिगंबर । फांके तपोदीप्ति सुंदर । जैसा पूर्णिमेचा निशाकार । सर्वसंचार आनंदवी ॥ (अ. स्वामी लीलामृत, अ.१, ओवी ६ ते १२)
श्रीनृसिंहसरस्वती ज्या कर्दलीवनात श्रीस्वामींचे अवतारित्व प्रकटले. ‘आपण कोठून आला?’ या प्रश्नाला उत्तर देताना श्रीस्वामींनी सांगितले, ‘प्रथम आम्ही कर्दलीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बांगलादेश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे आम्ही गोदातटाकास आलो. गोदावरीचे स्नान करून हिंडत-हिंडत हैद्राबादेस गेलो. तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथे जाऊन हिंडत मोहोळास आलो. तेथून सोलापुरास आलो. तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो तो इथेच आहे.’ (कै. ग.ब. मुळेकर लिखित श्री स्वामी महाराज चरित्र – पान ५) श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यात प्रकटले. याविषयीचा ऐतिहासिक संदर्भ चरित्रकारांनी नोंदविला आहे “शके सतराशे साठात । स्वामी जगदुद्धारार्थ । प्रकटले मंगळवेढ्यात । साक्षात दत्त अवतारे ॥” (अ.स्वा. ली.अ. १ ओवी १६) तेथून श्रीमाणिकप्रभूंच्या भेटीनंतर श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटास शके १७७९च्या आरंभीस आले. श्रीमंत मालोजीराजे त्यावेळेस नुकतेच राज्यपदारूढ झाले होते. त्यांची स्वामींच्या चरणी अपार श्रद्धा होती. श्री स्वामी समर्थांचे प्रकट वास्तव्य एकूण ४० वर्षे असून (शके १७६० ते शके १८००) त्यातली २१ वर्षे त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले. अक्कलकोट येथील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी दत्तसंप्रदाय बराच वाढविला.

असे पातकी दीन मी स्वामीराया । पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ।
नसे अन्य त्राता जगीं या दीनाला । समर्था तुझ्याविण प्रार्थू कुणाला ।

एकदा कलकत्त्याचे एक इंग्रज बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ त्यांच्या दर्शनास आले असता “आपण येथे कोठून आलात?” असा साहेबांनी भीत भीत त्यांस प्रश्न विचारला. तेव्हा स्वामींनी उत्तर दिले ते असे- “प्रथम आम्ही कर्दलीवनातून (हिमालय) निघालो. पुढे फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. (पुढे स्वामींनी गावांची व तीर्थक्षेत्रांची शेकडो नावे घेतली.) पुढे गोदातटाक हिंडत हिंडत दक्षिण हैद्राबादेस गेलो. तेथून मंगळवेढे, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर अशा गावी रहात रहात अक्कलकोटास आलो.”

“अक्कलसे खुदा पछानना” ह्या बोधवचनाची लोकांनी स्मृती रहावी म्हणूनकी काय स्वामी अक्कलकोटास येऊन प्रकट झाले, असा कोटीक्रम कोणी करतात व त्यास त्यांच्या चरित्रातील एका गोष्टीचा दाखला देतात. एकदा कोणी एक मोगलाईतील श्रेष्ठ दर्जाच्या सय्यदाने स्वामींच्या मठाशी येऊन “क्यों जी, ये अक्कलकोटके स्वामीं कहॉं है?” असे विचारले. तेव्हा त्यास स्वामींनी नेहमीच्या फटकळ भाषेत उत्तर केले ‘स्वामी बैठे… पर, स्वामी तो अक्कलकोटमें है, ह्या क्या देखता है?” या स्वामींच्या उत्तराने तो सैय्यद समजावयाचे ते समजून एकदम तटस्थ झाला! घटकाभर त्याची उभ्या उभ्याच समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले. त्यातून तो पूर्वस्थितीवर आल्यावर त्याने मुक्तकंठाने स्वामींचे स्तोत्र गायले व आजपर्यंत अनेक साधने केली; पण हा आनंदानुभव मिळाला नाही. अनेक अवलियांस यापूर्वीही पाहिले, पण आज साक्षात् खुदाचेच दर्शन झाले. “आरे उसी लिये अक्कलके अंदर हरदेमें साहेबकू सच्चा देख लिया, सब जनमका सार्थक हुआ, पलखमें दरया माफक हो गया. किस्मतकी बात हैं मैं आपका बंदा हूं.” इत्यादी धन्योद्गार काढले. यावरून श्रीगुरूंचे निवासस्थान अक्कलकोट किंवा प्रज्ञापुरी हेच योग्य असे स्वामींचे भक्त म्हणू लागले.

श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 

स्वामींचे  स्वरूप, स्वामी असे आहेत

स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिगम्य आहेत. ते स्वतःच म्हणाले, अकलसे खुदा पहचानो. निष्क्रिय व जुजबी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही. 

स्वामी अद्भुत आहेत. निर्बुद्ध व चंचल असणाऱ्याला स्वामींचे 'स्व'रूप व त्यांची विलक्षण कृपासत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार (अघटित लीला) कळणार नाहीत व अनुभवास येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतन सत्य आहेत. बाकी मायाभ्रम आहे. ते सर्वशक्तीमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी 'अवधूत' म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ॐकारातील पहिला स्वर 'अ'कार, म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत. स्वामींना कुळ, जात, धर्म, पंथ, सांप्रदाय नाही. त्यांची जात सर्व संतांप्रमाणे कळवळ्याची आहे स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे, अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर, अतर्क्य व अनुत्तम (सर्वोत्कृष्ट) आहेत. स्वामी तपोमय अजर यतिश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि ऋद्धी-सिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम क्रोधादी विकार नाहीत. तसे संकल्प आणि विकल्प नाहीत.ते सर्वसाक्षी आहेत. स्वामीच सर्व विश्वातील 'अर्थ', आनंद, प्रेम आणि 'सुख'रूप  आहेत. आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थाने स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म वअतिविराट वटवृक्षासारखे, वटवृक्षाच्या तळी व मुळात (दत्तनगर मूळ मूळ) आहेत. म्हणून साध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे. स्वामी निरालंबासनी आहेत. म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही. त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे उदायास्तापलीकडेचे आहे. ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरलेले आहेत. स्वामी सर्व जीवांचे (पापी किंवा पुण्यवान) सुहृद म्हणजेच जीवलग आहेत. जीवांच्या उद्धारासाठीच त्यांनी सदेह अवतार या मृत्युलोकात घेतलेला आहे. स्वामी अंतःसाक्षी (प्रत्येकाच्या हृदयात असणारा) व अनंत परमात्मा आहेत. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी अमुख्य आहेत. म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाही. ते निर्मोही, निरहंकारी, तुल्यनिंदा, स्तुतिमोंनी  व निर्विकारी 'साक्षी' आहेत. म्हणून ते म्हणायचे "मला नमस्कार करा किंवा करु नका. माझे नामस्मरण, पूजा करा किंवा करू नका, मी आहेच. स्वामी 'अहंभावहीनं प्रसन्नात्मभाव' असे आहेत. ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात. त्याच्या पापवृत्तीवर व संकटावर ते रागावतात व त्याची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात. स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी व पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत. स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तीरूप व्यक्त होतात. स्वामी त्रिविध तापहर (जन्म, जरा, मरण,- या अवस्थांतील यातना) आणि अधिभौतिक, आधिदैविक आणी आध्यात्मिक ताप हरण करणारे भक्तकाम कल्पद्रुम - भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहेत. स्वामी परमेश आहेत. इष्ट इति ईश्वर:- या सर्व विश्वाचे कल्याण, मंगल, सुखसमाधान केवळ स्वामी अत्युच्च कोटींची शक्ती आहे. बाकी सर्व भ्रम व माया आहे. या मायेच्या नादी लागल्याने (तिच्या मोहात पडल्याने) केवळ अकल्याण व दुःखच आहे. स्वामी संगविवर्जीत म्हणजे मोहमायेपासून दूर असल्याने संयमी (जागर्ति संयमी) असे आहेत. म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत. त्यांच्या दृष्प्रवृत्तीचे व्यवहार ते सहन करतात. (सुंदराबाईची मनमानी) सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरुपात धरून ठेवले आहे. तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचाच संहार होईल म्हणून स्वामी रागावत नाहीत, तर अपराधांना क्षमा करतात. म्हणून स्वामी म्हणाले, 'मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती.'

स्वामी भावविनिर्गत आहेत, म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. चित् आणि दिक् हेच ज्यांचे वस्त्र आहे, असे विराटरूपी ते चिन्मय-चैतन्यरूप आहेत. स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत. म्हणजे मायास्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत. त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वदासिद्ध आहेत. ते कृपासागर आहेत, ते कृतनाश, कृतांत, कृतलक्षण आहेत. सर्व कर्मे स्वामीच करतात. (उत्पत्ती, स्थिती, लय) स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती (श्रवण), स्मृती (स्मरण) यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत- 'कथित' आहेत. स्वामी चतुरात्मा आहेत. म्हणजेच ब्रम्हा, विष्णु, महेश व माया अशा चार स्वरुपात वावरणारे-मन चित्त, बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य, शुद्ध, मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहेत. म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले. स्वामी धि (बुद्धी) पती, श्री (लक्ष्मी) पती, पृथ्वीपती, यक्षपती व देवाधिपती (सर्व देवतांचे देव, सर्व सरकारांचे सरकार) आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीही सत्ता नाही. स्वामी हे विश्वातील तेज, प्रदीप्तमूर्ती आहेत. ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते, म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही.

अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्री स्वामी

अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू परंपरे नुसार घरातील सर्वाना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. कोनाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामी बरोबर श्रीपाद भटांसह सुमारे १०० सेवेकरी होते. त्या सर्वजणांना  चालून चालून खूप भूक लागली होती. थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला पाणी दिले. पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वाना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा. इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपादभटाना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले. तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपादभट।नी चौकशी केली  तेव्हा महिला म्हणाली, 'आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती.पण अजून ती आली नाहीत. आता सूर्यास्त होत आला. त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा' तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपादभटाना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासींनीस  आग्रह केला पण ती म्हणाली' तुम्ही  पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते.' श्रीपाद भटांनी सर्व सेवेकर्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशाप्रकारे स्वामी समार्थानीच  सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्याचे भाग्य (श्रीपाद भट यांचे सारखे एकनिष्ठ सेवक) ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले

अक्कलकोटास राहण्यास येण्याच्या पूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस स्वामी रहात असत. तेथे येणाऱ्या एका गुराख्याच्या पोराला तुझ्या गावात येऊ का? असे स्वामी विचारीत. दोन दिवस त्याने काहीच उत्तर दिले नाही. तिसरे दिवशी तो या म्हणाला तसे स्वामी गावात गेले. याप्रमाणे अक्कलकोटात श्रीगुरूंची ओळख प्रथम गुराख्याच्या मुलाशी झाली. अक्कलकोटास आल्यानंतरचेच स्वामींचे चरित्र उपलब्ध आहे. त्यापूर्वीचे विशेष उपलब्ध नाही. एकदा स्वामी अक्कलकोटास त्यांचे एक आद्य भक्त चिंतोपंत टोळ यांच्या घरी असता वसंतऋतूतील एका मध्यरात्री आंगणात पहुडलेले होते. तेव्हा स्वामींना गाण्याची लहर लागली. व “गोरे रूप तुझें तुजला पाहिलें सात ताल माडीवर ॥” ही जुनी लावणी स्वामींनी संबंध म्हटली, ती ऐकून पंतांना नवल वाटून ते म्हणाले, “महाराज, आपण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते. आपली जात कोण, आईबाप कोण?” स्वामींनी चटकन् उत्तर केले की, “आमची जात चांभार, आई महारीण व बाप महार आहे.” असे म्हणून महाराज पोट धरधरून मोठ्याने हसू लागले.

swami samarth
श्री स्वामी समर्थ

अक्कलकोटास एक म्हातारी सोनारीण वेडसर दिसे. पण तिला स्वामींची भाषा इतरांपेक्षा जास्त कळे. एकदा तिच्या देखत महाराजांस एका कलापाने प्रश्न विचारला, “स्वामीनु आपण कोण आहा?” त्यावेळी श्रीसमर्थ म्हणाले ‘मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर.’ हे ऐकून ती म्हातारी म्हणाली- “वटपत्र शयनी मूळ पुरुष दत्तात्रेय रूपाने अवतरले आहेत.” नंतर कोणी एक कर्वे यांनी विचारले, “हे महाराजांचे सत्यार्थरूपवचन आहे काय? परंतु आपली ज्ञाती कोण?” समर्थ म्हणाले- “आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचे नाव नृसिंहभान, काश्यप गोत्र, आमची मीन राशी; पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस! पण काय रे, तुझी फक्कड मुलगी पुण्यास रात्रंदिवस फिरते तिची ज्ञानी कोण?” हे ऐकून प्रश्न विचारणारा गृहस्थ ढेकळासारखा विरघळला! 

बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की, आपण स्वामींची इतकी सेवा केली, तरी महाराज अजून का प्रसन्न होत्त नाहीत? अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही? ह्याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही. सर्वांनाच दु:खे असतात. दु:ख-संकटे एकामागून-एक येतच राहिली, तर मन खट्टू होते. आपल्याच वाट्याला एवढी दु:खे का? इतके नामस्मरण केले, तरी महाराजांना आपली दया येतच नाही का? आणि निराशेने कधी-कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात, पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे, कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांचीही इच्छा हीच असते की, आपण प्रारब्धभोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे. आपले स्वामी तर इतके कनवालू-दयाळू आहेत की, ते दु:खातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात. जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही हेच स्वामी विद्यारण्यांच्या दृष्टांतातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. दु:ख-संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही ह्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते. म्हणूनच, 

श्री स्वामी-नाम नौका भवसागरी तराया ।
भ्रम-भोवऱ्यात अडली, नौका कधी ना बुडली ।
धरूनी सुकाणू हाती बसलेत स्वामीराया ॥

आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामीकृपाच! दुसरं काहीच नको ही एकच भावना अंत:करणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दु:खदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचीती येते आणि मग सुख-दु:खासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत. कारण स्वामी माउली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती! दाय म्हणजे देणारा-सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहे तो! फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माउलीवर! 

निवडुंगाच्या बनाजवळ आल्यावर बाकीची सर्व मंडळी थबकली. एकटा चोळप्पा मात्र कसलीही शंका मनात न घेता निर्भय होऊन निष्ठेने स्वामींच्या मागे चालत राहिला आणि काय आश्चर्य! एकही काटा चोळप्पाच्या पायात मोडला नाही. जणू काही ते काटे नव्हतेच फुलांचा गालिचाच अंथरला होता. स्वामी आपल्या परमभक्ताच्या निष्ठेची परीक्षा घेत असतात. प्रारब्धाने कितीही दु:ख संकटे आली तरी भक्तांची भगवंताच्या चरणांवर अढळ श्रद्धा आहे की नाही ते पहातात आणि एकदा का भक्त त्यांच्या परीक्षेला उतरला की स्वामींच्या कृपेला सीमाच राहात नाही. स्वामी अक्कलकोटास प्रगट होण्यापूर्वी त्यांस अनेकांनी अनेक ठिकाणी पाहिलेले असल्याचे आढळून आले. ते अक्कलकोटास येऊन राहिल्यावरही त्यांचा संचार एकाच वेळी अनेक ठिकाणी होत असे.

श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 

स्वामींची वृत्ती पाहिली तर ती श्रीनृसिंहसरस्वतींच्या वृत्तीपेक्षा पूर्वीच्या क्रमांकांत वर्णिलेल्या कित्येक दत्तावतरांशी अधिक जुळतेशी दिसते. चरित्रकार भागवत लिहितात, ‘महाराजांची वृत्ती फारच विलक्षण प्रकारची असे. त्यांच्या वृत्तीस कित्येक लोक पिशाचवृत्ती म्हणत. प्रात:काळ होण्याबरोबर नित्य नेमाने उठून संन्यासधर्मास योग्य असा प्रात:स्नानादिक जप, तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काहीएक करण्याचा नेम नसून स्वच्छंदाने व दुसऱ्याच्या हाताने सर्व कारभार होत असे. महाराजांस स्नान दुसऱ्याने घालावे, परंतु स्नान व्हावे असे त्यांच्या मर्जीस आल्यास. महाराजांस जेवण दुसऱ्यांनीच घालावे, परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागल्यास. महाराजांच्या अंगावर पांघरूण दुसऱ्यांनीच घालावे. परंतु ते अंगावर असावे असे त्यांस वाटल्यास. महाराजांनी मनाला वाटेल त्या ठिकाणी जावे, ती जागा मग राजाचा रंगमहाल असो, अगर स्मशानभूमी असो, वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो. महाराजांस प्रतिबंध करणारा कोणी नसे. महाराज चारील त्याच्या हातचे अन्न खात असत. परंतु महाराज अधर्मी होते, अशी कल्पनाही कोणास करवत नसे. महाराज कधी कधी दिवसातून दोन दोनदा स्नाने करीत. केशराच्या व चंदनाच्या उट्या अंगाला लावून घेत आणि आरती करून घेत. कधी कधी आठ आठ दिवस स्नानच करीत नसत. कोणास न कळत एखाद्या बागेत अगर स्मशानात अगर जंगलात जाऊन रहात. महाराज चालू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाच्यानेही चालवत नसे. ते बोलू लागले म्हणजे एकसारखे काहीतरी बोलत असत. हुक्का ओढू लागले, म्हणजे एकसारखा हुक्काच ओढीत बसत. लहान मुलांजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळच चालावा. एखादे वेळी स्वारी रागावली, म्हणजे सात सात दिवस त्यांचा रागच हालू नये. आनंदात स्वारी असली, म्हणजे सर्वांजवळ मधुर वाणीने बोलावे. अशा प्रकारची महाराजांची दर घटकेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या पारख्यावाचून कोणालाच झाली नाही.’ नामाला कसलीही उपाधी नाही; काळवेळ नाही, लहानथोर नाही. कृपा व्हावी, अपेक्षापूर्ती व्हावी या संकल्पाने जरी नामाची सुरूवात झाली तरी हरकत नाही. नाम आपले काम करतेच. नामाच्याच प्रभावाने हळुहळू ते नाम आपल्या ह्र्दय महाराजांसाठीच घेतले जाऊ लागते आणि स्वामीनामावर आपले प्रेम कधी जडले ते आपले आपल्यालाच कळत नाही. कारण ही किमयादेखील स्वामीच करतात. हा नामाचा प्रभाव आपल्या नकळत आपल्याच अंत:करणावर होतो. 

नामाचेही असेच आहे. ज्याप्रमाणे ताकातच लोणी लपलेले असते पण त्यासाठी ते सतत घुसळावे लागते. तद्वत् नामातच नामाचे प्रेम दडलेले आहे. सातत्याने आणि भावपूर्ण अंत:करणाने आपण जर नामाचा अभ्यास केला की नामाचे प्रेम आपोआप येते. प्रपचात जसे अभ्यास, कर्म, कर्तव्य ह्यांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व परमार्थात नामस्मरणाला आहे. प्रपंच स्वामींचाच म्हणून प्रेमाने करावा म्हणजे तो छान होतो आणि तितक्याच प्रेमाने तो करताना वाचेने अक्षय-अव्याहत गोड स्वामीनाम घ्यावे. एकदा का आपण स्वामींचे होऊन स्वामीनामात दंग झालो की नाम आपले काम करतेच करते! आणि त्याच्या प्रभावाच्या सुंदर खुणा अनुभूतीच्या रूपाने आपल्या अंत:करणात उमटतात. महाराजच आपल्या नकळत ह्र्दयासनावर येऊन बसतात. ते आपला योगक्षेम तर पहातातच त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात, संकटात-दु:खात आपली काळजी घेऊन ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ ह्या आश्वासनाची प्रचीती देतात. आपल्यावर कृपा करतात आणि आपल्याजवळच असल्याची खुणगाठ ‘नामावताराने’ देतात. एक महान ग्रंथ म्हणजे ‘श्रीगुरुलीलामृत’. श्री स्वामीसमर्थ, अक्कलकोट स्वामींच्या सर्व भक्तांना ज्ञात असलेला असा हा सोपा, सुबोध ग्रंथ आहे. या ग्रंथात वामनबुवा वैद्य यांनी अनेक ‘लीला’ वर्णिल्या आहेत. त्यात चमत्कार कथांचाही समावेश आहे. वचनबोध पाहताना चमत्कार कथांचा फारसा उल्लेख केलेला नाही. कारण हे चमत्कार सिद्ध पुरुषांचे असले तरी ते ज्याचे त्याला उपकारक असतात. मात्र एक प्रसंग इथे मुद्दाम उल्लेखिला आहे. त्यात व्यापक स्वरूपात प्रापंचिक माणूस आणि सद्गुरूकृपा यांच्या समन्वयाचे एक रूपक दडले असल्याने त्याविषयीची प्रतिकात्मकता इथे स्पष्ट केली आहे. प्रसंग असा आहे की, मुंबई-ठाण्याकडील राहणारा एक लक्ष्मण नावाचा कोळी होता. तो खलाशी होता. त्याचा व्यापारही फार मोठ्या प्रमाणावर होता. समुद्रातून जहाज / आगबोट याद्वारे तो व्यापार करीत असे. एकदा जहाजात पुष्कळ मालही भरलेला होता आणि त्याचबरोबर काही प्रवासीही होते. वाटेत मोठे वादळ सुटले आणि जहाज समुद्रात बुडू लागले. लक्ष्मण कोळी खरेतर मोठा धैर्यवान होता. पण तो घाबरला. डोळ्यातून पाणी वाहू लागले. प्रसंग तर मोठा दुर्दैवी ओढवला होता. 

‘दैववशात त्यासि झाले स्मरण । श्रीमद्ददत्तत्रेय – स्वामीस अनन्य शरण । होऊनि म्हणे त्रैलोक्यात तारण । आपणाविण नसेचि ॥ नवस केले देवाधिदेवी । करू लागला योगीश्वरांचा धावा । वदे गुरू मायबापा धावा हो धावा । पावा मज संकटी ॥ त्याच काळी अक्कलकोटात । प्रिय भक्त चोळाप्पाचे सदनी स्थित । आनंए खेळत असता अवधूत । एकाएकी गडबडून उठले ॥ त्वरेने उजवा हात खाली घालून । आवेशाने ‘हुं-हुं-हुं’ ऐसे म्हणून । तात्काळ दिधले उचलून । आश्चर्य जन पाहाता ते ॥ जैसें हनुमंते पृथ्वीत घालून कर । द्रोणागिरी उचलिला सत्वर । तैसे दत्तात्रेय स्वामींनी अभयकर । त्वरे उचलिलि जहाजे तदा ॥’ (अ. ४१ ओवीबंध २४ ते २८)
जहाज तरले. लोकही वाचले. पुढे आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी अक्कलकोटला आला. स्वामी समर्थांना त्यांनी साष्टांग दंडवत घातले. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन तो आपल्या गावी परतला. आता त्यातले रूपक पाहू : तुम्ही-आम्ही सर्वजण प्रापंचिक आहोत. लक्ष्मण कोळीप्रमाणेच या भवसागरात आपली देहनौका हाकीत आहोत. कधीकधी दु:ख – संकटे – प्रतिकूलता यांच्या वादळ-वाऱ्यात आपली देहनौका सापडते. मन वैतागते. बुद्धी डळमळीत होते. अशावेळी आपण काय करतो ? तर उपासनेचे जे दैवत असेल, वा सद्गुरू असतील, त्यांना आर्तपणाने हाक मारतो. साद घालतो. त्यावेळी भक्ताचा धावा ऐकून देव त्याच्या साहाय्यासाठी धावून येतो. अशा वेळी प्रत्यक्ष देव धावून येतो. म्हणजे काय? तर, कुणाच्या ना कुणाच्या रूपात येऊन तो आपल्याला संकटातून सोडवितो. संसारिकाला ही देवकृपा म्हणा वा सद्गुरूकृपा म्हणा, साहाय्य करते. अशावेळी आपण मनोमन देवाचे / सद्गुरूंचे ऋण मान्य करतो. त्यांचे ऋण फेडण्यासाठी वा उतराई होण्यासाठी त्यांच्या दर्शनार्थ जातो. सेवा म्हणून तन-मन-धन अर्पण करतो. लक्ष्मण कोळ्याने शतरौप्यमुद्रा, वस्त्रालंकार, फळे या स्वरूपात श्रीस्वामी समर्थांच्या पायी अर्पण करून ऋण मान्य केले व ते अंशत: का होईना फेडण्याचा प्रयत्न केला. यात धन, वस्त्रे, फळे यांचे महत्त्व नाही. अर्पण भाव महत्त्वाचा आहे. आपणही आपल्यापरीने पूजा-नैवेद्य-प्रसाद या स्वरूपात देवाचे / सद्गुरूंचे ऋण मान्य करून उतराई होण्याचा प्रयत्न करतो. प्रपंच म्हटला की, त्यात सुख-दु:ख आलेच, त्यातही ‘सुख जवा एवढे । दु:ख पर्वताएवढे’ हा बहुतेकांचा अनुभव आहे. मग अशा दु:खप्रसंगी व संकटप्रसंगी आपण त्यांचे निवारण व्हावे म्हणून कुलदेवतेला व गुरूदेवतेला नवस बोलतो पण नवस बोलला असेल, तर आपण दु:ख-संकटांचा परिहार झाल्यावर तो लक्षात ठेवून अगदी कटाक्षाने फेडला पाहिजे. अन्यथा त्याची ‘आठवण’ घडेल अशाप्रकारची ‘प्रतिकूल परिस्थिती’ निर्माण होते. म्हणून बोललेला नवस हा फेडलाच पाहिजे असेही स्वामी समर्थांचे सांगणे आहे. देवदर्शन घडण्यासाठी सद्गुरूंची कृपा कार्यास येते परंतु त्याच्यासाठी आचार, विचारांची शुद्धता अपेक्षित आहे.  

श्री स्वामींनी आपल्या एकूण प्रकट वास्तव्यातील ४० पैकी २१ वर्षे अक्कलकोट येथे घालवली. शके १८०० मध्ये त्यांनी वडाखाली देहत्याग केला व ते निजानंदी निमग्न झाले. देहत्यागापूर्वी एक वर्ष अगोदरपासूनच त्यांनी आपल्या अवतार समाप्तीची चर्चा भक्तमंडळीत सुरू केली होती. अवतारसमाप्तीचे आधी आठ दिवस त्यांनी ‘अखंड नाम-भजन’ सुरू ठेवले. देहप्रकृती ही नाशवंत असल्याने पुढे त्यांना ज्वर भरला. त्यांनी अन्नत्यागही केला. नंतर मंगलस्नान करून ते ध्यानमग्न झाले. त्यावेळी भक्तांनी त्यांना विचारले की, आपण बरे केव्हा व्हाल? तेव्हा स्वामी उत्तरले,

“जेव्हा पंढरी जळेल । अथवा डोंगर बोलतील । तेव्हाच आराम पडेल । दु:ख विव्हळ का होता”
म्हणजेच देहसमप्तीनंतर त्यांचे जगतोद्धाराचे कार्य आणखी अनेक वर्षे चालू राहणार आहे. भक्तांची समजूत घालून श्रीस्वामींनी त्यांना दु:खी कष्टी होऊ नका असे सांगितले व गीतेतील श्लोकांचा उच्चार केला.

‘अनन्याश्चिंतयंतो मां ये जन: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्’
अनन्यभावाने शरण येऊन जो माझी भक्ती करतो, नामस्मरणात्मक भक्तियोग आचरितो त्याचा योगक्षेम मी चालवेन, असे अभिवचन स्वामींनी आपल्या भक्तास दिले आहे. हा श्लोक म्हणत त्यांनी ध्यानमग्न अवस्थेतच आपल्या देहाचा त्याग केला. त्या दिवशी मंगळवार, चैत्र वद्य त्रयोदशी ही तिथी होती. 

श्री स्वामींनी जो उपदेश केला त्यात नामस्मरणाला सर्वाधिक महत्त्व दिले. अनन्यभावाने माझी सेवा कर, मी तुझा योगक्षेम चालवेन या गीतोक्ती पुनरुच्चार करून स्वामींनी नामस्मरणाची अखंड माळ (नामजप, नामतप, नामयोग) भक्ती चालू ठेवावी हाच महाबोध सांगितला आहे. स्मरणसातत्यातच अस्तित्वाची प्रचिती असते. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ हे त्यांचे आश्वासनही नामजप करताक्षणी तुझ्या सन्मुख आहे हेच भक्तितत्त्व सांगते. ‘वडाच्या पारंब्या तुम्ही धरून बसा’ हे त्यांनी का बरे सांगितले असावे? तर या सांगण्यातील मथितार्थ असा की, वड हे अखंडत्वाचे प्रतीक आहे. हे झाड वाढते, मोठे होते, विस्तारते. त्यास अनेक पारंब्या फुटतात. त्या पुन्हा जमिनीत रुजतात. त्याचा पुन्हा वृक्ष होतो. ही अखंडत्वाची खूण श्री स्वामींनी सांगितली असावी. सद्गुरूंकडून नामोपदेश मिळून सबीज/दिव्य/संजीवन अशा नामाचे बीज साधकाच्या अंत:करणात रुजते. ते वाढते. विस्तारते. ते नामोच्चाराच्या सातत्याने!! 

श्रीस्वामी समर्थांची हळुहळु सर्व भारतभर कीर्ती पसरली व नाना धर्माचे अशिक्षित, सुशिक्षित लोक स्वामीदर्शनास अक्कलकोट येथे येऊ लागले. ह्यांत जिज्ञासू, अतिथी तसेच श्रीस्वामी यांची परीक्षा पहाणारेही लोक येत. श्रीस्वामींचेकडून प्रत्येकास त्याचे अचूक उत्तर मिळे. निरनिराळ्या भाविक लोकांबरोबर श्रीस्वामी त्यांचे भाषेत बोलत व जिज्ञासूंचे समाधान करीत. 

श्रीस्वामी समर्थांच्या येणाऱ्या भक्तांत परमार्थमार्गात उन्नती करून घेण्यासाठी येणारे भक्त फार थोडे. श्रीहरिभाऊ (स्वामी सुत) हे श्रीस्वामींचे भक्त. त्यांनी प्रथमभेटीतच श्रीस्वामी समर्थांचे जवळ येण्याकरिता मुंबईस आपला संसार आवरता घेतला. स्वत: चक्रपाणी व त्यांच्या सौ. वैराग्यसंपन्नावस्थेत घराबाहेर पडले. त्यांनी चांदीच्या पादुका तयार करून श्रीस्वामी समर्थांचा प्रसाद म्हणून कामठीपुरा (मुंबई) येथे मठ स्थापन केला. श्री स्वामीसुतांनी श्री स्वामी चरित्रावर काव्य केले आहे. श्री स्वामीसुत हे श्री स्वामींचे देखत पंचतत्त्वात विलीन झाले. ती तिथी श्रावण वद्य १ होती. 

श्री बाळाप्पा महाराज 

श्री स्वामी महाराजांचे थोर भक्त श्री बाळप्पा महाराज. ते धारवाड जिल्ह्यातील हवेरी या गावचे राहणारे. घरी सावकारी, व्यापार वगैरे उत्तम परिस्थितीत चालले होते. एके दिवशी बाळप्पांचे मनात वैराग्य उत्पन्न झाले व सद्गुरू कोठे भेटेल व मार्गदर्शन करील ही आत्यंतिक तळमळ लागली. त्यावेळी त्यांचे वय तीस वर्षांचे. ते श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आले. त्यांनी तेथे दोन महिने कडक अनुष्ठान केले. दोन महिन्यानंतर त्यांना दृष्टान्त झाला. ‘तू अक्कलकोट येथे जाऊन स्वामीसेवा करावी.’ आज्ञेप्रमाणे ते अक्कलकोटला आले. त्यांना पाहताच श्री स्वामींना साताजन्माची ओळख असल्याप्रमाणे अत्यंत आनंद झाला व जिवाशिवाची ओळख पटली. श्री बाळप्पा महाराज यांनी श्री स्वामीसेवा एकनिष्ठपणे केली. साधकावस्थेत त्यांच्या दैवी सामर्थ्याची प्रचिती येई. श्री स्वामी समर्थांचे निर्वाणानंतर ते ३२ वर्षे हयात होते. 

श्री वामनबुवा वामोरीकर वैद्य व नृसिंहसरस्वती 

श्री वामनबुवा वामोरीकर श्री स्वामींचे एकनिष्ठ शिष्य. श्रीगुरुआज्ञा प्रमाण मानणारे ‘श्री गुरुलीलामृत’ हा महाराजांचे जीवनावर चरित्रपर ग्रंथ श्री वामनबुवांनी लिहिला. श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज आळंदी हे थोर संत योगप्रक्रिया समजून घेण्यासाठी अक्कलकोटात श्री स्वामींकडे आले. श्री स्वामींनी त्यांचे मनातील भाव जाणून समाधी लावली व त्यांना योग प्रक्रिया समजावली. श्री माटेबुवा, श्री स्वामी समर्थांची कीर्तन करून सेवा करीत. एके दिवशी कीर्तनप्रसंगी श्री माटे म्हणाले ह्या भवसागरातून आम्हाला कोणते चरण पार करतील? एवढे म्हणताच श्री स्वामी समर्थांनी आपले चरण पुढे केले. माटेबुवांचे लक्षात आले की, हे चरण आपणास उद्धरतील व त्यांनी कीर्तनात श्री स्वामी समर्थांचे पाय घट्ट धरले. 

श्री वासुदेव बळवंत फडके

प्रसिद्ध क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके हे स्वामी महाराजांचे दर्शनास आले, त्यावेळी आपली तलवार श्री स्वामी समर्थांपुढे ठेवली व श्री स्वामींचे हातातून ती प्रसाद म्हणून मिळावी अशी इच्छा धरून बसले. श्री स्वामी महाराजांनी ती तलवार झाडावर टांगून ठेवण्यास सांगितली व असे सूचित केले की, तू करीत असलेले कार्यात यश येणार नाही. श्री वासुदेव बळवंतांनी ती तलवार घेतली. स्वामींना नमन करून गेले. पुढे त्यांनी बंड केले पण ते विफळ झाले.

श्री स्वामींचा नित्यक्रम असा असे. भल्या पहाटे श्री स्वामी महाराजांना भक्त मंडळी स्नान घालीत. नंतर संध्या वगैरे. श्री स्वामी समर्थ फक्त दोन आचमने घेत. नंतर त्यांना लंगोटी नेसवावी लागे. थोडा फराळ घेऊन त्यांना भक्तांचे दर्शनाकरिता बसवीत. श्री स्वामी समर्थ सर्व दर्शनच्छूंच्या मनातील कामना ओळखून त्यांच्या इच्छा पूर्ण करीत. श्री स्वामींची कीर्ती सर्व भारतभर पसरली व बडोदे, इंदोर, ग्वाल्हेर येथील संस्थानिक अक्कलकोट येथे दर्शनास येत. सरदार विंचुरकर आदी सरदार दर्शनास येत. ते स्वामींचे भक्त झाले. श्री स्वामी समर्थांचे समकालीन अवतारी पुरुष, सकलमतस्थापित श्री माणिक प्रभू महाराज, (हुमणाबाद) श्री नरसिंह सरस्वती (आळंदी), श्री जंगली महाराज (पुणे), श्री बीडकर महाराज हे श्री स्वामी समर्थांचे शिष्य. त्यांनी तीन वेळा नर्मदाप्रदक्षिणा केली होती. त्या वेळी जंगलातून जात असता त्यांना सिंहाची डरकाळी ऐकू आली, तोच सिंह त्यांचेसमोर उभा. श्री बिडकर महाराजांना स्वामींनी त्या रूपात दर्शन दिले. त्यांची भीती नष्ट झाली. श्री बीडकर महाराज अक्कलकोट येथे गेले असता श्री स्वामी समर्थांनी त्यांचेजवळ ते करीत असलेल्या किमयेची दक्षिणा मागितली. श्री बिडकर महाराजांना तांब्यापासून सोने करण्याची किमया अवगत होती. त्यांनी आनंदाने सदर किमयेचे उदक श्रीस्वामी समर्थांचे हातावर सोडले. व किमया करणे बंद केले. फाल्गुन व. १० रोजी या स्वामीभक्ताने देह ठेविला. 

श्री सोमनाथापासून श्री जगन्नाथापर्यंत, तसेच विश्वेश्वरापासून रामेश्वरापर्यंत अक्षरश: अगणित स्त्री-पुरुषांना श्री स्वामींनी आकर्षित करून घेतले. त्यांचेवर निरपवाद कृपावर्षाव केला. त्यांचे कुसुमकोमल अंत:करणात जीवमात्राविषयी अलोट प्रेम वसत असे. पढिक पंडितांचा अभिमान दूर करून, त्यांच्या विद्यारूप चंदनाभोवती पडलेला अहंकार-सर्प-विळखा दूर केला. शास्त्रअभ्यास व वेदविद्येचा पुरस्कार केला. 

शास्त्रसंपन्न पंडितांपासून अक्षरशत्रू बसाप्पापर्यंत, राजाधिराजापासून भाग्यहीनापर्यंत, वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणापासून अंत्यजापर्यंत सात्त्विक, सदाचारसंपन्न सतीपासून ते दुराचारी वेश्यापर्यंत प्रतिदिनी असंख्य जीवात्मे स्वामी समर्थांकडे येत. कोणी शुद्धभावनेने, कोणी निष्काम सेवेसाठी, कोणी कामनापूर्तीसाठी, कोणी परीक्षा पाहण्यासाठी वा निंदानालस्ती करण्यासाठी. श्री स्वामी समर्थांनी आलेल्या व्यक्तींचा कधीही कंटाळा केला नाही. उलट सान्निध्यात आलेल्या प्रत्येकास आयुष्यभर जतन करावा वाटेल असा अनुभवाचा अमोल ठेवा प्राप्त करून देऊन त्यांची मने श्री ईश्वरसेवेकडे वळविली. श्री. केळकर यांनी चिपळूण येथील स्वामीमठ स्वामी-आज्ञेप्रमाणे स्थापन केला. श्री. केळकर हे रेल्वेत नोकरी करीत असता त्यांना जलोदर नावाची रोगबाधा झाली. त्यांनी ताबडतोब नोकरीचा राजीनामा देऊन श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे श्री स्वामीसमर्थांचे सेवेत उर्वरित आयुष्य व्यतीत करावयाचे ठरवून श्रीसेवेत गुंग झाले. त्यांची उदरव्यथा नष्ट झाली. 

नित्य घडणारे चमत्कार त्यांनी जमा करून श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ‘बखर’ तयार केली. श्री स्वामी समर्थांनी श्री. केळकर यास आपल्या पादुका घेऊन चिपळूण येथे स्वामीमठ स्थापन करण्यास सुचविले. त्या ठिकाणी त्यांचे वंशज त्याचप्रमाणे सेवा करीत आहेत. 

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, चिपळूण, गोवा, वेंगुर्ला; गुजरातेत बडोदा, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणी श्री स्वामी मठ स्थापन झाले आहेत. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे निर्वाण होण्यापूर्वी बुधवार पेठ, येथे श्री स्वामी समर्थ समाधीची जागा श्री चोळप्पांनी तयार केली. ती त्यांनी समर्थांना दाखविली. श्री चोळाप्पा हे श्री स्वामी समर्थांचे निर्वाणाआधी श्री स्वामीचरणी लीन झाले. 

श्री स्वामी वटवृक्षाखाली नेहमी बसत असत. ह्यांचे जागी श्री स्वामी समर्थ शके १८०० बहुधान्य नाम संवत्सर चैत्र व. १३ दुपारी ३-३॥ चे सुमारास लौकिक दृष्ट्या पंचत्वात विलीन झाले. 

श्रद्धेच्या वाढीसाठी - श्री स्वामींचे संपूर्ण जीवन सिद्धपुरुषाचे असल्याने त्यांचे चरित्र म्हणजे अनुभव-कथा होत. हे सर्व अनुभव अनेकविध चमत्कारांनी भरलेले आहेत. सिद्धपुरुष ‘प्रेरणा’ देतात आणि ‘कार्य’ करून घेऊन ‘सिद्धीस’ नेतात. श्री स्वामींच्या अनेक चरित्रकारांनी ही चमत्कारांची ‘अनुभव-गाथा’ अत्यंत रसाळपणाने, प्रेमाने आणि अपार श्रद्धेतून गुंफली आहे. श्रीवटवृक्षांच्या पारंब्या जशा विस्तारतात नि त्या पुन्हा जमिनीत रुजून नवा वृक्ष त्यातून साकारतो. तशा या अनुभव-कथा आहेत. त्या श्रींच्या प्रेरणेतून प्रचीतीस येतात आणि त्या प्रचीतिरूपाचे स्वरूप म्हणजे ‘चमत्कार! पण चमत्कार म्हणजे परमार्थ नव्हे!’ हे अनेक साक्षात्कारी संत नि सत्पुरुषांनी सांगितले आहे आणि खरेही आहे. मग अशा चमत्कारांचा अन्वयार्थ कोणता? असा प्रश्न मनात उभा राहतो. त्याचा एकूणार्थ एवढाच की, हे चमत्कार श्रीकृपेने होतात हे तर सत्य आहेच, पण या चमत्कारामागे भक्तांची श्रद्धा वाढावी, ती दृढ व्हावी, त्यांना आनंदप्राप्ती व्हावी हाच त्यामागे हेतू असतो. श्री स्वामी समर्थांच्या अनेक चमत्कार कथांतून त्यांचे विषयीची श्रद्धा दृढावते आणि नामघोष सातत्य पुन:पुन्हा भक्तांच्या अंत:करणात ठसत जाते. तिथेच श्रीस्वामींचे अस्तित्व असल्याची खूण मनोमन पटते. 

स्वामी समर्थांनी स्वत:च्या सगुण देहाची कुंडली करण्याची आज्ञा श्री. नानाजी बापूजी रेखी (पिंगला) ज्योतिषी यांना केली व त्यांच्या हातावर हात ठेवून स्वहस्ते गंधाक्षता व तुळशीपत्रासह ती कुंडली नानाजींना दिली. त्यावेळी श्री रेखी यांच्या उजव्या हातावर विष्णुपद (आत्मलिंग) प्रसाद म्हणून उमटले. या कुंडलीत महत्त्वाचा उल्लेख म्हणजे धरणी दुभंग होऊन आठ वर्षाची बालमूर्ती हस्तिनापुरापासून १२ कोस दूर असलेल्या छेली खेडेगावात वडाखाली गणपतीच्या मूर्तीजवळ प्रगटली निराकार निर्गुण परब्रह्म (विश्वचैतन्य) देह धारण करून सगुणात येते व अवतार अवतार कार्य संपल्यावर पुन्हा निर्गुणात जाते. हा ईश्वर ज्या सगुण देहात प्रगट होतो त्या देहाची व जन्मकाळाची वैशिष्ट्ये त्यांचा कुंडलीत आढळतात. ही वैशिष्ट्ये स्वामींनीच मान्य केलेल्या व दिलेल्या पत्रिकेत आढळतात. 

स्वामी समर्थ ही विश्वशक्ती जेव्हा सगुणाकार देहात प्रगट झाली तेव्हाची वेळ व देहाची वैशिष्ट्ये विशेष आहेत. ती स्वामींनीच मान्य केलेल्या कुंडलीत प्रगट झालेली आहेत. जन्मकाल बहुधान्य संवत्सराचा (वैभवाचा) आहे. अश्विनी (सूर्यपत्नी) नक्षत्रावर चरणप्रीतीचा (ईश्वराचे चरणी भक्ती करण्याचे संस्कार होण्याचा) योग आहे. चैत्र मासातील द्वितीयेचा प्रहर आहे. आद्य पुरुषाचे स्पंदन-स्फुरण दाखवणारी नाडी आहे, देवगण आहे, ज्ञान यज्ञात चिंतनाच्या समाधीचे हवन करणारे ते यजुर्वेदी ब्राह्मण व नारसिंही चैतन्य स्वामी आहेत. राशी स्वामी मंगळ आहे. 

तात्पर्य, महाराजांच्या ठिकाणी सारी द्वद्वे सामावलेली दिसत. ते कधी मसणवटीत, तर कधी खासबागेत, कधी महारवाड्यात तर कधी राजवाड्यात, कधी निवडुंगाच्या काट्यांवर, तर कधी पलंगावर, कधी मंदिरात, तर कधी मठात, यांप्रमाणे सारख्याच भावनेने वावरत असत. “सहज स्वारी बाहेर निघाली की, सर्व राजचिन्हांनी मंडित दिसावी. छत्रचामरे, पालख्या, म्याने, घोडे, गाड्या, गाई, म्हशी इत्यादी खिल्लारे, तंबू, कनाती, नगारखाने, वाजंत्री, रणवाद्ये व सेवेकरी व यात्रेकरी लोकांच्या फलटणी, त्याचप्रमाणे पुराणिक, हरिदास, गवय्ये, कलावंतिणी, तमासगीर, नाटकवाले त्याप्रमाणे फुलवाले, फुलारी, मिठाईवाले व सर्व प्रकारचे दुकानदार बरोबर आहेतच. मग महाराज एखादे वेळी जंगलात का वस्तीला जात ना, बरोबर हा इतका सरंजाम असावयाचाच.” अशा या लोकोत्तर पुरुषाची खरी योग्यता जाणण्यास अंगी तशीच पात्रता पाहिजे. एरव्ही लक्षावधी लोक स्वामींच्या दर्शनास येत असत. हिंदुस्थानाच्या चारी टोकांकडील व साऱ्या धर्मांतील लोक स्वामींच्या दर्शनास येत असत. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले असे संस्थानिक त्यांच्या भजनी होते. युरोपियन बंडगार्डन, पारशी नवरोजी शेट, मुसलमान सय्यद आणि अहमदअल्ली रिसालदार, त्याचप्रमाणे जैन, लिंगायत, वैष्णव, वारकरी, संन्यासी, सुधारक, सनातनी, शास्त्री, हरिदास अशा अनेकांनी त्यांच्या पायी आपले मस्तक नमविले. वारंवार होणाऱ्या चमत्कारांनी महाराज सर्वज्ञ आहेत व ते सर्वशक्तिमान आहेत, अशीही आर्त जीवांची खात्री झाली. आपद्ग्रस्त लोकांनी तर त्यांची पाठ पुरविली व आपआपली संकटे निवारण करून घेतली. पण हे जरी सारी घडले तरी त्यांची खरी पारख फारच थोड्यांना झाली असेल असेच त्यांचे चरित्रकार म्हणतात. 

एकीकडे त्यांच्या सेवेत तत्पर असलेले चोळाप्पा आणि बाळाप्पा, सुंदराबाई आणि काकुबाई, मालोजी आणि दादाजी भोसले, सबनीसबाबा आणि मराठेबाबा, बाळकृष्ण आणि कृष्णाप्पा, टोळ आणि कानफाटे, तसेच एकीकडे स्वामींच्या सर्वज्ञतेची अंतरी चुणूक मिळाल्यामुळे हतगर्व झालेले माटेबुवा आणि विष्णुबुवा (ब्रह्मचारी), रामशास्त्री आणि माधवशास्त्री. त्यांनी स्वामींचे अनेक चमत्कार पाहिल्यामुळे त्यांना सर्वज्ञ दत्तावतार असेही त्यांनी मानले असेल. पण त्यांची खरी योग्यता ज्यांनी जाणली ते आळंदीचे नृसिंहसरस्वती व यशवंतराव भोसेकर देवमामलेदार, मंगळवेढ्याचे बाळकृष्णबोवा आणि हुमनाबादचे माणिकप्रभू, असे संतच खरे होते. 

श्री स्वामी समर्थ  चरित्राचे  विहंगावलोकन व उपदेशाचे सार

आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतराजीत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळीवनातीलनिबिड अरण्यात, एकांतस्थळी एक महात्मा काष्ठ समाधीत निमग्न होता. शरीरावर लता, वेली, झुडपे, वारूळही उगवू लागली. एकेदिवशी एका लाकूडतोड्याने वारूळावरीलवेलीवर लाकडे तोडताना घाव घातला. तो घाव वारूळ फोडून त्या समाधीस्त योग्याच्या मांडीवर बसला. त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली. लाकूडतोड्या भयभीत झाला. इतक्यात त्या योग्याची समाधी भंग पावली. ते देहभानावर आले. लाकूडतोड्यास अभयदान दिले. तपस्या संपवून इथूनच श्री स्वामी समर्थ विश्वकल्याणासाठी तेथून बाहेर पडले. हेच ते चौथे दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामीसमर्थ होत. स्वामींचा जन्म कधी झाला, कोठे झाला, याची ना कुठे नोंदआढळते, ना स्वामींच्याबोलण्यातून कधी त्याचा उलगडा झाला. म्हणूनच त्यांचा प्रगटदिन साजरा केला जातो.

श्रीशैल्य पर्वतराजीतून बाहेर पडून श्री स्वामी समर्थांनी कोणकोणत्यास्थानांना भेटी दिल्या, हे इतिहासाला ज्ञात नाही. परंतु स्वामींच्या कथनातूनवेळोवेळी जी माहिती झाली त्यातून काही आडाखे बांधता येतात. ते सर्वप्रथम काशीक्षेत्री आले. त्यानंतर आसेतुहिमाचल विविध तीर्थक्षेत्रांतून त्यांनी भ्रमण केले. ज्ञात इतिहासाप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रथम सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढे येथे प्रकट झाले. त्यानंतर पंढरपूर, मोहोळ, सोलापूर असेकरीत अक्कलकोटला आले. स्वामींनी अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली दीर्घकाळवास्तव्य केले, म्हणून त्यांना वटवृक्ष स्वामी म्हणून संबोधले जाते.

चैत्र वद्य १३, मंगळवार, बहुधान्यनाम संवत्सर शके १८०० इ.स १८७८ यादिवशी सायंकाळीचारच्या सुमाराला श्रीस्वामी महाराज निजानंदी विलीन झाले. श्री स्वामींनी शिप्य श्री बाळप्पा महाराजांवर अनुग्रह केला. त्यांनीआपल्या चिन्मयपादुका व इतर प्रासादिक चिन्हे देऊन, अक्कलकोटला मठ स्थापन केले. बाळप्पांनामंत्रदीक्षा देऊन त्यांना त्रयोदशाक्षरी महामूलमंत्राचा उपदेश केला. स्वामीभक्तीचा प्रचार करण्याची आज्ञा दिली. बाळप्पा महाराजांनी स्वामींच्याआज्ञेनुसार अक्कलकोटला मठ बांधून दत्तात्रेय गुरुपीठाची स्थापना केली. गुरूदत्तात्रेयांच्या परंपरेतील भगवान अवधूत दत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती (गाणगापूर) आणि श्री स्वामी समर्थ अशी श्रेष्ठ गुरुपरंपराअवधूत पीठास लाभली आहे. महान गुरू परंपरेतील श्री स्वामी समर्थांच्या नंतरचेचौथे उत्तराधिकारी म्हणून अक्कलकोट रेल्वे स्टेशन रस्त्यावरील शिवपुरीआश्रमाचे सत्यधर्मप्रणेता परमसद्गुरू श्री गजानन महाराज १९३८ मध्ये पीठारूढ झाले.

श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्यासांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय. आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकालाएखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज आहे. अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकानेसद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे. त्यांची आराधना करावी. त्यांच्यामुखातून निघणारे प्रत्येक अक्षर, हे मंत्रस्वरूप मानून अंत:करणाने ग्रहणकरावे. अशी गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंती मोक्षप्राप्ती होते. वाटेल त्याच्याहातचे अन्न ग्रहण करू नये. निरंतर केवळ विषय चिंतन करणा-या स्त्री अगरपुरुषाच्या हातचा विडाही खाल तर तुम्हीही तसेच व्हाल. दुष्ट मनुष्याच्या हातचेअन्न खाल तर, तुम्हीही दुष्ट व्हाल. एक ईश्वरच सर्वत्र भरलेला आहे अशी भावनाकरा, जेणेकरून तुमचे मन निरंतर पवित्र राहील. परावलंबी नसावे, स्वत: उद्योगकरावा व खावे. गांजा केव्हाही ओढू नये, त्याने अपाय होतो. आपल्या धर्माप्रमाणेच (कर्तव्यकर्मानुसार) वागावे, त्यानेच सर्वत्र विजय प्राप्तहोतो. ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणेतुम्ही स्वत: कोणतीही ज्ञानपिपासा दाखविल्याशिवाय गुरू आपण होऊन ज्ञानोपदेश देणार नाहीत. साधना करताना ज्या काही सिध्दी प्राप्त होतात, त्यांचा चमत्कारदाखविण्याच्या कामी उपयोग करणे गैर आहे. परमार्थज्ञानाचा उपयोग स्वचरितार्थाचेसाधन म्हणून करणे हे अयोग्य ईश्वरीय ज्ञानाचा उपदेश करणा-या सर्व धर्म मतांचे व सर्व पंथांचे अंतिम ध्येयएकच असल्यामुळे सर्व धर्म मते व पंथ वंदनीय आहेत. या जगात प्राप्त होणारीसुख-दु:खे, परमात्माच्या इच्छेने घडतात असे मानून त्यांचा स्वीकार करावा.मूर्तिपूजा ही त्याविषयी रहस्य जाणून करावी, केवळ मूर्तिपूजाच करीत राहणे, हेच मनुष्यप्राण्याचे कर्तव्य नाही. परमात्मप्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे!

swamisamarth
वटवृक्ष मंदिर अक्कलकोट

स्वामीसमर्थांचा संदेश

अनन्यश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तांना योगक्षेमं वहाम्यहम् ।

एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्या माझ्या ठिकाणी मुक्त असलेल्या योग (अप्राप्त वस्तूची प्राप्ती) व क्षेत्र (प्राप्तवस्तूंचे रक्षण मी करतो)

श्री स्वामींचा आजही चैतन्य स्वरूपात वास असून "हम गया नही जिद्ना है" या वचनाची अनुभूती आजही भक्तांना येत आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे ते योगारुढ होते. यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते सर्व संकल्प संन्यासी योगरुढस्तदोच्यते (विषयाचे आणि कर्माचे ठिकाणी जो आसक्त होत नाही आणि ज्याचे सर्व संकल्प सुटलेले असतात. त्या योगाला योगरुढ असे म्हणतात.)

देवा दीन मी पदरी धरा । कलियुगी श्री दत्तात्रेय 
अवतार तुमचा खरा । अक्कलकोटनिवासी ब्रह्म 
सगुण ह्र्दयी उतरा । श्री ज्ञानेश्वररूप धरुनि 
शिरी ठेवा स्वकरा ॥
 

गुरु परंपरा

श्री गुरुदत्त
       |
श्रीपाद श्रीवल्लभ
       |
श्रीनृसिंह सरस्वती
       | 
श्रीस्वामी समर्थ

परम अर्थाचे स्वामी बोल

भगवंताचे सहा सद्गुण असतात. ऎश्वर्य, धर्म, यश, वैभव, ज्ञान आणि वैराग्य हे ते सहा सद्गुण होत. यांनाच 'भग' म्हणतात. हे भग ईश्वराकडे असतात म्हणून तो भगवंत. स्वामी महाराज हे साक्षात भागवंतच. पण हे सद्गुण म्हणजे तरी काय ? 

१) सुख, समाधान, शांती आणि आनंद हे ऐश्वर्य 
२) नीती, न्याय आणिकृपा हा धर्म  
३) सर्वत्र, सर्वकाळ कार्याची सिद्धी हे यश 
४) निरांतराची ऐहिक व पारलौकिक अनुकूलता हे वैभव 
५) निजारूपाची स्पष्ट व नित्य जाणीव हे ज्ञान 
६) हे सर्व असूनही निरपेक्ष, निस्वार्थ आणि निरलस राहणे हे वैराग्य

या सहा गुणविशेषांचा पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात. त्यावरच सत्कार्याची उभारणी होते हे अधीष्ठान देणारा भगवंत असतो.
पूर्व जन्म।तील कर्मे हे 'संचीत' असते. वर्तमान जन्मात भोगल्यास येणारा त्यातील अंशभाग म्हणजे  'प्रारब्ध'. प्रारब्धातील पुण्यरूप सत्कृत्याने सुख, समाधान, तर पापरूप दुशकृत्याने दुःख अनुभवास येते. देव व गुरु सहसा प्रारब्धात ढवळाढवळ करीत नाहीत. प्रारब्ध टाळून टाळता येत नाही. ते कालांतराने पुढे उभे ठाकतेच. म्हणून प्रारब्ध भोगून संपवावे. प्रारब्धात नसलेल्या गोष्टींची प्राप्ती देव गुरु करून देतात तेव्हा ती पुढील जन्मातून घेतलेली उधारी असते.

सुखी जीवनासाठी स्वामी समर्थांची  वचने

१. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.  
२. जो माझी अनान्यभावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. 
३. आळशी माणसाचे तोंडपाहू नये. 
४. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा. 
५. जा तुझे अपराध माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग.
६. भिऊनकोस! पुढें जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी, तुझ्यासाठी आम्ही त्यांचा प्रतिकार करू.
७. आमचे बोलण्यावर विश्वास ठेवा,राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालावा, मोक्ष मिळेल.   
८. मी सर्वत्र आहे, परंतू तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा. 
९. हम गया नही जिंदा  है.

संकल्प

अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज - श्री स्वामी समर्थ महाराज मी आपले चरणाशी ञिवार मुजरा करुन प्रार्थना करीत आहे. आजपासुन आपण माझे माता, पिता, गुरु सर्व कांही  तुम्हीच आहात. आजपासुन मला आपला शिष्य बनवून आपण माझे गुरु व्हावे व मला गुरुपदी लीन करावे. व माझ्या सर्वार्थाने सांभाळ करावा.

आपण माझे गुरु-सदगुरु-परमगुरु-परात्पर गुरु-गुरु तत्व सर्व काही आपणच आहात, म्हणुन आपण माझा शारिरीक, मानसिक, प्रापंचिक, आर्थिक, दैविक, आधिदैविक, भौतिक, आधिभौतिक, धार्मिक, आध्यात्मिक, परमार्थिक सर्वतोपरी सांभाळ करावा. अशी मी विनम्रपणे पुन्हा ञिवार मुजरा करुन आपले चरणी प्रार्थना करीत आहे.

तीर्थ घेण्याचा मंञ

अकालमृत्यू हरणम् सर्व व्याधि विनाशनम् |
श्री गुरु श्री स्वामी समर्थ पादोदंक तीर्थ जठरे धारयाम्यहम् ||

'श्री स्वामी समर्थ' चा नेमका अर्थ काय ?

षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रम्हाण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुचरित्र हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याच प्रमाणे समानार्थी 'श्री स्वामी समर्थ' हा सुद्धा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. ह्या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे अंतरीक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातुन सहजच होते. असा आमचा अनुभव आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ व्यवस्थित समजुन घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यययोग सर्व साधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व आधिक प्रभावकारक होत असतो.
श्री स्वामीं समर्थ या सद्गुरु ब्रम्हवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा मतीतार्थ खालीलप्रमाणे आहे.

श्री 
स्वयं श्रीपदाविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज...!

स्वामी - स्वाः + मी
स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छ्या...! अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. 

समर्थ
समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा...! 
त्यायोगे 'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभु शिव तत्व सद्गुरुकृपे अंकित करा.

सद्गुरु शंकरनाथ साटम महाराज ( दाणोली ) हे साक्षात भगवान शिवाचेच अवतार असत. महाराज स्वामींनी 'अक्कलकोटीय दत्तस्वरुपाय नमो नमः' अशाप्रकारे नाम साधन करत असत. सद्गुरु साटम महाराजांची सद्गुरु परंपरा श्री स्वामीं समर्थांकडुनच सुरु झाली होती. त्यात अनुक्रमे गुरुपरंपरा खालीलप्रमाणे आहे.

*सद्गुरु साटम महाराजांचे सद्गुरु अवलिया हाजी अब्दुल रेहमानबाबा (डोंगरी)
*अवलिया हाजी अब्दुल रेहमान बाबांचे सद्गुरु पीरसाहेब मिर्झा सिनिया (जुना पंजाब)
*सिनिया पीरबाबांचे सद्गुरु अक्कलकोटचे श्री स्वामीं समर्थ महाराज...! 

या योगे सांगण्याचे प्रयोजन असे की, 

' स्वामीं चरणी लीन विनम्र मती येता । अवघी सृष्टी आत्म रंगली सहजता ।।'

स्वामीं सान्निध्यात येताच आपल्या अंतःकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहाणार नाही. असे हे दत्त स्वामीं तत्व सर्व चराचर व्यापुनी उरलासे. 

ॐ नमो स्वामीं समर्थाय नित्यानंदायमुर्तयै । अक्कलकोटी विराजीत परमगुरवें वेदशास्त्रार्थ दर्शनें ।।

सत् चित्त व आनंदाचे परम द्योतक स्वामीं चरण अक्कलकोटी विराजलेले असुन अशा परम गुरुच्या अमृतमय चित् पावन मंगलमय चरण कमळांनी आपल्याला वेदशास्त्र वेदोक्त ज्ञान व वेदांत वेदांच्याही पलिकडील सद्गुरु तत्वज्ञान सहजच होते. असे भक्तवत्सल स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपावर्षाव करोत.

स्वामींबाबत विशेष
ॐ नमो स्वामीं समर्थाय नित्यानंदायमुर्तयै  |

स्वामींबाबत विशेष

स्वामी कसे दिसत असतील??स्वामी फोटोत दिसतात तसेच असतील ना..ज्या लोकांनी स्वामींना बघितलंय ते किती भाग्यवान..न जाणो आपण ही गेल्या जन्मात अक्कलकोटचेच गावकरी असू..आपलाही दिवस त्यावेळी स्वामींना बघून उजाडत असेल..आपल्या चुकीवर स्वामींनी आपल्याला ही चांगलंच झापल असेल. समकालीन बखरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची अंदाजे सात - सव्वा सात फूट होती. त्यांच्या पादुकांवरून हे सहज लक्षात येईल. त्यांची नखे कापायला न्हावी येत तो म्हणत स्वामींची नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्या चं जणू. हातानेही ती तुटत. त्यांची पावले लोण्याहून मऊ त्यांच्यात हाडे आहेत की नाही ते समजत नसे. चिखलातून ही जर स्वामी चालले तरी त्यांची पाऊले लखलखीत स्वच्छ. त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्यासारखे जणू सारं ब्रह्मांडच सामावलंय त्यात. स्वामींची त्वचा खूप नितळ, कोमल होती. आपले स्वामी मनाचे राजे होते. ते कित्येक दिवस अंघोळ करत नसत तर कधी दिवसातून चार वेळा अंघोळ करत. पण त्यांच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध येई.

स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे. त्यामध्ये कधी खीर, मसाले दूध असे तर कधी पन्हे. स्वामींची जेवणाची तऱ्हा ही निराळीच. कित्येक दिवस, महिने ते जेवत नसत अगदी पाणीसुद्धा घेत नसत. तर कधी त्यांना इतकी भूक लागे की आरामात ६००-७०० भाकऱ्या खात. दहा पंधरा बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसत भाकऱ्या करायला. कधी कधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून "जेवण घाल गे माये" अस म्हणत.पण घरच्या बाईने वाढलेलं जेवण तिथेच गायीला घालत. स्वामी बाहेरच जेवायला बसत त्यावेळी त्यांच्या ताटात गाई, कुत्रे येऊन जेवत स्वामी ही त्यांना प्रेमाने घास भरवत.

गोपालकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन. त्यांनी “ह्याची देही ह्याची डोळा” स्वामींना पहिले. त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या स्वरुपात लिहून ठेवले आहे. त्यातील वाचलेला एक भाग जश्याचा तसा इथे नमूद करत आहे. “स्वामींना कधी गाढ झोपल्याचे, पाहिलेले आठवत नाही. फार रात्र झाली की तोंडावरून पांघरूण घेऊन स्वतःला झाकून घेत. मग पांघरुणातून रात्री दीड दोन च्या सुमारास कधी भारुड तर कधी अभंगाचे आवाज येत. बऱ्याचवेळा कुराणातील काही आयतेही आळवत असत. अचानक मोठ्मोठ्यानी वेद म्हणत. कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत. असे रात्रभर चाले. अश्या कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत”
स्वामींना वड, औदुंबर, कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती. एकदा अक्कलकोट गावाच्याबाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते. एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाटसरू त्याची फांदी तोडायला लागला. त्याने आपल्या कुऱ्हाडीचा पहिला घाव त्या झाडाच्या फांदीवर घालताक्षणीच, इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले” अरे बघा रे ! कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे” भक्तमंडळीनी मग गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले.

स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणी गोट्या खेळत. त्यांना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती. स्वामी तिला प्रेमाने भरवत मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खराखरा चाटे. स्वामी कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणी तिच्या आचळाना तोंडाने ढुशी देत मग ती सुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करे. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गायीला मिठी मारून "माझी माय ग ती "असं म्हणत अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत.  

swami samarth
.

श्रीस्वामी समर्थ म्हणजेच श्री  नृसिह सरस्वती

स्वामी भक्तांना विचारतात:- "आम्ही कोण आहे?" चोळप्पा उत्तर देतात:- "आपण त्रिभुवन नायक आहा !" स्वामी संतुष्ट होत नाही .स्वामी म्हणतात:- "आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते." स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्या वेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोकं अन्न-पाण्यालापारखे झाले होते. लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्ह्ते. इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी, स्वामींची परीक्षा पहायला आला होता.'स्वामी स्वताला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात', असं त्याचं मत होतं. आल्या-आल्या, तडका-फडकीनी तो वट-वृक्षा खाली बसलेल्या स्वामींकडेयेतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात:- "काय रे! गाणगापूर मंदिराचा तु पुजारी ना!" "आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना?" पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात- "गाणगापूरला कोणाची भक्ती करतो?" पुजारी उत्तर देतो- "श्रीनरसिंहसरस्वतीची!" स्वामी म्हणतात- "आंम्ही नरसिंहभान आहो!" "नीट बघ आम्हाला!" पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंहसरस्वती उभे आहे. पुजाऱ्याला गहिवरून येतं. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचीती येते कि स्वामी साक्षात दत्त अवतार आहे. तो स्वामी-चरणी मस्तक ठेऊन क्षमा मागतो. मग म्हणतो- "अक्कलकोट हेच गाणगापूर आणी गाणगापूर हेच अक्कलकोट आहे!" इकडे मामलेदार यशवंत, सरकारी धान्य गोदामातलं धान्य गरजवंत लोकांमध्ये वाटून टाकतो. सरकारी धान्य वाटल्या मुळे त्याला '१०,००० रु, दुसऱ्यादिवशी संध्याकाळ पर्यंत सरकारी खजिन्यात जमा करा', असा  खलीदा येतो. यशवंत घर-दार, शेत व बायकोचे दागिने विकायला काढतो पण त्या सर्वांचेमात्र १००० रु मिळणार, असं सावकार सांगतो. सावकार शिल्लक ९,००० रुपयाचे कर्ज द्यायला स्पष्ट नकार देतो. पैशे न भरल्या मुले वरिष्ठ अधिकारी यशवंताला अटक करायला येतात. त्याला बेड्या पडणारच होत्या तेव्हा स्वामी एका शेटाच्या रुपात येतात, वरिष्ठ अधिकाऱ्यांना १०,००० रु देऊन यशवन्ताची सुटका करतात. अधिकारी लोकं गेल्यावर स्वामी यशवंताला आपलं खर रूप दाखवतात. यशवंत नौकरीला राजीनामा देऊन, स्वामीसेवेतच आयुष्य काढण्याचं ठरवतो.

श्री गुरूंचे श्रीशैल्यगमन व स्वामींचे प्रकटीकरण

क्षणार्धात नौका डोळ्यासमोरून गेली. गाणगापुर येथे भीमा-अमरजा ह्या दोन संगमावर सर्व भक्तांसमोर त्या नौकेसहित सद्गुरू गुप्त झाले. थोड्याच अवधीत पैलतीरावरून एक नौका झपाट्याने तिराकडे येताना भक्तांनी पाहिली. नौकेतील नावाड्याने तीरावरील लोकांना सांगितले की, पैलतीरावर आम्ही एका तेजस्वी यतीला पाहिले. जणू प्रत्यक्ष दत्तानीच आम्हाला दर्शन दिले. त्या यतीनी आम्हाला सांगितले," ही शेवंतीची फुले माझ्या सर्व भक्तांना आणि शिष्यांना द्यावी, "त्यांनी असाही निरोप दिला आहे. "आम्ही जातो श्रीशैल्यासी । कल्याण असो सर्वांसी ॥" शिष्यांनी ती शेवंतीची फुले ओंजळीत घेतली व जड अंत: करणाने ते मठाकडे निघाले. श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार समाप्तीचा दिवस शिशिर ऋतूमध्ये माघ वद्य प्रतिपदेचा तो दिवस शुक्रवार होता. गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गाणगापुरात केली आहे. आजही त्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते. हजारो भक्त दर्शन घेण्यास तेथे जात असतात. गाणगापुर हे दत्तसंप्रदायाचे प्रमुख  तिर्थस्थान मानले जाते.

श्रीशैल्य-मल्लीकार्जुन येथे ते गुप्त स्वरुपात वावरू लागले. सर्व भक्तांना श्री नृसिंह सरस्वतींचा साक्षात्कार प्रत्यक्षही होऊ लागला. ते अनंतकाळ तेथे समाधी अवस्थेत होते. त्या वेळी इकडे सर्व लोक धर्मभ्रष्ट होऊन स्वैराचारी होऊ लागले..अनेक पंथ ,अनेक मते निर्माण होऊन सगळीकडे अराजक माजले. सर्वत्र यवनांचे अनुकरण करण्यास हिंदुंची सुरुवात झाली होती. त्यांना हे सर्व अंत :ज्ञानाने समजत होते. समाधी अवस्था विसर्जित करून लोकांच्या कल्याणासाठी ते परत तीर्थस्थळे करीत फिरत होते. गंगेच्या काठावरील एका महद् अरण्यात श्री नृसिंह सरस्वतींनी परत समाधी लावली. ते कर्दळीवन होते. तेथे बराच काळ समाधीत गेल्यामुळे त्यांच्या भोवती प्रचंड वारूळ निर्माण झाले. 

"जन्म कोठे झाला । कोण असती माता पिता 
दिव्य शरीर तेजोमय कांती । अजानबाहु कौपीनं छाटी 
नाक कान विशाल भाल । जणू तेजाचा रवि प्रखर ॥" 

एका प्रचंड वृक्षाच्या खाली एक लाकूडतोड्या लाकडे तोडण्यासाठी तेथे आला होता. आपणास भरपूर लाकडे मिळतील ,.या हेतूने त्या झाडावर आपला कूऱ्हाडीचा घाव घातला व लाकडे तोडावयास लागला. त्याचा एक घाव चुकून त्या वारूळावर लागला. त्याक्षणी त्या वारूळातून रक्ताची एक चीळकांडी उडाली. ते पाहून लाकूडतोड्या घाबरला. क्षणभर त्याला काय करावे हे सुचेना. लाकूडतोड्याने त्या अवस्थेतच वारुळाची माती लगेचच उपसण्यास सुरुवात केली. तो एक तेज : पुंज ऋषी त्या वारूळात आसन घालून बसलेला त्याने पाहिला. त्याच्या तेजाची प्रभा सगळीकडे पसरली होती. त्या ऋषीच्या मांडीतून भळाभळा रक्त वाहत होते. हे अघोरी क्रूत्य आपल्या हातुन घडले व आपण पापाचे धनी झालो ,आता हे ऋषी आपणास शाप नक्कीच देतील , असा विचार त्याच्या मनात आला. तो दुःखवेगाने रडू लागला. तेंव्हा ऋषीनी आपली समाधी विसर्जित केली व त्या लाकूडतोड्याकडे मंदस्मित करीत ते ऋषी पाहू लागले. तेंव्हा लाकूडतोड्या लगेचच धावत पुढे आला व त्याने त्या ऋषीचे चरण धरले. तो ऋषी म्हणजेच नृसिंह सरस्वतीचाच अवतार " श्री स्वामी समर्थ " म्हणून प्रकट झाला होता. तो लाकूडतोड्या वारंवार स्वामींची  क्षमा मागू लागला तो म्हणाला,

मी बहु अन्यायी । परि घातले आपुल्या पायी ।
क्षमा करुनी लवलाही । अभय द्यावे मज दीना ॥

पायाशी लोळण घेणाऱ्या त्या लाकूडतोड्यास स्वामींनी मोठ्या प्रेमाने उठवले. स्वामींचा स्पर्श होताच त्याच्या अंगातुन वीज सळसळली. स्वामी म्हणाले , "तुझ्याकडून माझी समाधी भंग पावली व मी प्रकट झालो. तू महान पुण्यवंत आहेस. तूझे परमकल्याण होईल. "स्वामींनी लाकूडतोड्याच्या मस्तकावर हात ठेवला. त्याक्षणी त्याला अपूर्व ज्ञानप्राप्ती झाली. त्याने स्वामींचे चरण धरले व त्याच्या अश्रूंनी स्वामींच्या चरणांना अभिषेक केला. दत्तात्रयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाला. ते अंधारातले गडद आरण्य स्वामिंच्या तेजप्रकाशाने उजळून निघत होते. स्वामींच्या मुखातून शब्द आले, "दत्तनगर, मूळपुरुष, वडाचे झाड, मूळ मूळ." हे शब्द बोलून स्वामी तेथून पुढील प्रवासाला निघाले. तो लाकूडतोड्या श्री स्वामींकडे पहात उभा राहिला तेंव्हा त्याच्या लक्षात आले, स्वामी गंगेच्या उगमाकडे निघाले आहेत.

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज

अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासू आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वात मोठी लीला आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन आज सव्वाशेहून अधिक वर्षे उलटून गेली; परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतचआहे. या "सगुण ब्रह्मा'ची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने अन्‌ भक्तीने महाराष्ट्रातील घराघरांतून नित्य सुरू आहे आणि. त्यांच्या अस्तित्वाचे अन्‌ कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्यशः अनुभवीत आहेत. भगवंताचा हा अवतार महाराष्ट्रात झाला ही केवढी तरी भाग्याची गोष्ट; परंतु अवताराला सर्व प्रांत आणि देश सारखेच असतात. संपूर्ण विश्र्वाच्या आणि मानववंशाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी भगवंत भूतलावर अवतार धारण करीत असतो.

श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतील. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? "प्रत्यक्ष ज्ञानेश्र्वर विभूती जगामाजी प्रकटली।।' असे ज्यांचे माहात्म्य, त्या संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराजांनाही स्वामी समर्थांचा अपूर्व महिमा कसा वर्णावा असा जणू प्रश्र्न पडला. आणि म्हणूनच आपल्या "सूक्त रत्नावली' या भावमधुर काव्यातते लिहितात -अक्कलकोट ग्राम कलियुगी काशी। जिवंत कैलासी लोक सारे।। स्वामी विश्र्वेश्र्वर दत्तात्रेय रूप। महिमा अपूर्व वर्णवेना।।

स्वामी समर्थ या नावाने सर्वसामान्य जनतेला परिचित असलेल्या कलियुगातील लोकोत्तर अवतारी पुरुषाचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा, त्या सगुण ब्रह्माने आपल्या हृदयी नित्य वास करावा अशी तीव्र इच्छा गुलाबराव महाराजांसारख्या संतश्रेष्ठाला झाली असल्यास नवल नाही. म्हणूनच ते श्रीस्वामी समर्थांची पुढील शब्दांत प्रार्थना करतात -

देवा दीन मी पदरी धरा।।धृ।। कलियुगी श्रीदत्तात्रेय अवतार तुमचा खरा।।देवा।। अक्कलकोट निवासी ब्रह्म। सगुण हृदयी उतरा।।देवा।। श्रीज्ञानेश्र्वर रूप धरूनी। शिरी ठेवा स्वकरा।।देवा।।

अशा प्रकारे श्रीस्वामी समर्थांचे माहात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरीत्याचा जो जो अधिक विचार करावा तो त्याचे अनंत नवे नवे पैलू आपल्या लक्षात येतात आणि खरोखरच मती कुंठित होऊन जाते! सूर्याचे किरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची जशी मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे या प्रज्ञापुरीच्या सूर्याच्या चरित्राचा थांगच लागत नाही!वारुळातून प्रकटलेली दिव्य मूर्ती.

श्री स्वामी समर्थांच्या जन्माविषयी त्यांच्या भक्तात आणि चरित्रकारात एकवाक्यता आढळत नाही. श्रींचे परमभक्त हरिभाऊ ऊर्फ स्वामीसुत यांच्या मते मध्य हिंदुस्थानातीलछेलीखेडा या गावी चैत्र शुद्ध द्वितीया शके १०७१ या दिवशी श्रीस्वामी एका अष्टवर्षीय बालकाच्या रूपात प्रकटझाले. तथापि बहुसंख्य चरित्रकारांचे असे मत दिसते की, श्रीस्वामी समर्थ म्हणजे "गुरुचरित्रा'त वर्णन केलेले नृसिंह सरस्वतीच होत. श्रीशैल्य यात्रेच्या निमित्ताने भगवान्‌ श्रीनृसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाले. नंतर याच कर्दळीवनात सुमारे तीनशे वर्षे ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात वाल्मिकीप्रमाणेच मुंग्यांनी त्यांच्या दिव्य शरीराभोवती आपले प्रचंड वारूळ निर्माण केले. योगायोगाने त्याचवेळी एक लाकुडतोड्या तेथे आला. एका झाडाची फांदी तोडता तोडता त्याच्या धारदार कुऱ्हाडीचा एक ओझरता घाव त्या वारुळावरपडला आणि भगवान श्रीनृसिंह सरस्वतींची प्रगाढ समाधी भंग पावली!

अशा प्रकारे समाधी विसर्जित केल्यावर "वृद्ध नृसिंह सरस्वती' म्हणजेच श्रीस्वामी समर्थ कर्दळीवनातून निघून अनेक गावे आणि तीर्थक्षेत्रे पाहता पाहता इ. स. १८५६-५७च्या सुमारास अक्कलकोट येथे आले. कर्दळी वनात त्यांच्या मांडीवर जो कुऱ्हाडीचा घाव बसला होता तो पुढेही त्यांच्या मांडीवर स्पष्टपणे दृग्गोच्चर होत असे, असे सांगतात. त्याचप्रमाणे त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या भक्तांनी "त्यांची काया जुनाट होती आणि त्यांचे वय सहज ४०० ते ५०० वर्षांचे होते.' असेही त्यांचे वर्णन केलेलेआढळते. ही गोष्टदेखील वरील तर्काला पुष्टी देणारीच वाटते. कर्दळीवन ते अक्कलकोट. कर्दळीवनातून बाहेर पडल्यावर श्रीस्वामी समर्थांची दिव्य मूर्ती वाटेतील अनेक रम्य स्थळे, मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे पाहता पाहता इ. स. १८५७ चे सुमारास अक्कलकोट येथे आली. या प्रवासाची हकिकत एकदा स्वामी समर्थांनी देखील स्वमुखाने सांगितली हाती, ती अशी;

एकदा कलकत्त्याच्या एका पारशी गृहस्थाने स्वामींना विचारले, "स्वामीन्‌ आपण कोठून आलात?' त्यावर स्वामी समर्थ लागलीच म्हणाले - "प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बंगाल देश हिंडून कालीदेवीचे दर्शन घेतले. नंतर गंगातटाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्र्वर पाहिले.' (यानंतर त्यांनी अनेक गावांची व तीर्थांची नावे पटापट सांगितली. ती सर्वच लक्षात ठेवणे कोणालाच शक्य झाले नाही.) श्रीसमर्थ पुढे म्हणाले, "नंतर आम्ही गोदातटाकास आलो. तेथे बरीच वर्षे राहून नंतर पंढरपूर, बेगमपूर येथे जाऊन हिंडत हिंडत मोहोळास आलो, तेथून सोलापुरी आलो, तेथे काही काळ राहून अक्कलकोटास आलो, तो येथेच आहे.' या यादीवरून "श्रीं'चा संचार आसेतुहिमाचल झाल्याचे लक्षात येते. त्यांच्या हिमालयाच्या वास्तव्यात त्यांनी एका चिनी दांपत्याचे गर्वहरण केले. एका हरिणीच्या निष्पाप पाडसाचे पारध्यापासून रक्षण केले. त्याचप्रमाणे एका तपोनिष्ठ संन्याशास दत्तरूपात दर्शनही दिले. हिमालयाप्रमाणेच जगन्नाथपुरीसही त्यांचे काही काळ वास्तव्य झाल्याचा उल्लेख त्यांच्या दिव्य चरित्रात आढळतो. त्या ठिकाणी अलवणीबुवा नावाचे एक थोर संन्यासी होते. ते तिघांना बरोबर घेऊन जगन्नाथाच्या दर्शनासाठी आले होते; परंतु तेथे येताच ते चौघेही तापानेफणफणून गेले. त्यांचा ताप इतका वाढला की अन्नपाण्यासाठी चार पावले बाहेर जाणेही त्यांना अशक्य होऊन बसले. तेथे आलेल्या हजारो यात्रेकरूंपैकी कुणीही त्यांची विचारपूस केली नाही. अखेर भगवंताला शरण जाऊन बुवांनी त्यांचे अखंडनामस्मरण सुरू केले आणि थोड्याच वेळात एक विलक्षण चमत्कार घडला. लखकन्‌ वीज चमकावी तसा भास बुवांना झाला आणि त्या तेजस्वी प्रकाशलोळातून श्रीस्वामी समर्थांची आजानुबाहू दिव्य मूर्ती एकाएकी त्या ठिकाणी प्रकट झाली.

हिऱ्यांप्रमाणे तेजस्वी असलेल्या त्यांच्या नेत्रात चांदण्याची सुखद शीतलता होती. त्यांनी प्रसन्न मुद्रेने बुवांकडे पाहिले. त्या अमृतदृष्टीने बुवांना न्हाऊन टाकले. श्रींच्या प्रसन्न दर्शनाने बुवांच्या निःस्तेज शरीरात एकाएकी चैतन्य संचारले आणि त्यांनी गीर्वाण भाषेत श्रीगुरूंची स्तुती करून आपण कोण व कोठून आलात असा प्रश्र्न त्यांना केला. त्यावर परमहंस दत्तावधूत प्रसन्न हास्य करीत म्हणाले, "अरे, आमचा वास अखण्ड विश्र्वात आहे; तथापि सह्याद्री, गिरनार, काशी, मातापूर, करवीर, पांचाळेश्र्वर, औदुंबर, कारंजा, नृसिंहवाडी, गाणगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत.' त्याचवेळी आणखी एक चमत्कार घडला. शेजारीच असलेल्या एका टुमदार घरातून पंचपक्वान्नांचा खमंग वास येऊ लागला आणि श्रीसमर्थांनी त्या चौघांना त्या ठिकाणी भोजनाला येण्यासाठी पाचारण केले. तेथील राजेशाही थाट पाहून त्या चौघांनाही यतिरायांच्या विलक्षण लीलेचे अपारकौतुक वाटले आणि त्यांनी आकंठ भोजन करून तृप्तीची ढेकर दिली.

हे अलवणीबुवा नंतर बडोद्यास गेले. तेथे ते बालोन्मत्त पिशाच्चवृत्तीने राहात. तथापि त्यांनी बडोद्यास अनेक लोक-कल्याणाची कामेही केली. अशा प्रकारे कर्दळीवन ते अक्कलकोट या भ्रमंतीत श्रीस्वामी समर्थांचा वास अनेक तीर्थक्षेत्री झाला; परंतु प्रत्येक ठिकाणी ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातहोते. कुठे ते चंचलभारती म्हणून प्रसिद्ध होते, तर कुठे चैतन्य नृसिंह सरस्वती या नावाने लोक त्यांना ओळखत. मंगळवेढ्यास ते दिगंबरबुवा म्हणून ओळखले जात. अक्कलकोटला आल्यावर मात्र ते अक्कलकोटचे स्वामीमहाराज या नावानेच प्रसिद्धीस आले आणि त्यांची कीर्ती दशदिशांत पसरली.

हम किसीके ताबेदार नही. नाना तीर्थक्षेत्री भ्रमण केल्यानंतर स्वामी समर्थांची स्वारी इ. स. १८५७ च्या सुमारास अक्कलकोटास आली. त्यांना अक्कलकोटास आणण्याचे श्रेय त्यांचे परमभक्त चिंतोपंत टोळ यांना दिले पाहिजे. श्रीस्वामी समर्थांना घोड्यावर बसवून चिंतोपंत टोळ अक्कलकोटकडे निघाले; परंतु वाटेतच "उभ्या उभ्या भेटून जा' असा सोलापूरच्या कलेक्टर साहेबांचा तातडीचा हुकूम आल्यामुळे टोळांनी स्वामीमहाराजांना एका डेरेदार वृक्षाखाली विश्रांती घेण्याची विनंती केली आणि त्यांच्या दिमतीला एक नोकर देऊन ते तातडीने सोलापुरास निघाले. काम आटोपून त्यांनी पुन्हा घोड्यावर टांग मारली आणि घोडा त्या घनदाट वृक्षाच्या दिशेने भरधाव सोडला. थोड्याच वेळात ते त्या वृक्षाजवळ आले; परंतु "श्रीं'ची दिव्य मूर्ती त्यांना कोठेच आढळली नाही. त्यामुळे त्यांनी नोकरास हाक मारून त्याविषयी विचारले. तेव्हा नोकर थरथर कापत म्हणाला, "साहेब, स्वामींनी जाऊ नये म्हणून मी त्यांची अनेक प्रकारे विनवणी केली, परंतु "हम किसीके ताबेदार नही' असे उत्तर देऊन ते पाच-दहा पावले पुढे गेले आणि एकाएकी दिसेनासे झाले!' खंडोबाच्या देवळात.

तो वृत्तांत ऐकून हाती आलेले परम निधान गमावल्याचे दुःख होऊन चिंतोपंत टोळ उद्विग्न चित्ताने अक्कलकोटकडे निघाले. स्वामीदर्शनासाठी त्यांचा जीव आसुसला होता. इकडे स्वामी समर्थ त्या घनदाट वृक्षांजवळून अंतर्धान पावून मनोवेगाने निघाले ते थेट अक्कलकोटजवळील खंडोबाच्या देवळात प्रकट झाले. तो दिवस होता आश्विन शुद्ध पंचमी, शके १७७९ (बुधवार). बऱ्याच वेळाने चिंतोपंतही तेथे येऊन पोचले. त्या ठिकाणी यतिरायांची मनोहर मूर्ती बालक्रीडा करीत बसलेली पाहून त्यांच्या आनंदाला उधाण आले आणि त्यांनी श्रींच्या कुसुमकोमल चरणांवर वारंवार मस्तक टेकवून त्यांना आपल्या घरी चलण्याची विनंती केली; परंतु श्रीसमर्थ ताडकन म्हणाले,"आमचे घर वेगळे आहे.' अखेर नाइलाज होऊन टोळ तिथून निघून गेले. त्यानंतर श्रींची स्वारी गाववेशीजवळ आली. तेथे तीन दिवस ते निराहार राहिले. अक्कलकोटातील पहिला चमत्कार.

चौथ्या दिवशी तेथील अहमदअली खॉं नामक रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. "श्रीं'ची बालोन्मत्त पिशाचवत्‌ वृत्ती पाहून हे कुणी वेडे इसम असावेत असा तर्क करून त्यांची चेष्टा करण्यासाठी त्याने एका रिकाम्या चिलमीत विस्तव घालून ती चिलीम "स्वामीं' पुढे धरली. तेव्हा स्वामी समर्थांनी काही न बोलता ती निमूट हाती घेतली आणि मोठ्या आनंदाने ओढावयास सुरुवात केली. त्याबरोबर त्या चिलमीतून गांजाचा काळानिळा धूर बाहेर येण्यास सुरुवात झाली! तो विलक्षण प्रकार पाहताच खॉंसाहेब मटकन खालीच बसले. हा कुणी सामान्य मनुष्य नसून अवलिया असला पाहिजे याबद्दल खात्री पटून त्यांनी त्या अवलियाला मनोमन वंदन केले.    

स्वामींचा एक प्रभावी- तारक मंत्र

निःशंक हो, निर्भय हो, मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकही ना भिती तयाला ।।२।।
उगाची भितोसी भय पळू दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ।।३।।
खरा होई जागा तू श्रध्देसहित
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ।।४।।
विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ
स्वमीच या पंच प्राणाभृतात
हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती
न सोडेल स्वामी ज्या घेई हाती ।।५।।

'तारक मंत्र' ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, ह्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काही तरी उपाय करताच. स्वामिनी आपल्याला हि अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे कि मी, तुम्ही आणि आपण कोणीच त्यचा विचारही करू शकत नाही. शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरवात करा आणि बघा तुमच्या शरीरीरात एक मानसिक बळ येते ते. आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळू हळू म्हटला तर खूपच बळ, शक्ती अंगात संचारते हा सर्वच स्वामी भक्तांचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे कि "अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी", फक्त आणि फक्त ह्या स्वामींच्या वाचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा ह्या जगातील कितीही मोठी गोष्ट असून द्या. ती तुम्ही सहजच मिळवाल आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र म्हणा किवा नातेवाईक म्हणतील असे तू काय करतो रे कि तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते ती. तेह्वा मनातल्या मनात स्वतः लाच बोला कि "माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत, ह्या जगाचा जो एक मालक आहे. ह्या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो, सर्वांचे रक्षण करतो, असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत, आणि राहणारच. सर्व जणानी हा तारक मंत्र म्हणायला सुरवात करावी. हा म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन, अग्गरबत्ती लाऊन त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा. आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्या आणि बघा अनुभव स्वत च अनुभवून. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओलखू शकत नाही. कुटल्या ना कुटल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्ष्यात आणले पाहिजे कि स्वामी सद्देव माझ्या बरोबर आहेत. ते म्हणतात ना "भगवंताला, माझ्या, आपल्या, स्वामिना बघायला तशी दृष्टि असावी लागते"!                                       

चोळप्पा आणि सुंदराबाई

श्रीस्वामींच्या चरित्रात चोळप्पा व सुंदराबाई या दोघांना विशेष महत्त्व आहे. श्रींचा वास बहुतकाळ चोळप्पाच्या घरीच झाला. चोळप्पावर श्रींचे पुत्रवत्‌ प्रेम होते. समर्थांनी त्यांची हरप्रकारे परीक्षा पाहिली. त्याच्या बायकोला तर त्यांनी नाना प्रकारे त्रास देऊन सळो की पळो करून सोडले. चूल पेटली असता तीत खुशाल पाणी ओतावे, सोवळ्यात स्वयंपाक सुरू असता मुद्दाम ओवळ्याने शिवावे, अशासारखे प्रकार त्यांनी केल्याचे पाहून सुरुवातीला आपला नवरा एका वेड्याच्या आहारी गेला आहे असे त्या माऊलीस वाटल्यावाचून राहिले नसेल! परंतु पुढे प्रसंगाने श्रीस्वामी समर्थांचे सामर्थ्य तिला कळून चुकले, त्यामुळे तिने तो त्रासही नंतर निमूटपणे सहनकेला. श्रीसमर्थांची बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती.

स्वामी चरित्रकार कै. भागवत लिहितात: "महाराजांची वृत्ती फारच विलक्षण प्रकारची असे. त्यांच्या वृत्तीस कित्येक लोक पिशाच्चवृत्ती म्हणत. प्रातःकाळ होण्याबरोबर नित्य नेमाने उठून संन्यास धर्मास योग्य असा प्रातःस्नानादिक जप, तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काही एक करण्याचा नेम नसून स्वच्छंदाने व दुसऱ्याच्या हाताने सर्व कारभार होत असे. महाराजांस स्नान दुसऱ्याने घालावे, परंतु स्नान व्हावे असे त्यांच्या मर्जीस आल्यास! महाराजांस जेवण दुसऱ्यानेच घालावे, परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागल्यास! महाराजांच्या अंगावर पांघरूण दुसऱ्यांनीच घालावे, परंतु ते अंगावर असावे असे त्यांना वाटल्यास! महाराजांनी चाहेल त्या ठिकाणी जावे, ती जागा मग राजाचा रंगमहाल असो अगर स्मशानभूमी असो, वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो. महाराजांस प्रतिबंध करणारा कोणी नसे, महाराज चाहेल त्याच्या हातचे अन्न खात असत, परंतु महाराज अधर्मी आहेत अशी कल्पनाही कोणास करवत नसे. महाराजकधी कधी दिवसातून दोन-दोनदा स्नान करीत. केशर-चंदनाची उटी अंगाला लावून घेत आणि आरती करून घेत. कधी कधी आठ-आठ दिवस स्नानच करीत नसत. कोणास नकळत एखाद्या बागेत, स्मशानात अगर जंगलात जाऊन राहत.

महाराज चालू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाच्यानेही चालवत नसे. ते बोलू लागले म्हणजे एकसारखे काही तरी बोलत असत. लहान मुलाजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळच चालावा. एखाद्या वेळी स्वारी रागावली म्हणजे सात-सात दिवस त्यांचा रागच हलू नये. स्वारी आनंदात असली म्हणजे सर्वांजवळ मधुर वाणीने बोलावे, अशा प्रकारे महाराजांची दर घटकेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या पारख्यावाचून कोणासच झाली नाही.'

"गुरुलीलामृत'कार वामनबुवा ब्रह्मचारी लिहितात: "श्रीगुरू चालत असता आपल्याशीच बोलत व हसत. चालताना त्यांना मध्येच गुडगुडी ओढण्याची लहर येई. ते मधूनच झाडांवरून, दगडांवरून प्रेमाने हात फिरवून "तुम्हांला काय हवं?' असा प्रश्र्न करीत. हसताना त्यांचे सर्वांग हलत असे. तोंडातून नित्य वेदमंत्र, दोहे, श्र्लोक व अभंग बाहेर पडत. दुसऱ्याच्या मनातील प्रश्र्न ओळखून त्यांची उत्तरे देण्याचा चाळा तर एकसारखा सुरूच असे.' तर स्वामी बखरकार कै. गोपाळबुवा केळकर आपल्या बखरीत लिहितात: "श्रीस्वामी समर्थांस झोप लागलेली कोणाच्या पाहण्यात नाही. मात्र डोक्यावर पांघरूण घेऊन पलंगावर निजत असत. पहाटे दोन वाजल्यापासून पांघरुणातून अभंगांची कडवी, श्र्लोक म्हणू लागत. जेणेकरून महाराज आता जागे झाले असे लोकांस वाटे. मग कोणाला काही वेदांत, भक्तियोग, हठयोग, राजयोग इत्यादींचे जे काही प्रश्र्न करण्याचे असतात ते तेव्हा करत. त्या त्या लोकांनी केलेल्या प्रश्र्नांची उत्तरे महाराजांनी सरळ आणि अनुभवासह यथार्थ द्यावी, परंतु ही व्यवस्था कोठपर्यंत? उजाडेपर्यंत! एकदा उजाडलेआणि लोकांची गर्दी होऊ लागली, म्हणजे तो सर्व क्रम बदलला,मग काही प्रश्र्न केला, तर त्याला उत्तर बहुतेक करून मिळावयाचे नाही. प्रश्र्न करणाराने प्रश्र्न करावा एक आणि उत्तर मिळावे भलतेच. स्वामी समर्थांची स्वारी सहज बाहेर निघाली म्हणजे सर्व राजचिन्हांनी मंडित दिसावी. छत्रचामरे, पालख्या, मेणे, घोडे, गाड्या, गाई-म्हशींचे खिल्लार, तंबू, कनाती, नगारखाना, वाजंत्री, शिंग, सेवेकऱ्यांची पलटण, पुराणिक, हरदास, गवई, फूलवाले, मिठाईवाले व सर्व प्रकारचे दुकानदार महाराजांबरोबर आहेतच!'

श्रीसमर्थांच्या दर्शनासाठी दररोज शेकड्याने लोक तरी सहज येत व भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असे वाटे की, आपणापेक्षा या महापुरुषाला अधिक ज्ञान आहे! श्रीसमर्थांना सोवळ्या-ओवळ्याचा विशेष विधिनिषेध नसे, परंतु कुणी सेवेकरी भलत्याच ठिकाणी नाक शिंकरला किंवा खाकरला तर बिलकूल खपत नसे. हिंदूंप्रमाणेच मुसलमानांवर प्रेम असून त्यामुळेच मंदिरांप्रमाणेच पीर किंवा दर्ग्याच्या ठिकाणीही ते पुष्कळदा जाऊन बसत. जनावरात गाय आणि कुत्रा त्यांना विशेष प्रिय असे. मांजरावर मात्रत्यांचा फार राग असे. फुलात भगव्या रंगाची फुले त्यांना विशेष आवडत, तर खाण्याच्या पदार्थांत बेसनाचे लाडू, पुरणपोळी, कडबोळी आणि कांद्याची भजी त्यांची विशेष आवडतीहोती. सुंदराबाई त्यांना जेवू घाली त्यावेळी एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्यांना भरवावे लागे. त्यांनी जेवावे म्हणून सुंदराबाई नाना प्रकारच्या युक्त्या-प्रयुक्त्या लढवी. ते पुष्कळदा झोपूनच जेवत, डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपण्याची त्यांना सवय होती आणि विशेष म्हणजे ते पुष्कळदा खुशाल दक्षिणेकडे पाय करून झोपलेले आढळत!

श्रीसमर्थांचे हे वर्णन वाचल्यावर श्रीमद्‌भागवतात यदुराजाला भेटलेल्या अवधूताची आठवण येते. हा अवधूत सदैव ब्रह्मानंदात डुलणारा आणि आत्मज्ञानाच्या तेजाने तळपणारा होता. सर्वत्र आपणच व्यापलेले आहोत, अशी साम्यतात्यांच्या अंगी बाणलेली होती. आत्मज्ञानाच्या सामर्थ्याने द्वैतभावना पूर्णपणे जिंकली होती. त्यांचे वागणे एखाद्या निरागस बालकाप्रमाणे होते. अमृताला लाजविणारे आणि ब्रह्मरसाने भरलेले रसाळ भाषण करीत असत. ब्रह्मरस पिऊन मस्त झाल्यामुळे ते कुणालाही जुमानीत नसत. "हम किसीके ताबेदार नही' असे म्हणणारे श्रीसमर्थ सुंदराबाईंच्या मात्र अर्ध्या वचनात राहिले, हे पाहिल्यावर या बाईंची पूर्वपुण्याई फारच जबरदस्त असली पाहिजे असे म्हणावे लागेल; मात्र "श्रीं'ची सेवा तिने लोभबुद्धीने केली. श्रींवरील आपल्या प्रभावाचा उपयोग करून तिने बराच पैसा गाठी बांधला; परंतु पुण्याई संपल्यावर तिलाही "श्रीं'च्या सेवेतून मुक्त व्हावे लागले. धनप्राप्तीपेक्षा आत्मप्राप्तीसाठी तिने श्रीसमर्थांचा उपयोग करून घेतला असता, तर तिच्या आयुष्याचे सोने झाले असते; परंतु क्षणिक मोहात गुंतलेल्या जिवाला एवढा सारासार विचार राहात नाही हेच खरे! श्रींचे रूपवर्णन.

श्रीस्वामी समर्थ प्रत्यक्ष कसे दिसत, कसे बोलत, कसे चालतयाबद्दल वाचकांना कुतूहल असणे स्वाभाविक असल्याने आपण"श्रीं'च्या रूपवर्णनाकडे वळू. श्रीस्वामी समर्थांचे ठळकवैशिष्ट्य म्हणजे ते दाशरथी रामाप्रमाणे आजानुबाहू होते. त्यांची उंची सहा फुटांपेक्षाही अधिक होती. विशाल उदर, रुंद खांदे, तीक्ष्ण भेदक नजर आणि पांढऱ्याशुभ्र भुवया ही त्यांची आणखी काही वैशिष्ट्ये. श्रींचा वर्ण गव्हाळ असून, कांती इतकी तेजस्वी होती की त्यांच्याकडे एकसारखे टक लावून पाहणे देखील शक्य होत नसे. त्यांच्या तीक्ष्ण नजरेत विलक्षण जरब होती. त्यांचा रागही असा भयंकर की, एकदा विश्र्वासराव मान्यांसारखे शूर सरदार म्हणाले की, "प्रसंग पडल्यास आम्ही वाघाच्या अंगावर चालून जाण्यास भिणार नाही, परंतु श्रीसमर्थांपुढे उभे राहण्यासही आम्हांस धैर्य होत नाही, ते रागावल्यावर जाळून भस्मच करतील, असे भय वाटते!'

श्रींचे कर्ण मंगलमूर्तींप्रमाणे मोठे असून, त्यांची नाजूक पाळी श्रींच्या प्रत्येक हालचालींबरोबर मागे-पुढे हलत असत. हसताना पोट धरून हसण्याची सवय असून, बोलणे अल्प असे. बोलणे बहुधा मराठी किंवा हिंदीतून होई. त्यांची काया जुनाट वाटत असली तरी उत्साह तरुणाला लाजविणारा असा होता. त्यांचे एकंदर शरीर गुलाबपुष्पाप्रमाणे सुकोमल असून त्यांच्या पायास हात लावल्यावर असे वाटे की, यांच्या पावलास हाडे मुळीच नसावीत. त्यांच्या कपाळी चंदनाचा भव्य टिळा, गळ्यात तुळशी वा रुद्राक्ष यांच्या माळा असत. त्यांचे सेवेकरी त्यांना कौपीन नेसवीत. डोक्यावर जरीची कानटोपी घालीत आणि अंगावर शाल पांघरीत; परंतु कोणत्या क्षणी स्वामी महाराज या सर्व वस्तू फेकून देऊन दिगंबर बनतील याचा नेम नसे. असा हा अवधूत श्रीसमर्थांच्या रूपात जणू पुन्हा एकदा भूतलावर प्रकटला होता की काय कुणास ठाऊक! श्रीसमर्थकोण होते?.

मूळ पुरुष-वडाचे झाड-दत्त नगर-मूळ-मूळ' अशा गूढ शब्दांत स्वतःची माहिती सांगणाऱ्या श्रीस्वामी समर्थांचे चरित्र असेच गूढ आणि अतर्क्य घटनांनी ओतप्रोत भरलेले आहे. ते कोण, कोठले, त्यांचे आई-बाप कोण याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. मात्र हा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांच्या काळात काही निकटच्या भक्तांनी करून पाहिला. एकदा चिंतोपंत टोळांच्या घरी स्वामी समर्थांचा मुक्काम असताना "श्रीं'ची स्वारी घराबाहेरील अंगणात बिछान्यावर पहुडली होती. मंडळींशी गप्पा सुरू होत्या. त्या नादात मध्यरात्र केव्हा झाली हे कुणालाच समजले नाही. तेवढ्यात श्रीसमर्थांनी खड्या आवाजात एक जुनी लावणी चालीवर म्हणावयास सुरुवात केली - गोरे ग रूप तुझे। तुला पाहिले। सात ताल माडीवरी।।

श्रीं'च्या तोंडी ही शृंगारिक लावणी पाहून सर्वांनाच मोठे आश्र्चर्य वाटले. तेवढ्यात चिंतोपंतांनी थोडे धाडसकरून विचारले, "महाराज, आपण पूर्वाश्रमी गृहस्थ होता असे वाटते. आपण आपली जात कोणती हे कृपा करून सांगाल का?' त्यावर श्रीसमर्थ चटकन म्हणाले, "आमची जात चांभार, आई महारीण आणि बाप महार.' एवढे सांगून ते पोट धरधरून खो-खो हसत सुटले. पुढे मात्र एकदा कर्वे नावाच्या एका गृहस्थांनी या संदर्भात खुलासेवार सांगण्याची विनंती केल्यावर दत्तावधूत यतिराज त्यांना म्हणाले - "आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंह, काश्य गोत्र, आमची मीन राशी, पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस.' स्वामी समर्थांची जी पत्रिका नाना रेखी यांनी तयार केली तिला स्वामी समर्थांनी मान्यता दिली होती, त्या पत्रिकेवरही"नृसिंहभान' असेच टोपण नाव आढळते; मात्र श्रीसमर्थांनी आपली राशी मीन असे का सांगितले याचे कोडे उलगडत नाही. वास्तविक त्यांचे जन्म लग्न मीन आहे. त्यामुळे त्यांना आपली लग्नराशी अभिप्रेत असावी असे वाटते. कारण सदर पत्रिकेत त्यांची चंद्रराशी मेष दाखविली आहे. तसेच, सदर पत्रिकेत यजुर्वेदी ब्राह्मण, कश्यप गोत्र असेच लिहिले आहे. (ही पत्रिका पाहिल्यावर "नौबत बजाव' असे शब्द श्रीमुखातून बाहेर पडले व दक्षिणा म्हणून श्रीसमर्थांनीनानाजींच्या उजव्या हातावर आत्मलिंगाचा प्रसाद दिला. त्याच वेळी त्यांच्या हातावर नीलवर्णाचे लहानसे विष्णुपाद उमटले. ते मरेपर्यंत त्यांच्या हातावर होते असे म्हणतात.)

श्रीसमर्थ हे खरे तर जगद्‌गुरू होते. जात-पात-धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी विश्र्वोद्धाराचे कार्य केले. तथापि त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे आणि गीतेतील बरेच संस्कृत श्र्लोक नित्य असत. त्यावरून ते ब्राह्मण असावेत, असा त्यांच्या भक्तांचा तर्क असून, श्रीनृसिंह सरस्वती म्हणजेच श्रीस्वामी समर्थ ही गोष्ट ओघानेच मान्य करावी लागते; मात्र माझी जात चांभार, बाप महार आणि आई महारीण असे सांगून श्रीसमर्थांनी जातिभेदाच्या संकुचित कल्पनांमध्ये अडकलेल्या लोकांना चांगलाच धडा शिकविला आहे, असा निष्कर्ष काढल्यास तोही चुकीचा ठरू नये. तेजस्वी शिष्यपरंपरा.

श्रीस्वामी समर्थांच्या दिव्य चरित्राला एखाद्या हिऱ्याप्रमाणे अनेक तेजस्वी पैलू आहेत. त्यात त्यांनी निर्माण केलेली तेजस्वी शिष्यपरंपरा हा पैलू तर विशेषच तेजस्वी आहे. त्यांनी गुरुपदेश मागणाऱ्या ठाकूरदासबुवांना उद्देशून "हमकू कायकू सताता, हम पंतोजीपण नही करता, नाटके गुरु, बाटके चेले हम करते नहीं' असे उद्‌गार काढले असले तरी केवळ दृष्टिक्षेपात संकल्पदीक्षा देऊन त्यांनी गतजन्मीच्या अनेक योगभ्रष्टांना मार्गास लावले ही वस्तुस्थिती आहे. अशी "संकल्प दीक्षा' देणारे सद्‌गुरू या भूतलावर क्वचितच कुठे निर्माण होतात. कोणताही विधी न करता, स्वशिष्याचा सर्वोद्धार व्हावा अशा नुसत्या संकल्पानेच त्याला कृतार्थ करणे, जीवन्मुक्त करणे या दिक्षाप्रकाराला "संकल्प दीक्षा' असे म्हणतात. संकल्प देव तू (ब्रह्मसूत्र ४.४.८) या दीक्षेच्या द्वारे त्यांनी अगदी सामान्यातल्या सामान्य अशा एका मुसलमान भक्ताला त्याच्या सेवेवर संतुष्ट होऊन महान अवलिया बनविले. इतर गुरूंप्रमाणे दीक्षा देण्याचा एखादा "विधी' श्रीसमर्थांनी कधी केला असेल असे वाटत नाही; परंतु केवळ दृष्टिकटाक्ष टाकून संकल्पानेच त्यांनी योग्य त्या व्यक्तींना दिशा दिली आणि पाहता पाहता लोहाचे बावनकशी सुवर्ण बनले! या शिष्यांचे धगधगीत वैराग्य, खडतर तपश्र्चर्या, अपार गुरुभक्ती, उज्ज्वल चारित्र्य, लोकविलक्षण त्याग, ज्वलंत निष्ठा इत्यादी गोष्टी खरोखरच आदर्श होत्या. एका दीपाने हजारो दीप प्रज्वलित व्हावेत त्याप्रमाणे समर्थरूपी ज्ञानदीपाने अनेकांच्या हृदयातील आत्मज्ञानरूपी दीप प्रज्वलित करून त्यांच्या मानवजन्माचे सार्थक केले. एवढेच नव्हे तर ती शिष्यपरंपरा पुढेही चालत राहून हजारो मुमुक्षूंचा त्यायोगे उद्धार झाला आणि अध्यात्मप्रांतात जणू दीपावलीचा थाट उडाला!

या "आदर्श' शिष्यवर्गाची संख्या सहज पंचविसाच्या घरात जाईल. यामध्ये श्रीबीडकर महाराज, श्रीशंकर महाराज आणि काळबोवा (पुणे), श्रीनृसिंह सरस्वती (आळंदी), श्रीसीताराम महाराज (मंगळवेढे), श्रीदेवमामलेदार (नाशिक), श्रीरांगोळी महाराज (मालवण), श्रीकृष्ण सरस्वती (कोल्हापूर), श्रीस्वामीसुत (मुंबई), श्रीबाळप्पा महाराज (अक्कलकोट), ब्रह्मनिष्ठ वामनबुवा (बडोदे), धोंडिबा पलुस्कर (पलुस) आणि श्रीगजानन महाराज (शेगांव) इत्यादी अनेक नावे सहजपणे सांगता येतील. या शिष्यवृंदांची चरित्रेही साधकांना सदैव स्फूर्ती देत राहतील यात तिळमात्र शंका नाही.

अशा प्रकारे श्रीसमर्थांचे खरे अवतारकार्य अक्कलकोट येथेच झाले. या ठिकाणी ते सुमारे एकवीस ते बावीस वर्षे होते. या काळात त्यांनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. नास्तिकांना चमत्कारांच्या द्वारे ईशशक्तीची जाणीव करून देत ईशसेवेला लावले. दुष्टांना सुष्ट बनविले. ढोंग्यांचे ढोंग उघड करून अज्ञ जनांना खऱ्या ईश्र्वरनिष्ठांची ओळख करून दिली. अनेक व्याधिग्रस्तांच्या व्याधी दूर केल्या. अशा प्रकारे जगाची विस्कटलेली घडी पूर्ववत बसविण्यासाठी, निष्ठावान भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सद्‌धर्म, सुसंस्कृती अन्‌ भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठीची अनंत लीला करून श्रीसमर्थांनी आपल्या तेजस्वी अवतारकार्याची सांगता केली.

गजराज लीला
गजराज एक अदभूत लीला

ब्रम्हांडनायक व महाराजांचा गजराज एक अदभूत लीला 

अक्कलकोट गावात महिपालाचे देवालया जवळ मालोजी राजांच्या गव्हार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती. त्या जागेवर आता शाळा आहे. तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला लोकांना त्या रस्त्या वरून जाण्याची भीती वाटू लागली.राजांनी त्याला चारही पायात साखळदंड बांधून जखडून ठेवला तरी तो सोंडेने लोकांवर दगड भिरकावीत आसे. अखेर वैतागून मालोजीराजे स्वामींचे दर्शनास आले असता त्यांनी महाराजांना विचारले “आमचा हत्ती सध्या फारच मजला आहे. लोकांना हि त्याची फार भीती वाटू लागली आहे तर त्याला गोळ्या घालून ठार मारावे का ?” आणि महाराज आपल्या भक्ताच्या त्या हत्ती कडे जाण्यास निघाले. वाटेत लोक महाराजांस सांगू लागले “महाराज या रस्त्याने जाऊ नका! तो हत्ती मोठमोठे दगड सारखा फेकत आहे.” ज्याची सत्ता जगावर चालते, त्याला प्रत्यक्ष काळ हि घाबरतो, आसे साक्षात दत्तावतार श्री स्वामी समर्थ समर्थ बरोबर असताना जे भक्त स्वत:ला सेवक म्हणत होते, ते देह बुद्धी धरून पळून गेले. आणि फक्त एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा, आणि बाबा यादव एवढेच दोन चार जण श्रीं जवळ थांबले.

महाराज कंबरेवर हात ठेऊन हत्ती समोर उभे राहिले आणि त्याला रागाने म्हणाले “मुर्खा, माजलास काय? चढेल तो पडेल बाष्कळपणचा आभिमान सोडून दे!” अशी स्वामींची आज्ञा एकताच तो पिसाळलेला हत्ती शांत होऊन, आपल्या पुढच्या पायाचे गुढगे टेकून गंडस्थळ श्रींच्या चरणी ठेवले. त्याच्या डोळ्यातून एकसारखे आश्रू वाहू लागले. श्रींच्या दर्शनाने एवढा मदोन्मत हत्ती हि पुढे गरीब गाई सारखा झाला. आशा प्रकारे मुकी जनावरे हि श्री स्वामी समर्थांना शरण जातात पण आपल्यासारखी अहंकाराने मदोन्मत झालेले लोक मात्र महाराजांबद्दल संशय घेतात. आसो ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे, श्री स्वामी समर्थांच्या चरणास शरण जाऊन त्यांच्या कृपेला पत्र व्हावे.

ब्रह्माण्ड नायक स्वामी समर्थ
ब्रह्माण्ड नायक श्री स्वामी समर्थ 

श्री बिडकर- स्वर्ण विद्येच्या शिल्पकार, त्यांचा उद्धार

बीडकर नावचे एक गृहस्थ अत्तराचे व्यापारी होते. त्यांचा व्यापार तर चांगलाच चालायचा पण त्यात त्यांना जडीबुटीनी धातूचे स्वर्णकरण्याची विद्या पण हस्तगत झाली होती. त्यांचे एका नर्तकी वर प्रेम होते आणी तिला लग्नाचे वचन पण दिले होते. नर्ताकिनी पण दुसऱ्या लोकासाठी नाचणे बंद केले होते. ती बीडकरांच्या मागे लग्ना साठी लागली होती. पण बीडकर यांचे आधीच लग्न झालेले होते म्हणून त्यांना प्रश्न पडला होता. आपल्या मित्राला आपली चिंता सांगताना त्यंना खबर येते की त्या नर्तकीचा सर्प दंशानी मृत्यू झाला. मित्र त्यांना म्हणतो की ईश्वरानीच तुमची या प्रश्ना पासून सुटका केली. पण त्या नर्तकी वर जीव असल्यानी त्यांना जगा-प्रती थोडा वीतराग आला होता. संसार दु:ख प्राप्त  झाल्यावरच मनुष्याला अध्यात्माची आठवण येते. मनाच्या शांतीसाठी बीडकर आध्यात्मात उपाय शोधात्तात. तितक्यात एक रामदासी उयुन त्यांना  म्हणतो की आध्यात्म-मार्ग इतका सोपा नसतो आणी त्यात तुझ्या सारखा ऐश्वर्यात लोळणारा माणूस काय आध्यात्मा कडे वळणार? त्या रामदासाचा टोमणा बीडकर च्या हृदयात लागतो. ते आपल्या आराध्य देव मारुतीचा मंदिरात जातात. तिथे ते मारुतीचा धावा करतात. तितक्यात त्यांना देववाणी ऐकू येते की अक्कलकोटला स्वामी समर्था कडे जा.

बीडकर अक्कलकोटला येतात. तिथे ते स्वामी सेवेत राहतात. एकदा स्वामींचे पाय चेपताना त्यांचा डोळा लागतो. डोळे उघडतात तेव्हा पाहतात तर काय स्वामी जवळ एक मोठ्ठ्या फणेचा नाग बसला आहे. बीडकर स्वामींवर विश्वास ठेऊन मुखांनी नामस्मरण करत पाय चेपत राहत्तात. स्वामी लगेच उठतात. आणी उठल्या बरोबर बीडकरांच्या श्रीमुखात एक जोरदार ठेवतात. बीडकरचा चेहरा आनंदानी खिळून उठतो. ते आनंदात डोलू लागतात. स्वामी मग त्या नागाला हातात धरून तिथून निघतात. गुरु आपल्या निवडक शिष्यावर शक्तिपात करतो तेव्हा त्याचे प्रकार वेग-वेगळे असतात. चापटी मारणे हा ही एक शक्तीपाताचा प्रकार होता. या मुळे बीडकर यांच्या मनातला द्वंद संपून त्यांना होणाऱ्या उद्वेगाचे निरसन होते. खर ज्ञान मिळाल्यानी त्यांचा चेहरा प्रफुल्लित होतो. ते स्वामी शरणी येतात. स्वामी त्यांना सहस्त्र भोजन घाल असे सांगतात. बीडकर आपल्याकडे असलेल्या अत्तराच्या बाटल्या विकायला निघात्ता पण त्यांना ठेच लागून बाटल्या चकनाचूर होतात. हुशार बाळप्पा त्यांना मार्ग सांगतात. त्या राहिली-सुध्लेल्या अत्तराचं अष्टगंध करून ते राजाला विकून येतात. आणी त्या पैशानी बीडकर सहस्त्र भोजनपार पाडतात. 

स्वामी भोजन ग्रहण करून म्हणतात: "भोजन तो दिया अब दक्षिणा देणने का वक्त आ गया है." पण बिद्कारांकडे पैशे नसतात. सर्व पैशे तर सहस्त्र भोजनात खर्च झालेले असतात. मग स्वामी म्हणतत अरे दक्षिणा नसेल तर एक वचन दे- "जडी बुटी चे कार्य सोडून दे"
जडी-बुटी चे कार्य म्हणजे धातू चे सोने बनवण्याचे कार्य. बीडकरांना प्रश्न पडतो पण ते सद्गुरू आज्ञेला सर्वोपरी मानून सोनं बनवणार नाही अशे वचन देतात. स्वामी मग त्यांना नर्मदा प्रदिक्षणा घालायला सांगतात. माया ही ब्रह्मा आणी मोक्ष प्राप्तीत सर्वात मोठी बाधा असते.
बीडकर यांची आध्यात्म मार्गावर उन्नती व्हावी म्हणू स्वामींनी केलेली ही उपाय योजना होती. नुसते धातूचे स्वर्ण करत बसल्या पेक्ष्या आता बीडकर स्वताच्या जीवनाचे सुवर्ण करण्याच्या मार्गावर चालायला लागले होते.

हमारी कस्तुरी लाओ

ठाकुरदास नावाचा एक प्रसिद्ध प्रभोधनकार होता. तो जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोकं साक्षात डोलायचे.तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही तो दुखी होता-कारण त्याच्या अंगावरउभरलेले कोड. त्याला फक्त हाच प्रश्न होता कि जन्म भर एवढी अनन्य भावानी दत्त उपासना करून आपल्याला कोड का झाला! एक दिवस तो वैतागून निर्णय करतो कि आता संसार सोडून काशीला जाऊन वाचलेले जीवन तिथेच काढावे. तो आपल्या परिवाराची व्यवस्था लाऊन काशी ला जायची तैयारी करतो. त्याआधी तो गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार करतो. जायच्या आधी तो गावकऱ्यांच्या आग्रहाखातर गावात दत्तप्रभोधन करतो. त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन आज्ञा करतात कि काशी ला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्यानी तो काशी ला न जाता अक्कलकोटला जातो. स्वामी त्याला पाहताच म्हणतात: "हमारी कस्तुरी लाओ !" ठाकुरदासला स्वामींचा अधिकार कळतो. स्वामी साक्षात दत्त अवतार आहे, अशी त्याला प्रचीती होते. तो स्वामी चरणी मस्तक ठेवतो. ठाकुरदास स्वामींना म्हणतो: " जन्म भर दत्त-उपासना करून पण मला कुष्ठ रोग का झाला ?" स्वामी म्हणतात: "हे तुझे भोग आहे. वेळ आले कि ते संपतील. "काही दिवसांनी स्वामी ठाकूरदासला चुलीतले विझलेले लाकूड आणायला सांगतात वत्याचे काळोख तोंडावर फासायला सांगतात. ठाकूरदासचा कुष्ठ बरा होतो. स्वामी बोध करतात: " कर्म मुळे विपरीत-प्रारब्ध प्राप्त झाल्यानी सद्कर्माची कास सोडू नये. उपासना पंथ सांडू नये." "भोग आपली वेळ आली कि आपोआप संपणार". ठाकुरदास स्वामी चरणी मस्तक ठेवतो.

ब्रम्हांडनायक श्री स्वामीसमर्थ
ब्रम्हांडनायक श्री स्वामीसमर्थ 

ब्रम्हांडनायकाच्या अदभूत लीला 

श्री स्वामी समर्थांची स्वारी देशमुखांच्या वाड्यात बसली होती.तेव्हा मोगलाईतील एक बाई आपल्या अंध मुलाला घेऊन दर्शनासाठी आली. तिने श्रींचे दर्शन घेऊन त्यांस विनंती केली कि, मौजीबंधन झाल्या पासून मुलाची दृष्टी गेली आहे तरी स्वामींनी कृपा करून त्या मुलास दृष्टी द्यावी. आसे उद्ग्गार ऐकताच महाराज म्हणाले “पाच राक्षस आमची परीक्षा घेण्यासाठी येत आहेत, तेव्हा तुझा मुलगा डोळे उघडिल. ”तेवढ्यात पाच वैष्णव डोक्यावर पगडी घातलेले तेथे आले. आणि स्वामींची कीर्ती ऐकून हे संन्यासी कोठेही जेवतात आणि कोठेही झोपतात, हे कोणत्या शास्त्रात लिहिले आहे हे ढोंग बाहेर काढावे या उद्देशाने श्रींस नमस्कार न करताच मोठ्या अभिमानाने येऊन बसले. त्यातील काही मराठी तर काही कन्नड भाषेत आपापसात चर्चा करू लागले. तेव्हा श्रींनी त्या आंधळ्या मुलास म्हणाले “इकडे ये! या काळ्यांच्या मनातील वाक्ये त्यांना उत्तरासहित सांग.” तो अंध मुलगा स्वामींना म्हणू लागला कि, ”महाराज मला तर अक्षर ओळख देखील नाही, तर मी त्यांना काय सांगणार?” मग समर्थांनी आपल्या गळ्यातील माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फुल त्याच्या डोळ्यास लावले. स्वामींचे हात त्याच्या डोळ्यास लागताच अंध मुलाने डोळे उघडले. आणि त्याच्या डोळ्यातून तेजाचे लोट वागू लागले. आणि तो मुलगा वैष्णवांच्या समोर उभा राहिला आणि त्या वैष्णवांच्या मनात असलेली वेद वाक्ये, भगवत गीतेतील श्लोक त्यांच्या समाधानासाहित सांगू लागला.

स्वामींनी हे दिलेले पारमार्थिक सामर्थ्य पाहून ते वैष्णव चांगलेच घाबरले आणि आपला खोटा अभिमान सोडून अनन्य भावाने स्वामींच्या चरणी लोळू लागले आणि क्षमा मागू लागले, महाराज आप्रधाची क्षमा असावी आशा पद्धतीने आश्रुनी स्वामींच्या पायाला आभिषेक  घातला. मग स्वामींना त्यांची दया आली व ते बोलले “गंगा स्नान करून भागवत धर्माचे आचरण करा” आसा तत्काळ अनुग्रह स्वामींनी त्यांच्यावर केला. त्यानंतर ते वैष्णव निघून गेले. पण त्या नंतर ते न चुकता अक्कलकोटला येऊ लागले. तो अंध मुलगा हि स्वामी कृपेने डोळस व पुढे खूप विद्वान झाला. एकाद्या सामान्य मुलास आपल्या कृपादृष्टीने पारमार्थिक सामर्थ्य देणे हि अतिशय अदभूत आशी गोष्ट आहे. आसे माझ्या बापाचे सामर्थ्य होते.

ब्रम्हांडनायक श्री स्वामीसमर्थ
ब्रम्हांडनायक श्री स्वामीसमर्थ 

गोसाव्याची मनोकामना 

स्वामी निद्रेत असतात आणी बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात, तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात. लोणी खाऊन संतुष्ट भावानी स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात. बाळप्पा प्रांजळपणानी स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात. स्वामी म्हणतात: "भक्ती म्हणझे ईश्वराला वाहून जाणे. आयुष्य आपले नसून ईश्वराचे असं मानुन, तन मन आणि धनानि केलेलं समर्पणम्हणझे भक्ती." तिकडे एक गोसावी जलोधर रोगांनी ग्रस्त होता. त्या रोगामुळे त्याच्या पोटातसदेव कळा निघायच्या. पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती, गोसावी मृत्यू आधी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करू, असा निश्चय करतो. गोसावी पोटदुखीच्या मर्मान्तक वेदना सहन करत द्वाराकेसाठी निघतो. द्वारकेला जातांना रात्री स्वामी, संन्यासाच्या रुपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलवतात. गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो. स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात- "क्यो द्वारका जा रहे थे ना? यहा अक्कलकोट कैसे पहुचे?" गोसावी विस्मित होतो. स्वामी म्हणतात: हमने ही बुलाया था! खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्या शिवाय आम्ही कशे राहणार? गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णाचे दर्शन होतात. गोसावी धन्य होतो, तो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावानी संबोधित करतो. गोसावी म्हणतो: माझी इच्छा पूर्ण झाली आहे, आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही. स्वामी म्हणतात: ती वेळ अजून आली नाही आहे. मग गोसाव्याला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात- "हा पाला रोज वाटून खात जा". काही दिवसांनी गोसावी येउण पूर्ण रोग मुक्त झालो अशी स्वामींना सूचना देतो. स्वामी  म्हणतात- 'अनन्य भाव भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते.' ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच.

मंगळवेढा येथे स्वामी औदुंबराखाली आसनमांडी घालून बसलेले असायचे. गावोगावचे लोक स्वामींच्या दर्शनाला नित्य येत असत. त्यांच्याजवळ आपल्या अडचणी, मनातील दुःखे मोकळी करायचे. स्वामी प्रत्येकाला दुःख-संकटातून सोडवित. स्वामींच्या सहवासात लोकांना खूप आनंद मिळत होता. काही भाग्यवान भक्त नित्य स्वामींच्या दर्शनाला येत. त्या गावात एक कोष्टी रहात होता. तो स्वामींच्या दर्शनाला सकाळ-संध्याकाळ येत असे. स्वामींच्या चरणावर मस्तक ठेऊन आशीर्वाद मिळाला की, आनंदाने तो घरी निघून जायचा. एके दिवशी संध्याकाळी कोष्टी हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, "स्वामी आज माझे वडील वारीबरोबर पंढरपूरला गेले. मला पांडुरंगाच्या दर्शनाला येण्यासाठी आग्रह करीत होते. "मी त्यांना सांगितले की, स्वामींच्या रूपाने मी रोजच पांडुरंगाचे दर्शन घेतो." तेंव्हा स्वामी त्याच्याकडे पाहून फक्त हसले. दोन-चार दिवसांनी आषाढी एकादशीच्या दिवशी कोष्ट्याला स्वप्न पडले. स्वप्नात स्वामींनी दर्शन दिले व त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, "माझ्या भक्ता, ह्या क्षणी तुझे वडील पंढरपुरात  विठ्ठलाचे दरबारात वैकुंठवासी झाले. ते खूप पुण्यवान म्हणून त्यांचा प्रत्यक्ष विठ्ठलासमोर पंढरपुरात स्वर्गवास झाला. कोष्टी आता पोरका झाला होता. तो अतिशय गरीब होता. भिक्षा मागून तो उदरनिर्वाह करू लागला. तो महाराजांचे रोज दर्शन व सेवा करीत असे. महाराजांना त्याची खूप दया येत असे. एकदा परत त्याच्या स्वप्नात येऊन महाराजांनी सांगितले की, "तुझ्या वडिलांनी त्यांचे पश्चात तुझा योगक्षेम नीट चालावा म्हणून तुझ्या घराच्या मागील अंगणात जे तुळशी वृंदावन आहे त्याखाली खूप धन पुरून ठेवले आहे, ते तू घे व सुखात आनंदात दिवस काढ." स्वप्न संपले तेंव्हा कोष्टी जागा झाला. त्याला क्षणभर स्वप्नाचा अर्थ कळेना. वडिलांचा स्वर्गवास झाल्याचे वडिलांचा स्वर्गवास झाल्याचे दुःख तर होतेच, परंतु वडिलांनी आपणासाठी धन जपून ठेवले आहे हे स्वामींना कसे समजले? ह्या गोष्टीचा त्याला विचार पडला. तो मागील अंगणात गेला आणि खणून पाहिले तर त्याला तो धनाचा हंडा मिळाला. स्वप्नातील दृष्टांत खरा झाला. त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. ते धन घेऊन कोष्टी स्वामींकडे गेला. त्यांना साष्टांग नमस्कार घालून सर्व धन त्यांच्या पायावर ठेवले आणि वर तुळशीचे पान ठेवले. तेंव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, "मला काय करायचे आहे हे धन. वडिलांनी तुझ्यासाठी हे ठेवले आहे. तू त्याचा योग्य वापर करून सुखाने राहा." परत स्वामींच्या पायावर त्याने मस्तक ठेऊन आनंदाश्रूनी त्यांच्या चरणावर अभिषेक केला. तो कोष्टी पुढे खूप धनसंपन्न तर झालाच परंतु स्वामींकडे येण्याचा त्याचा दिनक्रम कधीच बदलला नाही.

ब्रम्हांडनायक श्री स्वामीसमर्थ
ब्रम्हांडनायक श्री स्वामीसमर्थ 

गादी आणी पाषण एकसमान 

पुराणिकबुवा नावाजलेले प्रबोधनकार होते. त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान होता.एकदा ते अक्कलकोटला येतात. आपलं ज्ञान अफाट आहे, अशी स्वामींना  प्रचीती यावी, असं त्यांची  इच्छा होती . स्वामी स्वताहून, त्यांना आमच्या समोर कीर्तन करा असं निमंत्रण देतात. पुराणिक बुवा कीर्तन सुरु करतात:- "मानव जीवनात चार पुरूषार्थ असतात- 'धर्म अर्थ काम मोक्ष'यात मोक्षाचं महत्व फार असतं. कारण मोक्षच आपल्याला जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवतो. मोक्ष प्राप्त करायला संतान असावी लागते. निपुत्रीको गतीर्नास्ती या शास्त्र वचना प्रमाणे निपुत्रीकाला गती मिळत नाही." स्वामी एकदम संतापून भडकतात-"बंद कर तुझी वटवट! अरे अशे असत्य वचन सांगून तु लोकांची दिशाभूल करत आहे. अरे नारद,शुकाचार्य, भीष्माचार्य हे सर्व निपुत्रिक होते, यांना काय उत्तम गती मिळाली नाही? अरे तुझ्या कीर्तनानी लोकं देव मार्गावर जायच्या ऐवजी पुत्र प्राप्तीलाच आपलं ध्येय समाझेल. अरे ज्याचं वर्तनच वाईट आहे, पण अनेक पुत्र आहे, त्याला काय गती मिळणार? अरे मोक्ष मिळतो तो अनन्य भावांनी ईश्वर भक्ती करणाऱ्यांना, सदाचरण आचारणाऱ्यांना, परोपकार करणाऱ्यांना. आमचीच चूक झाली जे आम्ही तुला इथे बोलावलं." कीर्तन बंद पडतं. पुराणिक बुवा संतापतात. दुसऱ्या दिवशी पुराणिक बुवा स्वामींना जाब विचारायला येतात. स्वामी निद्राग्रस्त असतात. स्वामींना मऊ-मऊ गादी वर झोपलेले पाहून पुराणिक बुवांनाप्रश्न पडतो, स्वामी सन्यासी असून गादी वर कशे काय झोपतात? पुन्हा कधी तरी स्वामींना गाठू आणी त्याचं पाखंड उजागर करू अश्या बेतांनी पुराणिक बुवा परततात. दुसऱ्या दिवशी पुराणिक पुन्हा येतात, तेव्हा स्वामी कुठे जायच्या तयारीत असतात. पुराणिक  म्हणतात- "मला तुम्हाला काही विचारायचं आहे." स्वामी म्हणतात "आम्हाला वेळ नाही. आम्ही शेजारच्या गावातल्या टेकरीवरच्या देऊळात जात आहे." पुराणिक बुवा पण बरोबर येतात. त्या दिवसात फार थंडी पडली होती. टेकडीच्या पायथ्याशी पोहचता-पोहचता रात्र होते. पुराणिक बुवा फार दमतात, त्यावर हाडं गारठेल अशी थंडी त्यांना बेजार करुन टाकते. ते स्वामींना गावात कुठेतरी मुक्काम करू असं सांगतात.स्वामी म्हणतात -"आम्ही कुठेच जाणार नाही वाटल्यास इथे विश्रांती  घेऊ."पुराणिक एकटेच गावा कडे जायला पाहतात पण वन्य श्वापदांच्या  भयानी ते जाऊ शकत नाही.ते स्वामी कडे परत येतात. स्वामी एका खडकावर निर्विकारपणे विश्रांती घेतात.स्वामी म्हणतात:- "पुराणिक किती वेळ असं उभ राहणार, त्या दुसऱ्या खडकावर जाऊन विश्रांती घे."पुराणिक त्या खडकाला स्पर्श करुन पाहतात, तो खडक थंडी मुळे बर्फाच्या शिळेसारखा जाणवतो. पुराणिक बुवा मनात विचार करतात:- "मला अंगभर कपडे घालुन पण थंडी झोंबूनराह्यली आहे आणी स्वामी एका लंगोटी वर बर्फा सारख्या शिळे वर विश्रांती घेत आहे. पुराणिक बुवा म्हणतात:- "अहो एवढ्या थंड शिळे वर तुम्ही अशे निर्विघ्न कशे झोपू शकतात?" स्वामी म्हणतात:- "अरे आम्ही संन्याशी! आम्हाला खडका वरंच झोपलं पाहिजे, मऊ-मऊ गादी वर कशाला झोपायचं? पुराणिक बुवांना स्वामी अंतरज्ञानी असल्याची प्रचीती येते. ते स्वामींच्या शरणी येतात. "स्वामी तुम्ही असामान्य आहा. तुम्ही देवाचे अवतार आहा. मीच तुम्हाला ओळखण्यात चूक केली. मला क्षमा करा. "स्वामी प्रेमळ शब्दात म्हणतात:- "आम्हाला ओळखण्यात खूब उशीर केला पुराणिक! अरे आम्हाला माहित आहे, तु विद्वान आहे, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याबरोबर श्रद्धा आणी विश्वास पण पाहिजे. ज्याच्या ठायी हे असतात त्याचं हृदय निर्मल होतं. आणी अश्या निर्मल हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो." पुराणिकबुवा प्रांजळ पणे स्वीकृती देतात.

ब्रम्हांडनायक श्री स्वामीसमर्थ
ब्रम्हांडनायक श्री स्वामीसमर्थ 

स्वामी समर्थांचे नीर्वांण, एक लीला! स्वामी होते, स्वामी आहेत, व स्वामी हे असणारच...

हम गया नही जिंदा है या वाक्यातच विलक्षण जादू आहे. हे वाक्य लिहिलं, ऐकलं, वाचलं तरी खूप मानसिक समाधान मिळते, सकारात्मकता येते अन विस्कटलेलं कामही योग्य मार्गी लागते.भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभय वचनाने तर सर्व भीतीच संपवली आहे. वाईट गोष्टींशी, संकटांशी बिनदिक्कत तलवार घेऊन लढा, या युद्धात पूर्वकर्माने तुमच्यावरही वार होतील, तुम्ही ही खाली पडाल पण स्वामी तुम्हाला पुन्हा उठवतील, लढण्याची ताकद देतील शेवटी विजय तुमचाच आहे. फक्त रणछोड दास होऊ नका कारण स्वामींना ते कदापी नाही आवडणार.

स्वामींनी आपल्या निर्वाणाच्या आधीच भक्तांना संकेत दयायला सुरुवात केलेली.आपल्या साऱ्या वस्तू एका भक्ताकडून मागवून घेतल्या. त्यात त्यांचे कमंडलू, खडावा, दंड ही होते. त्या सर्वांना वाटून टाकल्या. त्यावेळी सर्व भक्तांना आश्चर्य वाटले.बावडेकर नामक भक्ताने त्यांना सांगितले की महाराज काहीतरी आपल्या जवळ ठेवा..तर स्वामी म्हणाले "अरे भो***, ही लंगोटी पण माझी नाही, मला काय रे करायच्यात या वस्तू." कोल्हापूरचे वामनराव कोल्हटकर स्वामींचे भक्त. स्वामी त्यांना लाडाने वामन्या अशी हाक मारत. त्यांच्या मनात स्वामींना आपल्या घरी नेऊन भोजन घालावे अशी खूप इच्छा होती पण स्वामींचे वय अन प्रकृती बघता ते स्वामींना काही बोलले नाहीत. एकदा स्वामीच त्यांना म्हणाले "वामन्या भ*****, घरात एवढं धान्य भरून ठेवलस पण आम्हाला कधी जेवायला बोलवलं नाहीस." त्यावेळी वामनराव म्हणाले "महाराज सर्व तुमचंच आहे तुम्ही कधीही यावं." त्यावर स्वामींनी सांगितलं "अस म्हणतोस तर येतो गुरुवारी. भाकरी अन ठेचा करून ठेव." वामनराव अगदी आनंदात घरी परतले. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सर्व जेवणाची तयारी झाली भाकऱ्या, ठेचा, वांग्याचे भरीत. ते दाम्पत्य स्वामींची वाट पाहत होते. स्वामी आले पण ते एकटेच होते त्यांच्याबरोबर त्यांचा भक्तपरिवार नव्हता. वामनरावांनी स्वामींचे मनापासून स्वागत केले अन विचारले तुम्ही एकटे आलात? कोणाला बरोबर नाही आणलंत? त्यावेळी स्वामी म्हणाले "तुला कशाला हव्या नसत्या चांभारचौकशा. भूक लागलेय आम्हाला जेवायला वाढ." आणी स्वामींनी मनसोक्त भोजन केलं. वामनरावांना भरून पावलं स्वामींनी त्यांची इच्छा पूर्ण केली. पण स्वामी एकटेच का आले हा विचार त्यांना शांत बसू देईना म्हणून त्यांनी याबद्दल विचारणा करण्यासाठी एकाला अक्कलकोटला पाठवलं. त्या माणसाने परत आल्यावर सांगितलं की, स्वामींनी मंगळवारीच आपला देह ठेवला. असे हे स्वामी!

चैत्र शुद्ध द्वितीयेला, शके १०७१, इ. स. ११४९ मध्ये छेली खेड्यामध्ये प्रकटलेल्या या परब्रह्ममूर्तीने, अतर्क्य, अद्भुत आणि बोला-बुद्धीच्या पलीकडच्या अनंत लीला करून, शके १८०० च्या चैत्र कृष्ण त्रयोदशीला, मंगळवारी दि. ३० एप्रिल १८७८ रोजी दुपारी ४-४.३० च्या सुमारास अक्कलकोटी देहत्यागाची लीला केली. देहत्यागाची लीला म्हणण्याचे कारण म्हणजे, श्रीस्वामी समर्थांनी प्रत्यक्ष देह ठेवलेलाच नाही. त्यांनी प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराजांना स्वमुखाने सांगितले होते की, ते ८०० वर्षे त्याच देहातून कार्य करीत असून, पुढची हजारो वर्षे ते कार्य चालूच राहणार आहे! शिवाय त्यांचे वचन आहेच, "हम गया नही जिंदा है।" त्यामुळे श्री स्वामी महाराज कुठेही गेलेले नाहीतच. त्यांनी फक्त आपले कार्य पडद्यामागून करावयास सुरुवात केली बस्स इतकंच. स्वामी पूर्ण विश्वात आहेत तर दुसऱ्या कुठल्या निजधामास त्यांना जायची गरजच काय? स्वामींनी अगोदरच सांगितल्याप्रमाणे बुधवार पेठेतील ब्रह्मनंद गुंफेत स्वामीभक्तांनी जड अंतःकरणाने त्यांचा देह ठेवला पण बाळप्पा मात्र रोज स्वामींना अत्तर लावण्यास त्या गुंफेत उतरत असत. चार दिवसांनी स्वामींनीच डोळे उघडून त्यांना बस्स असं सांगितलं. त्या दिवसानंतर पुन्हा कोणीही त्या गुंफेत उतरलं नाही अन दरवाजा कायमचा बंद झाला.

देहत्यागापूर्वी अक्कलकोट जवळील नीलेगांवच्या भाऊसाहेब जहागिरदारांना श्री स्वामींनी "शनिवारी घरी येऊ" असे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी व एक अद्भुत लीला दाखवण्यासाठी देहत्यागानंतर पाच दिवसांनी श्री स्वामी समर्थ नीलेगांवाच्या वेशीबाहेर प्रकटले. या लीलेचे वैशिष्ट्य म्हणजे, स्वामी एकटे नाही तर संपूर्ण लवाजमा, सेवेकरी यांच्यासह तेथे प्रकटले होते. गावातील सर्व लोकांचे दर्शन झाल्यावर ते सगळ्यांसह अचानक कोठेतरी निघून गेले. लोकांनी खूप शोधले. शेवटी दुस-या दिवशी, रविवारी त्यांनी खुलाशासाठी अक्कलकोटात एक माणूस रवाना केला. तोवर दुपारी आणखी एक लीला घडली. स्वामी जहागिरदारांच्या वाड्यात एकटेच प्रकटले, पूजा स्वीकारली पण मौनच बाळगून होते. भाऊसाहेबांना दर्शन देऊन ते साक्षात् परब्रह्म तेथेच अदृश्य झाले. इकडे तो माणूस अक्कलकोटाहून स्वामींच्या मंगळवारी झालेल्या समाधीची वार्ता घेऊनच परतला. नीलेगांवच्या भक्तांना या अतर्क्य स्वामीलीलेचे आश्चर्य वाटून स्वामीप्रेमाने भरून आले. आजही श्री स्वामी समर्थ त्याच पावन देहाने प्रत्यक्ष कार्यरत आहेत, भक्तांचा सर्वतोपरी सांभाळ प्रेमाने करीत आहेत व पुढेही करतीलच!

स्वामी होते, स्वामी आहेत अन स्वामी असणारच!

श्री स्वामी समर्थ व सिद्धी विनायक मंदिर             

मुंबईत राहणाऱ्या माणसाला दादर येथील सिद्धिविनायक मंदिर माहित नाही असे होणारच नाही. या प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. अक्कलकोट स्वामी आणि श्री रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात एक आई आणि मुलाचे नाते होते. असेच एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक स्वामी त्यांना म्हणाले "रामकृष्णा तुला काय हवे?" प्रत्यक्ष ब्रह्माण्ड आपल्या हातात गोटीच्या स्वरूपात धारण करणारे परब्रम्ह देण्यासाठी समोर असताना जांभेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही. ते स्वामींना म्हणाले "स्वामी मला काही नको. तुम्हाला काही द्यायचे असल्यास आपण माझ्या सिद्धिविनायकाला वैभव द्या."

हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला. आपल्या लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले. ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभवसंपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत देत राहील. एका मागणीत दोन हेतू साध्य करण्याची कल्पना स्वामींना आवडली. स्वामींनी आपल्या आजानुबाहुंनी महाराजांना जवळ घेत आशीर्वाद दिला आणि म्हणाले" तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझेच भाग्य आहे. तू मुंबईला गेल्यावर मंगळवारी तुझ्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला जा. तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव. तुझा हा मंदार इंचाइंचाने वाढेल तस तसा तुझा सिद्धिविनायक वाढेल. ज्या दिवशी तो मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने बहरलेला असेल." स्वामींनी तथास्तु म्हटले आणि ते वटवृक्षाच्या दिशेने अंतर्धान पावले. 

चौथ्या दिवशी महाराज प्रभादेवीला आले. प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावले आणि त्या ठिकाणी हात जोडून प्रार्थना केली "स्वामी मी माझे काम केले. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा." असे बोलून महाराज देवासमोर उभे राहिले आणि हात जोडून म्हणाले "हे गजानना श्री स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त होवो. या वैभवाच्या झगमगाटाने तुझ्याकडे भक्त आकर्षित होवोत व त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत."

श्री स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला. जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेले वैभव सिद्धिविनायकाला प्राप्त झाले. त्यांनी लावलेला मंदार वृक्ष जसा जसा बहरत गेला तस तशी सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाली आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताच्या इच्छे खातर प्रभादेवीच्या सिद्धिविनायकालासुद्धा वैभव प्राप्त करून दिले. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वादाने मंदिर प्रासादिक झाले व भक्त कामकल्पद्रुम झाले हे मानण्यास हरकत नाही.

स्वामी  म्हणतात ......प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही..

सुमन नावाची एक स्वामीभक्त स्त्री, गरोदर असतांना स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आपल्या नवऱ्या विष्णू बरोबर येते. स्वामी म्हणतात:-"तुला संतती मिळेल पण जे काही होणार ते सहन करायची तैयारी ठेव." सुमनला स्वामी-वचन खरं होणार ही खात्री होती, पण "तैयारी ठेव" या ताकीदीनी तिचा थरकंप सुटतो. ती या गोष्टी मुळे फार चिंतेत राहायची. सुमनचा भाऊ शिवा जेव्हा स्वामी-दर्शनाला येतो तेव्हा स्वामी त्याला धान्याचे खाली पोतं देतात.शिवा त्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणुन घेतो. सुमन एकदा विहिरीतून पाणी आणतांना चिंतेत असल्यामुळे घसरून पडते.वैद्यबुवा गर्भस्थ शिशुचं निधन झालं आहे, अस निदान करतात आणी सुमन कधीही आई होणार नाही असं पण सांगतात.हे ऐकुन सुमन फार खचून जाते. इकडे शिवाच्या शेतात जोरदार पाऊस पडल्यानी पीक खराब होते. शिवाचे सर्व स्वप्न धुळीत मिळतात. त्याच्यावर देशोधडी वर जायची वेळ येते. इकडे सुमन आत्मघात करायला नदीवर जाते पण अंतर्यामी स्वामी बालळप्पांना वेळेवर पाठवून तिला वाचवतात. स्वामी आणी बाळप्पा मध्ये संवाद होतो-स्वामी: "बाळ्या! अरे आमचे भक्त असले तरी स्वकर्मानी त्यांना प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते. "बाळप्पा: "स्वामी यावर काही उपाय नाही का?" स्वामी: "अरे एकदा पापाचे विपरीत-प्रारब्धात बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही. सद्गुरू त्या भोगालामागे-पुढे करू शकतात पण ते प्रारब्ध भोगावेच लागतात." "अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्व देतो. मनुष्याच्या हातून कळत-नकळत परिस्थितीवश होऊन पाप घडत राहतात आणीत्याचं परिवर्तन विपरीत-प्रारब्धात न व्हावे म्हणूनच ईश्वर भक्ती करायची असते." "लोग कहते है की भगवान के यहा न्याय मे देर है, अरे भगवान सबको समय देता है अपने पापं नष्ट करने का." "कंस, रावण, हिरण्यकश्यप सबको दिया, फिर भी वो नाही माने, तब उनका संहार किया." बाळप्पा: "स्वामी मग अश्या विपरीत प्रारब्धात मनुष्यांनी काय करावे?" स्वामी: "अरे जेव्हा सोसाट्याचे वारे सुटतं तेव्हा मनुष्य काय करतो, आपली पांघरलेली घोंगडी घट्ट धरतो." "पण जेव्हा दुःखाचे वारे सुटते तेव्हाच ईश्वराची कास सोडतो, म्हणतो - "मी देवाचे एवढे करतो पण माझ्यावर हे संकट का आले?". "बाळ्या पण तो हे विसरतो की देवाची जी भक्ती त्यांनी आता पर्यंत केली, ती जर केली नसती तर आणखी भयाण संकट आले असते. "तिकडे शेत व्हायाल्यामुळे शिवा पण खचलेला असतो. त्याची पत्नी त्याचं सांत्वन करते. पण मग त्याच्या मनात विचार येतो, की स्वामीनी धान्याचे खाली पोते देउन आपल्यालाएक खुण केली होती. तो खंबीर होऊन उठतो, आणी आपलं आयुष्य पुन्हा उभं करायला निघतो. स्वामी त्याला सांगतात की जसा तु खंबीर होऊन सावरला तसाच तुझ्या बहिणीला पण व्हायला हवे. तिला जाऊन काही बोध कर. पण तिथे सुमन वेड्यासारखी वागत असते, आणी वेडेपणाच्या भरात ती गळफास लावायला जाते. पण योगा-योगानी शिवा आणी विष्णू तिथे येऊन तिला अडवतात. तितक्यात स्वामी तिथे प्रगट होतात: "सुमन! मरण सोपं नसतं. आणी मरण जीवाच्या हाती नसतं. अरे जर देवानी ठरवलेली वेळ नसली तर काहीही केलं तरी सुटका होणार नाही." "मरण आपल्या ठरलेल्या वेळीच येणार." "अरे आपल्या सासू, नवरा आणी भावाचा विचार कर. तुझ्या या पाऊला मुळे त्यांना काय वाटले असते?" सुमन म्हणते: "स्वामी, संतती नसल्यामुळे जे दुःख होतं त्याचं काय करू?" तितक्यात शारदा (शिवाची बायको) आपल्या नणंदेला आपलं बाळ देते. शारदा: "हे माझं बाळ घे! याला तु आपल्या मुला सारखे वाढव. याची तुला जास्त गरजआहे." "मला काय, मला दुसरं अपत्य होईल." स्वामीवचना प्रमाणे सुमनला संतती प्राप्त होते. सुमन सावरते आणी आनंदानी पुढच्या आयुष्याची सुरुवात करते. तात्पर्य असे की, 

१) स्वामीनंवर विश्वास असणे महत्त्वाचे.
२) प्रारब्ध हे भोगावेचं लागते.
३) स्वामी प्रारब्ध भोगाला पुढे माघे करु शकतात.
४) भक्ती (सेवा) महत्त्वाची.
५) नामस्मरण महत्त्वाचे.
६) आपल्या भक्ती मुळे येणारे दुःख, संकटे जी जितक्या भयानक पध्दतीने येऊ शकतात ती येत नाहीत, आपण हे विसरता कामा नये.
७) सुख आसो किंवा दुःख या दोन्ही वेळेस आपल्या स्वामी भक्ती वर ठाम असावे. फक्त दुःखात त्यांची आठवण नको.
८) मरण हे ठरलेल्या वेळेतचं येणार आधी नाही किंवा नंतर नाही कारण जगी जन्म मूत्यु आसे खेळ ज्यांचा.

श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ - युग कोठलेही असो भगवंताला सुदाम्याचे पोहेच आवडतात!

युग कोठलेही असो भगवंताला सुदाम्याचे पोहेच आवडतात! स्वामींची एक अद्भुत लीला!

जोशीबुवा गडगंज श्रीमंत होते. आपल्या श्रीमंतीचा त्यांना फार अभिमान होता. तात्या वैद्य नावाचा गृहस्थ त्यांच्या घर-गडी म्हणुन राबत होता. कारण त्यांनी जोशी बुवांकडून फार पैशे कर्ज म्हणुन घेतले होते. जोशीबुवांच कर्ज फेडून त्याला दोन वेळेचं जेवण ही महाग झालं होतं. तरी तो उदार वृत्तीचा होता. एकदा तात्याला आणी त्याच्या बायकोला खायला एकच भाखरी होती, ती सुद्धा तो भूखेल्या कुत्र्याला देतो. जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नेवैद्य ग्रहण करायला या, असं आमंत्रण करतात. स्वामी त्याला म्हणतात- "पैशाची श्रीमंती आहे, पण मनाची नाही!" "जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये". जोशीबुवांना परतताना सुंदराबाई अडवतात आणी स्वामींना तुमच्या घरी आणीन असं आश्वासन देतात.

त्याच्या मोबदल्यात सुंदराबाईंना सोन्याच्या मोहरा मिळतात. सुंदराबाई स्वामींना जोशीबुवा कडे चलायला विनवणी करते. स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात, तरीही ते होकार देतात. तात्याला जेव्हा हे कळतं तेव्हा तो जोशी बुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे, असं सांगतो. त्यासाठी तो काही पैसे मागतो. जोशीबुवा जाम भडकतात:- "अरे स्वताच्या खायचे ठिकाणे नाही, आणी स्वामींना बोलावणार." जोशी बुवांनी पैशे नाही दिले म्हणुन तात्या निराश होतो. दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवा कडे येतात. जोशी बुवा स्वामींना नेसायला अत्यंत महागडं पितांबर देतात, आणी यथासांग आदरातीथ्य करतात. त्यांच्या मनात एक प्रश्न येतो कि स्वामी जातांना आपलं महागडं पितांबर तर नाहीना घेऊन जाणार. तितक्यात स्वामी क्रोधित होतात, पितांबर काढुन जोश्यांच्या तोंडावर फेकतात. आणी नेवैद्य ग्रहण न करता परततात. जोशीबुवा क्षमा मागायला येतात. स्वामी म्हणतात- "अरे ऐश्वर्यात लोळुन तुझं मन मलीन झालं आहे. अरे तुला काय वाटलं नेवैद्य ग्रहण करुन आम्ही तो पितांबर घेऊन जाणार? चल निघ इथून." 

इकडे तात्या घरी येऊन पत्नीला सगळं प्रकरण सांगतो. तिकडे एक व्यक्ती येऊन जोशी बुवांना तात्यांनी घेतलेली रकम देऊन तात्याला कर्ज मुक्त करतो. जोशीबुवांना तो आपण तात्याचा हितचिंतक आहे, असं सांगतो. तात्या घरातल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्यारकमेनी स्वामींचं आदरातिथ्य करण्याचं ठरवतो. तो ती मुर्ती उचलतो. त्याच्या बायकोच्या भावना उचंबळून येतात. ती म्हणते- "देवघर रिकामं कसंतरीच दिसतं आहे." तात्या म्हणतो- "अरे स्वामी जीवंत देव असतांना, मुर्तीचा काय विचार करते. मी देवघरचं बाजूला उचलून ठेवतो." खाली पाहतो तर काय! तिथे त्याला स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते. तात्या म्हणतो- "हा स्वामींचा चमत्कार आहे, स्वामींचं आदरातीथ्य करुन शिल्लक उरलेली रकम आपण स्वामींनाच अर्पण करू." तितक्यात त्याला एक हाक ऐकू येते-" तात्या........."

तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय! खुद्द स्वामी बाळप्पा बरोबर त्याच्या घरी न बोलवता आले आहे. तो पत्नीसह स्वामीचरणी मस्तक ठेवतो. तितक्यात एक माणूस येऊन तात्याला सांगतो को तुझ्या पूर्वजांची जमिनीचा विवाद संपून ती जमीन आता तुला प्राप्त झाली आहे, आणी त्याशिवाय कोणीतरी तुझ्यावर असलेलं जोशीबुवांच कर्ज ही फेडले आहे. तात्या स्वामींचं यथासांग आदरातीत्थ्य करतो. तात्या स्वामींना नेवैद्य ग्रहण करायला विनवतो. स्वामी म्हणतात- "अरे हा सर्व सोहळा तुम्ही भक्तांसाठी असतो." "भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती." "तुला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे". तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते. स्वामी आनंदानी खीर ग्रहण करतात. स्वामी म्हणतात- "अरे युग कोणचेही असो भगवंताला सुदामाचेच पोहे आवडतात!"

श्रीस्वामींच्या हातातील गोटी
श्रीस्वामींच्या हातातील गोटी

ब्रह्मांडनायक श्रीस्वामींच्या हातातील गोटीची कथा

श्रीस्वामी समर्थ हातातील गोटीविषयी म्हणाले, ‘अरे सख्या, तुला पाहायचे आहे का, ते काय आहे?’ असे म्हणून त्यांनी गोटी टाकली. तत्क्षणी गोटी ब्रह्मांडरूप होऊन तिचा स्फोट झाला. ब्रह्मांडाचे अधिक व्यापक दर्शन होऊ लागले. सहजलीलेने श्रीस्वामीदेवांनी ते आपल्या बोटात ओढून घेतले. तेव्हा ती पुन्हा गोटीच दिसू लागली. ती भगवन्मूर्ती पुढे म्हणाली, ‘आम्ही हे धरून आहोत तोपर्यंत आहे. आम्ही सोडले की सारे संपले.’

हा रोमांचकारी संवाद श्रीस्वामी महाराज व परमपूज्य मामासाहेब देशपांडे यांच्यामधील असून, श्रीपाद सेवा मंडळ, पुणे या संस्थेचे अध्वर्यु शिरीषदादा कवडे यांच्याबरोबरील चर्चेवेळी समजला. मामासाहेबांची परंपरा श्रीस्वामीदेव व थोरले स्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती अशी आहे. मामांचे पट्टशिष्य असलेल्या दादांकडून श्रीस्वामींच्या ‘ब्रह्मांडनायक’ बिरुदाविषयी जशी स्पष्टता होते, तशाच स्वरूपाचा एक वेगळा अनुभव श्रीस्वामींच्या मुंबापुरी गादीचे मुख्याधिकारी हरिभाऊ तावडे तथा श्रीस्वामीसुतमहाराज यांनी लिहून ठेवला आहे. श्रीस्वामीसुतांनी लिहिलेल्या ‘श्रीस्वामी समर्थ जन्मकांड’ प्रकरणात स्पष्ट उल्लेख आहे की हस्तीनापुर नजीक भगवंताचा परमभक्त विजयसिंग हा गोटीला भगवंत मानून खेळ करीत आहे. 

॥ विजयसिंगे ही गोटी । वटवृक्षछायेस गोमटी । भगवंत मानोनिया जगजेठी । मांडोनिया खेळतसे । नाव घेऊनी भगवंताचे । गोटी आहे कौतुक त्याचे ॥ 

असा तो खेळताना काय करत आहे पहा! 

एकटाच बोले आपसांत। म्हणे देवबापा खेळ वेगी ॥१९॥ 

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील गोटी
दुर्मिळ व अप्राप्य दर्शन स्वामी समर्थांचे हातातील गोटी !
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हातातील गोटी (इंद्रनील मणी) व चरण पादुका (बेळगाव येथील) उपलब्ध आहेत. हा इंद्रनिल मणी बेळगाव येथील सद्गुरु किरण स्वामी ह्यांच्याकडे आहे. पत्ता- श्री स्वामी समर्थ मनमंदिर, सद्गुरु किरण स्वामी नायडू, ९६२, मेणसे गल्ली, बेळगाव, कर्नाटक. राज्य.

असे म्हणत तो स्वत:चा आणि भगवंताचा असे दोन्ही डाव स्वत:च खेळत होता. अशाप्रकारे भगवत्स्वरूपात नित्य मग्न असलेल्या आठ वर्षांच्या विजयसिंगाच्या निमित्ताने भगवान श्रीगणेशांच्या साक्षीने श्रीस्वामी समर्थ प्रकटले.

श्रीस्वामी आपल्या भक्तासोबत खेळण्याची लीला दाखविताना त्या वडाखाली एक श्रीगणेश मंदिर असून, त्या मोरयाचे नाव श्रीवक्रतुंड होते. विशेष म्हणजे श्रीस्वामीदेवांच्या या अद्भुत लीलेचे कौतुक करीत श्रीवक्रतुंड मोरया मोठमोठ्याने हास्य करीत आपल्या देवळातून चालत बाहेर आले. या खेळात रामसिंग, हरिसिंग हे दोन भक्तगणही आहेत. हे हरिसिंगच पुढे श्रीस्वामीरायांचे सुत म्हणून गणले गेले. कर्मधर्मसंयोगाने या नव्या जन्मातही त्यांचे नाव हरिभाऊ असेच होते!

या सर्वांच्या खेळावेळी जी मौज घडली त्याचे अवलोकन करता श्रीस्वामी समर्थ स्वरूपाच्या एका वेगळ्याच दर्शनाने आपण भारावून जाल. या वर्णनाच्या आरंभी श्रीस्वामीसुत म्हणतात, 

दत्त माझा अवतरला । दीन भक्ताच्या काजाला ॥ 

हा श्रीदत्तप्रभूंचा झालेला उल्लेख श्रीस्वामी समर्थांना उद्देशून नाही, हे इथे विशेष आहे. स्वामीसुत म्हणतात, गोटी गोटीचा हा वाद म्हणजे खेळ चालू असताना हरीसिंग हसतो आहे. वक्रतुंड गजाननही अपुल्या चरणांतील नूपुरांचा नादब्रह्म वातावरणात उमटवित, आपली गजशुंडा प्रेमभावाने हलवित दाद देत आहेत. तेव्हा तेथील मंदिराच्या एका खांबातून भगवान श्रीविष्णु प्रकटले. तर श्रीस्वामीदेवांनी टाकलेल्या एका गोटीतून - ती फोडून श्रीदत्त बाहेर आले. 

विष्णू स्तंभी प्रकटले । दत्त गोटी फोडुनि आले ॥ माझ्या स्वामींची करणी । कंप होतसे धरणी ॥ 

असे श्रीस्वामीसुत म्हणतात. श्रीस्वामीमहाराजांचे स्वरूप हे असे आगळे आहे. हळूहळू समजून घ्यावे. ईश्र्वरीय कृपेने ज्यांस सद्गुरु लाभतील, अशा भाग्यवंतास त्या सुयोग्य श्रीगुरुंच्या माध्यमातून श्रीस्वामी समर्थांचे समग्र दर्शन होईल. श्रीस्वामीरायांच्या हाती गोटी आहे, ब्रह्मांड आहे नि त्यात विविध देवताही आहेत. 

देईं देईं माझी ठेव ।। प्रेम हुंडी ती पाठव ।। १ ।।
रंगी होऊनी निधडा ।। तुझा गाजवू पवाडा ।। २ ।। 
माया मातली निर्भर ।। याचा करावा विचार ।। ३ ।।
दिनानाथ कृपावंत ।। ब्रीद तुमचें समर्थ ।। ४ ।। 
आनंद म्हणे करुणाकरा ।। आठव देतों कीं दातारा ।। ५ ।।

स्वामींनी एकाच वेळी पाच रूप, धारण केली आपण हे देव अरूप

अक्कलकोटला आषाढी एकादशीचा उत्सव असतो. पण चोळप्पाची इच्छा होती की स्वामींनी दर वेळे प्रमाणे त्याच्या घरी यावे.त्याचीच नाही तर इतर ३ भक्तांची पण अशीच इच्छा होती.
बाळप्पा यांची स्वामींनी अक्कलकोट-गावाच्या उत्सवाला हजर राहावे अशी होती. या प्रकरणा मुळे त्या सर्वांचा आपसात थोड वाद होतो.
स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हा सर्वांना एक परीक्षा द्यावी लागेल जो उतीर्ण होईल त्याच्या घरी आम्ही येऊ.
पण ठेवण्यात येतो. हातात तेलानी गच्च भरलेली पंती घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एका निश्चित स्थाना वरून सर्वानी स्वामींकडे यायचं.जो पहिले येईल तो जिंकेल आणी स्वामी त्याच्याच घरी येईल.
पण तेलाचा एक थेंबपण सांडायला नको. चोळप्पा सर्वांना पछाडून स्वामींकडे पहिले पोचतो.
पण स्वामी म्हणतात: "अरे पहिले तो आये पर मन में हमारा नाम कहा था?"
मग काय सर्वच अनुतीर्ण झाले होते. आता स्वामी फक्त गावाच्या उत्सवात हजर राहणार होते.
सर्वांना खंत होतो. आणी होणार पण का नाही ? कारण एवढी सोपी गोष्ट न करता आल्यानी स्वामींचे चरण त्यांच्या घरी आता पडणार नव्हते.सर्व निराश होऊन परततात. पण रस्त्यात सर्वांना स्वामी गाठून सांगतात की मी तुझ्या कडे येणार पण मात्र तू कुणालाही सांगू नको.आषाढी एकादशी च्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व मध्ये वाद होतो.चोळप्पा म्हणतात की स्वामी त्याचा कडे आले होते, इतर ३ भक्त पण असंच म्हणतात.
बाळप्पा म्हणतात की उगाच थापा मारू नका स्वामी गावाच्या उउत्सावातून कुठेही गेले नाही.
त्यांचा वाद सुरु असतानाच स्वामी म्हणतात: "अरे तुम्ही लोकं का विसरतात की आम्ही चैतन्य-स्वरूप आहो."
"चैतन्याला स्थूल-देहाच्या मर्यादा नसतात. अरे आम्ही कणा-कणात वावरतो. पाच जागी एका बरोबर प्रगट होणे कोणची मोठी गोष्ट आहे?"
"अरे आम्ही तुमच्या मध्ये सुद्धा आहे, फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची."
"आणी जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतातून हुडकून काढणार तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्म चित्ताला प्राप्त होणार."
"अरे 'अहं ब्रह्मास्मि' उगीच थोडी म्हटले आहे. तुमच्यातच नाही आम्ही सर्व जीवात वास करतो. म्हणून उगाच कुणाला त्रास किंवा मनस्ताप देऊ नका."
सर्व लोकं स्वामींची क्षमा मागतात.
सर्व लोकं स्वामीचे रूप आहे या सिद्धांतावर बसप्पा चालायचे. गरिबाला मदत करतांना सुद्धा ते त्याला स्वामी अशी हाक मारून मदत करायचे.

स्वामी समर्थ
निरंजनी सद्गुरू माझा निजे शेजेला

स्वामींची शेजारती

आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता। स्वामी अवधूता । चिन्मय, सुखधामी जाउनि, पहुडा एकान्ता ।। 
वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडिला । गुरु हा चौक झाडिला।। तयावरि सप्रेमाचा शिडकावा केला ।।१।।
पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ति ।। सुंदर नवविधा भक्ति ।। ज्ञानाच्या समया उजळुनि लाविल्या ज्योती ।।२।। 
भावार्थाचा मंचक ह्दयाकाशीं टांगिला ।। ह्दयाकाशीं टांगिला ।। मनाची सुमनें करूनी केलें शेजेला ।।३।। 
द्वैताचें कपाट लोटूनि एकत्र केले। गुरु हे एकत्र केले । दुर्बुध्दीच्या गांठी सोडुनि पडदे सोडियले ।।४।।
आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनि गलबला । गुरु हा सांडुनि गलबला ।। दया क्षमा शांति दासी उभ्या शेजेला ।।५।।
अलक्ष उन्मनि घेउनि नाजुकसा शेला । गुरू हा नाजुकसा शेला ।। निरंजनी सद्गुरू माझा निजे शेजेला ।।६।।

श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट एक सिद्धभूमी प. पु. आनंदनाथ महाराजांचे अभंगातून!

आनंदनाथ महाराज हे स्वामींचे प्रिय शिष्य होते, आणि स्वामींनी याच आनंदनाथ महाराजावर शिर्डीचे साईबाबा यांना प्रसिद्धिस आणण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी ती लीलया पेलली. नाशिक जिल्ह्यातील सावरगांव येथे मठ स्थापून त्यांनी हे कार्य केले. साईबाबा सुद्धा आनंदनाथ महाराज यांना आपले मोठे गुरुबंधू मानून त्यांचा सन्मान करत असत, आनंदनाथ महाराज भेटीला आल्यावर साईंबाबा आपले द्वारकामाईतील आसन त्यांना बसायला देऊन, आपण स्वतः त्यांची सेवा करत! आनंदनाथ महाराज यायच्या दिवशी भेटीच्या ओढीने दिवस भर साईंबाबा म्हणत, "आज मेरा बडा भाई आनेवाला हैं! आज तो मेरे भाग्य खुलने वाले हैं!" याचा उल्लेख साई सत्चरित्र या ग्रंथात ही आहे.

श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट
श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट

दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामीसुत हरिभाऊ तावडे नंतर स्वामींचे आत्मलिंग मिळालेली दूसरी एकमेव व्यक्ति म्हणजेच हे आनंदनाथ महाराज होत. यावरून आपल्याला त्यांची योग्यता समजेल. एवढ्या मोठ्या अधिकारी पुरुषाचा साधा उल्लेख ही स्वामी चरित्रात नाही. याचे खुप मोठे नवल वाटते. आपण ही आज आनंदनाथ महाराज यांचे अनेक अभंग सुरेल गीत म्हणून गायक अजित कडकडे यांच्या आवाजात ऐकतो. त्यातील प्रेम भावात रंगून जातो, आनंद म्हणे, देवा. या शेवटच्या पदाने आपणआज ही व्याकुळ होतो. मात्र हा आनंद कोण? याचा आपण साधा विचार ही करत नाही. किंवा आपण याकडे लक्ष ही देत नाही. असो.

या आनंदनाथ महाराजांनी अक्कलकोटची महती सांगणारे शेकडो अभंग लिहिले आहेत. यातील निवडक तीन अभंग आपण पाहणार आहोत.

धन्य अक्कलकोट, धन्य बा ही पेठ। सत्य ते वैकुंठ देखियले।।१।। सुंदर देऊळ समर्थाचे जाण। शोभा ही बा पूर्ण आणितसे।।२।। काय वाणू आता तेथील हे भाग्य। मुक्ती लागे वेगे पायरीसी।।३।। जोडूनिया कर देव लोटांगणी। लोळती चरणी समर्थाच्या।।४।। आनंद म्हणे ऐसे पूर्ण परब्रह्म । अक्कलकोटी वर्म राहिलेसे ।।५।।

आपल्या या अभंगात आनंदनाथ महाराज सांगतात की, अक्कलकोट किती धन्य आहे! तेथील बुधवार पेठ किती भाग्यवंत आहे! आनंदनाथ म्हणतात, अक्कलकोट हे मी  भूवरील पाहिलेले प्रत्यक्ष वैकुंठच आहे. येथील स्वामी भगवानांचे सुंदर, आणि अन्तरबाह्य पवित्र पावन करणारे देऊळ हिच खरी वसुंधरेची, धरणी मातेची शोभा आहे. या अखिल विश्वात फक्त येथेच सदैव नाम निराळा राहणारा परब्रह्म सगुण रुपात वावरतो, आपल्या लीला दाखवतो. त्यामुळे ही भूमी व येथील प्रत्येक गोष्ट ही पवित्र आणि कल्याण करणारी आहे. या भूमीची एवढी महती आहे की, ज्याला मुक्ति पाहिजे त्याने केवळ येथील स्वामी मंदिरातील पायरीचे दर्शन घ्यावे! बस्स! एवढ्याने त्याला सहज मुक्ती मिळेल. वेगळे काही करायची गरज नाही. एवढे महान तीर्थक्षेत्र अक्कलकोट आहे. आनंदनाथ महाराज म्हणतात, अहो मी काय अक्कलकोटाची महती वर्णन करावी, जेथे आपले दोन्ही हात जोडून सर्व देवता समर्थ चरणी लोटांगण घेतात ती पूण्यभूमी अक्कलकोट आहे. एवढा अधिकारी पूर्ण परब्रह्म जेथे राहतो त्या क्षेत्राचे काय वर्णन करावे? हा एक यक्ष प्रश्नच आहे, असे आनंदनाथ महाराजांना वाटते. तसे वाटने स्वाभाविक ही आहे, कारण जेथे संत राहतात ते पुण्यक्षेत्र बनते, जेथे देवतांनी काही काळ वास्तव्य केले ते पवित्र क्षेत्र बनते, तर जेथे देवतांचा निवास असतो ते तीर्थक्षेत्र बनते. आणि जे अक्कलकोट या सर्व देवतांचे तीर्थक्षेत्र आहे, जेथे या सर्व देवता हात जोडून लोटांगण घालतात, त्या तीर्थराज आणि तीर्थक्षेत्राचे मेरुमणी असलेले अक्कलकोट याचे मोल आपण काय ठरवणार? याचेच वर्म वाटते. असे आनंदनाथ सांगतात.

धन्य धन्य अक्कलकोट झाले । उद्धाराया भले पतितासी ।।१।। जाता तेथे कोन अवचित प्राणी । जाय उद्धरोनी स्वामीकृपे ।।२।। प्रेमभावे ज्याने वारी नेमियली । कुळे उद्धरिली कितीएक ।।३।। स्वामीपायी प्रीती ठेवावी वैभवे । शांती सुख गाव गुरुराज ।।४।। आनंद म्हणे तरी जा रे अक्कलकोटी । हित ते निकटी साधा वेगी ।।५।।

आपल्या दुसऱ्या अभंगात आनंदनाथ महाराज म्हणतात, अक्कलकोट हे स्वामी पदस्पर्शाने स्वतः तर धन्य झालेच आहे, पण अगणित पापी, पतित, दुराचारी यांचा उद्धार करणारे तीर्थराज म्हणूनही ते धन्य धन्य झाले आहे!

अक्कलकोट हे विश्व प्रसिद्ध एकमेद्वितीय असे तीर्थराज आहे की, जेथे कोणी जर अवचितपणे ही गेले तरी त्याचा उद्धार होतो. म्हणजे कोणीही अगदी सहज अथवा थट्टा म्हणून किंवा वाईट भावनेने, बळजबरीने जरी अक्कलकोट मध्ये गेले, अथवा कुठल्याही कारणाने अक्कलकोटच्या भूमीवर आपले पाऊल पडले तरी सुद्धा आपला उद्धार सहज स्वामीकृपेने होतो. एवढे अगणित महत्व अक्कलकोट भूमीचे आहे. अक्कलकोटी सहज जाणाऱ्या भक्ताचा उद्धार तर होतोच, मात्र जो स्वामी भक्त स्वामी भक्तित दंग होऊन, स्वामी प्रेमात रंगून  अक्कलकोटाची प्रेमभावे वारी करतो, त्याच्या सह त्याच्या पूर्ण कूळाचा उद्धार स्वामी करतात. (आनंदनाथ महाराज म्हणत, प्रत्येक पौर्णिमेला अक्कलकोटाची वारी करावी, ज्यांना हे शक्य नाही त्यांनी प्रति वर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला अक्कलकोटी नक्की जावे) अशी अक्कलकोटाची ख्याती व अपूर्वाई आहे, असे आनंदनाथ महाराज सांगतात. त्यामुळे स्वामी भक्त हो स्वामींच्या चरणी आपली भक्ति एकनिष्ठपणे ठेवा, स्वामी आपल्याला सुख, शांती, वैभव सर्व काही देतील. दूसरी कडे कुठेही जायची गरज नाही. स्वामी महाराज हे सर्व वैभवाचे भांडार आहेत. त्यांच्या अगाध कृपेचा लाभ घेण्यासाठी फक्त अढळ श्रद्धा एवढेच भांडवल लागते. दूसर काही नाही. त्यामुळे आनंदनाथ महाराज आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती करून सांगत आहेत की, *बाबांनो तात्काळ अक्कलकोटी जा, आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्या! ती योगीराज मूर्ती केवळ आपलीच वाट पाहत अक्कलकोटी बसलेली आहे, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता, लगेच अक्कलकोट जवळ करा, आपले हित साधा. अशी आपुलकीची साद सर्व स्वामी भक्तांना आनंदनाथ महाराज घालत आहेत.

अक्कलकोटी वस्ती भाग्याची ही जोड । कल्पनेचा मोड नाही तेथे । शुद्ध प्रेमभाव पादुका दर्शन । कुशवर्ती स्नान बारा वेळ ।।२।। प्रदक्षिणा केल्या पाप सरुनी जाय । पवित्र तो होय देह तेथे ।।३।। शुद्ध अनुष्ठान जणू तेची ध्यान । आवड ही पूर्ण स्वामीपायी ।।४।। आनंद म्हणे तया होईल दृष्टांत । दैवगती भेट कलियुगी ।।५।।

आजच्या या आपल्या शेवटच्या अभंगात आनंदनाथ महाराज म्हणतात, अक्कलकोटी वस्ती करणे म्हणजे ही खुपच भाग्याची गोष्ट आहे. जन्मोजन्मीची पुण्याई जेव्हा फळाला येते, तेव्हाच अशा पवित्र पावन ठिकाणी वस्ती करण्याचा योग येतो. येथे घालवलेले काही क्षण ही अनेक जन्माची शिदोरी ठरते. आणि स्वामी भक्त हो, ही केवळ कवी कल्पना नाही तर सूर्य प्रकाशा इतके सत्य वचन आहे. या अक्कलकोटाचे पूण्य काय आणि किती वर्णावे? येथील स्वामी मंदिरात स्थापित असलेल्या स्वामी देवांच्या पादुकांचे फक्त प्रेमभावे दर्शन घेतले तरी बारा वेळा कुशावर्ती स्नान केल्याचे पूण्य मिळते. म्हणजे बारा वेळा केलेली कुशावर्ती यात्रा आणि एक वेळा केलेले अक्कलकोट हे दोन्ही सारखेच! येथील स्वामी परब्रह्माच्या मंदिराला केवळ प्रदक्षिणा जरी घातल्या तरी जन्म जन्मांतरीचे पाप नष्ट होऊन, प्रदक्षिणा घालणाऱ्याच्या देह पवित्र होतो. अनेक वेळा गंगा स्नानाने मिळणारी एवढी मोठी फल प्राप्ती अक्कलकोटात  केवळ प्रदक्षिणा घातल्याने मिळते.

अनेक साधू, संत, साधक हे पुष्कळ दिवस अनुष्ठान करून देवाला आळवतात, त्याची करुणा भाकतात. परंतु स्वामी भक्तांनी अक्कलकोटात फक्त आपल्या लाडक्या परब्रह्म स्वामी मुर्तीचे नुसते ध्यान जरी केले, तरी तेच शुद्ध अनुष्ठान ठरते आणि स्वामी प्रसन्न होतात.* एवढे महत्व अक्कलकोटी केलेल्या ध्यानाचे आहे. आणि आपल्या या अभंगाच्या शेवटी आनंदनाथ महाराजांनी केलेले विधान हे सर्व स्वामी भक्तांसाठी वरदान ठरलेले आहे. या शब्दात त्यांची स्वामी वरील भक्ति आणि स्वामींचा त्यांच्या विधानाला असलेला आशीर्वाद, यातून प्रतीत होतो. हे शब्द केवळ एका कविचे शब्द नाहीत, तर जगात डंका वाजवणाऱ्या साईंबाबाना ज्यांनी पुढे आणले त्या अधिकारी पुरुषाचे हे शब्द आहेत. त्या अर्थाने हे महत्वपूर्ण ठरतात. तर शेवटी आनंदनाथ महाराज स्वानुभवाने सांगतात की, स्वामी भक्त हो दूसरे काही ही न करता केवळ अक्कलकोटी जाऊन, माझ्या पूर्ण परब्रह्म स्वरूप स्वामी देवांच्या पादुकांचे दर्शन घेऊन, तेथील देवळाला प्रदक्षिणा घातल्याने व शुद्ध स्वरूपातील या चैतन्य परब्रह्म मुर्तीचे फक्त प्रेमभावे ध्यान केल्याने, त्या स्वामी भक्ताला स्वामींचा दृष्टांत होईल! अल्पशा भक्तिने सहज प्रसन्न होणाऱ्या माझ्या परब्रह्म स्वामी  कडून त्या भक्ताला या कलयुगातून मुक्ती मिळाल्याची, दैवगती भेटल्याची भेट मिळेल! जे जप, तप, योग, ध्यान करूनही दुर्लभ आहे, असे मोक्ष स्थान अगदी सहज पणे मिळवून देणारे अक्कलकोट हे अखिल ब्रह्माण्डात केवळ एकमेद्वितीय स्थान आहे. त्यामुळे स्वामी भक्त हो, अक्कलकोटी माझ्या स्वामी आईला शरण जाऊन मुक्ति मिळवा. असा साधा सरळ सोपा संदेश आनंदनाथ महाराज यांनी केलेला आहे. याला स्वामींनीही आयुष्यभर अनुमोदन दिलेले आहे. स्वामींनी कधीही आपल्या कुठल्याही भक्ताला इतर देवतेच्या दर्शनाला जाऊ दिले नाही. यात बाळाप्पा महाराज यांचे थांबवलेले कुलदेवी दर्शन असो, शंकराची पूजा असो, चोळाप्पा महाराज व बाळप्पा महाराज यांचे तुळजापुर येथे जाणे असो, किंवा पंढरपुर येथे जाणे असो! सर्वांना स्वामी विरोधच केला. जग भरातील अनेक दुःखित, पीडित, मुमुक्षु, साधक, भक्त, तपस्वी हे शेवटी अक्कलकोटीच आले. त्यांचे कल्याण येथेच झाले! तेव्हा अक्कलकोट सोडून ईतर ठिकाणी वणवण फिरणारे कधी जागे होतील, कधी त्यांना कळेल की, स्वामींनी 'अकलसे खुदा पहचानो!' हे आपल्या सारख्या वाट चूकलेल्या भक्तांनाच सांगितले आहे! असो!

तेव्हा एवढे मोठे पवित्र भू-वैकुंठ अक्कलकोट असताना, तेथे न जाणे हे किती मोठे दुर्देव आहे. सर्व सूखे जेथे हात जोडून उभे आहेत. सर्व देवता ही जेथे लोटांगण घेतात, त्या अक्कलकोटी जाणे सोडून इतर तीर्थक्षेत्री जाणे हा केवळ आणि केवळ आपला कपाळकरंटेपणाच आहे. हे जेव्हा स्वामी भक्तांना कळेल, तो दिवस त्यांच्या आयुष्यातील भाग्याचा दिवस असेल.

असा भाग्याचा दिवस सर्व स्वामी भक्तांच्या आयुष्यात लवकरच येवो, हिच अनंतकोटी ब्रह्माण्डनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना!

श्री स्वामी समर्थ १०८ नामावली

श्री स्वामी समर्थांची १०८ नामांची नामावली अत्यंत प्रभावी आहे. ही नामावली जप करावा .करताना उदबत्ती लाऊन वाचावी. किंवा एका कागदावर रोज वहीत लिहावी. अद्भुत अनुभव येतील अवश्य अनुभव घेऊन बघा.

ॐ दिगंबराय नमः,
ॐ वैराग्यांबराय नम:, 
ॐ ज्ञानांबराय नमः,
ॐ स्वानदांबराय नमः, 
ॐ अतिदिव्यतेजांबराय नमः,
ॐ काव्यशक्तिप्रदायिने नमः,
ॐ अमृतमंत्रदायिने नमः,
ॐ दिव्यज्ञानादत्ताय नमः,
ॐ दिव्यचक्षुदायिने नमः,
ॐ चित्ताकर्षणाय नमः,
ॐ चित्तशांताय नमः,
ॐ दिव्यानुसंधानप्रदायिने नमः,
ॐ सद्गुणविवर्धनाय नम: ,
ॐ अष्टसिध्दिदायकम नमः,
ॐ भक्तिवैराग्यदत्ताय नमः,
ॐ मुक्तिभुक्तिशक्तिप्रदायने नमः,
ॐ गर्वदहनाय नम:,
ॐ षङरिपुहरिताय नमः,
ॐ आत्मविज्ञानप्रेरकाय नमः,
ॐ अमृतानंददत्ताय नमः,
ॐ चैतन्यतेजसे नमः,
ॐ श्रीसमर्थयतये नमः,
ॐ भक्तसंरक्षकाय नम:,
ॐ अनंतकोटिब्रम्हांडप्रमुखाय नमः,
ॐ अवधूतदत्तात्रैय नम:,
ॐ चंचलेश्वराय नमः,
ॐ आजानुबाहवे नमः,
ॐ आदिगुरवे नम:,
ॐ श्रीपादवल्ल्भाय नमः,
ॐ नृसिंहभानुसरस्वत्ये नमः,
ॐ कुरवपुरवासिने नमः,
ॐ गंधर्वपुरवासिने नमः,
ॐ गिरनारवासिने नमः,
ॐ श्रीकौशल्यनिवासिने नम:,
ॐ ओंकारवासिने नमः,
ॐ आत्मसूर्याय नमः,
ॐ प्रखरतेजा प्रचतिने नमः,
ॐ अमोघतेजानंदाय नमः,
ॐ तेजोधराय नमः,
ॐ परमसिध्दयोगेश्वराय नमः,
ॐ स्वनंदकंदस्वामिने नमः,
ॐ स्मर्तृगामिने नमः,
ॐ कृष्णानंद अतिप्रियाय नमः,
ॐ योगिराजेश्वरया नम:,
ॐ भक्तचिंतामणिश्वराय नमः,
ॐ नित्यचिदानंदाय नमः,
ॐ अकारणकारुण्यमूर्तये नमः,
ॐ चिरंजीवचैत्यन्याय नमः,
ॐ अचिंत्यनिरंजनाय नमः,
ॐ दयानिधये नमः,
ॐ भक्तचिंतामणीश्वराय नमः,
ॐ शरणागतकवचाय नमः,
ॐ वेदस्फूर्तिदायिने नमः,
ॐ महामंत्रराजाय नमः,
ॐ अनाहतनादप्रदानाय नमः,
ॐ सुकोमलपादांबुजाय नमः,
ॐ चित्शक्यात्मने नमः,
ॐ अतिस्थिराय नमः,
ॐ माध्यन्हभिक्षाप्रियाय नमः,
ॐ प्रेमभिक्षांकिताय नमः,
ॐ योगक्षेमवाहिने नमः,
ॐ भक्तकल्पवृ़क्षाय नमः,
ॐ अनंतशक्तीसूत्रधराय नमः,
ॐ परब्रह्माय नमः,
ॐ अनितृप्तपरमतृप्ताय नमः,
ॐ स्वावलंबनसूत्रदाये नमः,
ॐ असमर्थसामर्थ्यदायिने नमः,
ॐ योगसिध्ददायकम नमः,
ॐ बाल्यभावप्रियांय नमः,
ॐ भक्तिनिधनाय नमः,
ॐ औदुंबरप्रियाय नमः,
ॐ यजसुंकोमतलनुधारकाय नम:,
ॐ त्रिमूर्तिध्वजधारकाय नमः,
ॐ चिदाकाशव्याप्ताय नमः,
ॐ केशरचंदनकस्तूरीसुगंधप्रियाय नमः,
ॐ साधक संजीवन्यै नमः, 
ॐ कुंडलिनीस्फूर्तिदात्रे नमः, 
ॐ अक्षरवालाय नमः, 
ॐ आनंदवर्धनाय नमः, 
ॐ सुखनिधानाय नमः,
ॐ उपमातिते नमः, 
ॐ भक्तिसंगीतप्रियाय नमः,
ॐ अकारणसिध्दिकृपाकारकाय नमः,
ॐ भवभयभंजनाय नमः,
ॐ स्मितहास्यानंदाय नमः,
ॐ संकल्पसिध्दाय नमः,
ॐ संकल्पसिध्दिदात्रे नमः,
ॐ सर्वबंधमोक्षदायकाय नमः,
ॐ ज्ञानातीतज्ञानभास्कराय नमः,
ॐ श्रीकिर्तीनाममंत्राभ्यों नमः,
ॐ अभयवरददायिने नमः,
ॐ गुरुलीलामृत धाराय नमः, 
ॐ गुरुलीलामृतधारकाय नमः,
ॐ वज्रसुकोमलहृदयधारिणे नमः,
ॐ सुविकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः,
ॐ निर्विकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः,
ॐ त्रिकालातीतत्रिकालज्ञानिने नमः,
ॐ भावातीतभावसमाधिभ्यों नमः,
ॐ ब्रंह्मातीत - अणुरेणुव्यापकाय नमः,
ॐ त्रिगुणातीतसगुणसाकारसुलक्षणाय नमः,
ॐ बंधनातीतभक्तिकिरणबंधाय नमः,
ॐ देहातीतसदेहदर्शनदायकाय नमः,
ॐ चिंतनातीतसदेहदर्शनदायकाय नमः,
ॐ मौनातीत - उन्मनीभावप्रियाय नमः,
ॐ बुध्दयतीतसद् बुध्दिप्रेरकाय नमः,
ॐ मत् प्रिय - पितामहसद् गुरुभ्यों नमः,
ॐ पवित्रमात्यसाहेबचरणाविदभ्यो नमः

|| अनुसूया सत्त्व हरावयासी || || त्रिमुर्ति जातां करी बाळ त्यांसी || || निजे पालखीं सर्वदा सौख्यकारी || || तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ||५|| 
|| श्री दत्तस्तुती ||
   

राजेराय मठ अक्कलकोट
राजेराय मठ अक्कलकोट- 
स्वामींच्या इच्छेने बांधलेला अक्कलकोट मधील पहिला मठ. या मठातील पादुका साक्षात स्वामींनी स्थापन केल्या.

श्री स्वामी समर्थ  हेच श्री नृसिंह सरस्वती दत्तगुरूंचे तिसरे पूर्णावतार

नृसिंह सरस्वती श्री शैल्य यात्रेच्या निमित्ताने कर्दली वनात गुप्त झाले. याच वनात तीनशे वर्षे ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात त्यांच्या दिव्य शरीराभोवती मुंग्यांनी प्रचंड वारूळ निर्माण केले. या जंगलात एका लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारूळावर चुकून बसला व श्री स्वामी वारुळातून बाहेर आले. 'त्यानंतर स्वामींनी पूर्ण भारत भर भ्रमण केले.व त्यानंतर अक्कलकोटी येउनि स्थिरावले. या काळात त्यांनी अनेक भक्तांना दत्तरुपत दर्शन दिले तर कुणाला दृष्टांतामधून दत्तरुपाने 'मी सध्या प्रत्यक्ष रूपाने अक्कलकोटी आहे'. असे सांगितले. त्याच ह्या कथा. 

१) एके दिवशी गाणगापुरातले काही पुजारी श्रींच्या दर्शनाला आले. दर्शन झाल्यानंतर समर्थांनी त्यांना तुमच्या देवाचे नाव काय असे विचारले. त्यावर पुजार्यांनी 'नृसिंहसरस्वती' असे उत्तर दिले. त्यावर समर्थ म्हणाले आमच्या देवासही नृसिंहभान असे म्हणतात बरे! 
२) एका घाटावरील ब्राह्मणाने गाणगापुरच्या नृसिंहसरस्वतींना मुलगा झाल्यास त्याचे उपनयन गाणगापुरात येउन करेन असा नवस केला. मुलगा झाला, त्यानंतर काही वर्षांनी नवस फेडावयास म्हणून तो ब्राह्मण सहकुटुंब गाणगापुरास निघाला.
अक्कलकोटा नजीक येउन नेमके त्याच्या जवळचे पैसे संपले. त्यांने स्वामी समर्थांविषयी ऐकले होते. तो स्वामींच्या दर्शनास आला आणि स्वामींजवळ त्याने आपले मनोगत व्यक्त केले कि आता गाणगापुरला जाउन नवस फेडणे शक्य नाही तरी तुम्ही प्रत्यक्ष दत्तावतारी आहात. मी तुमच्या इथेच नवस फेडतो. स्वामींनी मान हलवली. इतक्यात ब्राम्हणाला पैशाची मदत होऊन त्याने उपनयन विधी हि उरकला आणि मोठ्या आनंदाने तो स्वगृही आला. त्यानंतर प्रत्यक्ष दत्तगुरूंनी नवसाची सांगता झाल्याचा स्वप्नात दृष्टांत झाला.
३) मुंबईचे ठाकूर दास बुवा हे मुळचे दत्तभक्त, गाणगापुरच्या श्रींवर श्रद्धा होती. पुढे प्रारब्धकर्माने त्यांच्या अंगावरती श्वेतकुष्ठ आले. चेहरा विद्रूप दिसू लागला. दोन वर्षापर्यंत अनेक उपचार केले पण काही गुण आला नाही. त्यांना खूप दुःख झाले. त्यांनी ठरवले कि आता काशी क्षेत्रात वास करून राहणे योग्य. तेव्हा ते सहकुटुंब गाणगापुरला शेवटचे दर्शन घेण्यास निघाले. श्रींच्या पादुकांवर त्यांनी कस्तुरी अर्पण करावी अशी त्यांची इच्छा होती. तसे त्यांनी उत्तम कस्तुरी विकत घेऊन आणली होती. दर्शन घेऊन ते ती कस्तुरी पादुकांवर अर्पण करण्यास विसरले. पुढे त्यांनी देवळात कीर्तन केले. उत्तम प्रकारे मनोभावे सेवा केलि. व काशीस जाण्याची आज्ञा मागितली. रात्री स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला. दत्तगुरू स्वये स्वप्नात येउन म्हणाले कि मी अक्कल्कोति वास करून आहे, माझे तुला प्रत्यक्ष दर्शन होइल. आणि तुझा कुष्टपरिहार होइल.सकाळी बुवांना स्वप्नाचे स्मरण झाले. त्यासरशी बुवांनी दर्शन घेऊन अक्कलकोट चा रस्ता धरला. अक्कलकोटी आल्यानंतर स्वामींना पाहून ते हरवून गेले.लगबगीने दर्शन घेण्यासाठी चरणावरती डोके ठेवले इतक्यात स्वामी त्यांस म्हणाले. 'हमारी कस्तुरी अभी का अभी लाव'. बुवांना कस्तुरी श्री दत्तां प्रित्यर्थ आणल्याचे स्मरले, परंतु ती गाणगापुरला अर्पण करण्यास विसरलो याची जाणीव झाली आणि स्वामी समर्थ साक्षात दत्त अवतार आहेत, त्यांच्या अन्तःसाक्षित्वाची कल्पना आली. लगेच च त्यांनी कस्तुरी स्वामींना अर्पण केली. स्वामींनी हसत हसत ती तिथे असलेल्या लहान मुलांमध्ये वाटून टाकली. पुढे काही काळाने स्वामी कृपेने बुवांचा दुर्धर श्वेतकुष्ठ बरा झाला. 
४) कर्नाटकातील श्रीधर नावाचा गृहस्थ पोटशूलाच्या व्याधी ने त्रस्त झाला होता. बरेच दिवस तो गुण यावा म्हणून गाणगापुरला दत्तपादुकांची सेवा करत होत. एके रात्री यतीरुपाने दत्तगुरूंनी स्वप्नात येउन त्याला सांगितले श्रिपुरिच्या झाडाचा रस काढून त्यात सैंधव व सुंठ घालून सेवन कर म्हणजे तुझी व्याधी जाइल.सकाळी त्याला याचे स्मरण झाले. पण श्रिपुरिचे झाड म्हणजे नेमके कोणते हे त्यास कळेना. त्याने गावातील जाणकारांना, वैद्यांना याबाबत विचारले पण कुणीच काही संगे ना,श्रीधर अशाच भ्रांतीत असताना त्यास श्रींनी स्वप्नात येउन सांगितले कि अक्कलकोटास परमहंसस्वामी आहेत, ते तुला याबद्दल सांगतील. तो दुसरे दिवशी तडक अक्कलकोटास गेला, श्रींची मूर्ती पाहून त्यास परम समाधान झाले. दर्शन घेणार इतक्यात स्वामींनी त्यास सांगितले अरे कडूनिंबाच्या झाडास श्रिपुरि असे म्हणतात त्यात सैंधव आणि सुंठ घालून तीन दिवस घे म्हणजे तुझी व्याधी जाइल. तसे केल्यानंतर श्रीधर चा पोटशूळ नाहीसा झाला. 

श्री स्वामींची श्री पूज्य गोपाळ बुवा केळकर लिखित बखर वाचल्यास कितीतरी जणांना जे गाणगापूर, नरसोबाची वाडी, पंढरपूर अशा ठिकाणी उपासना करत होते त्यांना अक्कलकोटी प्रत्यक्ष रूपाने दर्शन होईल असे दृष्टांत झाल्याच्या कथा दखल म्हणून आहेत. आजही कित्येक भाविकांना याची प्रचीती येते. तर माणिकप्रभू, साईबाबा, गजानन महाराज यांनी सुद्धा स्वामी समर्थ आणि आमच्यात काही भेद नाही अशा लीला भक्तांना दाखविल्या त्याबद्दल च्या नोंदी श्री साई चरित व इतर चरित्रांमध्ये आहेत. 
येथे भक्तकवी मिलिंदमाधव कृत स्वामींच्या छोट्या चरित्र पोथीमधील काही श्लोकांचा संदर्भ द्यावासा वाटतो. 

स्वामी समर्थ अक्कलकोटचे | चवथे अवतार दत्तात्रयाचे |
तीन अवतार यापूर्वीचे | गुरुचरित्री वर्णिले || २० ||

पहिले दत्तात्रेय, दुसरे श्रीपादवल्लभ | नृसिंहसरस्वती हे तिसरे नांव शुभ |
गाणगापूर दर्शन देवदुर्लभ | जागृत दत्तस्थान ते || २१ ||

तेथे होउनी साक्षात्कार | पहावयासी येती चवथा अवतार |
अक्कलकोट पुण्यभूमि थोर | जेथे प्रत्यक्ष दत्त वसे || २२ ||

।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड

लीलाः श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकर्यांस अक्कलकोटास जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरास दृष्टांत झालेले आहेत महाराज आनंदात असताना आपण कोण म्हणून त्यास प्रश्न केल्यास दत्तनगर मूळ पुरुष वडाचे झाड म्हणून उदगार निघत शिवाय मूळ मूळ या प्रमाणे महाराज हमेशा उच्चार करीत असत (बखर १)

लीलाः एकदा नरसोबाच्या वाडीची काही माणसे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आली त्यांनी श्री स्वामींस प्रश्न केला स्वामीन् आपण कोण आहात समर्थ म्हणाले मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे ऐकताच सोनारीण बोलली वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रेय रुपाने अवतरले आहेत.

१) दत्तनगर मूळपुरुष वडाचे झाड हे वंश सातत्याचे प्रतीक आहे ते प्रकृतीचे अक्षय रुप आहे मूळ पुरुष यात पुरु शब्दाचे अर्थ गाव अथवा वस्ती असा आहे नऊ दारे असलेले तुमचे आमचे मानवी शरीर हे ही एक गाव अथवा एक वस्तीस्थानच आहे आपल्या शरीराची ही नऊ दारे म्हणजे दोन डोळे दोन कान दोन नाकपुड्या एक तोंड एक गुद आणि एक लिंग योनी अशा या नऊ दारांच्या गावात म्हणजे पुरात शरीरात वस्तीला असलेला आत्मा हाच तो पुरुष होय हा आत्मा मूळ परमात्म्याचा अंशच असतो म्हणून आत्मा हा मूळ पुरुष होय ब्रह्या विष्णू महेश या त्रिवर्गाचे एकत्रित स्वरुप म्हणजेच मूळ पुरुष.

२) दत्तनगर सरस्वती सोनारणीच्या उत्तरात दत्तात्रेय असा उल्लेख आहे दत्तात्रेय या मूळ पुरुषाचे म्हणजे परमात्म्याचे अंशात्मक स्वरुप सृष्टीवर आले पण त्याला राहण्यासाठी असंख्य योनी निर्माण झाल्या हे आत्मस्वरुप त्यात जीव म्हणून राहवयास गेले अशा या जीवाला राहावयाला वस्तीला दिलेले शरीर हेच नगर अथवा पूर होय ते दिलेले आहे म्हणून दत्त असे हे दत्तनगर आहे याच नगरात मूळ परमात्मा उत्पत्ती स्थिती लय (प्रलय) म्हणजेच ब्रह्या विष्णू महेश या दत्तात्रेय स्वरुपात अवतरल्या असा याचा अर्थ आहे.

३) त्यानंतर मूळ मूळ अशी द्विरुक्ती महाराजांनी उच्चारली आहे एकदा सृष्टीची निर्मितीसाठी ते मूळ निर्गुण स्वरुप ब्रह्या विष्णू महेश अशा त्रिमूर्तीचे स्वरुप धारण करते तर दुसऱ्या वेळी ते जीव रुपाने शरीर धारण करुन सगुण सदेही होते असे जरी असले तरी ते मूळ परमात्म्याचेच विशुद्ध स्वरुप आहे हेच श्री स्वामींनी मूळ मूळ अशा द्विरुक्तीने सूचित केले आहे त्या सोनारणीचा खुलासा वटपत्रशाही अथवा शयनी मूळ पुरुष दत्तात्रेय रुपाने अवतरले आहेत श्री स्वामींच्या व सोनारणीच्या उदगारावरुन श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष परमेश्वराचे कसे कोणते व कोणाचे स्वरुप आहेत याची संक्षिप्त स्वरुपात का होईना कल्पना येते म्हणून श्री स्वामी समर्थांचे नित्य स्मरण म्हणजे परमेश्वराचे स्मरण !

स्वामींच्या प्रकट दिनाविषयी

स्वामी समर्थ महाराज कदी आले, कोठून आले, ते कोण होते या बद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामीसुत नावाचे त्यांचे एक आतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या आनुभावावरून आपल्याला समजेलच कि स्वामी कसे प्रकटले.तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आशी.

शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस (जवळपास २४ कि. मी. अंतरावर) छेली खेडा नावचा गाव होता. त्याठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजय बरोबर राहायचा.तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याश्या अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या आश्या जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती, तर तो विजयसिंग खुप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपती ला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतः वरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंग ला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला .तर तो दिवस होता चित्र शुद्ध द्वितीया. आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने या हि दिवशी तिथे गेला गणपती बरोबर पण आज अचानक त्याच्या मनात आले कि रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तरव सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले”बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही, आज तूच खेळायचं” बस इतके त्यांच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना कि काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची हि सूचना होती., आणि ज्याठिकाणी गणेश मूर्ती होती त्याठिकाणी धरणी दुभंगून एक ८ वर्षाची आतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकढून हरला आणि बालरूप स्वामिनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन तिथून ते गुप्त झाले.

थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून १२ कोस (जवळपास २४ कि. मी. अंतरावर) छेली खेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी शेजारी झाला.

आता शंका हि उपस्थित होईल कि हि गोष्ट कशी काय कळली.पण यागोष्टीचा उलगडा आस झाला.कोकणातील हरिभाऊ (स्वमिसुत) हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापुरती साठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्यला होते .आणि एक दिवस स्वामिनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले सांगितले कि आजपासून तू माझा सुत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरीभाऊना रडू कोसळले कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्ती साठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगता आहेत हे पाहून त्यांना थोड रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले कि “रडतोयस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघू.” आणि ज्यावेळी हरीभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसर तिसर कोणी नाही तर तो स्वमिसुतांचाच पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. आणि या गोष्टीला स्वतः स्वामिनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे.

स्वामी प्रकटदिनाचा उत्सव स्वमिसुत महाराजांनी सुरु केला आहे. ज्यावेळी स्वमिसुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मधे करत होते तेव्हा भुजंगा सारख्या भक्तांनी स्वामिना प्रश्न विचारला स्वमिसुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उततर आसे होते”माझा बळ मी सदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे.”

नाना रेखी नावाचे अहमदनगर चे स्वामीभक्त होते ते स्वमिसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोट ला आले होते तर ते पिंगला जोतिष्य विद्येत पारंगत होते.स्वामिनी त्यांना आज्ञा केली कि माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरु केल. आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता ,तर ते ती कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरु होता.तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामिनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वैगेरे वाहून सर्व दैवतानि त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्याच्या ठेवला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या हायती पर्यंत होते त्यांच्या हातावर. याचाच आर्थ स्वामिनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्ष रित्या स्वामीसुतानी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटन्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले.आणि आजही हि स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगर च्या मठात आहे.

स्वामी समर्थ महाराज कार्द्लीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वताचे खरे नाव, ओळख लपवून चंचलभारती, दिगंबर बुवा आशा नावाने सुद्धा कार्यरत होते.

श्रीस्वामीसमर्थांच्या समाधीलीलेचा हेलावणारा प्रसंग

समस्त जीवांस अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्ममूर्ती चैत्र वद्य त्रयोदशी, सहवद्य चतुर्दशी,  शके १८००, सन १८७८ला समाधीलीलेचे निमित्त करून पृथ्वीतलावरून गुप्त झाली. प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे, याची जराही कल्पना कुणास नव्हती. मागील पंधरा दिवसांत काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवित होते खरे! बारा दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते. पण त्या दिवशी काकुबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली. मग त्यांना निजविले. तेव्हा बाळप्पांनी सुपारी दिली, ती घेतली. राणीसाहेबही तिथे होत्या. त्यांना अत्यानंद झाला. ‘आता माझ्या महाराजांस भय नाही,” असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या. पण त्या दिवशी समर्थकृपेने साधुत्वाला पोचलेल्या असंख्य साधकांचा हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे! समर्थसेवेकरी बाळप्पा यांना बराच अदमास असावा. कारण अक्कलकोटात त्वरेने हजर होण्याच्या तारा त्यांनी काही स्वामीभक्तांस केल्या होत्या. त्यानुसार मुंबईचे केशव नाईक अक्कलकोटात पुत्र रामचंद्र यांच्यासमवेत दाखल झाले. पुढे, २५ जुलै १९२५ला साईलीला मासिकाच्या संपादकांना रामचंद्र नाईकांनी हे वृत्त कळविले होते. ते म्हणतात,- आम्ही अक्कलकोटात पोचलो तेव्हा ती दिव्य भूमी स्तब्ध भासली. त्या नगराची हालचालच थांबली होती जणू! महाराज पेठेतल्या चोळप्पांच्या मठात असतील म्हणून तिथे गेलो, तर तिथे सामसुम होती. काही कळेना. मठाजवळ महाराजांची गाय व वासरू होते. तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती. वासरूही हंबरत होते. काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून आम्ही तसेच वटवृक्षाकडील स्थानावर धावत निघालो. 

इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते, ते पहा- दुपारी १ वाजण्याच्या सुमारास श्रीस्वामीगुरूंनी आपल्या सर्व जनावरांस समोर आणण्याचे फर्मावले. हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले. लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले. त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामीआज्ञा झाली. इतकेच काय, आपली वस्त्रेही श्रींनी त्या इमानी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले. त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभिर्य लक्षात आले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. नित्य सेवेत अंतर पडणार म्हणून सेवेक-यांचे हृदय पिळवटून निघाले होते. कसेतरी आवंढा गिळत, नजर चुकवित ते स्वत:शीच प्रार्थना करीत होते. ब्रह्मांडनियंता स्वेच्छेने लीला दर्शवित होता. त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते. श्रींनी स्वत: उठून जनावरांच्या अंगावर हात फिरविला नि पलंगावर येवून बसले. त्या हालचालींत नित्याचा आवेश नव्हता इतकेच. एरवी समर्थदर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता. महाराजांनी टेकून बसण्याकरीता तक्क्याच्या दिशेने खूण करताच सेवेक-यांनी तो दिला. श्रीपाद भटजींनी त्यांना बसविले. महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले. ते तसेच किंचित मागे टेकले नि त्यांनी लगेचच नेत्र मिटले. आसपास वैदु मंडळी होतीच. कुणाच्याच जीवात जीव नव्हता. पुढे होवून एकाने नाडी पाहिली, तेव्हा तो गडबडला. नाडी मुळीच लागेना. त्याच्या व्यथित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला. भुजंगा सेवेकरी व अन्य नि:सीम भक्त मिळेल तिथे डोके आपटीत होते. कुणी जमिनीवर लोळण घेतली. स्त्रीवर्गाने आकांत मांडला. कोणी आपलेच केस उपटत होता. स्थिरचित्त साधुवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते. धक्क्यातून न सावरलेले कित्येकजण श्रींची काही हालचाल होते आहे का, हे निरखत स्तब्ध झाले होते.

“हे गुरुमाय, अरे देवा, समर्थ सद्गुरु, श्रीस्वामी समर्थ देवा, भगवंता, आम्ही आता कोठे पाहावे, सांगा’’, अशा विविध शब्दांत समस्त जन आक्रंदन करीत होते. कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता. अशा हलकल्लोळात थरथरणा-या अक्कलकोटास अचानक एक क्षणैक सुखद धक्का बसला. श्रींनी आपले नयन सहजच उघडले. प्रेमभावाने सर्वांस न्याहाळू लागले. सर्व गलबला थांबला. सारी लेकरे मायबाप सद्गुरुंच्या पलंगासभोवती सरकली. श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले. तेव्हा समर्थमुखातून श्रीकृष्णावतारावेळी त्यांनी सांगितलेले अद्भूत वचन परत पुन्हा उच्चारले गेले.- अनन्याश्चिन्तयंतो मां ये जना: पर्युपासते ।। तेषांनित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।। -जो अनन्य भावे शरण मजसी, पाहील मुक्तीचा सोहळा ।। जिंकील जीवन कला। जो मजवरी विसंबला ।। समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्रीस्वामीकृतीकडे पाहत होते. श्रींनी आशीर्वादसंकेत दर्शविण्यासाठी हस्तकमल उंचावले. पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. समर्थ निजानंदी निमग्न जाहले. अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशीएवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले. नंतर, श्रीस्वामीदेह दरबार मंडळींच्या आग्रहामुळे, पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेत ठेवण्यात आला. वाजतगाजत मिरवणुकीने, ढोलताशांच्या गजरात, आतषबाजीत त्यांच्या या समाधीलीलेस अंतिम स्वरूप देण्यात आले! तीन दिवस बाळप्पा समाधीत उतरून पूजा करीत होते. मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली.

वडाखाली कर्जाळकरांच्या घरालगत छप्परवजा विश्रांतस्थळी मंगळवार, ३० एप्रिल १८७८, शके १८००, दुपारी २ वाजता चैत्र वद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरु झाल्यावर सायंकाळी ४.३० वाजता ही घटना घडली! पुढे तेथे भंडारखान्यातील दत्त मंदिरात असलेली एक शिवपिंडी वडाखालच्या समाधीप्रसंगस्थळी स्थापन झाली! हेच स्थळ आज अक्कलकोटात वटवृक्ष देवस्थान नामे सुप्रसिद्ध आहे.

श्री स्वामी समर्थ शिष्य परंपरा

ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराजांची शिष्य परंपरा बघणार आहे त्यांचे शिष्य बघून तुम्हाला स्वामी महाराजांच्या अधिकाराची जाणीव नक्की होईल कारण आज त्यांच्या शिष्यांची मंदिरे आहेत त्यांच्या शिष्यांची पूजा केली जाते मग विचार करा आशा शिष्याचा गुरु कसा असेल !

श्री कृष्णसरस्वती (१८३६-१९००), कोल्हापूर 
श्री बाळप्पा (१८३६-१९१०), अक्कलकोट 
श्री रामानंद बिडकर (१८३९-१९१३), पुणे 
श्री नृसिंहसरस्वती, आळंदी
श्री वामनबुवा वाम्बोरीकार (१८४८- १९०१), बडोदा 
श्री ठाकूरदासबुवा, ठाकूरद्वार मुंबई 
श्री चोळप्पा, अक्कलकोट 
श्री तातमहाराज, मुंबई
श्री गोपाळबुवा केळकर, (१८४७-१९१९) चिपळूण 
श्री देव मामलेदार (१८१५-१८८७), नाशिक 
श्री आनंदनाथ महाराज, वेंगुर्ले 
श्री लक्ष्मण कोळी (आनंद भारती), ठाणे 
श्री रांगोळी महाराज, कोल्हापूर 
श्री जमादार, मैदर्गी
श्री स्वामीसुत तथा हरिभाऊ, मुंबई 
श्री सीतारामबुवा, मंगळवेढा 
श्री सच्चिदानंद स्वामीकुमार, मुंबई 
श्री बाबा घोलप (१८२५-१८८८), नाशिक 
श्री काळबुवा (१८२४-१८८४), पंढरपूर व पुणे 
श्री मायुरानंद सरस्वती, सोपारा
श्री नाना रेखी (१८२८-१९१२), अहमदनगर 
श्री शंकर महाराज, पुणे 
श्री गजानन महाराज, शेगाव 
श्री साई बाबा (१८३८-१९१८), शिरडी 
श्री बावडेकर बुवा, बार्शी 
श्री कैवाल्याश्रम स्वामी, गुर्लहोसूर 
श्री सच्चिदानंद महाराज (१८६०-१९३४), पंढरपूर 
श्री श्रीपती बाबा महाराज, महाळुंगे 
श्री जंगली महाराज, पुणे 
श्री दास गोपाळकृष्ण स्वामी, हुपरी 

यातील बहुतांश जणांनी स्वामी महाराज अक्कलकोट आणि त्याच्या आसपास च्या परिसरात वास्तव्यास असताना शिष्यत्व स्वीकारलं होत पण त्याच्या आगोदर स्वामी महाराजांनी शिष्य जे बनवलेत त्यांची इथे नुसती नाव जरी द्यायची म्हंटली तर ती खूपच मोठी होईल. जेव्हा स्वामी महाराज एकाद्याला आपले शिष्यत्व (अनुग्रह) प्रदान करायचे तेव्हा त्याला एक गोष्ट सांगायचे कि आता तू परत अक्कलकोट ला यायचं नाही आम्ही फक्त अक्कलकोट पुरते मर्यादित नसून आम्ही सर्व ब्रम्हांडात व्यापून आहे त्यामुळे इथून पुढे तू स्मरण करशील त्या क्षणी आम्ही तुझ्यापाशी असू.

"श्री स्वामी समर्थ " हा सिद्ध मंत्र, सुरुवात कधी व कशी झाली ?

श्री बाळाप्पाना स्फुरलेला सिद्ध मंत्र 'श्री स्वामी समर्थ'

'श्री स्वामी समर्थ' हा जप किंवा मंत्र श्री बाळप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला, कारण त्यांचे पोट दुखायचे. नाभीस्थानांत एक छोटीशी विषाची पुडी अडकली आहे.

ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल. आता हा सव्वा लाख जप कोणता करायचा? असा प्रश्न श्री बाळप्पा आणि सौ. बाळप्पा यांना पडला. कोणी ग्रामदेवतेचा, तर कोणी कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

शेवटी बाळप्पा श्री स्वामी समर्थां समोर भल्या पहाटे बसले आणि 'श्री स्वामी समर्थ' असे नामस्मरण मनातल्या मनात पुटपुटू लागले. श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला. एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि सव्वा लाख जप कर, तू आपोआप बरा होशील. त्याप्रमाणे अक्कलकोट येथील हाफक्याच्या मारुती मंदिर गुहेत श्री. बाळप्पा गेले, तेथे सतत एक कलमी सव्वा लाख जप केला आणि नाभिस्थानातून विषाची बारीक पुडी बाहेर आली. म्हणून 'श्री स्वामी समर्थ', हा शास्त्र शुद्ध-स्वयंभू आणि स्वत: श्री स्वामी समर्थाची अनुमती असलेला जप मंत्र आहे.