केवळ विद्वानांचाच नाही तर सर्व साधारणांचाही उद्धार करण्यासाठीच श्री दत्तअवतार, दत्ताचा जन्म झाला आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे. अवतार तत्वाचे महत्व क्षीण झाले आहे व आता केवळ पंडीत व उपासक यांच्यापुरतेच महत्व उरले आहे. परमकरुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीन जनांचा उद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती, इत्यादी अवतार आहेत.
श्री दत्तगुरुचे तत्व कल्पनातीत आहे. अवधूत स्वामींच्या रुपांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तीचे एक गृहस्थ रुप पण आहे. ही माहीती बऱ्याचश्या पंडीतानाही माहीत नाही. नित्य अनेक रूपांत प्रकट होणारे स्वामी गृहस्थ रुपांत मात्र अनघास्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्निचे नांव अनघा देवी आहे. जी साक्षांत लक्ष्मीचा अवतार आहे. हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहीक सुख, तत्वज्ञानव्दारा अनुग्रहीत करीत असतात. या दिव्य दांपत्याच्या अष्ट सिद्ध मुलांचा अवतार झाला आहे.
पद्मासनस्थां पदयुग्मनूपुरां पद्मं दधानाममयं च पाण्यो:।
योगार्थे संमीलिता निश्र्चलाक्षींदत्तानुरक्ताम् अनघां प्रपद्ये॥
श्रीप्रभूंच्या दत्तावताराला ‘स्मर्तृगामी’ (स्मरण करताच भक्तावर कृपा करणारे दैवत) असे म्हटले आहे. याचाच अर्थ खूप तपाचरण, भक्ती करणाऱ्या भक्तावरच ते कृपा करतात असे नव्हे तर संकटाच्या वेळी कोणीही त्यांचे स्मरण करताच ते त्याच्यावर कृपावर्षाव करतात. अशा या परमकारुणिक दत्तदैवताने वेगवेगळ्या काळात वेगवेगळे अवतार धारण केले. त्यातील पहिला अवतार म्हणजे ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ होय. आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पीठापूर येथे इ. स. १३२०मध्ये अप्पलराज व सुमती या पुण्यवान दाम्पत्याच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने साक्षात् श्रीदत्तगुरू प्रकट झाले व त्यांनी या अवतारात अनेकांचा उद्धार केला. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्याच काळातील परम भक्त शंकरभट्ट यांच्याकडून त्यांच्या लीला चरित्र ग्रंथांची रचना करून घेतली व हा ग्रंथ ७०० वर्षांनी प्रसिद्ध होईल, असे सांगून ठेवले. मूळ तेलगूत असलेल्या ह्या ग्रंथाचे मराठी भाषांतर हैद्राबादच्या प. पू. श्री हरिभाऊ निटूरकर यांनी केले आहे.
या अनघ दंपतिची उपासना पद्धती, कृतयुगांत साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तवीर्यार्जुनाला स्वत: सांगितली, ह्याचे विवरण व्यास लिखीत दत्तपुराणामध्ये आहे. या युगात या उपासनेचा. व्रताचा प्रचार केल्याने कार्तवीर्य चक्रवर्ति होऊन त्याने एका स्वर्णयुगाचे निर्माण केले. त्रेतायुगांत प्रभु श्रीराम व दशरथ महाराज यांनी हे व्रत आचरण केले. असा पुराणांत उल्लेख केला आहे.
भावीश्योतर पुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण व दत्तपुराण इ. ग्रंथात या व्रताचा उल्लेख आढळतो. यातही भावीश्योत्तर पुराण व ब्रह्मांड पुराण।त हे व्रत केवळ मार्गशीर्ष कृष्णा अष्टमीस व श्रीपाद चारितामृतात प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस अनघाष्टमी मानून हे व्रत करण्यास सांगितले आहे. श्री दत्त म्हणजे अघा पापांचा नाश करणारे हे पंचमाश्रमी आहेत. ग्राहस्थाश्रमाचे आचारण हि त्यांनी केलेले आहे. अत्रिपुत्र दत्त हे अनघा दत्त आहेत व त्यांची पत्नी अनघा लक्षमी रूप आहे. या दाम्पत्यास' निमी, ह्रिमान, किर्तीमान, जितात्मा, मुनींवीर्
व्दापार युगांत हे व्रत थोडे क्षीण झाले. पण भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला उपदेश केला व ह्या व्रताचे आचरण करविले. सर्व भक्तांवर श्री सद्गुरुंच्या कृपादृष्टीमुळे कमी झालेले व्रत पुन: प्रसिद्ध झाले आहे.
श्री दत्तगुरूंचे ‘अवधूत’ हे स्वरूप तर आहेच पण त्या व्यतिरिक्तही त्यांची अनेक स्वरूपतत्त्वे आहेत. अनेकानेक स्वरूपात साकारणाऱ्या या लीलामूर्तीला एक गृहस्थस्वरूपही आहे. याच गृहस्थस्वरूपाला अनघस्वामी असे नाव आहे आणि अर्थातच त्यांच्या अर्धांगीला अनघालक्ष्मी असे म्हणतात. व्यासोक्त दत्तपुराणात व भविष्योत्तर पुराणातही या अनघ व अनघालक्ष्मी व्रताचा, पूजेचा संदर्भ आहे. सांप्रत अनेकांना याची माहिती नसते. अनघालक्ष्मीचे स्वरूप व व्रत समजावे हा या लेखाचा उद्देश आहे.दत्तनाम महायोगी विष्णोरंशो महीतले ।
द्वितीयोऽनघो नाम लोकेऽस्मिन् परिश्रुत: ॥
तस्य भार्याऽनघा नाम बभूव सहचारिणी ।
अष्टपुत्राऽतीव वत्सा सवैर्ब्राह्म गुणैर्युता ॥
अनघो विष्णुरूपेण लक्ष्मीश्र्चैषाऽनघा स्मृता ॥
श्रीपादश्रीवल्लभचरित्रात अनघालक्ष्मीचे प्रकट झालेले स्वरूप अधिकच व्यापक आहे. श्रीपादश्रीवल्लभ स्वत: म्हणतात, अनघालक्ष्मीचा ‘अनघ’ हे माझे दत्तस्वरूप आहे. अर्थातच श्रीदत्तमूर्ती ही त्रिगुणात्मक त्रैमूर्ती आहे. तिच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीनही देव व त्यांच्या शक्ती एकवटलेल्या आहेत. म्हणून महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिन्ही तत्त्वांचे मिळून एक आगळे दिव्य मातृस्वरूप आहे व तोच अनघालक्ष्मीचा आविर्भाव आहे. म्हणून अनघालक्ष्मी ही महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिघींनी धारण केलेल्या तादात्म्यस्थितीचे प्रतीक आहे. अनघ हे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रीकरणाचे तादात्म्य धारण करून व्यक्त केलेले शक्तिस्वरूप आहे. या शक्तिस्वरूपाचा अनघालक्ष्मी हा आधार आहे. ती एक दिव्यशक्ती आहे. या दिव्यशक्तीला अनघदेवाने वामभागी धारण केले आहे.
सुरुवातीला एक यंत्र दिले आहे जे अष्टदल पद्म आहे. त्याच्या एक एक पाकळीत विविध देवतांची नावे लिहिली आहेत. घरांत एक सिंहासन तयार करून तांदूळ, हळद कुंकु, यांचे अष्ट दल पद्म तयार करून, विविधे देवतांच्या नावाच्या जागी कलश किंवा सुपारी, विडयाचे पान, तुळशीचे पान, ठेऊन विविध देवतांचे कल्पोक्त विधानाने आवाहन करावे.
या प्रकारे पिवळा, लाल पांढऱ्या रंगाने युक्त तीन धागे एकत्र करून त्याच्या मध्ये गाठ बांधावी व धागा वेदिकेच्या मधे अनघा दंपति जवळ ठेवावा. व्रत समाप्त झाल्यानंतर धागा उजव्या हातात बांधावा किंवा हा धागा आपल्या प्रिय व्यक्तीला देऊन त्यांना व्रताची दिक्षा दयावी. आवश्यकता आसल्यास २ किंवा ३ धागे तयार करून पूजा करता येते. धागा बांधताना प्रार्थना करावी.
ब्रह्म विष्णू महेशान
रूपिन त्रिगुण नायक ।
त्रैवर्णिक नमस्तुभ्यं
तोर देवाsनघात्मक ॥
अनघ स्वामींना नैवेद्य रूपांत अनेक फले, व पाच खारीका अर्पित करावीत. या शिवाय महानैवेद्यही दाखवावा.
अविवाहित मुली, पारिवारिक कलहग्रस्त यांना अनघा देवीची अर्चना (पूजा) कुंकुमाने केल्यास व्रताचा विशेष प्रत्यक्ष प्रभाव मिळतो. हे व्रत सर्व करू शकतात. या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी आहे. सामान्यत: प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला हे व्रत करावे. काही लोक शुक्ल अष्टमीलाही हे व्रत करू शकतात. अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे पापहीन. मन, वाचा, कर्म व्दारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो. या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्या रुपात येते. अशा पापांना दूर करणारे. जगाचे जनक जननी अनघ दंपति होय.
सर्व सद्भक्तांनी हे व्रत आचरण करून आपल्या सौभाग्यात वाढ प्राप्त करू शकतात व श्री गुरुदत्तांचे कृपा पात्र होऊ शकतात.
श्रीपादप्रभूंनी स्वत:च सांगितले आहे की, सरस्वती ही सृष्टीतील आद्यदेवता आहे. या ज्ञानदेवतेला प्रेरणा देणारी महासरस्वती आहे. म्हणून सरस्वती व महासरस्वती ह्या दोघी वेगळ्या आहेत. महासरस्वती हे अनघास्वरूपच आहे. सृष्टीचे स्थितीकरण, समृद्धीकरण हे लक्ष्मीमातेचे स्वरूप आहे. लक्ष्मीच्या या कार्याला प्रेरणा देणारी महालक्ष्मी हेही अनघास्वरूपच आहे. तसेच शक्ती हे स्वरूप असणारी काली देवता आहे व तिला प्रेरणा देणारी महाकाली ही कालस्वरूपाची प्रेरणा असणारे अनघास्वरूप आहे.
ही अनघालक्ष्मीच पद्मावती आहे, राजराजेश्वरी आहे. तसेच ती दशमहाविद्यास्वरूपिणीही आहे. सर्व अध्यात्मसाधनांचे अंतिम साध्य असणारी अध्यात्मविद्या-प्राप्ती हे तिचे प्रधान लक्ष्य आहे. दृश्य जगताच्या सृष्टीच्या मूलकारणाचा शोध घेणे हे या अनघालक्ष्मीच्या कृपेचे फलित आहे.
अनघालक्ष्मी ही संपूर्ण परिपूर्णता स्थिती आहे. राजराजेश्र्वरी विवेकाची स्वामिनी, महाकाली बलाची स्वामिनी, महालक्ष्मी सौंदर्य व समृद्धीची स्वामिनी, म्हणजेच विवेक, बल, सौंदर्य, समृद्धी व प्रत्येक कर्मातील कौशल्य (योग: कर्मसु: कौशलम्) या सर्वांच्या तादात्म्याने येणारी परिपूर्णता जीवनात असेल तरच अनघालक्ष्मीची कृपा होईल हे स्पष्ट आहे.
श्रीअनघादत्तव्रत प्रासादिक महत्वपूर्ण माहिती
ॐ श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयाय नम:
ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः
अनघालक्ष्मी
परमकरुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीन जनांचा उद्धार केला आहे. श्री दत्तगुरुंचे तत्व कल्पनातीत आहे अवधूत स्वामींच्या रुपामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लिलामूर्तींचे एक गृहस्थ रुप पण आहे. स्वामी गृहस्थ रुपांत मात्र अनघस्वामी किंवा अनघास्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नीचे नांव अनघा देवी आहे जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. हे दांपत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख, तत्वज्ञानद्वारा अनुग्रहित करीत असतात. अनघ दंपतिची उपासना पद्धती, कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरुंनी आपला प्रिय भक्त कार्तर्वीर्यार्जुनाला स्वतः सांगितली.ह्याचे विवरण व्यास लिखीत दत्तपुराणामध्ये आहे. त्रेतायुगात प्रभू श्रीराम व दशरथ महाराज यांनी केले. या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीहा आहे. पण कोणत्याही अष्टमीला केले तरी चालते. अघ म्हणजे पाप अनघ म्हणजे पापहीन, मन, वाचा, कर्म द्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो. या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्यारुपात येते. अशा पापांना दूर करणारे, जगाचे जनक जननी अनघ दंपति होय.
श्रीपाद श्रीवल्लभस्वामींनी विशेष पुरस्कारिलेले श्रीअनघादत्तव्रत
सर्व स्त्री-पुरुषांनां संतती, संपत्ती, विवाहसौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्रशुद्धव्रत. अनघाष्टमीव्रत श्रीदत्तसंप्रदायातील एक अप्रकाशित व्रत आहे. फारच कमीजणांना त्याची माहिती आहे.
व्रत कोणी व केव्हा करावे
मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस, तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस (किंवा शुद्धाष्टमीस) "अनघाष्टमी" मानुन सकाळी हे व्रतकरावे, शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करुन करावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा, दिवसभर केवल फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत. सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे.
हे व्रत का करावे
ही अष्टमी 'अघ म्हणजे पाप' नाहीसे करते, त्यामुळे हे व्रत करणार्याने पापनिरसन व दारिद्रनाश होऊन त्याला दैवीसंपत्ती, अष्टैश्र्वर्यलाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्वपुण्यकर्मफळांची प्राप्तीहोते. मनोकानापूर्ती व निर्मलकीर्तीलाभ होतो. सर्व रोगनिरसन होऊन, सातजन्म आरोग्यलाभ होतो, कुमारिकांना सद्दगुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यशलाभ होतो. स्त्रीयांना सौभाग्यलाभ होऊन त्यांची कुटूंबसंतती वाढते, तसेच गृहकलहनिवृत्ती होऊन सुखशांती लाभते. सर्वत्र कल्याण होऊन, श्रीअनघामाता व श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन, अंती मोक्षलाभ होतो.
व्रताची मांडणी
घराची जमीन ( जाडेमीठ, हळद, गोमुत्र किंवा हिंग, गुलाबपाणी ) स्वच्छकरुन घ्यावी.यानंतर स्नानकरुन, नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा सुद्धस्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालुन, त्याभोवती रांगोळी काढावी. त्यावर मध्यभागी एकमूठ तांदूळ घालुन पूर्वेपासून आठ दिशेस एक एक मूठ तांदूळ घालावे, त्यानंतर मध्यभागी शुद्धपाण्याने भरलेला कलश ठेऊन, त्याला पाच हळदी, कुंकवाची बोटे ओढावीत. त्यामध्ये गंध, अक्षता, फूल, सुपारी-नाणे व आंब्याचा डहाळा घालावा, त्याव्र तांदळाने भरलेले ताम्हाण ठेऊन त्यात अनघदत्तमूर्ती ठेवावी,या दत्तपीठाच्या डावीकडे (आपल्या उजव्या हातास) चौरंगावर एकमूठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी, समोर पाच विडे (२ पाने, १ नाणे, १ सुपारी म्हणजे एक विडा) केळे, फळ इ. मांडावे तसेच गूळसाखर व २ नारळ ठेवावे.
व्रतसूत्र
श्रीअनघदत्तात्रेयांच्या मुर्तीजवळ लालदोरा (व्रतसुत्र) ठेवावा. ( व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा. आपल्या सगेसोयर्यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे ठेवावेत, व्रत झाल्यानंतर स्वीकारणार्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणुन अन्यथा स्वतःस व्रतासंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरुपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघाष्टमी पूजेवेळी पहिल्यापूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे.)
व्रतपूजा
यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर श्रीअनघादत्ताचे आवाहन करावे, कलशाभोवती आठ दिशेस ठेवलेल्या तांदळाच्या पुंजावर अणिमादि अष्टसिद्धीस्वरुप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. यानंतर श्रीअनघासहित श्रीअनघदत्ताय नमः ॥
या मंत्राने श्रीअनघादत्त, अणिमादि दत्तपुत्र व व्रतसूत्र इ. देवतांचे पूजन करावे व श्रीदत्तदेवासं तु़ळ्सीपत्राने व श्रीअनघामातेस कुंकवाने शतनामार्चन करावे.
ॐ श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः
।।अथ श्री अनघाकवचाष्टकम्।।
शिरो मे अनघा पातु,
भालं मे दत्तभामिनी।
भ्रूमध्यं योगिनी पातु,
नेत्रे पातु सुदर्शिनी ।।१।।
नासारंध्रद्वये पातु,
योगिशी भक्तवत्सला।।
मुखं में मधुवाक्पातु,
दत्तचित्तविहारिणी ।।२।।
त्रिकंठी पातु मे कंठं,
वाचं वाचस्पतिप्रिया।
स्कंधौ मे त्रिगुणा पातु,
भुजौ कमलधारिणी ।।३।।
करौ सेवारता पातु,
ह्यदयं मंदहासिनी।
उदरं अन्नदा पातु,
स्वयंजा नाभिमंडलम् ।।४।।
कमनिया कटि पातु,
गुह्यं गुह्येश्वरी सदा।
ऊरु मे पातु जंभघ्नी,
जानुनी रेणुकेष्टदा ।।५।।
पादौ पादस्थिता पातु,
पुत्रदा वै खिलं वपु:।
वामगा पातु वामांगं,
दक्षांग गुरुगामिनी ।।६।।
गृहं मे दत्तगृहिणी बाह्ये,
सर्वात्मिकाSवतु।
त्रिकाले सर्वदा रक्षेत्,
पतिशुश्रुणोत्सुका ।।७।।
जाया मे दत्तवामांगी,
अष्टपुत्रा सुतोS वतु।
गोत्रमत्रि स्नुषा रक्षेद्,
अनघा भक्त रक्षणी ।।८।।
य: पठेद अनघाकवचं नित्यं भक्तियुतो नर:।
तस्मै भवति अनघांबा वरदा सर्व भाग्यदा ।।
इति अनघाकवचाष्टकम् ।।