श्री क्षेत्र हिप्परगी

श्री कल्लेश्वर महादेवचे साधारणतः ८५० वर्षे जुने मंदिर
श्री कल्लेश्वर महादेवचे मंदिर

कल्लेश्वर महादेव मंदिर आणि श्री नरहरी कवीचे मूळ घर, हिप्परगी (मंदेवाल) हे  गाणगापूरपासून ३९ कि.मी. अंतरावर विजापूर जिल्ह्यातील एक छोटेसे गांव आहे.

गुलबर्गा - जेवरगी - सिंदगी - बीजापुर हायवे वर हिप्परगी (मंदेवाल) हे गाव असून मुख्य रस्त्यापासून साधारणतः ०३ कि. मी आत जावे लागते. या गावात श्री कल्लेश्वर महादेवचे साधारणतः ८५० वर्षे जुने मंदिर असून, ह्या मंदिराला एक ऐतिहासिक महत्व पण आहे. श्रीगुरुचरित्रातील ४६ व्या अध्यायात नरहरी कविबाबत या स्थानी घडलेल्या घटनेचा उल्लेख आहे. ह्याच मंदिरात महाराजानी नरहरी कवींना साक्षात्कार दिला, पुढे नरहरी कवि श्रींचे भक्त झाले आणि गाणगापुरात श्रींवर स्तुतीपर अनेक कवने करून त्यांच्या अखंड सेवेत राहिले.

आज मितीला ह्या गावात श्री नरहरी कवींची ८ वी पिढी (श्री दत्तोपंत जोशी, मो. नं. - ०९७३१६०६८६२) श्री नरहरी कवींच्या मूळ घरत राहते.

येथे आम्हाला जुने श्री गुरुचरित्र बघायला मिळाले. तसेच श्री नरहरी कवींचे पिढीजात देवघर पण बघायला मिळाले. ह्या देवघराची दोन वैशिष्ट्ये म्हणजे - महाराजांच्या कृपाभिशीर्वादाने मिळालेले शेवंतीचे फुल आणि पिढीजात पूजेत असलेले शिवस्वरूप बाण. महाराजांच्या कृपाभिशीर्वादाने मिळालेले शेवंतीचे फुल आज बघायला उपलब्ध नाही. हे फुल श्री नरहरी कवींच्या पुढील चार पिढ्या पर्यंत होते आणि नंतर अदृश्य झाले / गायब झाले असे आम्हाला कळले. तसेच चार पिढ्या पर्यंत रोज ३ गुंज सुवर्ण प्राप्ती पण होत होती अशी माहिती मिळाली.

एकदा ह्या अद्भुत ठिकाणी भेट देऊन, दर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा.

श्री कल्लेश्वर महादेवचे मंदिर
श्री कल्लेश्वर महादेवचे मंदिर

माहिती संकलन - गिरिश शाहापूरकर

श्री कल्लेश्वर महादेव मंदिर आणि श्री नरहरी कवीचे मूळ घर, हिप्परगी (मंदेवाल)
https://2g3svp.blogspot.com/2020/07/blog-post_78.html 

*गुगल नकाशावरील स्थान -*

श्री नरहरी कवीचे मूळ घर -
https://goo.gl/maps/MYVJmeXVDKNLLGXs6

Hippargi Kalleshwar Temple
Hipperga S.Nelogi, Karnataka 585310
https://goo.gl/maps/8dF5ctVeBypsksQL8

श्री नरहरी कवींचे पिढीजात देवघर
श्री नरहरी कवींचे पिढीजात देवघर
जुने श्री गुरुचरित्र
जुने श्री गुरुचरित्र