श्री क्षेत्र गेंडीगेट दत्तमंदिर, बडोदे

स्थान: बडोदे (गुजरात राज्य)  
सत्पुरूष: श्री वामनबुआ वामोरीकर 
विशेष: अक्कलकोट स्वामींच्या पादुका, महावस्त्र, पंचायतन ठेवलं आहे

श्री एकमूखी गुरुदेव दत्त मंदीर बडोदा, गेंडी गेट

बडोद्यात गेंडी गेट जवळच हे मंदीर आहे. ह्या मंदीरा संबधी ची कथा अशी आहे. 

श्री अनंतसूत कावडीबाबा महाराज हे मातृपितृभक्त होते. महाराजांचे मूळ नांव श्री विठ्ठल अनंत पिंपळगावकर. ते मूळ चे सोलापूर कडचे. वडीलाच्या ईच्छेनूसार त्यांनी माता पित्यांना कावडीत बसवून ते काशी यात्रेला निघाले. वाटेत मातेचे निधन झाले ते पाहून प्रयाग येथे वडिलांनी सन्यास घेतला व ब्रम्हाव्रतात समाधी घेऊन नारायणस्वरूपी लिन झाले. हे पाहून कावडी बूवांना वाईट वाटले. रिकामी कावड माघारी न नेता त्यात विठ्ठल रूकमाई च्या मूर्ती घेउन परतीचा मार्ग चालू लागले. 

१८५६ मध्ये ते बडोदा येथे पोहोचले. तेव्हा त्यांचा मूक्काम श्रीराम मंदीरात होता. तेथेच ते श्री गुरुभक्तीत रमले. ह्याच स्थानी त्यांनी श्री दत्त प्रबोध  हा ग्रंथ लिहला. श्री अनंतसूत विठ्ठल उर्फ कावडीबाबा विरचित श्री दत्त प्रबोध मराठी ग्रंथाचे पारायण केल्याने श्री गुरुचरित्र पठाणाचे फळ लाभते. ते महान श्री दत्त भक्त होते. एका भक्ताने बऱ्हाणपूर चोरवडी मार्गावर राममंदीर बांधून तिथेच विठ्ठल-रूकमाईची स्थापना केली. पूढे ते वैकूंटवासी झाल्यावर तिथेच हे एक मूखी दत्त स्थापना झाली.

हे खाजगी देवस्थान प्राचीन असून मुख्य मूर्ती श्रीमहाविष्णूची आहे. कै. शंकरराव लक्ष्मणराव पट्टणकर ह्यांना त्यांचे गुरू ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वामोरीकर (पूर्ण दत्तावतारी श्री अक्कलकोट स्वामीसमर्थांचे शिष्य) ह्यांनी स्वत:च्या पूजेतील देव, अक्कलकोट स्वामींच्या प्रतिमा, चरणपादुका, महावस्त्र (छाटी), पंचायतन, श्रीदत्तमूर्ती - वगैरे नित्य पूजेसाठी दिल्याने ते वरील मंदिरात आहेत. शिवाय कै. सौ. उमाबाई (कै. श्री. शंकररावांच्या पत्नी) ह्यांच्या अंगात दर गुरुवारी आरतीच्या वेळी श्रीस्वामीसमर्थांचा संचार होत असे व जिज्ञासूंना मार्गदर्शन मिळत असल्यामुळे हे ‘दत्तमंदिर’ म्हणून ओळखले जाते. श्री वामनबुवा वामोरीकर यांनी श्री स्वामी समर्थ चरित्र ग्रंथ लिहीला. 

गुरुपौर्णिमा, श्रीदत्तजयंती, ब्र. वामनबुवा व अक्कलकोटस्वामीसमर्थांची पुण्यतिथी वगैरे उत्सव यथाशक्ती साजरे केले जातात.