श्री दत्तमंदिर मुरुड

श्री दत्तमंदिर मुरुड
श्री दत्तगुरूंचे देवस्थान मुरुड

कोकणच्या सौंदर्य मध्ये प्रासादिक भर घालणारे हे दत्तमंदिर समुद्र सपाटी पासून सुमारे ३५० ते ४०० मीटर उंचीवर 106 गुंठे जमिनीवर आहे. हे मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध असून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक लहान-मोठ्या व्यक्तींचे योगदान आहे. १८०० व्या शतकाच्या मध्यास ब्रम्हेन्द्रस्वामी धावडशिकर या सिद्ध प्राप्त साधूने या टेकडीच्या माथ्यावरील सपाट मैदानात उंबराच्या झाडापाशी श्री. दत्तगुरूंच्या पवित्र पादुकांची प्रतिष्ठापना केली अशी अख्यायिका आहे. २० व्या शतकाच्या प्रारंभीक १९०६ ते १९०७ च्या सुमारास जंजिरा संस्थानाचे सरन्यायाधीश पदी असलेल्या राज्याध्यक्ष यांनी स्वखर्चाने छोटी श्री. दत्तगुरूंची मूर्ती आणून त्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली. सोबत मूर्तीपुढे त्यापूर्वी ब्रम्हेन्द्रस्वामीनी प्रतिष्ठापित केलेल्या श्री. दत्तगुरूंच्या पादुका आजतागायत आहेत. कालांतराने जंजिरा संस्थान खालसा झाले त्यानंतर खूप वर्ष्यानंतर रस्त्याची देखभाल होऊ शकली नाही.

श्री दत्तगुरूंचे देवस्थान मुरुड गावचे उत्तरेकडे टेकडीवर अतिशय सुंदर व अप्रतिम ठिकाण आहे. तेथून मुरुड शहरातील निसर्गरम्य अशा नारळी पोफळीच्या हिरव्यागार बागांचे दर्शन होते. श्री. सद्गुरूंच्या लहानशा मंदिरावर प्रशस्त मंदिर बांधले जावे अशी भक्तांची इच्छा होती. १९२६-२७ मध्ये दत्त मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. त्यावेळी मंदिराचे सभागृह कौलारू होते जे आज देखील जपून ठेवण्यात आले आहे. सभागृहात छताला लाकडी सीलिंग होते. त्यावर दत्त मंदिरातून दिसणारा आजूबाजूच्या परिसराची चित्रे कोरण्यात अली होती. त्यावेळीचे जिर्णोद्धाराचे कार्य कै. चिंतामणी अनंत जोशी यांचा पुढाकार होता. कालांतराने अलीकडे सन 1997 मध्ये मंदिराचा पुन्हा जिर्णोद्धार करण्यात आला. त्याकरिता मंदिराच्या ट्रस्टीचे असे म्हणणे होते की मंदिराचा पाया व भिंती कायम तशाच ठेवून आरसीसी चे सभामंडप करावे. त्याकरीता चौलकर कुटुंब यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण भॊवतालचे आरसीसी काम व गाभाऱ्यातील देव्हाराचे काम स्वखर्चाने करून दिले. तसेच अलीकडे मंदिराच्या श्री. दत्तगुरूंच्या मूर्तीसाठी लाकडी देवरा तयार करण्याचे काम चौलकर कुटुंबाने खर्च करून श्री. नयन जमादार यांच्या कामगिरीतून पार पडले. १९८८ साली श्री. नरेश खोत व विलास खोत या बंधूने अगरदांडा रस्त्यापासून ते थेट मंदिरापर्यंत दगड व मुरूम यांच्या सहाय्याने रस्ता करून त्यावर डांबरीकरण केले.

श्री. दत्तगुरूंची मूर्ती
श्री. दत्तगुरूंची मूर्ती

सध्या अस्तित्वात असलेल्या ट्रस्टी देवळाची देखभाल तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम, दत्तजयंतीला यात्रेचे आयोजन अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित रित्या करीत असत. स्थानिक व मुंबई पुणे येथून अनेक भक्तगण येत असल्याने येथे विश्वस्त मंडळ धर्मशाळा बांधायचे नियोजन सुरू आहेत. अनेक दत्तभक्त येथे आवर्जून दर्शनास जातात व  दत्तगुरूंचे आशीर्वाद घेऊन कृतकृत्य होतात. आपण ही आशीर्वाद घेऊन या.

सदर माहिती  खालील दत्तभक्तांनी उपलब्ध करून दिली आहे  
विनायक रांजणकर मोबाईल +91 72760 26884 व भारत रांजणकर