श्रीपाद छाया आश्रम पंचदेव पहाड कुरवपूर

श्रीपाद छाया आश्रम  पंचदेव पहाड कुरवपूर
श्रीपाद छाया आश्रम पंचदेव पहाड कुरवपूर


(क्षेत्र कुरवपूर) पंचदेव पहाड, मक्तल मंडल, जि. नारायणपेठ, तेलंगाना 509298

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या आज्ञेवरून व त्यांच्या आशीर्वादाने दि. 03-05-2014 रोजी  श्रीपाद छाया आश्रमाची स्थापना झाली.

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा जन्म ह्या कलियुगात इ.स. 1320 ( भाद्रपद शुक्ल 4, विनायक चतुर्थी या शुभ दिवशी) श्री अपलराज शर्मा व अखंड सौभाग्यवती सुमती महाराणी यांच्यापोटी झाला. श्रीपाद स्वामी मातेच्या गर्भातून साधारण बालकाप्रमाणे न येता ज्योती स्वरूपाने अवतरले. जन्म होता क्षणीच प्रसूतीगृहातून मंगल वाद्यांचा ध्वनी झाला. या दांपत्याचे हे तिसरे अपत्य होय. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात पीठापूर येथे 16 वर्ष राहिले. स्थाने उत्तम शोधुनी त्रिभूवनी नाहीं असे पाहुनी। कुरवपूर स्थानाची तपश्चर्येसाठी निवड केली. त्याठिकाणी विविध लीला दाखवून आश्विन वद्य 12 (द्वादशी) ह्या दिवशी कृष्णा माईच्या नाभी स्थानी अंतर्धान पावले.

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी कृष्णा नदी काठी दरबार चालवला व दत्तपीठाची स्थापना केली. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी कृष्णा नदी काठी पंचदेव पहाड येथे पंचयज्ञ केला होता. आज ते तेलंगाना प्रदेशातील जिल्हा नारायणपेठ, मंडल मक्तल येथे आहे. स्वामींनी आपल्या भक्तांना सांगून ठेवले होते की माझा दरबार जेथे चालवला तेथे पक्की इमारत बांधली जाईल व तेथे अंखड नाम व अग्नी यज्ञ वालेल. तेथे गोशाळा असेल. तेथे मी माझे चमत्कार दाखवीन.

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या आज्ञेवरून व त्यांच्या आशीर्वादाने श्रीपाद छाया आश्रमात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,  ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाचा अखंड नामजप दि. 18-04-18 पासून चालू आहे आणि अग्नि यज्ञ दि. 08-02-2019 पासून 24 तास चालू आहे व हा 13 वर्ष चालणार आहे.

श्रीपाद छाया आश्रमात 48 एसी व नॉन एसी खोल्यांची व्यवस्था भक्तांसाठी आहे. या ठिकाणी जाती भेद-भाव पाळला जात नाही.

 दि. 18-04-2018 साली गायत्री स्तूपाची प्रतिष्ठापना झाली. याला ’सूची’ असे नाव देण्यात आले. 10 लाख गायत्री मंत्र लेखन आले. 2010 पासून महिन्याच्या दुसर्‍या रविवारी गोमहालक्ष्मी पूजा, अनघा लक्ष्मी व गायत्री यज्ञ चालू आहे. गेल्या काही वर्षापासून रामनवमी उत्सव आणि दुर्गा नवरात्री मध्ये मुळ-नक्षत्रापासून 3 दिवस देवीचे पूजन चालू आहे. श्रीदत्त जयंती व गुरु पोर्णिमेला विशिष्ट पूजा अभिषेक व दत्त यज्ञ साजरा करतात.

श्रीपाद स्वामींच्या आज्ञेप्रमाणे भारत देशात सर्वांना नोकरी  मिळावी व योग्य वेळी योग्य स्थानी मुबलक पाऊस पडावा आणि शेती चांगली पिकावी. यासाठी दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, ब्रह्मा विष्णू महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा अखंड जप दि. 18-04-2018 पासून चालू केला आहे व अग्नि यज्ञ दि. 8-2-2019 पासून सुरु केला असून हा पुढे नाम जप व अग्नी यज्ञ 24 तास व सतत 12 वर्ष चालणार आहे.

अनेक संतांनी नामाचा महिमा सांगितला आहे. कलियुगात नाम जपावा मोठा महिमा आहे. कलियुग हा दोषांचा खजिना असला तरी त्यात खूप मोठा गुण आहे, तो गुण म्हणजे केवळ नाम जप केल्याने सर्व आसक्ती मुक्त होतात, मन शुद्ध होऊन मोक्षाच्या मार्गाला लागते. आपले वित्त नामामध्ये गुंतले की देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. दुःख ही परमात्म्याची इच्छा जाणून जो भगवंताचा झाला त्याला देह प्रारब्धावर टाकता येतो.

यज्ञ ही हिंदू धर्मातील एक महत्वाची धार्मिक प्रथा आहे. यज्ञ ही वैदिक काळापासून वैयक्तिक किंवा सामाजिक विधिचा एक भाग आहे. विधिवत अग्नी, दिव्य अग्नी, अग्नी देव हा देवांचा दूत मानला जातो. या विधिद्वारे देव आणि मानव यांच्यात आध्यात्मिक देवाण घेवाण केली जाते. नाम जप व अग्नि यज्ञात आपण सर्व जण सहभागी होऊ शकता. इच्छुक भक्तांनी ह्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा 9912314718

श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या आज्ञेने आणि आशिर्वादाने आश्रमात नित्य अन्नदान चालू आहे. डिसेंबर 2007 पासून ते 2014 पर्यंत पांडुरंग स्वामी मंदिरात नित्य अन्नदान चालू होते. नंतर दि. 03-05-2014 पासून श्रीपाद छाया आश्रमाची पक्की इमारत बांधली तेथे सुद्धा नित्य अन्नदान चालू आहे. रोज 200 गरीब मुले, अनाथ, वृद्ध लोक जेवायला असतात. अन्नासाठी तळमळणार्‍यांना अन्न दिल्यास त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ आहे. तिन्ही लोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाही. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोक्ता हे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. दत्त संप्रदायात असे सांगितले गेले आहे की जेथे अन्नदान बालू असते तेथे स्वामी सूक्ष्मरुपात येत असतात.

नंदिनी गो-शाळेत 50 गाई आहेत. येथून आलेल्या दूधाने देवळात अभिषेक होतो आणि अन्न दानांत वापरले जाते.आपल्या पुराणात गोपूजेला खूप महत्व दिले आहे. हिंदू परंपरेत गायीची पूजा करण्याची प्रथा आहे. याला गोपूजा म्हणतात. पुराणात सांगतात की चार समुद्र  गाईच्या दूधात आहेत. वैदिक विद्वान म्हणतात की गायीच्या सर्व भागामध्ये सर्व जग लपलेले आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष मिळवण्यासाठी गायीची उपासना केली पाहिजे.

माहितीवजा सूचना:

1. आश्रमात इतर प्रांतातून आलेल्या यात्रेकरूंसाठी सकाळी नाष्टा, दुपारी व रात्री जेवणावी व्यवस्था आहे.

2. आपण आपल्या आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा आपल्या आयुष्यातील महत्वाचे / आनंदाचे क्षण साजरे करु इच्छित असाल तर त्या निमित्ताने आपल्या नावाने पुजा व अभिषेक करायचा असेल तर रु. 5001/- देणगी द्यावी.

3. आश्रमात 24 तास नाम जप व अग्नी यज्ञ चालू आहे व पुढे असे 12 वर्ष चालणार आहे. आश्रमात दुपारी 1 वाजल्यापासून सर्वांसाठी खुले अन्नदान आहे.

4. आश्रमात खोलीचे बांधकाम चालू आहे. एका खोलीच्या बांधकामाचा खर्च सुमारे दोन लाख रुपये आहे. ह्या रकमेची देणगी देणार्‍याचे नाव ह्या खोलीला देण्यात येईल. जे देणगी देतील त्यांनी आधी सूचना दिल्यास वर्षातून 7 दिवस विनामूल्य राहता येते.

5. श्रीपाद छाया आश्रमात 48 ए सी व नॉन ए सी खोल्यांची व्यवस्था भक्तांसाठी आहे. या ठिकाणी जाती भेद-भाव पाळला जात नाही.

आपण या भगवंत कार्यात सहभागी होऊन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेचा लाभ घ्यावा हे नम्र विनंती.आपली इच्छित देणगी फूल न फुलाची पाकळी या स्वरूपात रोख किंवा चेक ने देऊ शकता. देणगी बेक ने द्यायची झाल्यास कृपया चेक नंदिनी गोशाळा ट्रस्ट  या नावाने खालील दिलेल्या खात्यात जमा करावा.

BANK NAME :  UNION BANK OF INDIA
ACCOUNT NAME :  NANDHINI GOSHALA TRUST
ACCOUNT NO. :  128911100001732
ACCOUNT TYPE :  CURRENT ACCOUNT
IFSC CODE :  UBIN0812897
BRANCH :  MAKTHAL

देणगी गूगल-पे किंवा फोन-पे ने देण्यासाठी: मोबाईल क्र. 9912314718 

आश्रमातील नैमित्तिक कार्यक्रमांची सूची: 

1. रोजचे कार्यक्रम : श्री दत्ताची पूजा व अभिषेक सकाळी 6 वाजता दुपारी 12 वाजता आरती व महाप्रसाद

2  दर गुरुवारी रात्री 8 वाजता पालखी सेवा

3. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या रविवारी गो महालक्ष्मी व अनघा लक्ष्मी पूजा, गायत्री यज्ञ.

4. वार्षिक उत्सव : रामनवमी, दुर्गा नवरात्री, दत्त जयंती व गुरु पौर्णिमेला विशिष्ट पूजा अभिषेक व दत्त यज्ञ